Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 01, 200720 02-01-07  3:50 am
Archive through February 08, 200720 02-08-07  9:45 am
Archive through February 12, 200718 02-12-07  4:34 am
Archive through February 14, 200720 02-14-07  2:49 am

Badbadi
Wednesday, February 14, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी, मस्त तरल ग :-)
मिल्या, देवा....:-)


Jayavi
Wednesday, February 14, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी..... अगं किती गोड कविता गं....... मी आलेच नाही इकडे. स्वप्नातला तो तर एकदम आवडेश :-)

मिल्या..... एकदम सही यार. बरं झालं..... प्रसाद फ़क्त पुरुषांच्याच भावना व्यक्त करतो. तू आमच्या बाजूने बोललास..... म्हणून अजून छान वाटलं :-)

देवा......... वा..... मजा आ रहा है :-)
पूनम अगं मस्तच..... पण इथे का गं?

अपर्णा........ तुझा पण बीबी चुकलाय. कविता आवडली.




Shyamli
Wednesday, February 14, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम जयाला अनुमोदन इथ्थे कित्थे?
सहीये :-)
देवा :-)

Vaibhav_joshi
Wednesday, February 14, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा , पूनम छान पण इकडे कुठे ?
देवा ..
:-)


Aparnas
Wednesday, February 14, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, वैभव कविता मधे टाकली आहे ही कविता पूनम, केपी आणि मिल्याच्या सांगण्यावरून.

Vaibhav_joshi
Wednesday, February 14, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बारसं

जाणं भागच होतं एका दोस्ताकडच्या बारश्याला
यायचं नव्हतं माझ्यासोबत बायकोला अन लेकाला
कारण काय तर दोस्ताकडचं सारंच होत हाय फाय
ड्रॉइंग हॉल , बेडरूम सोडा , टॉयलेट देखील वाय फाय
गेलो एकटाच थोडा थोडा ऑकवर्ड झालो होतो
बंगल्यापाशी जाऊन थोडा बॅकवर्ड गेलो होतो
इतक्यात वाजला मोबाईल आणि दोस्तच लाईनवर आला
" धिस वे धिस वे माय डिअर फ्रेंड कम इन " म्हणता झाला
दारात होत कुत्रं , वाटलं माझ्यावर गुरगुरतय
म्हटला " नो नो मित्रा ते तर गूगल गूगल करतंय "
गेलो आत , सबकुछ शांत , हालचाल नव्हती काही
पाळणा नाही , दुपटी नाही , आत्त्यादेखील नाही
म्हटलं " काय रे बारश्यासाठी बोलावलं होतंस ना ? "
बोलला " येस मॅन वेट फॉर समटाईम , व्हर्च्युअली तरी बस ना "
वैनी आल्या बाळास घेउन , फारच होतं गोड
दोस्त बोलला हिअर कम्स सर्वर ! विथ हर कम्स द " नोड "
दोन चार लॅपटॉप घेउन बाळाशेजारी मग बसला
टायपिंग केलं पटपट आणि जग जिंकल्यागत हसला
आज्जी , आजोबा , आत्त्या सारे वेबकॅमवरती दिसले
जगावेगळा असा सोहळा बघण्या मन आसुसले
" नोड नोड " कुर्र , " नोड नोड " कुर्र आत्त्या ओरडत होती
आज्जी दुसर्‍याच वेबकॅमवरती बुक्क्या मारत होती
ओशाळवाणे हासत मी दिला खुळखुळा बाळाहाती
जिवंत हसला बाळ अचानक विसरून सारी ई - नाती


Princess
Wednesday, February 14, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव... वैभव... वैभव... वैभव


Bhramar_vihar
Wednesday, February 14, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मित्रा! शेवटच्या ओळीतच खाउन टाकलस रे! मस्तच गड्या!

Sati
Wednesday, February 14, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच!
प्रसाद,मिल्या देवदत्त मजा आली.

साती


Swaatee_ambole
Wednesday, February 14, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मस्त आहे! :-)

देवा, सहीच. :-)


Meenu
Wednesday, February 14, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" नोड नोड " कुर्र , " नोड नोड " कुर्र आत्त्या ओरडत होती
आज्जी दुसर्‍याच वेबकॅमवरती बुक्क्या मारत होती >>> गुरु तुम महान हो ..

Shyamli
Wednesday, February 14, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)क्या बात है
छान झालं बारसं
मीनु :-)

Sati
Wednesday, February 14, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"टीप"
डोळ्यानी सदा तो हिरवळ शोधे
संताप मनात खदखदे

घरातील मुर्गी डाळीसम वाटे
मग तू अळूचे फतफते

थांब तुला आता दावते प्रसाद
अद्दल चांगली घडवते

रस्त्यात गुलाब किती फुललेले
तू रे सुटलेला फुलकोबी

एका गुलाबास पाहुनी हसले
म्हणाले बघच जादू माझी

आंटीजी आपको देखा है कहीं तो
गुलाबही मेला पचकला

अकलेच्या बैला फुटले का डोळे
वयाचा अंदाज येऊ नये

काटा हातामाजी रुतताच ऐसा
म्हणे पतीराज टीप देतो

हिरवळ आम्ही दुरूनी पहातो
म्हणूनच "काका" | होत नाही


Anilbhai
Wednesday, February 14, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो वैभव जियो..
सती ते 'काका' च्या ऐवजी 'मामा' चांगल वाटेल का?


Kandapohe
Wednesday, February 14, 2007 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव सहीच रे नेहेमीप्रमाणे. :-)

Milya
Thursday, February 15, 2007 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव सहीच एकदम वेगळी

Sanghamitra
Thursday, February 15, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कैच्या कै वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल आभार.

>> 'टिपिकल पुरुषी ईगो!!! दुसरे काय?' म्हणाले

मिल्या मान गये बॉस. अगदी हात बसलाय तुझा. समस्त स्त्रीवर्गातर्फे आभार मानायला हवेत खरंतर पण एकूणच या वर्गात मतभेद फार. त्यामुळे ते आपले माझ्यापुरते समज. :-)
देवदत्त वेगळी पण तितकीच छान झालीय तुझीही कैच्याकै.
वैभव, नोड


Psg
Thursday, February 15, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, 'ई-नाती'चा श्लेष मस्तच! :-)

Rahulphatak
Thursday, February 15, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, 'बारसं' मस्त आहे ! :-)
शेवटच्या ओळीने एकदम 'वजन' येते आणि 'काहीच्या काही' नाहीये हे जाणवते :-)


Chinnu
Thursday, February 15, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी सहीच ग! वैभवा नोड नोड अगदीच कहर रे! :-)
साती, पतिराजांचे एक्सप्लेनेशन छान.


Daad
Thursday, February 15, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद(झकासच), मिल्या, संघमित्रा ( cute ) , देवा (अरे देवा), अपर्णा, पूनम
अरे काय चालवलय काय? "कै च्या कै"च मस्त कविता हैत.
वैभव, 'नोड नोड कुर्र'? - साष्टांग नमस्कार आहे तुला!


Badbadi
Friday, February 16, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुंदर!!!
दोस्त बोलला हिअर कम्स सर्वर ! विथ हर कम्स द " नोड " >> नातं इतकं रुक्ष कधी होऊ नये :-(

Dineshvs
Friday, February 16, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, छान आहे. कदाचित अजुन काही वर्षानी हेच वास्तव असेल.

Suvikask
Saturday, February 17, 2007 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW !!! एकसे एक सुन्दर कै च्या कै!!!
बारस वाचून एक डोळ्यात पाणी तर दुसर्‍यात हसु आल...
सती छानच





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators