Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 14, 2007 « Previous Next »

Krishnag
Tuesday, February 13, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खंत


शब्दांचे दुर्भिक्ष
असे का जाणवावे
जणू ऐन वसंतात
पानगळीने यावे
तुझ्या साठी शब्दही नाहीत
एवढा का कफल्लक झालो
तुझ्या रेशमी वसना संगे
मी लक्तरे लेउनी आलो
तिमिराच्या गर्तेतूनी कधी
मी शतदीपही पेटविले
परी तुझ्या मार्गातूनी
कधी पणतीला ना तेवविले
ही खंत आता आयुष्यामार्गी
सोबती राहील
तव आठवांच्या अश्रुसंगे
तृष्णा मनीची शमविल




Lopamudraa
Tuesday, February 13, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या रेशमी वसना संगे>>.. kalale naahii
पण क्रिश्नाग तुमची कविता आवडली.
पूनम तुही श्यामली सारखेच झटके देते.. मस्त आहे कविता..
स्मिता नाते छान आहे ग.. अपरणा संवाद छान आहे..!!!
राधिका (botany) घेतले आहे तर एक पानाफ़ुलावरची कविता टाक ग..(बाकी मी पण गणित सोडले आणि zoology घेतले होते ग....)


Smi_dod
Tuesday, February 13, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स लोपा:-)...

किशोर:.. खंत सुंदर.....


दरी!!

तुझ्या माझ्यातली दरी
नाही ओलांडली गेली कधीच
अहंमन्यतेचे खोल कडे लाभलेली
सतत वाढत जाणारी...
समजांचे गैरसमजात रुपांतर करणारी
श्रेष्ठ्त्व कनिष्ठ्त्वाच्या
खाच खळग्यांची
कधीतरी आषाढ सरींनी
कोसळतात धबधबे...
श्रावणाच्या रिमझिमीने
उमलतात रंगीत गालीचे.....
पण ते कधीतरी....कायम असते
वस्तीला ओसाडता.. शुष्कताच,
खुप नयनरम्य भासते कधी
पण दरीत त्या अडकता
सुटका होता होत नाही
तसेच रहायचे घुसमटत
अंहकार जोपासत
अजुन खोल खोल जात
दरी वाढवत.......

स्मि


Aparnas
Tuesday, February 13, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स राधिका, लोपा.
स्मि, दरी खूपच सुंदर!!!

झीज

मी उभा होतो किनार्‍यावर
शांत, स्तब्ध, निश्चल
आणि एक तडाख्यात
चिंब चिंब करून गेलीस तू....
वरवर तसं काहीच नाही बदललं
पण आतपर्यंत काहीतरी हललं नक्कीच
थोडंसं गूढ, तरी हवंहवंसं..
तू भरतीचं उधाण लेऊन येताना,
कोसळलीच तुझी आतुरता
आणि ओहोटीसंगे मागे फिरलीस ना,
तेव्हा जाणवली तुझी कासवीस नजर......
असह्यच झाला मला माझा निश्चलपणा!
आणि मग हळूहळू
कणाकणाने तुटत गेलो मी
आता इतरांनाही जाणवलाय बदल
लोक म्हणतात 'खडक झिजला किनार्‍याचा'
बरोबरच आहे, त्यांना कसं कळणार
आता माझा प्रवास अखंड तुझ्या सोबतच-
किनार्‍यावरची रेती होउन!!!


Meenu
Tuesday, February 13, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अपर्णा मस्तच गं आवडली एकदम ..

Raadhika
Tuesday, February 13, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किशोर, स्मि, अपर्णा...
एकाहून एक सुंदर कविता!


Princess
Tuesday, February 13, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा धन्यवाद... चला काव्याच्या राज्यातले अनभिषिक्त राजे लोक... वैभव, निनावी, लोपा, जयु (कोणाचे नाव विसरले तर नाही ना)प्रेमावरच्या कविता लिहा बरे.... valentine day romantic होउन जाउ द्यात:-)

Niru_kul
Tuesday, February 13, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्या वाटेवर....

सुर्याच्या किरणांना गाठायला निघालोय....
प्रसन्नता चहुकडे वाटायला निघालोय....

नव्या वाटा खुणावत आहेत,
नवी क्षितीजं बोलावत आहेत;
डोळ्यांत घेऊन आयुष्याची स्वप्नं,
पायवाट ही मी चालत आहे....
नव्या दिशांना आता मी, अनुभवायला निघालोय....
प्रसन्नता चहुकडे वाटायला निघालोय....

अपेक्षांचे ओझे नाही,
इच्छापूर्तीची आसक्ती नाही;
मनात नाही चिंता कशाची,
नियतीचे माझ्यावर दडपण नाही....
ज्ञानाचा हा महासागर, ढवळायला निघालोय....
प्रसन्नता चहुकडे वाटायला निघालोय....

ह्रदयात एकच चेहरा वसलायं,
त्या चेहर्‍यातच तर माझा आनंद लपलायं;
हळव्या या माझ्या मनात,
मी तिच्या आठवांचा बंध जपलाय....
तिच्या ह्रदयाला आता, मी स्पर्शायला निघालोय....
प्रसन्नता चहुकडे वाटायला निघालोय....



Robeenhood
Tuesday, February 13, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण क्रिश्नाग तुमची कविता आवडली.
पूनम तुही श्यामली सारखेच झटके देते.. मस्त आहे कविता..
स्मिता नाते छान आहे ग.. अपरणा संवाद
>>>>

पण मी म्हणतो स्वताची विषामृत ही कथा अर्धवट पडली असताना माणसाना झोपा तरी कशा येतात कुणास ठाऊक? अन आपलं सदान कदा दुसर्‍याच्या बी बी वर बेल घालीत फिरायचं मेलं!!!

Imtushar
Tuesday, February 13, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हव्याहव्याश्या या क्षणांस
असेच घट्ट धरून जगावे
पुन्हा एकदा आज नव्याने
प्रेम जुने ते करून बघावे

श्वासांत हा सुगंध मंद
असाच खोल भरून रहावा
एकेक क्षण मग आयुष्याचा
एक एक आयुष्य व्हावा
मने आपली बोलत असता
तू आणि मी मुके रहावे
पुन्हा एकदा आज नव्याने
प्रेम जुने ते करून बघावे

तोच लाडका हट्ट आणि मी
तुझ्याकडे रे पुन्हा करावा
तसेच लटके रागावुन अन्
गोड अबोला पुन्हा धरावा
डोळ्यांमधले पाणी अलगद
मग ओठांनी तू टिपावे
पुन्हा एकदा आज नव्याने
प्रेम जुने ते करून बघावे


Meenu
Tuesday, February 13, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुडा बाकी तुझं काही खरं नाही एकंदरीत ..

Mi_anandyatri
Tuesday, February 13, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा,
"आता सगळं कसं.. खरच पुढचं गाव.. बेट.. दिसेपर्यंत. असाच चालत राहतो प्रवास" - याचा अर्थ नाही कळला... :-(


Manas6
Tuesday, February 13, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कसले भास आभास

हे कसले भास आभास,
तुझ्या आठवणींचा श्रावणमास,
येतोय माझिया हातांना,
तुझ्याच गजऱ्यांचा सुवास !-१

हे कसले भास आभास,
तुझ्या स्वप्नांची का ही आरास?
वाहती नदीतुनी दिवे,
नि नभी नक्षत्रांची रास !-२

हे कसले भास आभास,
तुझ्या श्वासांचाच हा सहवास,
म्हणूनी बघ दरवळतो,
मत्त केवड्याचा सुवास !-३

हे कसले भास आभास,
तुझ्या सोबतीची का ही आस?
छेडीला कुणी मारवा,
अन सूर ते उदास-उदास !-४

--मानस६




Sanghamitra
Wednesday, February 14, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहती नदीतुनी दिवे,
नि नभी नक्षत्रांची रास !-२
हे आवडलं.
रॉबीनहूड
किती हा हूडपणा.


Neelkantee
Wednesday, February 14, 2007 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
चुकत कुथेच नाहि...
केवल मन थाय्रावर नसत...
गनिताच एक बर असत
अन्क सुत्राबरोबर त्याल मन मात्र नसत...


Ajjuka
Wednesday, February 14, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई

चुकत कुथेच नाहि...
कुठेच kuThech

केवल मन थाय्रावर नसत...
थार्‍यावर thaaRyaavar

गनिताच एक बर असत
गणिताचं एक बरं असतं gaNitaachaM ek baraM asataM

अन्क सुत्राबरोबर त्याल मन मात्र नसत...
अंक सुत्राबरोबर त्याला मन मात्र नसतं
aMk sutraabarobar tyaalaa man maatra nasataM

देवनागरीसाठी करेक्शन..


Shyamli
Wednesday, February 14, 2007 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलकांती पाटेकर म्हणजे नानांच्या सौ. की काय?
वेल कम :-)
धन्यवाद लोक्स


Neelkantee
Wednesday, February 14, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद!
अरे व्वा! जमलं की!ठीक आहे कसं लिहू?लिहिलं बुवा एकदाचं!
ते पान काही सापडलं नाही.
मला एक पान दाखवता का कुणी... एक पान...?
मराठी इन्ग्लिशमधे लिहायचं पान...?


Neelkantee
Wednesday, February 14, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा! हुश्शारच आहेस तू!ओळखलस बरोबर!

Neelkantee
Wednesday, February 14, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकत कुठेच नाही...
केवळ मन थार्‍यावर नसतं...
गणिताचं एक बरं असतं...
अंक सूत्राबरोबर त्याला मन मात्र नसतं...

श्यामली, किती प्रयास पडले ठाउक आहे का तुला...मराठी पुन्हा शिकल्यासारखे वाटले...
इन्ग्रजान्चा आशीर्वाद! दुसरे काय!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators