|
Princess
| |
| Monday, February 12, 2007 - 6:13 am: |
| 
|
जरासंधाच्या हाडापासुन बनलेल्या कवड्या, जशा थिरकतात बघुन राधेयाला, तसेच काहीसे होते, माझही तुला बघुन सगळेच फासे उलटे पडायला लागतात, तू आलास की... आणि मग हातात आलेले दानही निसटुन जाते... सगळे काही उलट सुलट होउन जाते आणि जिंकणार असलेला एक डाव मी पुन्हा हरवुन बसते...
|
Princess
| |
| Monday, February 12, 2007 - 6:15 am: |
| 
|
श्यामली गणित छान आहे ग. नेहमी प्रमाणेच कमी शब्दात उतरलेला जोर का झटका. पुन्हा पुन्हा चुकत असेल तर calculator वापरुन बघ
|
Meenu
| |
| Monday, February 12, 2007 - 6:23 am: |
| 
|
श्यामली, माझही असंच व्हायचं, मग मी B Sc ला Botany घेतलं >>> पुन्हा पुन्हा चुकत असेल तर calculator वापरुन बघ>>>> पण मी काय म्हणते option ला टाकायला काय हरकत आहे ..? शामले दिवे घेशीलच 
|
Shyamli
| |
| Monday, February 12, 2007 - 6:43 am: |
| 
|
पुनम calculator हरवलय माझं गप्पे मीनु option ला नाहीये काहीच :D राधिका
|
बी छान आहे रे कविता. काही काही शब्द चुकीचे वाटतायत पण एकूण छानच. श्यामली, प्रिन्सेस सुंदर.
|
Niru_kul
| |
| Monday, February 12, 2007 - 6:53 am: |
| 
|
गाणे क्रमांक २ या जगातून गेलो तरीही.... मी राहीन तुझाच प्रिये, या जगातून गेलो तरीही.... मी येईन परतून तुझ्यासाठी, मला मृत्यूने गाठलं तरीही.... मी वेचली स्वप्नं तुझ्यासाठी.... मी गमावलं माझं स्वत्व तुझ्यासाठी.... गुंतलो मी तुझ्यामध्ये.... माझा श्वास अधूरा तुझ्यासाठी.... देईन तुला कायमची साथ, मी राखेत मिसळलो तरीही.... मी राहीन तुझाच प्रिये, या जगातून गेलो तरीही.... मी गुंफीले शब्द तुझ्यासाठी.... मी सूर जुळवले तुझ्यासाठी.... रुजली माझी प्रिती तुझ्यात.... माझ्या काव्याचा अर्थही तुझ्यासाठी.... राहीन बनून मी तुझाच श्वास, शरीराने नसलो तरीही.... मी राहीन तुझाच प्रिये, या जगातून गेलो तरीही....
|
Niru_kul
| |
| Monday, February 12, 2007 - 7:04 am: |
| 
|
मीनू, राधिका, चिन्नू, दाद, रीना, तुषार..... प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद..... स्मि.... भान आवडली... आनंदयात्री....... पाऊलवाट छान आहे..... प्रिन्सेस.... मृत्यंजयाची उपमा उत्तम मांडली आहेस.... वा!
|
Raadhika
| |
| Monday, February 12, 2007 - 7:09 am: |
| 
|
श्यामले, कविता आवडली हे सांगायचंच राहिलं बघ. प्रिन्सेस, छानच. पण कवड्या बहुतेक भीमाला बघुन थिरकायच्या ना? नीरज, भावना समजल्या. गाणे क्र. २ ची चाल बहुतेक 'मैं पिया तेरी, तू माने या ना माने' ची आहे, बरोबर ना?
|
Niru_kul
| |
| Monday, February 12, 2007 - 7:29 am: |
| 
|
राधिका..... तुमचा अंदाज चुकीचा आहे..... या गाण्याला चाल मी स्वतःच लावली आहे..... आणि आधीच्या गाण्यालाही चाल मीच दिली आहे..... देवाच्या कृपेने मला आवाज चांगला लाभला आहे..... आणि थोडेफार सूरांचेही ज्ञान आहे.... त्यामुळे माझ्या गाण्यांना मी स्वतःच चाल देतो...
|
Princess
| |
| Monday, February 12, 2007 - 7:37 am: |
| 
|
नीरु छान आहे गाणे. पण आधीचे जास्त छान होते. राधिका, त्या कवड्या भीमाला आणि कर्णाला (राधेयाला) पण बघुन थिरकत. आणि म्हणुनच त्या दिवशी दुर्योधन कर्णाला दिवसभर सुर्याला अर्घ्य देत नदीतीरी उभे करुन ठेवतो. आणि भीमाला घाबरुन त्या कवड्या पांडवांना एकही दान चांगले देत नाही. चु.भु.दे.घे.
|
Ajjuka
| |
| Monday, February 12, 2007 - 7:44 am: |
| 
|
Imtushar , गोंधळलात तरी कविता आवडली? नक्की काय धरायचं हो खरं? 
|
Imtushar
| |
| Monday, February 12, 2007 - 8:28 am: |
| 
|
नीरजा, गोंधळलो, आणि कविता आवडली आनंदयात्री, थोडी सवडीनेच वाचली तुमची कविता... अजून सवडीने वाचायला हवी... शब्द छान आहेत, अर्थही हळूहळू लागतोय्; जे समजलं ते आवडलं. बी, कविता सुरेख आहे. श्यामली, प्रिन्सेस, नीरज उत्तम. --तुषार
|
Meenu
| |
| Monday, February 12, 2007 - 10:12 am: |
| 
|
बंद दरवाजा हा दरवाजा बंद आहे कायमचा, माझ्यासाठी.. म्हणुनच मी पुन्हा पुन्हा इथे येते, पलिकडे काय असावं? या उत्सुकतेपोटी.. खरं तर मला काहीच नकोय, दरवाजा पलिकडे काहीही असलं तरी.. तरीही मी उभी आहे इथे पुन्हा एकदा, आणि हा बंद दरवाजा.. वाळीत टाकावं ना कुणी, तसं वाटतं मला, पाहुन हा बंद दरवाजा.. बेघर असेन मी, असं वाटेल कुणाला, अंऽऽहंऽऽ तसं नाहीये तरी हा बंद दरवाजा.. खरं तर उगीच सर्वस्व पणाला लावलय मी, उघडायला हा बंद दरवाजा.. तरीही बंदच दरवाजा..
|
Meenu
| |
| Monday, February 12, 2007 - 10:22 am: |
| 
|
धावते मी कधी वार्यासवे भांडते मी कधी वार्यासवे समजुत काढते त्या समिरा हासते मी पुन्हा वार्यासवे... जागते मी कधी तार्यासवे.. बोलते मी शांतता तार्यासवे.. आठवुनी क्षण सारे विखारी लावते चांदणे तार्यासवे...
|
Bee
| |
| Monday, February 12, 2007 - 11:43 pm: |
| 
|
दोन्ही कविता छान आहे मीनू.. संघमित्रा, please सांगतेस का कुठले शब्द चुकलेत. मला नक्कीच त्याची मदत होईल. Botany ची प्रतिक्रिया राधिका, तुषार धन्यवाद..
|
Meenu
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:33 am: |
| 
|
बोथड >>> हा शब्द बोथट असा आहे बी.
|
Aparnas
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:59 am: |
| 
|
ही कविता मी काहीच्या काही मधे टाकली होती. आता इथे टाकते आहे. घरटं ती: प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू आणि नदीसारखी स्थिर, शांत मी उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू आणि जमिनीशी नातं जोडणारी मी क्षितीजाच्यापार झेपावणारा तू आणि किनार्यावरच वाळूचं घरटं जपणारी मी 'साथ देशील का' विचारतोयस खरा पण भीती वाटते मला, हे सगळं कसं काय जमणार मला? **** तो: कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून त्याला शक्ती देणारी नदीच असते ना? वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी मुळं घट्ट धरून ठेवून त्याला आधार देणारी जमीनच असते ना? आणि वेडे, पक्षी क्षितिजापार झेपावला तरी समुद्रावर थोडच विसावणार तो? संध्याकाळी परतून यायला, घरटंच हवं ना त्याला?
|
Smi_dod
| |
| Tuesday, February 13, 2007 - 3:30 am: |
| 
|
नाते!! कोणतेच नाते नाही चिकटवलेलं अन रक्ताचं..... रक्ताचे घट्ट बंध नाहीत बांधुन ठेवणारे रज्जु नाहीत तरीही रक्तगोलकात जाउन साठलेली आणि घट्ट घट्ट झालेली अबोध... अनाम ओढ झिरपत झिरपत आत उतरलीये,खोलवर........ रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरली अन.... चिकटवलेल्या नात्यापेक्षाही स्मि
|
Raadhika
| |
| Tuesday, February 13, 2007 - 5:13 am: |
| 
|
अपर्ण, घरटं छानच आहे. मीनू, दरवाजा आवडली. स्मि, कविता छान आहे, थोडीशी रक्तरंजित झालीये पण.
|
Smi_dod
| |
| Tuesday, February 13, 2007 - 5:24 am: |
| 
|
राधिका... हो गं.. तुला botany आवडते ना तसेच मला zoology... त्यामुळे असेल कदाचित रक्तरंजित..
|
|
|