Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 12, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 12, 2007 « Previous Next »

Shyamli
Friday, February 09, 2007 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मीनु रंगमंच आवडल जबरी आहे
स्मि,काळोख मस्तच "काळीशार मखमाली" हे आवडलं

श्यामली, तुला ' देवदूत' म्हणायला हवं आता>>>
स्वाती.. .. ..

Mi_anandyatri
Saturday, February 10, 2007 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊलवाट

सगळं कसं बदलत चालल्ण्य?
हे जाणवतंय की, दूर दूर चाललंय
ओळखीचे शब्दही आता अनोळखीपणे कानावर येऊ लागलेत,
कधीकाळी अंतराच्या पार गेलेले ते आता खरंच अंतरु लागलेत...
काही ओळखीच्या खुणा सापडताहेत का? मी शोधतोय
वेगळ्या झालेल्या वाटांना जोडणार्‍या वाटेची मी वाट पाहतोय
रंगलेल्या मैफली आणि भावस्पर्शी सोहळे आता इतिहासजमा झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

त्यांनी प्रवासाच्या वाटेवरची
माझी पावलंच पाहिली
त्या पावलांचं एकटेपण
त्यांना दिसलंही नाही, जाणवलंही नाही.
आता वाटेत काळ्या रात्री भेटतात,
कभिन्न पहाड उभे ठाकतात
वळणावळणाच्या रस्त्याने त्यातून पुढे जाणं चालूच आहे,
नव्या गावांना भेटी देणं चालूc आहे
घाटरस्त्यातल्या गाडीच्या हेडलाईटसारखी मधूनच
त्यांची आठवण उजळते-
तेवढीच चार पावलं लवकर पार होतात
हेडलाईट वळणावर दिसेनासा होतो,
आठवण मात्र गाडीच्या आवाजासारखी साथ देते
ते नाहीशा झालेल्या गाडीसारखे केव्हाच नजरेपार झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

कधीतरी परिचित हाक कानी येते,
समजावणीच्या चार शब्दांचं दान
न मागताच माझ्या ओंजळीत टाकून जाते
मग पुढचं सगळं अपरिचित होऊन जातं.
पावलांचे ठसे मात्र शहाणे होत जातात
प्रवासी पक्ष्यांची क्रमश: कहाणी होत जातात
कहाणीच्या सुखद शेवटाची मी वाट पाहत असतो
खर्‍या होणार्‍या संकेतस्वप्नांची पहाट पाहत असतो
पण पहाटेच्या धुक्यात सगळे हरवून गेलेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

पण वळणावळणाच्या एका वाटेनेही मला समजावलंय
"काही शिक्के स्यमंतकासारखे असतात,
ते पुसण्यासाठी काळच जावा लागतो.
आणि पावलांचं एकटेपण दिसायलाच हवं असं नाही..."

नवं गाव आता जवळ येत चाललंय
आता परत सगळं कसं बदलत चाललंय!



Reena
Saturday, February 10, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरु, स्मि, मिनू तुषार..खुपच छान काव्य रचना..
अगदी मैफ़िलीत दाद घेईल अशी....


R_joshi
Saturday, February 10, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे तर कवितेंचा पाऊस पडतोय. काव्य वर्षा अखंडित अशिच छलु राहु द्यात.:-)

Manas6
Saturday, February 10, 2007 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, कविता मधाळ आहे-- मानस

Ajjuka
Sunday, February 11, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळाचे अनंत..
आपण देतो त्याला परिमाणं
मोजमापासाठी
संदर्भासाठी..
करतो त्याचे तुकडे
देत लयीचे नाव.
असं करता करता वाटायला लागतं.
की मीच नेतेय त्याला पुढे.
आणि तिथेच तो माझ्यासाठी थांबतो.
म्हणजे तो जातोच पुढे,
पण मी थांबते, अडकते एका तुकड्यात.
मग काळाचे अनेक वेगवेगळे तुकडे
स्वतःचे संदर्भ सोडून
मला भेटायला येतात..
माझ्यावर आदळतात
त्यांना नसतो क्रम, नियम आणि अपवादही.
माझा पूर्ण गोंधळ होतो...
माझा तुकडा कुठला?
आजचा तुकडा कुठला?
what kind of idea am I?
सगळंच मस्त उलटपालटं होतं.
निरर्थकही.
असं माझं वेड विकोपाला जात रहातं....
मला मजा येत जाते,
आता तुम्ही गोंधळू लागता..

नी


Daad
Monday, February 12, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच कविता मस्त!
मीनू, भूक जबरदस्त उतरलीये.
आनंदयात्री, तुमची स्वराज्य आवडली. गज़लेचा बाज वाटतो (गजलच असावी). सगळेच शेर मस्त दुसरा खूप आवडला.
मीनू, स्मि तुमच्या सगळ्याच कविता मला वाचायला आवडतात. नवीन नवीन कल्पना!
निरज, नक्कीच हे गाण असावं. आवडलं पण "अळवाचे पाणी' कळलं नाही.
नीरजा (अज्जुका), 'लय... ' आवडली, भावार्थ आवडला. काळाचे अनन्त.. हे कवितेचं नाव आहे का? वाटत नाही. पण त्यात एखादा शब्द गाळला गेलाय का?
(एक विचारू? 'अज्जुका' म्हणजे काय?).



Sanghamitra
Monday, February 12, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आधीच्या काही वाचायच्या राहून गेल्यात.
आनंदयात्री छान आहे पाऊलवाट.
अज्जुका सहीच गं. कवितेची चढण झकास आहे.


Ajjuka
Monday, February 12, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे आणि दाद,
धन्यवाद..
काळाचे अनंत हे नाव नाहीये आणि लय हे ही नाव नाहीये.. मला शीर्षक देता येत नाही आणि आवडत ही नाही.
शब्द गाळला नाहीये. अनंत हे विशेषण नसून नाम म्हणून आहे तिथे.


Abhiyadav
Monday, February 12, 2007 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सय

शब्द नाही आज माझी बोलती आसवे
थेंब थेंब सय तुझी डोळ्यांतून ओघळे

शक्य नाही ते तुला कायमचे विसरणे
क्षण देतील साद जे तुजसवे बहरले

मी अता शोधत नाही विरहाची कारणे
थांबवले आहे अता मी स्वत:ला कोसणे

नाही चालली काही मात्रा नियतीपुढे
झालो वेगळे तरी आहेत सांधलेली मने

तू ठेव अशीच आठवणीत जपून मला
राहो अंतापर्यंत अशाच अक्षय ह्या भावना

abhijit.
http://anabhishikt.blogspot.com

Bee
Monday, February 12, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भय...

शिशिरात थिजून विरक्त झालेल्या
त्या अनामिक तरुकडे पाहून वाटले
"जीवनाच्या बिकट प्रश्नावलीतून स्वतःला
सोडवून घेण्याचा आटापिटा करताना
अखेरशेवटी जगण्याच्या सर्व सवेंदनाच
कशा गोठून बोथड होऊन गेल्यात!
आता फ़ुलण्याचे वेड सरले असेल
तर जगण्याचे भयही उरले नाही"

पण..
काळोखाची मऊगार चादर अलगद सारून
ओक वृक्षांच्या त्या रांगा भर वेगानी
पुन्हा एकदा गर्द हिरव्या दिसू लागल्यात
आणि शुभ्रधवल हीम वितळू लागताच
थांबलेला प्रवाह जोर धरुन वाहू लागला

जीवनरसाचा हा अनुभव घेताघेताच
नवे कोंब पुन्हा एकदा टोचू लागलेत..


अज्जुका, कविता छान वाटली वाचायला...


Meghdhara
Monday, February 12, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदयात्री.. आता सगळं कसं.. खरच पुढचं गाव.. बेट.. दिसेपर्यंत. असाच चालत राहतो प्रवास

अज्जुक्का.. आणि मग वाटतं म्हंटलं तर सगळे तुकडे माझे, म्हंटलं तर कुठलाच नाही.. फक्त एकच आपला, आत्ता हातात आलेला.

मेघा


Smi_dod
Monday, February 12, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्यामली, रीना,दाद,राधिका.....

भान!!

काही बाही सतत
आभास होतात...
गर्दीत उभी असते मी
समोर एकदम सगळीकडे
तुच असल्याचा भास...
सगळ्या अनोळखी,ओळखीच्या
चेहर्‍यांमधे तुच दिसायला लागतो
सगळ्यांमधे गप्पा मारता मारता
मधेच तु बोलतोस...
तु समोर असल्यासारखी
तासनतास न्याहाळत बसते तुला
तुझे श्वास,तुझा गंध
तुझा स्पर्श अनुभवते मी....
मधेच कधीतरी भान येते
सगळे आभासी आहे याचे
तरी परत....
भास हसत असतात
फ़ेर धरून माझ्या भोवती
आणि मी असते अशीच बेभान
हरवलेली......

स्मि


Vaibhav_joshi
Monday, February 12, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रांनो आणि कौतुकाबद्दल आभारी आहे .

स्वाती .. पेशल नमस्कार

वाह ... इथे तर एक से एक कविता पोस्ट झाल्या आहेत. कविता बीबी पुन्हा बहरलाय मस्त . लगे रहो


Ajjuka
Monday, February 12, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) मेघा.. खरंतर तोही कुठे आपला.. आणि वेड लागलं की आपला तुपला कुठे काय?

R_joshi
Monday, February 12, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन आभाळमाया
मन क्षितिज प्रेमाचे
मन आईची छाया
साद घाली काळजाते.

मन विशाल वटवृक्ष
मन सावलिचे घर
मन पित्याचे नेत्र
लक्ष ठेवी बालकाचे.

मन झुळुकेचा वारा
मन सरितेचा गारवा
मन भावाचे बंध
औक्ष मागती बंधाते

मन असे प्रेमरुप
मन असे निरंकार
मन आर्जवाची गुज
त्यास नात्यांची जोड

प्रिति:-)


Imtushar
Monday, February 12, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदयात्री, पुलस्ति, चिन्नू, राधिका, रीना, मानस... आभार

BTW, तिलिस्म म्हणजे mysterious magic (हा अर्थात मला लागलेला अर्थ), नुसती जादू नव्हे. अर्थात, पुलस्ति प्रमानेच मला देखिल ती पुनरुक्ती आहे असे बरेचदा वाटते, (but I convince myself somehow).


मीनू, नीरज, स्मि छान.

नीरजा, कविता आवडली... 'आता तुम्ही गोंधळू लागता....' खरंच गोंधळलो.


--तुषार


Shyamli
Monday, February 12, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूत्र माहीत असत
आणि
माहीत असतात त्यात घालायचे अंकही
सगळ व्यवस्थीत करुनही
गाणित मात्र सुटत नसतं
कोणास ठाउक
कुठे काय चुकत असतं?

श्यामली!



Raadhika
Monday, February 12, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, स्मि, आनंदयात्री, प्रीती, कविता आवडल्या.

श्यामली, माझही असंच व्हायचं, मग मी B Sc ला Botany घेतलं


Smi_dod
Monday, February 12, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, माझही असंच व्हायचं, मग मी B Sc ला Botany घेतलं >>>>>>राधिका..|

धन्स... राधिका,तुशार..

श्यामली... गणित :-) छान आहे.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators