Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 12, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through February 12, 2007 « Previous Next »

Swaatee_ambole
Thursday, February 08, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, झकास!! सहीच जमल्ये!! :-)
मला फक्त ते ' म्हटलो ते म्हटलो' खटकतं बघ. म्हणजे तसं म्हणत असतीलही बोलीभाषेत, पण मी माझ्यापुरतं ' म्हटले ते म्हटलेच' असं वाचलं.


Sanghamitra
Thursday, February 08, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद झक्क झालेय कविता.
>> मला फक्त ते ' म्हटलो ते म्हटलो' खटकतं बघ.
स्वाती मी सहमत.


Chinnu
Thursday, February 08, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद केशरी बासुंदीची साय! आय हाय क्या बात है! एकदम आवडेश आपल्याला! बाकी सौ. नी वाचली तर काही दिवस फ़िरण्या-बोलण्यावर बंदी यायची! :-)

Raadhika
Thursday, February 08, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, एकदम मस्त आहे तुमची कविता

Shyamli
Thursday, February 08, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद मोकाशी, खेळणं सहीये आवडली खुपच छान आहे कल्पना.
पण एवढी छान कविता इकडे नको टाकु रे राहुन गेली होती वाचायची :-(

प्रसाद, हाय म्हणालो,wow सहीये एकदम :-)मजा आली वाचायला
सारंगला अनुमोदन अगदि "प्रसाद कविता"

माणिक हल्ली गझल जास्ती वाचताय वाटत :-)

Vinaydesai
Thursday, February 08, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, बायकोलाही पूर्ण वाचायला द्यावी... मस्त आहे..(कविता)

:-)

Paragkan
Thursday, February 08, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah re prasad !!


Meenu
Thursday, February 08, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कुणीतरी "सुंदर तरुण दिसल्यावर ती 'हाय' म्हणाली..
सांगा याला इतके भीषण काय म्हणाली" लिहील असं वाटलं होतं ...


Bhramar_vihar
Thursday, February 08, 2007 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, तु हात साफ करुन घे ना!

Lopamudraa
Friday, February 09, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद प्रत्येक नवर्‍याने वाचावी अशी कविता...!!!!

Sanghamitra
Friday, February 09, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद मोकाशी खेळणं आत्ता वाचली.
अतिशय सुरेख.
पण काहीच्या काही मधे का म्हणे? काहीच्या काहीच बै.


Mrinmayee
Saturday, February 10, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, 'सुंदर तरुणी दिसल्यावर...' एकदम झकास जमलीय! नवर्‍याला वाचून दाखवली. त्याच्या कडून पण कॉम्प्लिमेंट्स! तो म्हणतोय, "अच्छा, म्हणजे जेव्हा जेव्हा रस्तावर तु मला अलतु फालतु बिलबोर्ड दाखवतेस तेव्हा रस्तातून प्रेक्षणीय स्थळ जात असतं का?" पुढल्या वेळी त्याला पण "हाय" म्हणण्याचा चान्स द्यावा असा विचार आहे!
पुन्हा एकदा मस्त कवीता!


Meghdhara
Monday, February 12, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा प्रसाद! प्रसन्न.
मला आता वाटायला लागलय की
समस्त स्त्रीयांनी स्वताः चिडलेले असताना एक फोटो काढून बघितलाच पाहिजे.

मेघा


Sanghamitra
Monday, February 12, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तशा काही कविता वाचक आधी कैच्या कै मधे टाकतातच. आपण होऊन टाकायचा पहिलाच प्रसंग. :-)

स्वप्नात येऊ नको म्हटलं
तर ऐकत नाही मुळीच.
वर खोल डोळ्यात पहातो
अन् म्हणतो "आहेस खुळीच".
"टक लाऊन नको ना पाहूस
किती वेळा सांगून पाहिलं".
हातात हात घेत हसतो
आणि म्हणतो हळूच "राहिलं".
"हात सोड माझा " म्हटलं
की लगेच सोडून देतो.
"जशी तुझी इच्छा"
म्हणत मिठीमधे घेतो.
"श्वास तरी घेऊ दे ना"
म्हणताच सुटतो हलकेच वेढा.
गालावर ओठ ठेवत सांगतो
"मला आवडतो केशरी पेढा"
आता तीही शहाणी झालीय
जास्त काही बोलत नाही.
फक्त कधी कानात म्हणते
"स्वप्नात येतोस तेच बरंय बाई"



Milya
Monday, February 12, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ idea ची कल्पना मीनुकडून साभार आणि प्रसाद ची माफी मागून...

कळे न मजला इतके भीषण काय म्हणाले
देखणा तरूण दिसल्यावर मी हाय म्हणाले

तसा त्याचा अन माझा परिचय नव्हता तरिही
तसा संगती नवरा माझा होता तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये धकधक होऊन
त्याला dark, tall and handsome guy म्हणाले
देखणा तरूण दिसल्यावर मी हाय म्हणाले

अवचित जे ओठांवर आले कसे आवरू
पदराचा हा मोरपिसारा कसा सावरू
ह्रितिक, जॉन आणिक अभीषेक म्हणले त्याला
वर नवर्‍याला तू तर mama's boy म्हणाले
देखणा तरूण दिसल्यावर मी हाय म्हणाले

वटारलेच नवर्‍याने मग आपले डोळे
शोभतात का स्त्रीजातीला असले चाळे
उसळून ह्यावर उत्तर दिधले मी त्वेषाने
समजू नको मज आता सोशिक गाय म्हणाले
देखणा तरूण दिसल्यावर मी हाय म्हणाले

सुंदर तरुणी दिसता तूही म्हणलास ना हाय
जिभल्या चाटीत वरुनी म्हणशी केशरी साय
तुझे चालते, माझे मात्र 'भलते चाळे'
'टिपिकल पुरुषी ईगो!!! दुसरे काय?' म्हणाले
देखणा तरूण दिसल्यावर मी हाय म्हणाले

वरमताच मग नवरोजी मी खुदकन हसले
नका घाबरू वावगे नाही ह्यातच कसले
परस्परांवर आपुला विश्वास असल्यावरती
ह्या सगळ्याचे देणे घेणे काय म्हणाले?
देखणा तरूण दिसल्यावर मी हाय म्हणाले


Milya
Monday, February 12, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे सहीच गं शेवटचा turn आवडला एकदम

Meenu
Monday, February 12, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मिल्या मस्तच .... आपल्याल नसतं बुवा जमलं असलं झकास लिहायला (तेथे पाहीजे जातीचे येरागबाळ्याचे काम नोहे)

सन्मे मस्त हं .. स्वप्नातच बरय हे मात्र खरय ..


Vaibhav_joshi
Monday, February 12, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह वाह .. प्रसाद , सन्मी , मिल्या ... झकास .. किती छान विषय निवडलात .. अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे
:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators