Chinnu
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:34 am: |
| 
|
सारंगा नुसता ओझे होतो.. मस्तच. सवडीने वाचली त्यामुळे उशीराने पोस्टतेय त्याबद्दल. मीनु धागे एकदम गोड. तीर्थे संवादाची कल्पना छान. रीना, आनंदयात्री सही. श्यामली, देवाला म्हणा शेवटच्या ओळी अतिशय सुंदर! कविता छाने.
|
Swaroop
| |
| Thursday, February 08, 2007 - 10:20 am: |
| 
|
आनंदयात्री..... 'स्वराज्य' अप्रतिम आहे... जाम आवडली आपल्याला
|
तुमच्या सर्वांचे धन्यवाद. सारंग तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. "हसत मुखाने" असायला हवं होतं.
|
Imtushar
| |
| Thursday, February 08, 2007 - 10:47 am: |
| 
|
स्वप्नात पाहतो जशी तुला मी तशीच वेडी असशील का तू? उगाच काही कारण नसता गोड मधासम हसशील का तू? डोळ्यांत अनोखी स्वप्ने घेउन नजरेत तिलिस्मी जादू घेउन बेधुंद स्वरांनी अन् माझे जीवनगाणे गाशील का तू? लाजून कापर्या स्वरात कानी शब्द प्रीतीचे बोलुन आणि लपवुन चेहरा ओंजळीत अन् मिठीत माझ्या येशील का तू? पावसात कधी चिंब होउनी इंद्रधनूचे रंग लेउनी पुनवेच्या त्या दुधाळ रात्री चांदण्यात अन् न्हाशील का तू? नाही घडले असले काही तरीही माझी हरकत नाही तूच पुरे मज जगण्यासाठी कायमची माझी होशील का तू? --तुषार
|
तुषार, कविता आवडली... पण, "तिलिस्मी" चा अर्थ सांगाल का?
|
Pulasti
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:37 am: |
| 
|
तुषार - कविता आवडली! आनंदयात्री - तुमच्या प्रश्नामुळे खरेतर एक सुधारणा सुचवली जातेय. "तिलिस्मी" म्हणजे "जादुई" - (उदा. बरसात की एक रात मधलं - "कभी देखी ना सुनी ऐसी तिलिस्मात की रात"). पण म्हणूनच - "तिलस्मि जादू" ही पुनरुक्ती होतेय असं वाटतं. तिलस्मि मधेच "जादू" आली! CBDG. -- पुलस्ति.
|
Chinnu
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:42 am: |
| 
|
फार समाधानी आहात तुम्ही तुषार! असे काही घडले नाही तरी चालेल तु फ़क्त माझी हो, वावा.. तिलस्मी, अनोखी कविता मस्तच!
|
Raadhika
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:43 am: |
| 
|
तुषार, कविता एकदम रोमँटिक आहे. खूप आवडली. तिलिस्मी चा अर्थ "mysterious" वगैरे आहे का?
|
मीनू, ' भूक' चांगली आहे. श्यामली, तुला ' देवदूत' म्हणायला हवं आता. मला त्याची कविता कळली नाही. आनंदयात्री, तुमचीपण नाही कळली मला. तुषार, ती जशी असेल तशी तिला आपली म्हणायला तयार आहात हे वाचून बरं वाटलं.
|
Meenu
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:09 pm: |
| 
|
श्यामली, तुला ' देवदूत' म्हणायला हवं आता.>> स्वाती सगळ्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद ..
|
Meenu
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:23 pm: |
| 
|
रंगमंच एक पेटलेली ठीणगी ह्रुदयातुन निघते वाटेत येईल ते सर्व जाळत सुटते प्रचंड वेदना.. वेदनेची कळ उठते पण मुखावरचं हास्य विलयाला जात नाही.. नजरेत मात्र घालमेल दिसते.. पापण्या मग त्यांचं काम चोख बजावतात वेदनेचा पट दिसला रंगमंचावर की, आपोआप पडदा पडतो.. पडदा वर जाताच परत दिसु लागतो रंगमंचावर आनंदाचा पट.. सगळे नेहमीचे यशस्वी कलाकार चोख बजावत असतात हसण्याची कामगिरी
|
Smi_dod
| |
| Friday, February 09, 2007 - 12:03 am: |
| 
|
मीनु अगदी सुंदर...वास्तव!!! काळोख!!!! अगदी शांत शांत वाटते या गडद काळोखात पुन्हा आईच्या कुशीत शिरल्यासारखे निर्धास्त... उजेडात डोळ्यांना रुतणार्या कित्येक गोष्टी जाणवतच नाही या अंधारात... आपले अस्तिव हि जाणवते ते आत्म्याच्या पातळीवर देहाची पातळी जाणवत नाही होतो संवाद मग सुंदरसा...... आपलाच आपल्याशी प्रकाशाचे साम्राज्य असेलही खुप छान पण मला आवडते माझे अंधाराचे राज्य.... काळेशार मखमली स्मि
|
Smi_dod
| |
| Friday, February 09, 2007 - 12:57 am: |
| 
|
निरोप!!!!! अजुनहि तुझ्या परवानगीसाठी पाउल अडखळते अजुनही नजर मागे वळते तु बघत तर नाही ना कुठेतरी डोळ्याच्या कडेला एखादा अश्रु तर नाही ना थोपवलेला...... कुठेतरी वेदना तर नाही ना काळजाच्या आरपार....लपलेली जाउ नको ना ची आर्जवे तर नाही ना मागे वळुन परत परत बघते वेडी नजर..... बन्ध सोडवता सोडवत नाही निरोप घेता घेववत नाही अजुनही वाटते तु जाउ नको म्हणशील म्हणुन परत वळुन बघते लांबवर गेले तरी मन तुझाच विचार करते स्मि
|
Raadhika
| |
| Friday, February 09, 2007 - 5:17 am: |
| 
|
स्मि, निरोप छानच आहे. पण काळोख तितकीशी आवडली नाही. मीनू, रंगमंच आवडली
|
Niru_kul
| |
| Friday, February 09, 2007 - 6:10 am: |
| 
|
सांग सखी.... सांग सखी तुजविना का असे, मन वाटते मज अपूर्ण-अधूरे... सांग सखी तुजविना का असे, मन वाटते मज अपूर्ण-अधूरे... डोळ्यात माझ्या अळवाचे पाणी.... श्वासात माझ्या हळवी कहाणी.... उमलते नव्याने अशी वेदना.... निःशब्दताही अगदी विराणी.... लपवू कशी मी मनाची व्यथा? सांग सखी तुजविना का असे, मन वाटते मज अपूर्ण-अधूरे... तुझ्या आठवांचे थवे पाहतो.... स्वप्नांची तुजला फुले वाहतो.... घाव उरीचा दाबून मी.... भावूकतेच्या कळा साहतो.... मिटवू कशा यातनांच्या खुणा? सांग सखी तुजविना का असे, मन वाटते मज अपूर्ण-अधूरे... ( हे गाणे आहे. त्यामुळे कविता समजुन वाचु नये. - निरज कुलकर्णी )
|
Raadhika
| |
| Friday, February 09, 2007 - 7:19 am: |
| 
|
बरं नाही वाचत. (बरं झालं शेवटी लिहिलेली नोट आधी वाचली मी!)
|
Meenu
| |
| Friday, February 09, 2007 - 9:34 am: |
| 
|
राधिका .. .. .. नुसतच वाचलस का ? गायलं नाहीस का गाणं ..?
|
Raadhika
| |
| Friday, February 09, 2007 - 10:20 am: |
| 
|
अगं वाचलीच कुठे??? तो म्हटला होता ना 'वाचू नये' म्हणून Jokes apart , गाणं छान आहे, अगदी हळवं आणि भावुक. पण मला अगदी चालीत म्हणायला नाही हं जमलं.
|
Meenu
| |
| Friday, February 09, 2007 - 10:34 am: |
| 
|
गाणं छान आहे, अगदी हळवं आणि भावुक>>> छे समजुन वाचलेलं दिसतय तु .. तरी लिहीलं होतं ना 'समजुन' वाचु नये म्हणुन .. निरज दिवे हं सहज गम्मत तुझ्या गमतीदार सुचनेमुळे बाकी मला अळवाचे पाणी योग्य नाही वाटलं आणि overall ठीक वाटलं गाणं
|
Chinnu
| |
| Friday, February 09, 2007 - 2:07 pm: |
| 
|
निरज छान आहे गीत. त्याची चाल लावुनच लिहिल्यासारखे दिसत आहे. चाल लावल्यास नक्कीच ऐकायला आवडेल.
|