Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 08, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend » Archive through February 08, 2007 « Previous Next »

Nandini2911
Thursday, February 01, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रिया, तुला खूप दिवसापसून विचारेन म्हणतोय.. पर पता नही डर लगता है.... तुम किसे मानती हो?"
"असिफ़, मेरी पैदाईश इस्लाम है परवरीश हिंदु... और सारा वक्त गुजारती हू तुम जैसे शैतानो के साथ... अपने साथ अगर कुछ बुरा होगा... तो कोई न कोई भगवान देख लेगा... सबको हाथ जोडती हू.. सजदा करती हू.. उसके बारे मे इतना क्या सोचना. "
"पण मग तू रेहानला भेटली का नाहीस?"
"ए असिफ़, साला एक तो मेरेको चढी है उसमे तू बात बात पे टॉपिक मत बदल.... अब भगवान की बात हो रही थी रेहान कहा से टपका.."
"प्रिया, जर तू कसम घेतलीस की तुला रेहानच हवा म्हणून मग..."
"ओहो... उसी के लिये तो इतना हिस्ट्री का लेक्चर चालू होता है... माझा खेळ तिथूनच सुरू झाला..."
"मतलब.."
"असिफ़, मला माझ्या बाबाना असा वार द्यायचा होता की आयुष्यभर त्याना त्रास झाल पाहिजे. मी खूप विचार केला पण मी मुसलमान आहे हे कळून इतका उपयोग झाला नसता... समजा मी रेहानशी लग्न केलं असतं तरी तो एका क्षणचा धक्का ठरला असता कारण आधीच त्याना आमचं लफ़डं आहे असं वाटत होतं... त्यामुळे त्यात एवढी मजा नव्हती. मुळात पहिलं म्हणजे मला स्वत्:च्या पायावर उभं राहायचं होतं. आणि दुसरं म्हणजे रेहानच्या आयुष्यातून बाहेर पडायचं होतं..."
"पण का?"
"कळेल.. असिफ़ लवकरच कळेल.. तुलापण आणि रेहानला पण... आज मी जे ठरवलं ते झालय. रेहान शादिशुदा आहे आणि मी कमावती.. मला कुणाच्याही आधाराची गरज नाही. असिफ़.. परत एकदा सांगते. माझं रेहानवर प्रेम आहे की नाही हे मला माहित नाही पण माझ्या आणि बाबाच्या या लढाईत त्याला बरंच काही गमवायला लागणार आहे... चीअर्स असिफ़.. This story is going to start now...
"मला तू काय म्हणते ते समजतच नाहिये.. तू स्पष्ट सांग तू आता काय करणार आहेस?"
"काय करणार म्हणजे... रेहानला भेटणार... अजून काय?"


Jhuluuk
Thursday, February 01, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good going नंदिनी!!
मेरा अंदाजा सही निकला, प्रियाच रुही आहे :-)


Zakasrao
Thursday, February 01, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सही................
आज आवडत्या कथेचे अनेक भाग वाचायला मिळाले.
come on nandini
असच येवुदे. उत्तरोत्तर रंगत चाललीय कथा.
जर नाचणारा smily असता तर नक्कि टाकला असता.


Neelu_n
Thursday, February 01, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


झकासराव घ्या हा स्मायली.
३ भाग एकदम... नंदिनी मोगॅम्बो खुश हुवा. :-)


Lopamudraa
Thursday, February 01, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मी पण बहोत खुष हुआ, एकदा पुर्ण झाल्यावर परत पहिल्यापासुन वाचुन काढायची आहे..
झक्कास,,...


Zakasrao
Friday, February 02, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलु
धन्यवाद.
तुम्ही असे हालचाल करणारे smily कसे टाकता?


Nandini2911
Friday, February 02, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नाझ, प्लीज बार बार फ़ोन मत करो.. मुझे कोई डीस्टर्बन्स नही चाहिये" रेहानने जरा गुश्शातच फ़ोन ठेवला. हल्ली त्याचा अर्धा वेळ कामातच जायचा पण कपडे विकण्यापेक्षा त्याला जास्त interest डीझाईन्स बनवण्यात होता आणि त्यासाठीच तर त्याला वेळ मिळत नव्हता. घरात निवांतपणा मिळायचाच नाही. सारखं कुणाचं ना कुणाचं तरी येणं जाणं चालू, ऑफ़िसचा वेळ सगळा administration आणि marketing मधेच जायचा. शेवटी वैतागून रेहानने पनवेलच्या पुढे असलेला हा बंगला विकत घेतला. त्याला जेव्हा केव्हा creative काम करावंसं वाटयचं तेव्हा तो इकडे यायचा. एकदम शांत आणि मस्त ठिकाण होतं. लग्नाला ज्जवळ जवळ वर्ष होत आलं होतं.
पण तरीही नाझ त्याला दिवसातून दहादा फ़ोन करायचीच. पण बाकी कसलाही त्रास नव्हता.

त्याने स्वत्:साठी कॉफ़ी बनवून घेतली. सकाळचे आठ साडे आठ झाले होते. बाहेर पाऊस मनाला वाटेल तेव्हा पडत होता. आजचा पावसाचा नूर एकदम लहरी होता. वातावरणतच आज एक प्रकारचा शांतपणा होता. त्याच्या डोक्यात वेगेवेगळे रंग सध्या थैमान घालत होते. काय करावं हा विचार चालू होता, तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आता कोण आलं असेल हा प्रश्न रेहानला पडला.

त्याने दरवाजा उघडला.. समोर एक मुलगी उभी होती. साधारण पंचविशीची.
"जी कहिये.." तो म्हणाला..
"पहचाना?" तिने विचारलं. ती अर्ध्याहून जास्त भिजली होती. लांबसडक केसामधे मोती चमकत होते.. चेहरा ओळखीचा होता.
"प्रिया?" त्याने विचारलं.
"नही... उसका भूत.. अभी ऐसेही दरवज्जेपे रोकोगे या अंदर भी आने दोगे? थंडी वाजतेय मला"
रेहानला काय बोलायचं तेच सुचेना. त्याला आठ वर्षापूर्वीची प्रिया आठवली. एका काळोख्या रात्री त्याला रस्त्यावर भेटली होती. आणि अशाच एका वळणावर त्याला सोडून गेली होती. कायमची. कधीही चेहरा न पाहण्याची कसम घेऊन मग आज इथे...
रेहान.. तुला परत भास होतायत.
"रेहान, आत येऊ दे मला." तिने रेहानला हलवलं.. "काय विचार चालू आहे तुझा?"
"अं.. कुछ नही.. प्रिया.. तुम यहा पे..." त्याला काय बोलायचं तेच सुचेना.
"क्यु.. मी इथे नाही येऊ शकत.. आणि काय.. मराठी विसरलास पूर्ण? बरोबर आहे म्हणा.. लंडनच्या पोरीशी लग्न केलस ना..." प्रिया आत आली सुद्धा.
परत रेहानला वाटलं की त्याला आता वेड लागेल. ही मुलगी काय चीज होती?
"रेहान, एवढा विचार करू नकोस.. झेपणार नाही तुला." प्रियाने केस झटकले. शुभ्र पांढर्‍या सलवार कमीझमधे ती आज वेगळीच दिसत होती. आठ वर्षापूर्वीची अल्लड प्रिया आणि आजची प्रिया.. पाहिलं तर काहीच फ़रक नव्हता.. आणि तरी या दोन वेगवेगळ्या वाटत होत्या.
हॉस्पिटलमधे झोपलेली प्रिया आणि आणि ही अशी तूफ़ान मेल प्रिया.
amazing
"रेहान. कधी पाहिलं नाहिस का तु मला? घूरना बंद करो.. मला थंडी वाजतेय. कॉफ़ी मिळेल?" प्रिया सोफ़्यावर बसली होती.
रेहान अचानक भानावर आला. किचनम्धे जाऊन त्याने कॉफ़ी गरम केली.
"प्रिया. I am confused " रेहान म्हणाला.
" I know that " तू हाच विचार करतोयस ना की ही मुलगी इतक्या दिवसानी मला कशी काय भेटतेय.. सांगेन.. सगळं सांगेन.."
"प्रिया, तुला मी इथे आहे हे कुणी सांगितलं?"
"अरे वा... अजून मराठी येत मग तुला,.. good very good "
"प्रिया,... अगर मे कभी हार्ट अटेकसे मरुगा ना you will be responsible "
प्रिया खळखळून हसली.
"तू बिलकुल नाही बदललास...." तिचा आवाज एकदम गंभीर झाला.
"और तुम.. तू तरी कुठे बदललीस?" त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.
ती हातातली कॉफ़ीच्या मगकडे पाहत होती. क्षण दोन क्षण असेच शांततेत गेले.
"रेहान.. i am sorry "
" for what ?"
"तुला मी खूप दिवस अंधारात ठेवलं. तुझ्या खूप जवळ असून मी तुला भेटले नाहि.. रेहान, मी.... मला.. "
"प्रिया, माफ़ी का तो सवाल ही नही उठता. जो तुमने मेरे साथ किया है मै कभी नही भूल सकता..." रेहान शांतपणे म्हणाला.
" i know आणि म्हणूनच आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथे आलेय."
"मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नकोय. प्रिया, जो हो गया सो हो गया. now move ahead in your life
" the way you have moved "
" yes प्रिया. मैने एक बात सिखी है जिंदगी से. वो किसी के लिये नही रुकती."
"पर मुझे उसे रोकनाहि नही है.. ना खुद रुकना है.. रेहान बहोत हो गयी ये घिसीपीटी बाते.. मी इथे तुझ्याबरोबर आयुष्य डिस्कस करायला नाही आले. मला माझ्या मित्राकडून मदत हवी आहे. ती मिळेल का तेवढं सांग."
"प्रिया. तुम मेरी best freind थी और रहोगी.. बोलो क्या मदद चाहिये?"
प्रियाने कॉफ़ी खाली ठेवली. आणि एकदम थंड आवाजात तिने विचारलं.
"क्या तुम मुझे अपनी रखैल बना सकते हो?"



Bhramar_vihar
Friday, February 02, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कानठळ्या बसवणारं गोंगाटी background music ! कॅमेरा पुढे मागे.. आणि एपिसोड the end!

Sakhi_d
Saturday, February 03, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही, मला वाटत ही नंदिनी त्या रेहानबरोबर आपल्यालाही हार्ट अटकने मारणार.............

नंदिनी लवकर पुढचा भाग टाक


Neelu_n
Saturday, February 03, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढ्यान्ट ढ्यान्SSSSSS
रेहान सुन्न आणि आम्हीही....
सखी :-)


Prasik
Saturday, February 03, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"फ़क्त मी जिंकताना किती आयुष्य उधळेन हेच आता बघायचय..." ..... स्व:ताचे आयुष्य उधळणारी प्रिया, ......आणि मी म्हणत होतो शेवट चांगला आहे.
.....CARRY ON NANDINI

Dhoomshaan
Sunday, February 04, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This is really great!!!!!!!!!!

I mean कुठली मुलगी असं direct हे "असलं" काही विचारेल!!!!!!!!!


हां, हां, म्हणजे ती असा बदला घेणार की काय बापाचा!!!!!!!!!

बाकी
प्रत्येक post चा end मात्र झक्कास करतेस हां, नंदिनी !!!!!!!!!!

Nandini2911
Monday, February 05, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रिया, दिमाग ठिकाने पे है तुम्हारा? काय बोलतेयस ते समजतय तुला?" रेहान उसळून म्हणाला.
"रेहान, मी पूर्ण विचार करूनच बोलतेय. खरं तर मला हे धाडस करायलाच इतके दिवस लागले. माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण निर्णय आहे..."
रेहान शांत बसला.
"प्रिया, का करायचय तुला हे?"
"रेहान, कुणीतरी माझ्या आयुष्याच पट उधळला आहे. मला तो पूर्ण विखरायचा आहे..."
"काय मिळेल तुला यातुन..."
" good question रेहान, मला यातून काहीही नकोय. माझी बदनामी होईल आणि काय...."
"प्रिया, तुम पागल हो"
"रेहान, if i am not mistaking.... असिफ़ने सगळ्यत आधी माझ्याबद्दल तुला हेच सांगितलं होतं ना? मला माहित आहे की कुठलिही मुलगी असं करायल धजावणार नाही.... पण मग मी दुसरि कुठलीही मुलगी नाहिये ना? I am different "
"प्रिया, माझं लग्न झालय आणि I am very haappy with my wife तिला माझ्या पास्टबद्दल सगळं माहित आहे तरी तिने माझ्याशी निकाह केला.. आणि मी तिला धोका देणार नाही..."
"मी तुला नाझियाला धोका दे असं सांगितलंच नाही.. रेहान, This is a deal तुला फ़क्त हे नाटक करायचं आहे.. बास मला अजून काहीही नको..."
"प्रिया, हे नाटक तुला खूप भारी पडेल. बापाशी बदला घेण्याची कधीतरी माझीपण इच्छा होती. पण म्हणून हे असं काहीतरी...
प्रिया नफ़रत आदमी को अंधा बनाती है.. तेरे हाथ से जिंदगी रेत की तरह निकल जायेगी और तू बाद मे पछतायेगी.."
"रेहान... एक मिनिट थांब. मी आधीच तुला सांगितलय की मला कसलेही उपदेशाचे डोस नको. ते सगळ्यानी दिलेत. इरफ़ानचाचानी तर अख्खी philosophy समजावली मला. पण कुणीही माझा निश्चय बदलू शकलं नाही.."
"इरफ़ान.. मतलब मेरा बाप?"
"हा.."
"तुम कैसे जानती हो उन्हे?"
"प्रिया कुलकर्णी नही जनती... रुही काद्री पहचानती है..."
प्रिया हलकेच हसली.
बाहेर पाऊस आता जोरात कोसळत होता. सकाळ सुद्दा काळवंडली होती.
रेहान खिडकीतुन बाहेर बघत होता.
" i am confused " तो बर्‍याच वेळाने म्हणाला.
" as usual.. let me give you some explanation..."


Nandini2911
Tuesday, February 06, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारचे बारा वाजत आले होते. प्रिया अखंडपणे बोलत होती. इतक्या वर्षाच्या तिच्या साठलेल्या भावना सगळे बांध तोडून आल्या होत्या. रेहान शांतपणे ऐकत होता.
"प्रिया, तु मला जे काही सांगितलंस ते खरंच कुणालाही जमणार नाही. मला तुझ्या या डेसेजन घ्यायच्या ability ची कमाल वाटतेय. पण तरीही This is not a way to solve the problem "
"मी परत एकदा सांगतेय की मला आता उपदेश नकोय. मला फ़क्त तुझा होकार हवाय..."
"आणि जर मी नकार दिला तर..."
"तू देणार नाहीस..."
"कशावरून.?"
प्रियाने रेहानकडे पाहिलं..
"रेहान, म्हणून तर मी तुझ्याकडे आले.. जर मला तुझ्या नकाराची पर्वा असती तर.. केव्हाही तुझ्याबरोबर मी प्रेमाचं नाटक करू शकले असते. तुला समजलं पण नसतं की मी तुला कसं वापरलय.. पण मला ते नकोय... मी एक मित्र म्हणून तुझ्याकडे मदत मागतेय..."
"प्रिया.... आणि जर मी नकार दिला तर तू काय करशील?"
प्रियाने डोळे मिटले. "रेहान, तू नकार देणार नाहीस..."
"मला नाझचीइ सगळ्यात जास्त काळजी आहे. पण त्याहूनही तुझी काळजी आहे.. मुर्खासारखं तू तुझं आयुष्य वाया घालवतेस..."
"रेहान हे फ़क्त मी माझ्यासाठी नाहि करत.." प्रिया उसळून म्हणाली..
"तू कुणासाठीही कर... पण only you willl suffer... "
" suffer... हा... ask my mother about it .... रेहान.. हे मला माझ्या आईसाठी करायचय. तिने खूप कष्ट काढले या माणसापायी. You know.. she is still virgin पण या माणसाने तिला वांझ म्हणून declare केलं. स्वत्:ची खोटी इज्जत जपण्यासाठी... रेहान. मला त्याला आयुष्यातून उठवायचय."
प्रियाच्या अंगातून संताप नुसता उसळत होता. रेहान तिच्याकडे बघत होता. त्याच्या मनात एकाच वेळेला अनेक विचार आपापसात लढत होते. एक नवरा. एक मुलगा. एक मित्र आणि एक पुरुष..
पण शेवटी कुणीतरी एकच जिंकलं..
"प्रिया.. I am ready for your deal.." रेहान शांतपणे म्हणाला.
" Thank you. "
"पर मेरी कुछ शर्ते है.. उन्हे पहले सुन लो... मी हे फ़क्त तुझ्यासाठी करतोय. पण हे नाटक फ़क्त एकच वर्ष चालू राहील. तू तुझा आताचा जॉब सोडशील आणि माझ्या कंपनित येशील. अस a brand manager .."
"आणि एक वर्षानंतर,... "
"ते मी ठरवीन.. आतापर्यंतचा खेळ तू खेळलीस.. पण पुढचा मी ठरवीन.."




Nandini2911
Wednesday, February 07, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाझियाला तिच्या भावाचं म्हणणं आता पुरेपूर पटत होतं. रेहानला स्किझोफ्रेनिया झाला होता हे ऐकूनच या लग्नासाठी त्याने नकार दिला होता. पण नाझ तेव्हा तिच्या निश्चयावर ठाम होती. डॉक्टराच्या मते हा आजार पूर्णपणे कधीच बरा होत नसतो. पण तरी तिने रेहानबरोबर येणं पसंद केलं होतं. पण हल्ली तोच रेहान असं का वागत होता.

त्याने तिला हर पद्धतीने समजावत होता. पण तरीही हे असली तडजोड तिला कधीच मान्य झाली नसती. friend साठी हे एवढं?

असिफ़ने सुद्धा तिला मनवलं होतं. फ़क्त एकदातरी प्रियाला भेट असं त्याचं म्हणणं होतं. पण नाझला तिचं तोंड बघायची इच्छा नव्हती...

प्रिया आणि रेहान एकत्र काम करत होते. त्यानी विरासत कलेक्शनला यश दाखवून दिलं. रेहानची डीझाईन्स आणि प्रियाचं मार्केटिंग..
असिफ़ आणि पाखी लग्न करणार हे जवळ जवळ नक्की झालं होतं

सुधीर कुलकर्णीनी रीटायरमेंट घेतली होती. गावामधून MLA साठी उभे राहत होते. पण त्याची एकुलती एक मुलगी मुसलमानाबरोबर लग्नाशिवाय राह्ते ही बातमी त्याच्या हित चिंतकानी व्यवस्थित पसरवली. कुलकर्णीना नॉमिनेशन परत घ्यायला त्याच्या पक्षाने भाग पाडलं.

हा प्रियाचा विजयी क्षण होता. तो तिने रेहानबरोबर celebrate केला.
रेहान तिच्या अयुष्यात नुसतीच एक business deal बनून आला नाही. जगण्याला प्रेमाची आणी त्याहूनही जास्त अशा शांतीची गरज असते. हे रेहानने तिला शिकवलं.

लहानपणापासून प्रिया प्रत्येक नात्याच्या स्पर्शाला मुकली होती. रेहान तिच्यासाठी ते प्रत्येक नातं जगला. तिच्या एकाकी जगण्यात त्याने स्वत्:च्या आयुष्य झोकून दिलं.

रेहान प्रियाचा फ़क्त प्रियकरच नाहीइ तर वडील, भाऊ मित्र सगळं काही होता.
तशीपण प्रियाला आणि रेहानला समाजाची पर्वा नव्हतीच त्यामुळे किती बदनामी झाली तरी काही फ़रक पडत नव्हता. नाही म्हणायला रेहानचे अब्बा थोडे फ़ार चिडले होते. पण तसंही रेहान कुठे त्याच्या आज्ञेत कायम होता?
बघता बघता दिवस कसे झर झर सरत होते कळलेच नाही
हळू हळू सगळ्याना या जगावेगळ्या नात्याची सवय होत गेली.
प्रियाची आई चिडायची ओरडायची.. प्रियाच्या बाबानी तर तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडूनच दिले होते.
प्रिया आणि रेहान दर वीक एंडला या पनवेलच्या बंगल्यात यायचे.
आजही प्रिया आणी रेहान इथे आले होते.
प्रियाला सकाळीइ एक मीटींग होती.. पण रेहान काही तिला सोडत नव्हता...
कारण आज रेहानच्या खेळाचा दिवस होता. आणि तो वाट बघत होता एका व्यक्तिची.


Chyayla
Wednesday, February 07, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता काय आपणही वाट पहा.. पुढच्या एपिसोडची

Varadakanitkar
Wednesday, February 07, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार वाट पहातोय नंदिनी टाका ना पुढंचं post लवकर

Manya2804
Thursday, February 08, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर कुलकर्णीनी रीटायरमेंट घेतली होती. गावामधून MLA साठी उभे राहत होते. पण त्याची एकुलती एक मुलगी मुसलमानाबरोबर लग्नाशिवाय राह्ते ही बातमी त्याच्या हित चिंतकानी व्यवस्थित पसरवली. >>>>

मला वाटत इथे 'हितचिंतक' ऐवजी 'हितशत्रू' जास्त योग्य आहे...


Bhramar_vihar
Thursday, February 08, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णींच हित होतय हे पाहुन ज्याना चिंता वाटली ते हितचिंतक!

Vinayaknarvekar
Thursday, February 08, 2007 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर बहुतेक तुला बुद्धिमत्ता चाचणीत संधी सोडवा या प्रकारात पैकीच्या पैकी marks मिळाले होते वाटत...:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators