Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Friend

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 08, 200620 12-08-06  9:48 am
Archive through December 12, 200620 12-12-06  5:36 am
Archive through December 15, 200620 12-15-06  5:33 pm
Archive through December 26, 200620 12-26-06  7:22 am
Archive through December 30, 200620 12-30-06  12:48 pm
Archive through January 09, 200720 01-09-07  12:47 am
Archive through January 16, 200720 01-16-07  2:19 am
Archive through January 24, 200720 01-24-07  8:47 am
Archive through February 01, 200719 02-01-07  4:13 am
Archive through February 08, 200720 02-08-07  8:03 pm

Nandini2911
Friday, February 09, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रेहान, मी काल रात्रीपासून बघतेय. तु कसल्यातरी विचारात आहेस.. काय झालय?"
प्रियाने विचारलं.
"काही नाही.. " त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिलं..
"रेहान, मी निघू?"
"नको, थोडा वेळ थांब..."
"मला उद्या सकाळची फ़्लाइट आहे.."
" I know पण तरी थांब,"
"का?"
"तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला i dont have time " तो भडकला.
"रेहान,... चिडू नकोस. मी सहज विचारलं.... असिफ़ आणि पाखीच्या लग्नात पण तू असाच वागत होतास.. काय झालय ते स्पष्ट सांग..."
त्याने केसातून हात फ़िरवला. तो अस्वस्थ होता.
"प्रिया.. थोडा वेळ तू बाहेर जाऊन बस... मी कसला तरी विचार करतोय.. please leave me alone "
प्रिया बेडवरून उठली.
"ठीक आहे.. एकीकडे मी तुला या रूममधे नकोय आणि तू मला जाऊ पण देत नाहिस.. " ती दरवाज्यापर्यंत गेली.... आणि पाठी वळून म्हणाली.."मला असं का वाटतय की तुला या नात्याचा आता त्रास होतोय.." आणि ती हॉलमधे आली.
तो काहीच बोलला नाही.

ती बाहेर येऊन बसली... तिच्या डोळ्यासमोरुन गेलेला काळ भुतासारखा नाचायला लागला. तिच्या एका आततायी निर्णयामुळे तिने किती जणाची आयुष्य उधळली होती. नाझिया कायमची लंडनला गेली होती. तिने रेहानकडे तलाक़ मागितला होता... इरफ़ानचाचानी आणि रेहनच्या अम्मीशी तर तिने स्वत्:हूनच संबंध तोडले होते.
काय तोंडाने ती त्याना भेटणार होती. नाही म्हणायाला असिफ़ पाखी अजूनही तिला समजून घेत होते. पण त्याना त्याचं आयुष्य होतं.....
तिने नोकरी सोडल्यापासून वीरने तर तिला ओळख सुद्धा दाखवली नव्हती. आणि जतिन.. कदाचित त्याचे एव्हाना लग्न झालं ही असेल... ती स्वत्:शीच हसली.
आतापर्यंत ती स्वत्:च्या शर्तीवर जगत आली होती.
मग आजच अचानक हा अंधार का जाणवत होता.
रेहानने तिला accept करून तिच्यावर उपकार केले होते. आणि आज जर त्याला याचं ओझं जाणवत असेल तर त्यात त्याची काय चूक होती.
आपलं रेहानवर प्रेम आहे का.. तिने स्वत्:लाच विचारलं..
किती तरी वेळ प्रश्नाचं उत्तर आलंच नाही... मग आतून कुठूनतरी एक प्रति ध्वनी उठला...
नाही प्रिया तुझं रेहानवर प्रेम नाही. तू त्याला स्वार्थासाठी वापरलं आहेस. तू तर बरबाद झालीसच पण त्यालाही घेऊन बुडालीस. तुझ्या निखळ मैत्रीची किंमत तो चुकवतोय. तुला वडीलाचा बदला घ्यायचा होता ना... पण तू तर रेहानलाच मिटवायला निघालीस..
तसं बघायला गेलं तर आपल्यात वितुष्ट असं काहीच नव्हतं. एखाद्या नवरा बायको पेक्षा आपण नीट राहतो....
प्रियाच्या मनात हा विचार आला आणि ती थबकली. आपण आपलं तारू किती भरकटवलय याची तिलाच कल्पना आली. रेहान नाझियाला तलाक़ देणार नाही हे तिला माहित होतं आणि ती रेहानची दुसरी बायको होणार नाही हे त्याला माहित होतं.
या नात्याला जगाच्या कुठच्याही पारड्यात तोलता येणार नव्हतं. आणि हे नातं असं संपवताही येणार नव्हतं.
ती उठून किचनमधे आली. नातं संपवणं शक्य नव्हतं पण ती तर स्वत्:ला संपवू शकत होती ना..
प्रियाने तिथे असलेला चाकू उचलला. आत्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. तिने मनाला समजावलं. पण त्या पापापेक्षा मोठं ओझं जगण्याचं आहे. तिच्या मनानं उत्तर दिलं.

वर्षानुवर्षे तिच्या मनत चालत असलेला संवाद परत सुरू झाला. पण तिला आज हा संवाद सम्पवायचाच होता.
रेहानला कळू नये म्हणुन ती मागच्या दरवाज्याकडून गार्डनमधे निघाली. तेवढ्यात कुणाची तरी गाडी गेटमधून आत आलेली दिसली.
कुणीतरी पुढच्या दरवाज्याची बेल वाजवत होतं.



Nandini2911
Friday, February 09, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियाच्या हातातुन चाकू गळून पडला. कोण आलय हे तिला संगायची गरज नव्हती.
रेहानने प्रियाला आवाज दिला. ती मुक्यासारखी हॉलमधे आली.
"प्रिया, पहचानती हो इसे?" रेहानने विचारलं.
तिने हलकेच मान डोलावली... रेहानच्या मनात काय विचार आहे हे तिला अजूनही कळलं नव्हतं.
जतिन तिच्या समोर उभा होता. निवांतपणे. बहुतेक पुढे काय होणार आहे याची त्याला कल्पना असावी. फ़क्त अजून तीच अंधारात चाचपडत होती.
"बस मी आलोच.." रेहान किचनमधे गेला.
ती तशीच उभी राहिली.
"प्रिया, तू पण बस ना.. " जतिन अगदी casually म्हणाला.
ती नाईलाजाने बसली.
"प्रिया, जेव्हा रेहानने मला सांगितलं तेव्हा माझा विश्वासच बसेना. i was so shocked "
तो कशाबद्दल बोलतोय तेच प्रियाला कळेना.. पण ती मुद्दामच काही बोलली नाही.
"जतिन, चलो.. lets decide everything " रेहान बाहेर आला.
" about what ?" प्रियाने विचारलं..
रेहानने प्रियाकडे एकच क्षण पाहिलं.. आणि बर्फ़ासारख्या थंड आवाजात तो म्हणाला..
"तुझ्या आणि जतिनच्या लग्नाबद्दल...."
प्रियाला एका क्षणासाठी पूर्ण कोरी झाली.. रेहान काय म्हणतोय तेच तिच्या लक्षत आलं नाही, आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिचा संताप डोळ्यातून उसळला.
"रेहान, तू काय बोलतोयस... कल्पना आहे तुला?" ती ओरडली.
"प्रिया,... मी आधीच सांगितलं होतं ना,, की नंतरचा खेळ मी ठरवेन.."
"माझं आयुष्य तुझं खेळणं नाही..."
"ते मी नाही तू बन्वलयस... प्रिया,.. अब्बा कायम म्हणतात की आपल्या दोघाकडे maturity नाही, आणि ते खर आहे,, नाहीतर एवढा मूर्खपणा आपण केला असता का?"
"अच्छा,, म्हणजे आता तुला मी नको झाले म्हणून तू माझ्यापासून ही अशी सुटका करून घेणार का?" तिच्या डोळ्यात पाणी आलं..
"प्रिया, जर मला तुला सोडायचंच असतं ना तर मी कुठच्याही क्षणी सोडलं असतं. मला तुला काहीही excuse द्यायची गरज नव्हती. but i am concerened about you "
प्रिया आता रडायला लागली.
"जतिन, देखो.. जिंदगीभर इसे संभालना पडेगा.. " रेहान जतिनकडे बघत म्हणाला.
"रेहान, मैने पहले भी कहा था.. आज भी.. i love her "
" thats it जतिन.."
रेहानने प्रियाच्या डोक्यावरून हात फ़िरवल.
"मला पाखीने जतिनबद्दल सांगितलं होतं. मी त्याला भेटलो. तेव्हा त्याने मला सांगितलं की तो तुझ्यावर प्रेम करतो.
प्रिया, सबसे important तो यही होती है ना.. कोई किसी बिना शर्त के आपसे प्यार करे.."
"पण रेहान,,,,"
"प्रिया,. हे मी आपल्या दोघासाठी करतोय.. तुझ्यासाठी जतिन चांगला मुलगा आहे. कारण त्याला तू जशी आहेस तशी चालेल. प्रिया. हमेशा उसीके साथ जिंदगी बिताओ जो तुमसे प्यार करे. ना की जिस से तुम प्यार करो.."
"रेहान.. This is not a solution. मला जतिनचे घरवाले कधीच acceptt करणार नाही."
"जतिन.. अब तुम बोलो" रेहान म्हणाला.
"प्रिया, मी घरी बोललोय.. आता नाही खूप आधीपासून. आणि मी हे clear केलय की तुला कसलाही त्रास घरी होणार नाही." जतिन म्हणाला.
"प्रिया, this is perfect "
प्रियाने जतिनकडे पाहिलं. "माझ्याजवळ दुसरा कुठलाच option नाहिये ना?" तिने हसण्याचा प्रयत्न केला. केविलवाणा,
"प्रिया, मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करत नाही. decision हा तुझाच राहील." जतिन म्हणाला.
"रेहान, मला वाटतय की तू मला तुझ्या अयुष्यातून घालवायचा प्रयत्न करतोयस.."
रेहान हलकेच हसला.
"प्रिया, मी तुला तुझं आयुष्य पुढे नेण्यासाठी मदत करतोय. मला तुला खूप खुश बघायचय. तुझा हा रडका चेहरा मला बघवत नाही आणि मी जतिन स्वत्:हून तयार झालाय... अजून काय हवय तुला?"
प्रिया काहीच बोलली नाही. रेहानने जतिनकडे पाहिलं.
"जतिन. तू तयारीला लाग. मी लंडनला जाऊन नाझला परत घेऊन येतो, तोपर्यंत असिफ़ परत येईल.. "
"रेहान पण अजून प्रिया तयार नाही झाली..." जतिन म्हणाला. रेहानने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला.
"ए पागल, चल हा बोल दे"
तिने परत एकदा डोळे पुसले.
रात्र नुकतीच सुरू झाली होती.
"हरामी साला.." ती म्हणाली.
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.


"


Nandini2911
Friday, February 09, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स मा प्त


मा प्त मा


प्त मा स


Manishalimaye
Friday, February 09, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>हमेशा उसीके साथ जिंदगी बिताओ जो तुमसे प्यार करे. ना की जिस से तुम प्यार करो.." <<

हम्म!!!

धन्यवाद नंदिनी
वा! छान नंदिनी!! अभिनंदन!!
आता पुन्हा नव्याकडे वळुया!!
नवी कथा---हवीच!!
नव्या कथेची वाट पहात आहे.

[मात्र मला इथे शेवट अचानक झाल्यासारखं का वाटतय!!!!


Neelu_n
Friday, February 09, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चलाSS गंगेत एकदाचं घोडे न्हाले. :-)
नंदिनी तु ठीक आहेस ना.. समाप्तची एवढी तोडमोड केलीयस ती:-)
शेवट गोड तर सगळच गोड.. नंदिनी छानच.
आज वादळ्वाट संपतेय आणि नंदिनीची कथा पण संपली.. योगायोग आहे ना!!:-)


Psg
Friday, February 09, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चलाऽऽऽ! :-)
नंदिनी, गोड शेवट केलास हे बरे केलेस, पण कथेत इतके धक्के खाल्लेत 'की इतका कसा काय गोड शेवट बरं ' असा प्रश्न पडतोय! :-) हेच तुझ्या लेखनाचं यश आहे!


Varadakanitkar
Friday, February 09, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी खूप छान लिहिलयस..मस्तच.

Prasik
Friday, February 09, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हरामी साला.." ती म्हणाली.
.......... I hate this girl, I dont know why, but its true.


........NICE JOB NANDINI, WAITING 4 NEXT.


Chinnu
Friday, February 09, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्तच ग. खुप ड्रॅमॅटीक लिहीलीस. मज्जा आली वाचतांना!

Sas
Friday, February 09, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्त लिहिलय.छान जमलिय कथा.

Marathi_manoos
Friday, February 09, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini...was waiting 4 u 2 finish dis story 4 so long. I enjoyed the journey(almost 2 months 4 dis story). waiting 4 a nu 1.

Chyayla
Friday, February 09, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, तुझ्या कथेची सुरुवात व शेवटही "हरामी साला...." नेच झाली. प्रिया हे पात्र खरच मनोविकारग्रस्त वाटत होते, शेवटच्या भागात ती शहाणी झाली व शेवट गोड झाला... खरच कठीण प्रसन्गातुन योग्य मार्ग काढुन अशा प्रकारे शेवट करण्यास यश मिळवलस. मानल बुवा तुला... अभिनन्दन...

Bhramar_vihar
Friday, February 09, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म्म! गुड वन मॅडम! खर तर कथाबीज म्हणतात तसं काही नाहीये, पण प्रसंग खुलवत नेलेस तु! पुढची कथा (?) कधी?

Zakasrao
Saturday, February 10, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
तु ना एखाद्या सिरिअलची लेखिका असल्यासारखे वाटतेय.
पण कथा आवडली.
आता आम्हाला तुझ्या कथेचे एपिसोड वाचण्याची सवय लागली आहे त्यामुळे तुझ्या पुढच्या कथेची वाट पाहतोय. ती लवकर येवुदे. तिथे फ़ार वाट पहायला लावु नकोस.


Ek_veda
Saturday, February 10, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा खुप आवडली.. तसा मि Read only member आहे. पण नंदिनी, तुमचे अभिनन्दन करायला पेन(अर्थात keyboard ) हातात घेतला:-)... तर नंदिनी तुमचे अभिनन्दन
पण मला तर ज़तीन ची दया येते आहे.. कसे होणार त्याचे? :-))


Manogat
Monday, February 12, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,
तु पोस्टिंग करते आहेस तेव्हा पासुन मि रोज न चुकता हि कथा वचते आहे पण, कथा शेवटि गुन्डाळल्या सरखि वाटते आहे..
मला वाटत कि तु अजुन कथा रंगवु शकलि असति...
But still story is too good, I enjoyed it...
Thanks


Jhuluuk
Monday, February 12, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय नंदिनी,
कथा सुरुवातीपासुन वाचत होते, अगदी छान रंगली होती!
झकासराव म्हणाले तसे, serial writer प्रमाणे लिहिलीस..
मलाही शेवट घाई-घाईत केल्यासारखा वाटला, कदाचित पुढचे भाग़ आता येणार नाहित म्हणुन वाटले असेल :-)
तरीही शेवट गोड व समर्पक झाला.
बरे, त्या रेहानला तरी काही अक्कल सुचली :-)



Arnika
Thursday, February 15, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तू लिहिलयस छान.ओघवती भाषा आहे शिवाय तुझ्या छान लिखाणाची अजून एक पावती म्हणजे ती प्रिया माझ्या अगदीच डोक्यात गेली...ती जे फाटकन बोलायची, मधेच काहीतरी बर्‍यापैकी बोलायची, ते तिचे मूड स्विंग्स हे सगळं तुला शब्दात छान पकडता आलय.

Lopamudraa
Thursday, February 15, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी thanks छान संपली एकंदर कथा..
थोडे एकता कपुर style धक्के दिले मधे मध्ये पण आवडली..!!!


Robeenhood
Friday, February 16, 2007 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो नन्दिनीची कथा सम्पली पण आपले काय बाईसाहेब?

Jayavi
Saturday, February 17, 2007 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी........ इतके दिवस तुझी कथा संपावी म्हणून थांबले होते. आज एका दमात सगळी वाचून काढली....... खूपच सुरेख झालीये कथा. मायबोलीची कथापटू म्हणून तुझी निवड करावी म्हणतेय :-)

Yog
Saturday, February 17, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके तपशिल लिहूनही मूळ पात्र (कोण?) आणि त्याची वा तिची भूमिका खूप weak वाटते. इतकी मोठी कथा (देवनागरीतून) लिहिली त्याबद्दल अभिनन्दन पण कथेतून कुठलाही धड मेसेज जाणवत नाही, स्वतः लेखिका confused वाटते. सुरुवातीपासून शेवटपर्यन्त (काहितरी ठोस हेतू वा एक दुवा सापडेल म्हणून) वाचून काढली आणि फ़क्त दमलो.:-) just felt like marathon... with no end and no purpose.

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

चान्गल्या आणि कथा या सदरात मोडणार्‍या अर्थपूर्ण कथा इथेच archives मधून वाचता येतील. may be 1-2 yrs back.. किव्वा त्याही पूर्वीच्या.

चू.भू.दे.घे.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators