|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 6:06 am: |
| 
|
>>>>>> असाच लोभ ठेवा ही विनंती होऽऽ नाऽऽ! अन शक्य झाल्यास जोडी जोडीन लोभ ठेवा.......! (असच ना???) DDD
|
पूनम, फार सुरेख लिहिली आहे कथा. मिल्या, लहानपणात आई, वडिलांच्या किंवा भावंडाच्या मृत्यूसारख्या मानसिक धक्का देणार्या घटना घडल्यानंतर मुलं खूप हळवी आणि संवेदनशील होतात, त्यामुळे तेजसचं जास्ती विचार करणं हे मला विसंगत नाही वाटले.
|
Maitreyee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:03 am: |
| 
|
पूनम सुरेख लिहिलियस कथा, आवडली!
|
Krishnag
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:08 am: |
| 
|
पूनम, सुंदर कथा! अगदी ओघवती!! वाचायला सुरुवात केल्यावर संपेपर्यंत सलग वाचली!! छानच!! 
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:18 am: |
| 
|
कथा खुप सुरेख जमलिये.. अगदी डोळे भरुन आल्याशिवाय राहिले नाही. (वय ५ पेक्षा जास्त हवे होते पण काय हल्लिची पिढी..काही सांगता येत नाही. )
|
Neelu_n
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:21 am: |
| 
|
पूनम, सुंदर कथा! डोळ्यात पाणी आले अगदी... च्नान!!
|
Madhurag
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:59 am: |
| 
|
पूनम, सुंदर....!!! खुपच छान लिहीलं आहेस
|
सुंदर जमली आहे कथा, पूनम! विषय नवीन नाहीये हे खरं, पण मांडणी सुरेख जमली आहे. सगळ्या महत्वाच्या आणि इतरही व्यक्तिरेखा नेमक्या डोळ्यापुढे उभ्या रहातायत. मोजकेच आणि नेमके प्रसंग, कुठे निष्कारण पाल्हाळ नाही. सहजसाध्या शैलीमुळेच भिडते असं वाटलं. Touching असूनही मेलोड्रॅमॅटिक होऊ न देण्याची कसरत छान साधली तुला. योगायोगाने मलाही वाचताना तेजस सात आठ वर्षांचा दाखवायला हवा होता असं वाटलं. विशेषतः किचनमधला प्रसंग वाचताना. पाच वर्षांचं मूल नवीन आई नाकारेल, बुजेल, पण ' का? आता तुम्ही माझं काहीच करणार नाही का?' अश्या भाषेत बोलेल असं नाही वाटत. अर्थात लोपा म्हणाली तसं.. हल्लीच्या मुलांचं काही सांगवत नाही. You are a natural. जरा seriously घे हे लेखनाचं.
|
Asami
| |
| Wednesday, February 07, 2007 - 12:00 pm: |
| 
|
एकदम ओघवती नि natural ग पूनम. मस्तच.
|
Shyamli
| |
| Wednesday, February 07, 2007 - 12:49 pm: |
| 
|
सुरेख कथा, आता लवकरच तुलाही कथासंग्रह कधी काढताय अशी विचारणा करायला हरकत नाही. छानच लीहीतीयेस तू, लगे रहो 'आईचा मृत्यू' सारख्या मोठ्ठ्या घटनेनंतर तर तेजसचं मन जास्तच संवेदनशील झालेलं असणार हे सगळं समजण्यासाठी. म्हणून तेजसचं वय ५ वर्षे योग्य वाटले>>>>100% अनुमोदन, असे आघात अवेळी झालेली मुलं फार लहान वयात विचार करायला लागतात.
|
Madhura
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:59 pm: |
| 
|
पूनम, काय मस्त लिहिली आहेस कथा. या आधीच्या दोन्ही कथाही छान होत्या. या कथेने तर रडवलेच... सहजसुंदर कथा.
|
Sashal
| |
| Wednesday, February 07, 2007 - 5:25 pm: |
| 
|
छान लिहिली आहे गोष्ट, खूप आवडली ..
|
Nakul
| |
| Wednesday, February 07, 2007 - 9:10 pm: |
| 
|
पूनम कथा छनच लिहिली आहेस स्वातीला माझेही अनुमोदक.
|
Limbi
| |
| Wednesday, February 07, 2007 - 10:14 pm: |
| 
|
पूनम, वाचताना टच्चकिनी डोळां पाणी आल हो माझ्या. मनाला भिडणारी लिहिलि आहेस ही कथा.
|
Suvikask
| |
| Thursday, February 08, 2007 - 1:50 am: |
| 
|
भिडणारी.. बाकी शब्दच आठवत नाहीत...
|
पूनम सुंदर गं. खूपच गोड आणि भावस्पर्शी झालीय गोष्ट. डोळे भरून येत होते वाचताना. वयाबद्दलचं तुझं स्पष्टीकरण अगदी योग्य. हल्लीची या वयाची मुलं यापेक्षाही चकित करणारं बोलतात. व्यवस्थीत इमोशनल ब्लॅकमेलींगही करतात.
|
Bee
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:22 am: |
| 
|
कथाशैली आणि कथेचा विषय छान आहे. पण..काहीकाही संवाद पटले नाही. जसे की हा खालचा संवाद एकदम नकोसा वाटतो आणि असं निदान विजय आणि अंजली सारख्या समंजसव्यक्तीकडून तरी होईल असे वाटत नाही. तुझी आई आता ह्या जगात नाही असे वाक्य योग्य वाटतं नाही. कथेची depth बर्यापैकी मांडता आली. कारण हा एक जड विषय आहे. तेजू, ही अंजली.." "तू माझी नवी आई होणारेस? मला नकोय नवी आई.." विजय चमकलाच.. त्याने सावरून घ्यायचा प्रयत्न केला.. पण अंजलीनी अडवले त्याला.. तेजसचा राग बाहेर पडू द्यायला हवा होता.. "तेजस, मी तुझी आई व्हायला नाही आले. तुझी आई तीच आहे- अपर्णा.. मी तुझी फ़्रिएन्द म्हणून आले तर चालेल ना?" तेजसला काय बोलाव कळेचना.. ही तर आई होणार नाही म्हणते.. मग आता? "हे बघ, तुझी आई आता नाही आपल्यात, पण तू छोटा आहेस ना अजून, मग तुझ्याकडे पाहणार कोण? बाबा आहेत, पण त्यांना इतकंसं जमत नाही ना? म्हणून मी येणार आहे.. आपण हळुहळू फ़्रिएन्द्स होऊ, ओके?" हे खरं होतं- बाबा करायचे सगळं, पण त्यांना नीट यायचं नाही काही आईसारखं.. आणि गीताकाकूंचा स्वयंपाक काहीतरीच असायचा.. पण म्हणून.. "मला खूप फ़्रिएन्द्स आहेत, तू नकोस मला" "हो, पण माझ्याइतकी मोठी फ़्रिएन्द बिग फ़्रिएन्द अंजलीच म्हण हं?" तेजसचे सगळे देफ़ेन्cएस
|
Deemdu
| |
| Thursday, February 08, 2007 - 3:48 am: |
| 
|
बी रे असं क्रिटीसाइज करण्यापेक्षा त्यातला भाव बघ ना please आणि मलातरी त्या संवादामध्ये चुकीच काही वाटत नाहीये. आणि त्याच स्पष्टीकरण अगदी वेळेवर कथेत आलं आहे अस मलातरी वाटतं पुनम जे सांगायचय ते व्यवस्थित आणि मोजक्या शब्दात एकदम perfect भावना पोहोचवल्या आहेस
|
Bee
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:22 am: |
| 
|
दीमडू गं मी टिका नाही करत आहे. तू माझे ते एक वाक्य वाच related to depth.. प्रतिक्रियांचा लेखकाला फ़ायदाच होत असतो... to be frank..
|
पूनम,कथासूत्र छान गुंफ़ले आहेस.. मस्त मांडली आहेस गं.. विषय खूप नविन नाहीये पण ओघवत्या भाषेमुळे छान झालीये कथा.. तसही लघुकथा हे तुझं होमपिच झालय आता
|
|
|