Psg
| |
| Thursday, February 01, 2007 - 6:16 am: |
| 
|
वा! काय सही कल्पना आहे!
|
Sarang23
| |
| Thursday, February 01, 2007 - 6:45 am: |
| 
|
वा! प्रसाद... अप्रतीम कल्पनाशक्ती! सुर्यमालेचा उगम खास आहे!
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 7:37 am: |
| 
|
प्रसाद खुप दिवसांनी ! खेळणं ....! माणिक !
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:42 am: |
| 
|
मिळाली रे .... बघ मिळाली माझ्या कवितेलाही दाद आली कविता माझी स्तुतिसुमनात न्हाली " धन्यवाद " लिहायची संधी मला आली महिनाभर झाला विचार मुरतोय मनात शब्दांचा जुगाड करतोय कागद पांढर्याचा काळा होतोय पण कुठे मित्रांनो यमक जुळतय कवितेखाली स्वत : च्या नावास तरसलो काल दु : खाच्या भरात बरसलो आज कवितेला दाद आली अन भरलेल्या डोळ्यांनीच निरर्थक हसलो ! माणिक !
|
Sarang23
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:30 pm: |
| 
|
वा माणिक वा! कवितेखाली स्वत : च्या नावास तरसलो काल दु : खाच्या भरात बरसलो आज कवितेला दाद आली अन भरलेल्या डोळ्यांनीच निरर्थक हसलो ! बडीया है! पण यमक जुळतोय कसं काय? यमक हा नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यामुळे जुळतय असं यायला पाहीजे.
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:43 pm: |
| 
|
धन्यवाद सारंगा ! खरंच दाद आली कि कवितेला ....! कविता एडिटली रे सारंग ! माणिक !
|
कवितेखाली स्वत : च्या नावास तरसलो काल दु : खाच्या भरात बरसलो>>> माणिक खुपच छान, प्रत्येकाची हीच व्यथा असते, एका चांगल्या शब्दाला माणुस भुकेला असतो. प्रसाद खेळणं मस्तय..
|
Mankya
| |
| Monday, February 05, 2007 - 5:38 am: |
| 
|
प्रेतयात्रा काल मी रस्त्यात एक प्रेतयात्रा पाहिली मनातच हात जोडले, मनीच श्रध्दासुमने वाहिली बाजुला असणार्यांपैकी एकाच्याही नयनी अश्रु नव्हता म्हणूनच बहुतेक तो मेल्यावरही रडला होता चेहरा होता निस्तेज, पण डोळ्यात भाव होते भरले पण बहुतेक त्याला आपण ' मेलोय ' असेल स्मरले असतील नातेवाईकांनाही नुसतेच लचके तोडले वरती जखमांवर ' काळजीचे ' मीठपाणीही सोडले काही माणसे कशी अन किती विचित्र वागतात झगमगत्या समारंभातही मनांच्या प्रेतयात्रा निघतात तेव्हा तो म्हणाला असेल, देवा न्याय द्यावा फुलात झोपुन जाण्याचा योग लवकर यावा ! माणिक !!
|
व्वा!!! माणिक सही. बाजुला असणार्यांपैकी एकाच्याही नयनी अश्रु नव्हता म्हणूनच बहुतेक तो मेल्यावरही रडला होता मस्तंच.
|
वा माणिक कल्पना छाने..!!!
|
Mankya
| |
| Monday, February 05, 2007 - 1:23 pm: |
| 
|
श्री तिर्थे, लोपा धन्यवाद !
|
सुंदर तरुणी दिसल्यावर... कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही तशी बायको सोबत माझी होती तरिही नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू? चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू' तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी 'तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले... (दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!) सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली! धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता... परिणामांना मी डरतो की काय म्हणालो! सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही मला आवडे तिचा असा हा फणकाराही चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते! म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो! सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
|
Suvikask
| |
| Thursday, February 08, 2007 - 1:18 am: |
| 
|
अरे वा!!! सुंदरच शेवट अनपेक्षित असल्यामुळे मजा आली.
|
व्वा रे प्रसाद! आणि म्हणे हा साधा सोप्पा!
|
Nakul
| |
| Thursday, February 08, 2007 - 1:52 am: |
| 
|
वाह प्रसाद मस्तच आहे कविता
|
Sarang23
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:22 am: |
| 
|
ओहोहो!!! एकदम प्रसाद स्टाईल कविता! class! माणिक... तेव्हा तो म्हणाला असेल, देवा न्याय द्यावा फुलात झोपुन जाण्याचा योग लवकर यावा ! क्या बात है! माझ्या एका कवितेच्या शेवटाची आठवण झाली.. शेवटी तोही म्हटला होता फक्त एवढे करून जा मातीमध्ये पुरून मित्रा तुही आता सरून जा! आणि ही कविता इकडे का? ही तिकडे कविता BB वर हवी होती
|
Psg
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:23 am: |
| 
|
प्रसाद तुम कब सुधरोगे?? छान आहे कविता..
|
Jayavi
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:41 am: |
| 
|
प्रसाद........ वा क्या बात है!! पूनम.... अगदी बरोबर बोललीस प्रसाद........ सुधरना मना है
|
प्रसाद,सही आहे रे कविता.. शेवट मस्त..
|
Meenu
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:45 am: |
| 
|
वाह रे प्रसाद क्या बात है ... एकदम सही मजा आ गया ... कालेजात असताना असा नवता हो वाटला हा मुलगा ... अरे अशा कविता लिहील्यावर त्याखाली आपलं नाव लिहावं येवढही कसं कळत नाही तुला ..?
|