|
Sarang23
| |
| Wednesday, February 07, 2007 - 11:35 pm: |
| 
|
मित्रांनो आभारी आहे. धन्यवाद! दाद, कधी तुला रडू येईल का? हा एक प्रश्न आहे जो कायम स्वरुपी पडलेला आहे आणि आज तो गेल्यावर हे सगळे प्रश्न निकालात निघाले आहेत... त्यामुळे तिथे अधिक समर्पक काय बसेल यावर विचार चालू आहे. कधी जमेल तुजला रडणे असं केलं असतं, पण त्याने तो प्रश्नचिन्हाचा impact येत नाही. रडशिल तू माझ्यासाठी असंही समर्पक वाटतं पण मला ते प्रश्नचिन्ह जास्त योग्य वाटलं... रडशिल खटकतय इथे... तुषार दादशी सहमत... पण कवितेतल्या कल्पना सुंदर आहेत! त्या वेळी आभाळाचा रंगच न्यारा होता आसमंत अन् माझ्या (माझ्याही केल तर बघ लय कधी येते आहे...) कवेत सारा होता असेच छोटे छोटे बदल आहेत जे कवितेला गुणगुणायला पोषक ठरतील... बाकी कविता आवडली रे...! मिनू... छोटेखानी छान कविता! राधिका observation छान आहे! तो form गझलेचाच आहे, पण गझल नाही... गझल तिकडे गझलच्या BB वर post होते... (तू नविन असल्यामुळे सांगतोय.... चु.भु.दे.घे.)
|
Meenu
| |
| Thursday, February 08, 2007 - 12:06 am: |
| 
|
भूक.. रणरणत्या दुपारी, निबर अनवाणी पायांनी.. वखवखलेली पोटाची भूक, फिरत असते रस्त्यावर.. कुत्सित नजरांचा, पाठलाग करत राहतात.. काही आशाळभूत नजरा.. तशातच काही तळकट, रेंगाळणारे वास.. आणि मग तोच वास, येऊ लागतो कचर्यातल्या, आंबलेल्या अन्नाला.. भूक शमते.. आणि उरतात मेलेल्या काही, आशाळभूत आणि कुत्सित नजरा..
|
Sarang23
| |
| Thursday, February 08, 2007 - 12:39 am: |
| 
|
विदारक मिनू... पण सत्य...
|
सारंग, कळुन आले एकदम सुरेख रे.. मीनु,एकदम वास्तववादी कविता... एक भयानक सत्य
|
सारंग 'कळून आले.' झकास. गझल नाही म्हणतोस (नियमाप्रमाणे नसेल) पण तबियत गझलेचीच आहे. तुषार पहिले कडवे सही. पहिल्या तीन कडव्यांत 'माझ्या' शब्द जास्त वेळा आलाय नाही का? मीनू भूक छान.
|
Princess
| |
| Thursday, February 08, 2007 - 1:50 am: |
| 
|
इथे कोणी हिंदी कविता लिहितात का? किंवा मायबोली सारखी कुठली साईट आहे का, हिंदी कविता पोस्ट करण्यासाठी?
|
सगळ्यांच्या कविता मस्तं आहेत.
|
Sarang23
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:24 am: |
| 
|
हो संघमित्रा, तुझं बरोबर आहे. तबियत गझलेचीच आहे! पण काही काही ठिकाणी नियमात जातेय ती. मुळात याचं कारण म्हणजे यावर मी गझल म्हणून काम केलंच नाही. कविता अशी आली आणि अशी लगेच टाकली. princess माझ्या माहितीप्रमाणे इथलेच कवी वैभव, निनावी, मृ हे लोक चांगल्या हिंदी आणि उर्दु mix कविता लिहीतात. अशी कुठली साईट माहीत नाही, पण online उर्दु गझल मुशायरा मात्र असतो इथे
|
मी आणि कविता मी: लोकं तुला देत नाहीत दाद तुला काहीच वाटत नाही का? आसवांच आभाळ मनात दाटत नाही का? कविता: जे माझे कुणी नाहीत त्यांची का करू मी पर्वा? तु मला घडवलं तुच माझा सर्वेसर्वा मी: नशीब माझं फुटकं माझ्या हातून तु घडलीस लोकं दाद देत नाहीत म्हणून का नाही रडलीस? कविता: अरे, मी का रडू परक्यांसाठी ही माणसं माझी कोण लागतात? तुच माझा कर्ता-करविता माझे शब्द तुझीच दाद मागतात मी: डोकं फोडु का तुझ्यापुढे तुला कसं कळत नाही? लोकांनी दाद दिल्याशिवाय माझं काही खरं नाही पुन्हा लोकं मला टोमणे मारतील पुन्हा उठेल टिकेची झोड माझेच मित्र मला म्हणतील "'श्री'ला सुपारी देऊन फोड" कविता: बोलणारे बोलतात निराश नाही व्हायचं आलेल्या संकटांना हसत्-मुखत सामोरे जायचं
|
Princess
| |
| Thursday, February 08, 2007 - 3:06 am: |
| 
|
धन्यवाद सारंग. उर्दु गझल, आपुन के बस की बात नही अजुन कोणाला माहिती असेल तर सांगा. कारण मला कविताची साईट हवीय.
|
Shyamli
| |
| Thursday, February 08, 2007 - 3:26 am: |
| 
|
देवदत्तची अजुन एक कविता पोस्ट करतीये तो आवाज पक्ष्यांचा लाख आघात साहिले अतर्क्य भेट 'सावली' कोण प्रेमात नाहले संथ पाण्यात कोणी ते अग्निबिंब वाहिले देहातले दोन अंग कुणी कुणास बाहले तोच एक सुक्ष्म आहे नैक कणाद जाहले
|
Sarang23
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:32 am: |
| 
|
तिर्थे कविता ठिक आहे. पण हसत्-मुखत असं चालतं का? हसत मुखाने असं अपेक्षित आहे ना तिथे.. श्यामली, देवाला सांग... कविता झेपली नाही.
|
Meenu
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:38 am: |
| 
|
तीर्थे कवितेमधला विचार पटला नाही.
|
Reena
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:52 am: |
| 
|
मित्रांनो, सांभाळून घ्या.. जुनी कविता पण नव्या मित्रांसाठी नव्याने लिहितेय.. पैसा-एसा-कैसा जिवनाचा या खेळ कैसा, जिकडे-तिकडे हवाच पैसा.. शाळेत घेता आडमिशन, तिलाही द्यावे लागे डोनेशन पैश्या शिवाय मार्ग नाही, सार्याना पैसे मिळवायची घाई. माणुस होता श्रीमंत, खंडणी मुळे होई जीवनी अंत.. तरिही हवा सार्याना पैसा, पैश्याचा नाद सुटेलच कैसा?? पैश्यामुळे माणुस- माणसास विसरला, स्वार्थापायी पैश्याचा गुलामच बनला.. म्हणुनच गरिबास नाही हॉस्पिटल, त्या साठी बंद असे रेशनिंग दुकानाचे शेटल.. अशावेळी जावे कुणीकडे?? देवाची करुनि प्रार्थना, पुर्ण होईल का मनोकामना? अपुरी माझी आराधना, नच पाझर फ़ुटे या धना.. जिकडे- तिकडे थांबवू शकेल का हा खेळ कुणी????????
|
Reena
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:56 am: |
| 
|
चुकीची दुरुस्ती, जिकडे-तिकडे wanted money
|
Bee
| |
| Thursday, February 08, 2007 - 5:38 am: |
| 
|
रीना, छान आहे कविता आणि पटली देखील. प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार...
|
प्रिन्स..., मी हिन्दी कविता लिहीते. तुम्ही इथे हिन्दी कविता पोस्ट करू शकता. website : www.anubhuti-hindi.com www.hindinest.com
|
स्वराज्य लोचनांच्या पार वेडे हे मनाचे राज्य आहे चन्द्र-इन्द्र, रवि-कवि, सर्व बाकी त्याज्य आहे रंगला हा खेळ येथे विधात्याच्या अंकावरी अंकी त्या नांदणारी हरेक संख्या भाज्य आहे बंध नाहीत येथे उमलण्या-फ़ुलण्यास वा बंधनाच्या पार गेले स्वयंभू साम्राज्य आहे हुन्दक्यांचा गाव आहे, भावनेला वाव आहे अंतरी शमविणारे शांभवी सुराज्य आहे निर्मिकाचे नाव नाही कोठेच येथे सापडे आपलेसे वाटणारे धन्य हे स्वराज्य आहे
|
Imtushar
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:04 am: |
| 
|
माणिक, दाद, सारंग, स्मि, संघमित्रा धन्यवाद... आणि तुमच्या सगळ्यांच्या observations , सुचना रास्त आहेत... मलाही काही गोष्टी खटकलेल्या आहेत या कवितेतील, पण लिहिताना better options नाही सापडले मला. मीनू भूक आवडली. आनंदयात्री, स्वराज्य छानच. तीर्थे, लिहीत रहा. --तुषार
|
Raadhika
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:48 am: |
| 
|
सारंग, गझलेबद्दलच्या खुलाश्यासाठी thanks . chinnu, jatyavi , माझी इथे पोस्ट केलेली पहिली कविता तुम्हाला आवडल्याचे पाहून बरे वाटले. तुषार, तुमची कविता खूप खूप आवडली. पण संघमित्रा, सारंग आणि दाद यंच्याशी मीही सहमत आहे. श्री, मीनू, आनंदयात्री, छान आहेत तुमच्या कविता
|
|
|