|
Supermom
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:34 am: |
| 
|
एक सफ़ाईदार वळण घेऊन रवीची गाडी गावाकडच्या रस्त्याला लागली. धुळीचा मोठा लोट उठला अन शेजारी बसलेल्या नीलीमाचा चेहेरा चांगलाच त्रासिक झालेला त्याच्या नजरेतून सुटला नाही. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. समोरच्या आरशातून तो तिचं बारीक निरीक्षण करू लागला. रस्ता अगदी शांत होता. मधूनच एखादी गाय नाहीतर बकरी चरत असलेली दिसे. तेवढीच काय ती वर्दळ. त्यामुळे रमत गमत गाडी चालवण्याची चैन तो सहज करू शकत होता. अन त्यामुळेच की काय, नीलीमाकडे निरखून बघणंसुद्धा त्याला जमत होतं. एकसारखे कापलेले केस, नाकात छोटीशी हिरकणी, कानातले तिच्या नाजूक हालचालींबरोबर चमकून जाणारे हिर्याचेच टॉप्स. गळ्यात अगदी बारीक चेनमधे गुंफ़लेलं मंगळसूत्र अन डाव्या हातात फ़क्त घड्याळ. किती गरम होतंय या सबबीखाली कालच खरेदी केलेला स्लीवलेस सलवार कमीज. 'काय बघतोयस एवढं?' तिच्या वैतागलेल्या आवाजाने तो भानावर आला. 'तू आता बाकी अगदी एन आर आय शोभतेस हं नीलू.' हसून त्याने डोळे मिचकावले. 'त्यात काय? आहेच मी.' तिचा मूड आता जरा परत येऊ लागल्याने रवीला हायसं वाटलं. समोरचा आरशातून त्याने मागे एक नजर टाकली. राहुल गाढ झोपला होता.त्याच्या निरागस चर्येकडे बघून रवीला एकदम उत्साह आला. आई, अप्पा, नि सविताला किती आनंद होईल राहुलला बघून याची कल्पनासुद्धा त्याला सुखावून जात होती. 'तब्बल चार वर्षांनी येतोय नाही आपण, नीलू? राहुल दोन वर्षांचा असताना आलो होतो गावी.' 'हो,अन तो किती आजारी पडला होता या धुळीनं अन सार्यानं? विसरलास वाटतं? तिच्या शब्दातला फ़णकारा त्याला चांगलाच बोचला. पण तिचं बोलणंही खोटं नव्हतंच. दोन वर्षांच्या राहुलचा बाळदमा तेव्हा खूपच उफ़ाळला होता. 'असू दे ना नीलीमा आता. मागचं सारं विसर. आता तोही मोठा झालाय नि त्याचा दमाही पार पळालाय. मग कशाला त्या आठवणी?' नीलीमा यावर काही बोलणार तोच गावाची हद्द सुरू झाली. गाई,बैलांच्या गळ्यातल्या घंटांच्या अन त्यांच्या हंबरण्याच्या आवाजानं राहुलही उठून बसला. आजूबाजूच्या मनोरम दृश्याकडे बघता बघता तो बालजीव एकदम हरखून गेला.
|
Supermom
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:59 pm: |
| 
|
छोट्या छोट्या गल्ल्याबोळांतून वाट काढत गाडी रवीच्या घराजवळ येऊन उभी राहिली. एवढ्या वेळात आजूबाजूचे शेजारीही बाहेर येऊन बघत होते.लहान मुलंही आश्चर्यानं गाडीकडे पहात होती. नीलीमा अन राहुल खाली उतरले तसं रवीनं गाडी बाजूला घेऊन पार्क केली. सगळ्या खिडक्या बंद आहेत ना ही खात्री करूनच तो घराकडे वळला. सुबोधनं, त्याच्या मित्रानं आठवडाभरापुरती त्याची गाडी अगदी आनंदानं देऊ केली होती. दारात सविता हसर्या चेहेर्यानं उभी होती. चार वर्षांनी आलेल्या भावाच्या कुटुंबाचं स्वागत करताना तिचा आनंद तिच्या मुद्रेवरून ओसंडून वहात होता.तिघांवर भाकरतुकडा ओवाळून टाकत ती किंचित वाकली. पुढच्याच क्षणी राहुलला मिठीत घट्ट गोळा करून तिनं गरगर फ़िरवलं. 'अग, आता काय लहान आहेस का सवी तू?' 'दादा, अरे कितीही मोठी झाले तरी तुझ्यापेक्षा लहानच की मी?' तिच्या निर्व्याज प्रश्नानं आपल्या डोळ्यात पाणी का तरारलं हे त्यालाच कळेना. 'आई अप्पा दिसत नाहीत ते?' किंचित नवलानं त्यानं प्रश्न केला. आपण आल्यावर लहान मुलीसारखी आनंदून जाणारी आई आज समोर का बरं नाही आली? 'अरे, ये ना आईच्या खोलीत. हल्ली अजिबातच चालता येत नाही तिला. अन अप्पा गेलेत अजित बरोबर शेतावर. तुमची यायची वेळ काही नक्की नव्हती ना. बराच वेळ होते घरी. आत्ताच गेलेत. थांब गड्याला पाठवतेच आहे मी.' आईच्या खोलीत आल्यावर त्याला अगदी गदगदून आलं. या चार वर्षांमधे किती उतरली आईची तब्येत. तिघांनी वाकून नमस्कार केला. आईनं तिघांनाही थकलेल्या हातांनी जवळ घेतलं. राहुलला बघून तिच्या चेहेर्यावरच्या सुरकुत्यासुद्धा इतक्या प्रसन्न हसल्या की आपण मागच्याच वर्षी यायला हवं होतं ही खंत रवीला पुन्हा बोचून गेली. 'दादा,वहिनी, या ना. हातपाय धुवून आधी खाऊन घ्या.' सविताच्या प्रेमळ हाकेनं तो भानावर आला. नीलीमा अजूनही तयार होऊन खोलीतून आली नव्हती. एवढ्या वेळात सवितानं राहुलला खायला दिलं होतं. टेबलावर सारा गावाकडचा मेवा मांडून ती दोघांची वाट बघत होती. सोबत ओल्या नारळाच्या वड्या अन गरमागरम पोहे होते. 'आई नाही खाणार?' 'अरे, दिलं नेऊन दादा मी तिला. तू बाथरूममधे होतास तेव्हाच." कोपरं टेबलावर टेकून बसलेल्या लहान बहिणीकडे बघता बघताच रवीच्या चेहेर्यावर माया दाटून गेली. लांबसडक केसांची वेणी समोर घेतलेली, कपाळावर ठसठशीत टिकली लावलेली अन गळ्यात भलंमोठ्ठं मंगळसूत्र घातलेली सविता म्हणजे नीलीमाचं अगदी विरुद्ध रूप आहे. त्याला वाटलं. 'सवी, तू मात्र लग्नानंतर अगदी बदलली नाहीस हं. तश्शीच काकूबाई राहिलीस. अन काय ग, अजितला आवडतं का तुझं हे रूपडं?' तिची चेष्टा करायचा मोह त्याला आवरेना. 'न आवडायला काय झालं? सगळेच काही साहेब नसतात म्हटलं तुझ्यासारखे...' सवितानं वार लीलया परतवल्याचं बघून तो मोठ्यानं हसला.
|
Chinnu
| |
| Thursday, January 25, 2007 - 3:08 pm: |
| 
|
ओल्या नारळाच्या वड्या नी पोहे! सुमॉ, पाहुणचार तर मस्त झालाय!
|
R_joshi
| |
| Saturday, January 27, 2007 - 7:37 am: |
| 
|
सुपरमॉम तुमची हिहि कथा चांगलिच रंगणार. सुरवात इतकि छान झाली आहे कथेची. पुढचा भाग हि लवकर टाका.
|
Shyamli
| |
| Monday, January 29, 2007 - 1:42 am: |
| 
|
कीती भावणारं लीहावं ग माणसानी..... लीही पुढे वाट बघतीये
|
सुपरमॉम, तुमच्या कथांची एक वेगळीच शैली आहे, सहज आणि ओघवती. छान वाटतंय वाचायला. लौकर येऊ दे पुढचे.
|
Jhuluuk
| |
| Monday, January 29, 2007 - 5:50 am: |
| 
|
Classic लिहिलेय सुपरमॉम!! अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे!!
|
Manuswini
| |
| Monday, January 29, 2007 - 11:00 pm: |
| 
|
ए सूपरमॉम, मला तुझ्या गोष्टी खुपा आवडतात. cute N touchy असतात खुप. ते प्रेम,ती ओढ असे सगळ्या भावना व्याक्त होवुन उभ्या रहातात समोर. पूनमच्या पण छोट्या सक्षिप्त गोष्टी छान असतात. लवकर लिहि.
|
suparmom, pharacha sahee zaliye suruwat. ata pudache wachanyacha moh awarat nahiye 
|
Supermom
| |
| Wednesday, January 31, 2007 - 12:12 pm: |
| 
|
मित्रमैत्रिणींनो, सगळ्या प्रतिक्रियांबद्दल आभार. एक दोन दिवसांत करतेच पूर्ण. कथा तयार आहे डोक्यात पण नवीन घरी आल्याने सार्या कामात बुडाले होते एकदम. टाकते लवकरच.
|
Supermom
| |
| Thursday, February 01, 2007 - 10:44 am: |
| 
|
रवी, नीलिमा अन सविताचं खाणं उरकत नाही तोच अप्पा अन अजित शेतावरून परत आले. रवी आईच्या उशाशी बसला होता. अजित चटकन त्याच्या पायाशी वाकला. 'अरे अरे हे काय?' रवीला विलक्षण संकोच वाटला. 'वा, असं कसं? तुम्ही सविताचे मोठे भाऊ म्हणजे मलाही मानानं मोठे नाही का?' अजितच्या दिलखुलास हसण्यानं रवी एकदम मोकळा झाला. चार वर्षांपूर्वी सविताच्या लग्नात काय ती भेट झाली होती. त्यानंतर आज प्रथमच असे फ़ुरसतीने भेटत होते दोघं. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या अन बघता बघता वेळ कसा गेला ते कळलेच नाही कोणाला. अजित शहरातल्या एका चांगल्या केमिकल कंपनीमधे नोकरी करत होता. रोज बसने अर्धा तास जाणे अन अर्धा तास येणे तो करत असे. शनीवार रविवारी अप्पांबरोबर शेतात जाऊन गड्यांवर नजर ठेवीत असे. ते दोन दिवस आईचे औषध आणणे, शेतासाठी बियाणे आणून देणे, घराच्या दुरुस्तीची काही कामे असल्यास देखरेखीखाली करून घेणे हे सारे तो करत असे. रवीशी बोलता बोलताच अजित एकदम उठला. 'आईंच्या औषधाची वेळ झालीय' असे पुटपुटत तो कपाटाशी गेला. नीट कपात औषध ओतून स्वतःच्या हाताने त्याने आईला पाजलं अन परत येऊन गप्पा मारू लागला. त्याच्या अकृत्रिम वागण्याने रवीला एकदम गहिवरल्यासारखं झालं. ज्या गोष्टी मुलाने करायच्या त्या जावई करतोय, अन तेही अगदी आनंदानं. त्याला वाटलं. बरं पैशाच्या मोहानंही तो काही करत असेल म्हणावं तर तेही नव्हतं. गावाकडच्या त्या घराची किंमत देखील फ़ारशी येणार नव्हती. शेताचा तुकडाही फ़ार मोठा नव्हताच. त्या मानाने अजितचे आईवडील लहानपणीच गेल्यानं त्यांचं शहरातलं घर नि एक दुकान यावर त्याचाच हक्क होता. तो सहज सविताबरोबर शहरात जाऊन राहू शकत होता. अशा परिस्थितीत गावात राहून सासूसासर्यांची सेवा करणार्या अजितबद्दल त्याच्या मनात प्रेमाबरोबर आदरही दाटून आला. सविताची हाक ऐकून दोघेही जेवायला उठले. गरम ज्वारीच्या भाकरी,चटणी, भरली वांगी,झुणका,अन रवीला अतिशय आवडणारी दलियाची खीर असा बेत होता. ताट बघूनच पोट तुडुंब भरल्यासारखं वाटलं त्याला. अगदी मनापासून जेवला तो.जेवणाच्या आधी आईचं ताट सवितानं खोलीत नेऊन दिलं अन जेवणातून उठून अजितनं खोलीत जाऊन लक्ष दिलेलं त्यानं बघितलंच. जेवणं झाल्यावर वेळ आणखीच भराभर गेला. अमेरिकेतून आणलेल्या वस्तू ज्याच्या त्याला दिल्यावर सारे गप्पा मारत बसले.तोच अजित एक कागद घेऊन आला. 'रवीदादा, हा हिशोब नजरेखालून घालाल का जरा?' 'काय आहे हे?' त्यानं नवलानं पृच्छा केली. 'गेले चार वर्षं तुम्ही आलाच नाहीत.त्या चार वर्षातल्या शेताच्या उत्पन्नातला तुमचा वाटा आहे हा.तुमच्या खात्यावर जमा केलाय मी वेळच्या वेळी. आता हिशोब बघून घ्या म्हणजे झालं.' नीलिमा अवाक झालीच, पण रवीला काय बोलावं हे सुचेचना. इतक्या निस्वार्थीपणानं अन जिव्हाळ्यानं कोणी वागू शकतं हे बघून दोघांनाही चांगलाच धक्का बसला होता.
|
Amayach
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:27 pm: |
| 
|
सुपरमॉम, पुढचा भाग कधी लिहितेस?? छान वाटते आहे कथा. लवकर लिही ना!
|
Runi
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:07 pm: |
| 
|
सुपरमाॅम, लवकर टाका हो पुढचा भाग, एकदम मस्त आहे सुरुवात.
|
Supermom
| |
| Thursday, February 01, 2007 - 5:31 pm: |
| 
|
बरीच रात्र झाली होती. रवीची झोप मात्र पार पळाली होती. खिडकीतून येणारा रातराणीचा गंधही त्याला पूर्वीसारखा सुखावत नव्हता.शेजारी नीलिमा गाढ झोपी गेली होती. तिची झोप चाळवू नये म्हणून त्याने हलकेच कूस बदलली. 'खरंच,नुसता नावाचाच मुलगा आहोत आपण. गेल्या काही वर्षात काय केलंय आपण आई अप्पांसाठी?नुसते मधून मधून पैसे पाठवून कर्तव्य केल्याचं समाधान मिळवत आलो. खरी सेवा त्यांची अजित अन सविता करताहेत. अन तेही अगदी हसतमुखानं.' 'अमेरिकेत लठ्ठ पगाराची नोकरी अन दर महिन्याला वाढत जाणारी शिल्लक यापलिकडे काय मिळवलंय आपण आयुष्यात? तिथे शिकत असतानाच नीलिमाच्या प्रेमात पडलो. ती तिथेच वाढलेली.तिचे सारे संस्कार देशी, परदेशी असे सरमिसळ. पण आई अप्पांनी आपल्या लग्नाला आनंदाने होकार दिला.तिला इथे फ़ारसं आवडत नाही यात तिचाही बिचारीचा काय दोष? तिचे या मातीशी बंध जुळणार तरी कसे?जन्मापासून ती कधी इथे राहिलीच नाही. ती मराठी उत्तम बोलते याचं श्रेय तिच्या आईचं. पण त्यापलिकडे तिला भारताबद्दल आस्था नाही. नाही म्हणायला आई अप्पा आपल्या लग्नानंतर दोन महिने राहून गेले तेव्हा तिनं अगदी मन लावून सारं केलं त्यांचं. तशी स्वभावानं चांगली आहे ती.पण इथे कायमचं येण्याचा विचार ती स्वप्नातही करू शकणार नाही.' विचार असह्य झाले तसा तो उठून बाहेर बागेत आला. टिपूर चांदणं पडलं होतं. रातराणीचा सुगंध वातावरणात दरवळला होता. पण हे सारं वातावरणही त्याचं तप्त मन शांत करू शकलं नाही. तो खोलीत जायला वळणार तोच अजितचा आवाज त्याच्या कानी आला, 'या ना दादा. बसा.झोप येत नाही का?' त्याच्या आवाजातल्या मार्दवानं स्वतला नकळतच तो झोपाळ्याकडे गेला. 'तुमचा चेहरा इतका ओढलेला का दिसतोय? बरं नाही का वाटत?' कुणासमोर मन मोकळं करण्याचा रवीचा स्वभाव नव्हता. पण अजितच्या गोड अन आर्जवी स्वभावाकडे तो आपोआपच ओढल्या गेला. आपली सारी व्यथा त्याने हळूहळू अजितसमोर उघडी केली. मनाची होणारी ओढाताण,आईअप्पांची काळजी अन इतक्या वर्षांचं सुस्थापित आयुष्य सोडून येण्याची असमर्थता. सारं सारं बोलून टाकलं त्याने. त्याचं बोलणं अजित अगदी मन लावून ऐकत होता.
|
Sakhi_d
| |
| Saturday, February 03, 2007 - 12:12 am: |
| 
|
>>त्याचं बोलणं अजित अगदी मन लावून ऐकत होता. >> आणि तुमची कथा आम्ही मन लावुन वाचतो आहोत....छान आहे कथा.....
|
हो, आम्ही पण वाचतोय हं, अगदी मन लावून, नव्हे गुंतवून!!!!!!!!!!!!!!!!!
|
Supermom
| |
| Wednesday, February 07, 2007 - 10:06 am: |
| 
|
मनातलं सारं बोलून टाकल्यावर रवी एकदम शांत बसला. एक दीर्घ श्वास घेऊन त्यानं अजितच्या चेहर्यावर नजर खिळवली. अन अचानक त्याला वाटलं, 'हा काय वेडेपणा करून बसलो आपण? अजितची अन आपली ओळखही फ़ार जुनी नाही. आपल्या कुटुंबात तो सामील झाल्यालाही फ़ार काळ लोटला नाहीय. अशात मनाच्या एका दुबळ्या क्षणी सारंकाही त्याला सांगून बसलो आपण. त्याचं काय मत होईल आपल्याबद्दल आता? अन तो वयानंही फ़ार मोठा नाहीय. काय सल्ला देऊ शकणार तो आपल्याला? छे, चुकलंच आपलं.' जणू त्याच्या मनातले विचार ओळखल्यासारखा अजित हलकेच हसला. 'रविदादा, खरंतर मी वयानं एखाद वर्षानं लहानच आहे तुमच्यापेक्षा.पण मला वाटतं ते सांगतो तुम्हाला. मी आल्यापासून बघतोय, तुम्ही इथे आलाहात खरे, पण सतत आई अप्पांच्या काळजीत, अन एक अपराधीपणाचं ओझं बाळगून असल्यासारखेच वावरता आहात. तुमचं सारं आयुष्य तिकडे अगदी नीट सेटल झालंय. नोकरी, घर, अन इतर भौतिक सुखाच्या वस्तू जाऊ द्या एखादे वेळी, पण तुमचं सर्वात महत्वाचं माणूस, म्हणजे नीलिमाताई. अन त्या तर तिथल्या मातीत इतक्या घट्ट रुजल्या आहेत, की तुमच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम त्यांच्यावर अन राहुलवर आधी होणार आहे. मला जे काही तुम्ही आत्ता सांगितलंत, अन घरातही सविताच्या अन आईअप्पांच्या बोलण्यातून जे काही कळलंय चार वर्षात, त्यावरून वाटतं की इथे येऊन इथल्या मातीत पाय रोवणं हे त्यांना फ़ार फ़ार कठीण होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना असं करायला भाग पाडणं,हा अन्यायच नाही का एकापरीनं? अन हा अपराधीपणा तुम्ही सर्वप्रथम मनातून काढून टाका की मला अन सविताला आई अप्पांचं करावं लागतय. आम्ही त्यांचे कोणीच नाही का? अन मनापासून सांगतो तुम्हाला, माझे आईबाबा मी फ़ार लहान असतानाच गेलेत. त्यांचं काहीच मी करू शकलो नाही. तेव्हा सविताच्या आईबाबांचं करण्याचं भाग्य मला लाभतंय हे माझं मोठं सुदैवच समजतोय मी. ' भावनावेग अनावर होऊन अजितनं डोळे पुसले अन क्षणभर तो थांबला. 'तेव्हा मनावर कुठलंही दडपण न येऊ देता इथलं चार दिवसांचं वास्तव्य सुखाचं होऊ द्या दादा तुम्ही. तिकडे गेल्यावर त्यांची काळजी वाटणं साहजिकच आहे. पण आपला धाकटा भाऊ भारतात आहे असं समजून निश्चिंत राहा तुम्ही.' रवीनं अजितकडे एकदा बघितलं, अन त्याला घट्ट मिठी मारली. थोडा वेळ गप्पा मारून तो झोपायला गेला तेव्हा अंथरुणावर पडल्यापडल्या त्याला गाढ झोप लागली. सकाळी बर्याच उशिरा रवी जागा झाला. स्वैपाकघरातून सविता अन नीलिमाचे हळूहळू बोलण्याचे आवाज येत होते. आल्याच्या चहाचा अन निरशा दुधाचा वास हवेत दरवळत होता.
|
Imtushar
| |
| Wednesday, February 07, 2007 - 10:20 am: |
| 
|
सुपरमॉम, खूपच सुरेख आहे कथा... या भागाची आतुरतेने वाट बघत होतो. आणि आता अर्थातच पुढच्या भागाची बघतोय. --तुषार
|
Chinnu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 10:23 am: |
| 
|
क्या बात है सुमॉ! जियो.. तुम्हाला मी आधीपण सांगितले असेन कदचित. तुमच्या कथा वाचतांना अगदी योगिनी जोगळेकर वाचल्याचा भास होत राहतो. कीप इट अप!
|
Supermom
| |
| Wednesday, February 07, 2007 - 11:56 am: |
| 
|
आळोखेपिळोखे देत रवी स्वैपाकघरात आला. सविता अन नीलिमा नाश्त्याच्या टेबलावर बसून एकमेकींशी काहीतरी बोलत होत्या. समोरच आईचा दागिन्यांचा डबा उघडा पडला होता. 'काय चाललंय नणंदाभावजयांचं खलबत?' 'दादा, अरे आईनं तिचे सगळे दागिने काढून दिलेत. मी वहिनीला सांगतेय की त्यातले हवे ते तिने घ्यावेत.' रवीनं नीलीमाच्या चेहेर्याकडे बघितलं. तिच्या मनातले भाव त्याला कळले नाहीत.तिची काय प्रतिक्रिया होईल याचा अन्दाज त्याला करता येईना. जुन्या पद्धतीचे दागिने तिला कितपत आवडतील, त्याला शंकाच होती. नीलीमा किंचितशी हसली. दागिन्यांचा डबा तिनं एका हातानं जवळ ओढला. जुन्या पद्धतीचे असले तरी चांगले वजनी, उत्तम सोन्याचे दागिने होते ते.त्यातली पेशवाई धाटणीची नथ अन ठुशी तिनं उचलली. 'सविता, हे दोन दागिने फ़क्त ठेवतेय मी. बाकी सारं तुझंच आहे ग. माहेराकडून तुला भेट समज.' 'अन एक गोष्ट मला आज सांगावीशी वाटतेय. रवीला ना विचारताच मी हा निर्णय घेतलाय. पण मला खात्री आहे की त्यालाही तो आवडेल. आता यापुढे दर वर्षी दिवाळीत आम्ही भारतात नक्की येऊ. यापुढची प्रत्येक दिवाळी आपली एकत्रच असणार आहे.माझ्या राहुलला त्याच्या माणसांमधे दरवर्षी यायला मिळायलाच हवं.' भरून आलेल्या डोळ्यांनी सवितानं नीलिमाकडे बघितलं. 'दादा, वहिनी, तसंही या वर्षाअखेर यावं लागणारच आहे तुम्हाला.' 'म्हणजे?' रवीला काहीच कळेना. तोच बागेत काम करत असलेला अजित हातात भलीमोठी फ़ुलांची करंडी घेऊन आत आला. त्याच्या दुसर्या हातात नुकताच तोडलेले टपोरे आवळे होते. ते त्यानं सवितासमोर ठेवले. ते बघून नीलिमा हलकेच हसली. अन रवीला सारा उलगडा झाला.' 'अग लबाडे, असं आहे होय? अन पत्ता नाही लागू दिलास आल्यापासून?' लाजलेली सविता पटकन नीलीमाच्या कुशीत शिरली. परतीच्या रस्त्यावर रवीचं मन अगदी उल्हसित होतं. आयुष्यातली सारी गणितं सुटल्यासारखं वाटत होतं त्याला. कुठल्याच बेरजा वजाबाक्यांचे विचार करायची गरज नव्हती आता. शेजारी बसलेल्या नीलीमाचा हात हातात घेऊन प्रेमभरानं त्यानं हलकेच दाबला. अन शिळेवर त्याची आवडती धून वाजवत तो गाडी चालवू लागला. वरचं निरभ्र आभाळ अगदी त्याच्या कवेत आलं होतं. समाप्त.
|
|
|