Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 07, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 07, 2007 « Previous Next »

Swaatee_ambole
Wednesday, February 07, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, ' व्यथा' चांगली आहे.
smi_dod , मला विहीर जास्त आवडली.


Mankya
Wednesday, February 07, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तु तर नावही दिलंस की कवितेला ( कस सुचतं तुम्हा लोकांना ?) !
आणि तुझी दाद आली, खुप काही मिळाल्यासारखं झालं बघ !
Really Thanks गं !

माणिक !


Pulasti
Wednesday, February 07, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच छान कविता वाचायला मिळताहेत! सर्वांचेच अभिनंदन!! हा काव्योत्सव चालू राहो!
- पुलस्ति.

Chinnu
Wednesday, February 07, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरु, तुझी माझी यारी काहिच्या काही मध्ये बरी दिसली असती. कविता छाने. माणिक मला व्यथा बोर झाली. (ए रागावु नकोस हा.) राधिका मनातला होकार मस्त. निरु, शापित वळणावर टचिंग!

Raadhika
Wednesday, February 07, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, thanks.

निरू, तुझी माझी यारी आवडली... खरंतर ती होस्टेल च्या भिंतीवर छान वाटेल :-)


Sarang23
Wednesday, February 07, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहाहा... पाऊस नुस्ता. एक से एक कविता! कुणाकुणाचे नाव घेऊ...?

जयश्री! क्या बात है! सहीच आहे ते गीत!

पेशवा! क्या बात है! उच्च!

तुषार खास म्हणजे खास रे

कलला रवि जरासा
वाराही मंद झाला
मरणाची वाट बघणे (पहाणे कसं वाटेल, लय चांगली येते आहे.)
आता हा छंद झाला

तुषार! परत एकदा खास!!! sixer boss!

मन भिरभिर भिरभिर झाले गं.... वा!! अगदी
रुमडाला सुम आले गं ची आठवण झाली!!!

स्वरूप...
"एक कविता.... अपूर्ण " स्मरणात राहील! सुंदर!

माणिक...! कवितेतल्या कल्पना छान, पण नादमयता आणता येईल सहज...
तसेच...
लढ आयुष्यात
सत्याने सातत्याने
हारणे जिंकणे ना (इथे हार जीत नाहीच.. असं नाही करता येणार का?)
आपल्या हाती केव्हाही ...
असं बरच करता येईल. म्हणजे कवितेसाठी लागणारं सगळंकाही आहे बघ तुझ्याकडे, फक्त नादमयता, लय, जमल्यास वृत्त(आग्रह नाही) याकडे लक्ष दे.

बाकी कविता आवडली रे!

"मातीत मिसळून उपयोगी पडेन" म्हणे झाडासाठी . . . .! वा सुधीर!

स्मी... मला विहीर खूप आवडली!!! सराईतही ठीक आहे...!

माणिक...

उच्च ना पातळी... हे ना ना खूप ठीकाणी आलय असं वाटतय... नाही बसवायसाठी काही तडजोड पण करावी लागणार नाही कारण कवितेत कुठलेच वृत्त वापरले नाहीयेस. मग काय गरज आहे नन्ना चा पाढा लावायची. दिलखुलास नाही म्हणून मोकळा हो!

चढाओढीचा अर्थ
चढणार्‍याला ओढायचं
स्पर्धेचं फक्त नाव (नाव ऐवजी निमित्त हा शब्द लगेच अर्थ पोहोचवेल ना?)
पुढच्याला मागं खेचायचं

वर्षानुवर्ष आम्ही
असंच जगत राहू
परीवर्तनासाठी शेजार्‍याच्या
पुढाकाराची वाट पाहू !

ये सही है! आवडलं...!

राधीका ठीक आहे नकार...

स्वरूप (अपुर्ण), तुषार (भिर भिर!) आणि स्मी (विहीर) विशेष आवडल्या कविता तुमच्या!


Sarang23
Wednesday, February 07, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळून आले

शब्दांचे बाण विषारी,
सुटल्यावर कळून आले
जगणे अवघड नव्हते,
मेल्यावर कळून आले

ज्यासोबत जगावयाची
मज सवय लागली होती
ते दुःखही माझे नव्हते
हसल्यावर कळून आले

उधळून टाकले ज्याला
मी फुलापरी तुजवरती
ते हृदय काच होते हे
तुटल्यावर कळून आले

कधी तुला रडू येईल का?
मज खरेच वाटत नव्हते
अंदाज चुकीचा नव्हता
गेल्यावर कळून आले

जगणे तर ओझे होते
मरणेही ओझे झाले
मी ओझे होतो नुसते
नेल्यावर कळून आले

तो डाव हातचा मीही
हसता हसता हरलो
जिंकणेच सोपे असते
हरल्यावर कळून आले


सारंग


Mankya
Wednesday, February 07, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळ न ओळ अप्रतिम रे सारंगा ! चवथं कडव विशेष आवडलं रे !

धन्यवाद सारंगा ! लगेच बदल केले कवितेत !
चिन्नु ... अगं राग कसला .. अन कशासाठी?

माणिक !




Raadhika
Wednesday, February 07, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, कविता छान आहे. गझल म्हणता येईल का रे या कवितेला?


शेवटचं कडव भरीचं वाटत... आणि 'कधी तुला रडू येईल का?' ... हेही तेवढे आवडले नाही. पण बाकी छान आहे.


Pulasti
Wednesday, February 07, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग - "कळून आले" आवडली! दु:ख आणि ओझं विशेष आवडलं.

Imtushar
Wednesday, February 07, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग... सही रे...
ते दुःखही माझे नव्हते... ultimate !!!


Swaroop
Wednesday, February 07, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,दाद... तुम्ही दिलेली दाद आवडली.
माणिक,चिन्नु,स्मि,संघमित्रा.... अभिप्रायाबद्दल आभार!
भ्रमर,लोपामुद्रा... तुमच्या अपेक्षा पुर्ण होवोत!

बी... 'तिन्हीसांजा' आवडली.
स्मि.... 'सराईत' आणि 'विहिर' दोन्ही छान आहेत... आणि कवितेच्या भुमिकेचे विश्लेषण करण्याची सवयही!

सारंग... तुमच्यासारख्या जाणकार लोकांच्या विशेष आवडत्या कवितांमध्ये माझ्या कवितेला बघुन खुप छान वाटले...
इथे कविता पोस्ट केल्याचे चीज झाले...

तुमच्या इतर कवितांप्रमाणेच 'कळून आले' ही आवडली.
अंदाज चुकीचा नव्हता..
गेल्यावर कळुन आले... खासच!



Imtushar
Wednesday, February 07, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या वेळी आभाळाचा
रंगच न्यारा होता
आसमंत अन् माझ्या
कवेत सारा होता

अंगणात रोज माझ्या
ते शुभ्र चांदणे पडे
गगनात आणि माझ्या
तो एकच तारा होता

किती वादळेही आली
भय वाटले न त्यांचे
होडीसंगे माझ्या
साक्षात किनारा होता

नवदिशा दिल्या तू आणि
नवक्षितिजेही दाखविली
मग उडले अशी जणू की
पंखातच वारा होता

जगणे शिकवुन मजला
तू घेउन अश्रू गेला
पण दु:खांवरती आता
तो एक उतारा होता

--तुषार


Mankya
Wednesday, February 07, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार ... भावना छान उतरल्यात !
शेवटच्या दोन ओळी अश्या हव्या होत्या का रे?
" पण दु : खावरती माझ्या
तोच एक उतारा होता "... असं वाटल वाचताना !
चु.भु.दे.घे.

माणिक !


Princess
Wednesday, February 07, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह आता खरा रंग आलाय मैफिलीला. ( चला चर्चेचा फायदा झाला:-)) एक से एक कविता आल्या या दोन्तीन दिवसात. सगळ्याच आवडल्या. हं, कोणाकोणाचे नाव घेउ हाच प्रश्न पडलाय.


Pulasti
Wednesday, February 07, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस - माझही असच झालं. मग मी "सर्वांचेच" अभिनंदन करून ही वेळ मारून नेली!

Daad
Wednesday, February 07, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, पुलस्ति १००% अनुमोदन. कुणाकुणाचं नाव घ्यायचं?
स्मि, तुझी सराईत मधली कल्पना आवडली पण कल्पना known असुनही 'विहीर' छान उतरलीये. तुझ्या कवितांमधे विषयांचं वैविध्य असतं. त्यामुळे वाचताना उत्सुकता असते मला.
माणिक, व्यथा मध्ये बर्‍याच चांगल्या कल्पना आल्या आहेत. कडव्यांचा शेवट ज्या सहजतेने केलाय (बोली भाषे सारख? उदा. 'जाणे कुठे जातो', 'अजब तर्‍हा आहे' इ.) - चांगला आहे. तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
सारंग, कळून आले मस्तच आहे. 'कधी तुला रडू...' जरा खटकली. त्या ऐवजी 'रडशील कधी तरी तू' असं केलं तर? (चू.भू.द्या.घ्या.)

तुषार, 'उतारा...' खूप खूप आवडली. लयीत म्हणताना काही ठिकाणी थोडी गडबड वाटतेय... पण कल्पना सगळ्याच छान आहेत.


Lampan
Wednesday, February 07, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगसेठ खुंखार आहे कविता .. काय बोलायचं कामच नाय !!

Meenu
Wednesday, February 07, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाजुक धागे

तोडावं म्हणलं तरी
चटकन तुटत नाहीत
हे असले नाजुक धागे..

कुठुन आणतात कळेना
हा नसता चिवटपणा
हे असले नाजुन धागे..

ओढ लावुन धरतात
ताणातही टिकुन राहतात
हे असले नाजुक धागे..


Smi_dod
Wednesday, February 07, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद.. तुषार, संघमित्रा जयावी, swatee_ambole, दाद

निरु कुल...यारी जमलीये
राधिका,माणिक... चांगला आहे प्रयत्न तुमचा

सारंग अगदी भिडल मनाला...खुप सुंदर.. सगळीच कडवी छान आहेत..पहिले आणि शेवटचे खासच

तुशार.... छान

आणि ईतकी निकोप चर्चा छानच वाट्तेय





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators