Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 05, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through February 05, 2007 « Previous Next »

Mankya
Wednesday, January 31, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्रदयात उत्कटता
पण मन फितुर
मी विझण्यास तर
तू जळण्यास आतुर !

माणिक !


Meenu
Wednesday, January 31, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहीतीप्रमाणे तरी मैत्रेयी तरसणे, तरस खाणे हे शब्द प्रयोग मराठी नाहीयेत.

Ganesh_kulkarni
Thursday, February 01, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शबरीची उष्टी बोरं खाणारा
आता राम राहीला नाही
आणी उष्टी राहावीत इतकी
बोरं सध्या शिल्लक राहीली नाहीत!

गणेश(समीप)


Lopamudraa
Thursday, February 01, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी उष्टी राहावीत इतकी
बोरं सध्या शिल्लक राहीली नाहीत!>>>.
याचा अर्थ तुला नक्कि काय अभिप्रेत आहे???

Ganesh_kulkarni
Thursday, February 01, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा..
आणी उष्टी राहावीत इतकी
बोरं सध्या शिल्लक राहीली नाहीत!
याचा अर्थ असा की...
"जो तो फक्त स्वत:पुरता व स्वार्था पुरता जगतो आहे"
त्या मुळे तो राम राहीला नाही आणी शबरी सुध्दा!


R_joshi
Thursday, February 01, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शबरीची उष्टि बोर खाण्यासाठि
राम आधि बनाव लागत
अन राम होण्यासाठी
मनाने निगुर्ण व्हाव लागत

प्रिति:-)


Lopamudraa
Thursday, February 01, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या मुळे तो राम राहीला नाही आणी शबरी सुध्दा!>>>.

शबरी राहिली नाही अस म्हण ना बोर राहिली नाही चा कुठे संबध येतो?

Princess
Thursday, February 01, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे राम.... उठा ले मुझे :-)
लोपा


Meenu
Thursday, February 01, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उठा ले मुझे>>> उठा ले रे बाबा मेरेको नही रे .. असं म्हणायचय का तुला ..

Meenu
Thursday, February 01, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांना धार आली.
मग संवादानही, माणसं घायाळ झाली..
मला वाटतं आता,
मौनाची उपासना करायची वेळ झाली..


Meenu
Thursday, February 01, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे शब्दही मला,
परत करायला लागला आहेस हल्ली..
इतकी का तुला,
नकोशी झालेय मी हल्ली?


Daad
Thursday, February 01, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच दिवसांनी आलेय. इथे आणि कवितेच्या बीबी वर सुद्धा बरच 'रामायण' घडून गेलय अस दिसतय.

एक आयुष्य उधळून जाताना...
कितीही जपलस तरीही
चिकटले असतीलच ना काही कण?
कुठे झटकलेस? सांगना रे, कुठे?

तिथेच वेचायला हवेत
उरलेल्या श्वासांसाठी अर्थ,
कणा कणाने!
-- शलाका


Jo_s
Friday, February 02, 2007 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तू नुसतेच शब्द दिलेस
मी त्यांना ओलावा दिला
इतकी का रुक्ष झालीस
न कळे भावनाही तुला


Jo_s
Friday, February 02, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, शलाका मस्तच चाललय अजून येऊदेत


Mankya
Friday, February 02, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु शब्दांना दिला ओलावा
भावनातुन फुललि तुझी प्रिति
प्रतिसाद मला देता येईना
मधे मुक्या मनाच्या भिंती !

माणिक !

शलाका ... उरलेल्या श्वासांसाठी अर्थ .. सुंदर !


Lopamudraa
Friday, February 02, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. मीनु शलाका सुधिर.. मस्तच,
माणिक चित्रकविते साठी तुझ्या चित्राची वाट बघावी लगतेय?? छानसं चित्र टाक एखादं..


Mankya
Saturday, February 03, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीच नाही भकास वाटतय
प्रश्न पडला काय करावं
विरहाच्या असह्य वेदना सहावेना
आता फुलांनी भरुन जावं

... कायमचं निघुन जावं !

माणिक !


Daad
Monday, February 05, 2007 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाच्या त्या कोपर्‍यात
फिरकतच नाही हल्ली.
तुझ्या आठवांच्या सावल्या नांदताहेत
........ माझ्यासवे सुखाने
.... इथे माझी सावली मलाच शोधतेय

-- शलाका


Shree_tirthe
Monday, February 05, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक मस्तंच.

तुझ्याशिवाय माझं नाही कोणी
नको करू जाण्याची भाषा
माझ्या मनाला लागली
तुला भेटण्याची वेडी आशा


Shree_tirthe
Monday, February 05, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! .... इथे माझी सावली मलाच शोधतेय. शलाका छान लिहिलंय.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators