|
Daad
| |
| Tuesday, February 06, 2007 - 5:00 pm: |
| 
|
जयश्री, कळले कधीच नाही काय छान लय आहे कवितेला. मानस चंद्र-तारे कल्पना सुंदर आहेत. 'माझे मी खूप आता, आतल्या 'कमी'पणावर लिही'! स्वरूप, प्रवास मला खरच आवडली कविता. एक निरुद्देश(मला दुसरा चांगला शब्द सुचत नाहीये) आयुष्य छान आलय त्यात. 'मानापमानाचे घाट आणि नात्यागोत्याचे पूलही....' - फारच छान. तशीच 'एक कविता अपूर्ण....' प्रत्येकाचाच अनुभव हा पण अगदी सुंदर उतरलाय. पेशवा, वा! संत भेटला मला अगदी अगदी समर्पक. खरच छान! तुषार, 'मन भिरभिर...' - एखाद्या मराठी चित्रपटात शोभेल अस चक्क गाण आहे हे. छान लिहिलय. निरु, प्राजक्ताचा सडा तुझ्या पाठवणीच्या पायघडीवर... कल्पना आवडली मला. माणिक, 'विचारातून कृती....' - कल्पना आवडली. - 'घरट्याचं काय... बांधता येईल केव्हाही...' छानय!
|
Jo_s
| |
| Tuesday, February 06, 2007 - 10:38 pm: |
| 
|
जुनिच एक कविता एक पान पिकून आता पिवळं पडू लागलं झाडापासून सुटून ते हळूच खाली पडलं जन्मभर झाडला दिली त्याने साथ वेळ येताच झाडाने सोडला त्याचा हात झिजू लागली होती त्याची आता काया सोडली नाही तरी त्याने झाडावरची माया काया त्याची झिजून आता होऊ लागली माती "मातीत मिसळून उपयोगी पडेन" म्हणे झाडासाठी . . . . सुधीर
|
Bee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 12:17 am: |
| 
|
तिन्हीसांजा.. तिन्हीसांजेची व्याकूळ चर्या तिचे ठाई गायीसारखे भाव, धुळमातीतून हंबरत येती गुरे खुरातून सुवर्ण झरत जाय.. क्षितिजावर रोखलेल्या डोळ्यातील काजळ निवळत.. उजळत जाय, धरून ठेवलेला शुष्क आसव मोतियाच्या रूपाने झळकत जाय गौकर्णीची कमनीय काया जांभळे अलंकार काढत जाय, परिटघडीचा आंबलेला दिवस एक नवे कवच विणत जाय..
|
माणिक, स्वरुप मस्त कविता! तुमच्याकडुन अपेक्षा वाधताहेत!
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:07 am: |
| 
|
स्वरूप,बी,माणिक,सुधीर,श्री,तुषार,नीरु.... सगळ्यांच्या कविता छान आहेत!!!! सराईत!!!!! अजुनही निर्ढावले नाही मन आठवाचे सल बोचतात अधुन मधुन किती ही सावरले तरी फ़ुटतात बांध मनाचे ढासळतात बुरुज बेसावध क्षणी वरचे आवरण पडते गळुन एकदम कोषात त्या मग होते... .. असाह्य तसेच परत धड्पडत उठत सावरायचय... ...सराईतासारखं... पण अजुनही.... स्मि
|
निशा, माणिक, चिन्नु, स्मि धन्यवाद.
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:29 am: |
| 
|
विहीर!!!! यातनांची ती विहीर बुजवुन टाकली घट्टसे झाकण पण घातले पण रात्री अपरात्री आतुन ऐकु येते कधीतरि...विव्हळणे त्या यातनांचे डोळ्यातली नीज उडवणारे वरुन सगळे शांत भासते पण आत कोलाहाल असतो कासाविशी वाढवणारा न बुजणारा... स्मि
|
स्वरूप सुरेख आहे अपूर्ण कविता. माणिक मस्त जमलीय अगदी. तिसरे कडवे आवडले. बी वर्णन छान आहे संध्येचं. स्मि सराईत आवडली. विहीर ठिक आहे म्हणजे शब्द छान आहेत पण तेवढेच. निरू प्राजक्त छान आहे.
|
Mankya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 6:05 am: |
| 
|
चिन्नु, दाद, भ्रमरा, स्मि, संघमित्रा .. खुप आभार मित्रांनो ! स्मि .. सराईत ... जमुन गेलीय अगदी ! विहिर .... शब्दरचना खुपच छान ! माणिक !
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 07, 2007 - 6:12 am: |
| 
|
स्मि सराईत आवडली. विहीर ठिक आहे म्हणजे शब्द छान आहेत पण तेवढेच. >>>>धन्यवाद संघमित्रा(मी जाणत नाही आपल्याला तरी अरे तुरे म्हणतेय.. चालेल का?).... पण मला कळाले नाही तुला काय म्हणायचे आहे ते.शद्ब छान आहेत म्हणजे तो केवळ चमकदार शब्दांचा गुच्छ नाहीये.... ती विहीर आहे ती म्हणजे मनात असलेल्या यातनांचा कप्पा...सोसलेल्या यातना सगळ्या... आता विहीर म्हणजे तुला सगळेच संदर्भ द्यावे लागतील...जश्या पुर्वीच्या विहीरी, आता बुजवल्या आहेत बर्याच ठिकाणी. पण तरी ही प्रवाद असतात की काहीतरी गुढ आवाज ऐकु येतात...काहीतरी भुतकाळ असतो त्यामागे...खरे खोटे महित नाही. पण ते प्रतिक आहे हे ईथे वापरलेले..... माझ्या भोगलेल्या यातनांची विहीर.... अर्थात कविता ही प्रत्येकाला वेगवेगळी जाणवत असते...मला अभिप्रेत असलेला अर्थ हा आहे....आणि ईतके विश्लेषण करायचा हेतु हा की त्या मागची भुमिका मला सांगता येते...केवळ शब्द जोडून केलेला फ़ुलोरा नाही तो.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:21 am: |
| 
|
भ्रमरला अनुमोदन स्वरूप आणि माणिक तुमच्याकडुन खरच अपेक्षा वाढल्यात आता.... माणिक घरट्याचे कडवे तर मस्त..
|
Chinnu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:41 am: |
| 
|
बी परीटघडीचा आंबलेला दिवस मस्त! सुधीर खुप छान. स्मि मला सराईत जास्त आवडली.
|
Mankya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:54 am: |
| 
|
लोपा ... खुप धन्यवाद ! नक्कि प्रयत्न करेन अपेक्षा पुर्ण करण्याचा ( तुम्ही सगळे बरोबर असाल तर कसली काळजी नाही ) ! माणिक !
|
Imtushar
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:58 am: |
| 
|
तीर्थे, माणिक, मानस, जयश्री, निशा, चिन्नू, दाद, स्मि... आभार. एकन्दरीत ही कविता ठीकठाक जमली असं वाटतय. bee , कविता आवडली. स्मि, सराईत छान... विहीर मधील घुसमट उत्तम व्यक्त झाली... वाट तितकीशी नाही आवडली. तीर्थे, अगदी गावाला गेल्यासारखे वाटले आणि, माणिक, कविता छान आहे... एक दोन ठिकाणी नीट समजली नाही, पण एकंदरीत चांगली वाटली. --तुषार
|
स्मि अरे तुरेच बरे हे मला समजलं गं की ती यातनांची विहीर आहे. ठीक आहे. पण मग तेवढेच? पुढे काय? असे काहीतरी वाटतेय. (कदाचित सराईत मुळे अपेक्षा वाढल्या असतील.) कारण यातनांची विहीर ही कल्पना काही तशी नवीन नाही मग तुझे म्हणून त्यात काहीतरी नवीन element पाहिजे. (अर्थातच हे वाचक म्हणून माझे मत मला खूप का आवडली नाही त्याबद्दलचे. कवी म्हणून तुझे एक वेगळे मत असणे ठीकच) आहे.
|
Niru_kul
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:16 am: |
| 
|
तुझी माझी यारी.... तुझी माझी यारी... खड्ड्यात जाओ दुनियादारी... मला तुझी संगत प्यारी.... अशी तुझी नि माझी यारी.... टूथब्रश आणि अंडरवेयर सोडून, आपण सगळं शेअर करणार; आणि हो एक राहीलचं! आपली गर्लफ्रेंड मात्र वेगवेगळी असणार; तरीही रस्त्यावर एखादी आयटम दिसल्यावर, आपण मागे वळून बघणार; आणि मग एकमेकांकडे पाहून, गालातल्या गालत हसणार; आपल्या या मैत्रीची, रंगतच न्यारी.... अशी तुझी नि माझी यारी.... सकाळी लवकर उठण्याची, तुला फारच घाई; मी मात्र रोज तुझी, पेकाटात लाथ खाई; कॉलेजला जाण्यापूर्वी तू चहाच्या टपरीवर जाई; आणि त्याचे पैसे भरण्याची पाळी माझ्यावरच येई; मसाला डोसा आपले जेवण अन इडली आपली न्याहारी... अशी तुझी नि माझी यारी.... पिक्चर म्हणजे धमाल, पार्टी म्हणजे कमाल; हास्य म्हणजे टाळी, दुःख म्हणजे रुमाल, आपल्या या बेधुंद जगाचे, आपण दोघे रंगारी... अशी तुझी नि माझी यारी.... मला तुझी संगत प्यारी.... अशी तुझी नि माझी यारी....
|
Raadhika
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:31 am: |
| 
|
सगळे जण इथे खूप सुंदर सुंदर कविता लिहिताहेत.... हा माझाही एक प्रयत्न. होकार तुला दिसले नव्हते का रे...? माझ्या पापणी आडचे अश्रू... माझे थरथरणारे बाहू... तू ऐकला नव्हता का रे...? माझा दबलेला हुंदका... माझ्या मनाचा ओरडा... तुला समजली नाही का रे...? माझ्या डोळ्यातील भीती... माझी असहाय स्थिती तुला दिसला फक्त माझा होकार... ऐकला फ़क्त माझा हुंकार... पण समजला नाही तुला माझा नकार!
|
Mankya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:36 am: |
| 
|
आमच्या मनाची व्यथाच वेगळी येणार्या संकटांचीही उच्च नाही पातळी लहानसहान प्रसंग आम्ही झुरतो आनंदाचे क्षण मात्र वेचायला विसरतो वैतागाचा एक क्षण पुर्ण दिवस खातो सारासार विचार जाणे कुठे जातो मनी नाना शंका प्रत्येक गोष्टीत संशय कुठे गेली श्रद्धा फक्त विश्वासाचा व्यय गैरसमजाची तर भिंत अभेद्य आहे न बोलताच गृहितके अजब तर्हा आहे चढाओढीचा अर्थ चढणार्याला ओढायचं स्पर्धेचं फक्त निमित्त पुढच्याला मागं खेचायचं वर्षानुवर्ष आम्ही असंच जगत राहू परीवर्तनासाठी शेजार्याच्या पुढाकाराची वाट पाहू ! माणिक !
|
Jayavi
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:45 am: |
| 
|
अरे वा..... अब आ रहा है मजा माणिक, स्मि, बी, तिर्थे, राधिका, निरु... लगे रहो..! खूप छान वाटतंय आता
|
Niru_kul
| |
| Wednesday, February 07, 2007 - 9:05 am: |
| 
|
त्या शापित वळणावर.... तू दिसली होतीस पहिल्यांदा, त्या शापित वळणावर... तू हसली होतीस पहिल्यांदा, त्या शापित वळणावर... झालो होतो मी तुझाच सखे, पळभराच्या दृष्टीभेटीत... तू नजर माझी भेदली, त्या शापित वळणावर... प्रेमबंधाचा माझा, तो पहिलाच अनुभव होता; तू श्वास माझा जिंकलास, त्या शापित वळणावर... दिवस माझे फुलू लागले, अन् रात्रीही जागू लागल्या; स्वप्नं मी सजवली पहिल्यांदा, त्या शापित वळणावर... ठरवले मी, सांगायचे गुपित तुला माझ्या मनातले; मी तुला गाठायचे ठरवले, त्या शापित वळणावर... तू आलीस, मी बोललो, तू हसलीस अन् मी हुरळलो; होकार तू दिलास मजला, त्या शापित वळणावर... मग मात्र तू मजला, परत कधीही दिसली नाहीस; पुन्हा कधीही त्या रस्त्यावरून, तू मात्र गेलीच नाहीस; मनाने मी बांधलो आहे आता, त्या शापित वळणावर... तुझ्यासाठी मी थांबलो आहे आता, त्या शापित वळणावर...
|
|
|