Daad
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:21 pm: |
| 
|
पूनम, खूप खूप छान कथा. छोटी, विषय तसा साधा आणि लांबवावा तितका लांबत जाणारा, पण आटोपशीर झालीये. कथेतली माणसं किती सुंदर साकारलीयेत. भावनास्पर्शी पण ओक्साबोक्शी रडायला लावणारी नाही. मस्तच!
|
Himscool
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:21 pm: |
| 
|
पुनम.. परत एक सुरेख कथा.. तू काय प्रत्येक वेळेस मॉड्सला मुख्य पानावर लिंक द्यायला कथा लिहिण्याचा पण केला आहेस का?
|
Abhi_
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:24 pm: |
| 
|
पूनम सहिच लिहिलं आहेस!! मस्त!!!
|
Sakhi_d
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:26 pm: |
| 
|
पुनम खरच छानच कथा आहे. अगदि डोळ्यात पाणी आणलस......
|
Maku
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:32 pm: |
| 
|
अप्रतिम दुसरे शब्दच नहिये.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 1:29 am: |
| 
|
तेजसच अगदीच काय चुकत नव्हत काही...... सुरवातीला अन्जलि त्याला ड्युप्लिकेट आई वाटली असणार.... ड्युप्लिकेट आयडीज सारखी! DDD एनिवे.... छान ओघवती लिहिली हे गोष्ट.....! वाचता वाचता वाचकाला अपेक्षित टर्न न येता वेगळाच तपशील समोर येत रहातो आणि वाचक पुढे पुढे उत्सुकतेने वाचत रहातो हे या लेखनाचे यश हे!
|
Kandapohe
| |
| Wednesday, February 07, 2007 - 1:51 am: |
| 
|
छान लिहीले आहेस. एकदम ओघवते. उत्सुकता पण व्यवस्थीत रहाते कथेत आणि जास्ती पाल्हाळ न लावता योग्य शेवट केला आहेस. Good 
|
Saco
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:33 am: |
| 
|
हि कथा office मधे वाचायला नको होती. manager ने २ वेळा बोलावले तरी माझे लक्ष गेले नाही. आता बोलणी! छान लिहीले आहे.
|
Ammi
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:42 am: |
| 
|
ekdam sahi katha aahe..khup aaawdali..
|
Wakdya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 3:21 am: |
| 
|
Psg एक गंभीर विषय खुपच सहजतेने हाताळला आहे. सुंदर कथा. अशाच प्रकारे दत्तक अपत्यांसंदर्भात सुद्धा काही रचलेल्या किंवा सत्यकथा लिहिता येतिल.
|
Milya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 3:23 am: |
| 
|
पूनम मस्त जमलीय गं कथा... लवकरच लोक मला कथाकार पूनम छत्रे तुमच्या कोण असा प्रश्ण विचारणार बहुतेक.... एक प्रांजळ मत : तेजस ५ वर्षाच्या मानाने जरा जास्ती विचार करतो असे वाटतेय... त्याला ७-८ वर्षाचा दाखवला असता तर जास्त सयुंक्तिक वाटले असते असे आपले मला वाटते.... अरे वा लिंबुटींबु आणि वाकड्या ह्या दोघांनिही ही कथा वाचली हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणायचा... अश्या एखाद्या योगायोगावर काही लिहिता आले तर पहा 
|
Deepanjali
| |
| Wednesday, February 07, 2007 - 3:33 am: |
| 
|
पूनम , छान लिहिली आहेस्लघु कथा . बाकी मलाही तेजस च्या वयाबाबतीत मिल्याचे पटले , अजुनही edit करु शकतेस . 
|
Tulip
| |
| Wednesday, February 07, 2007 - 3:36 am: |
| 
|
पुनम .. अप्रतीम कथा. सुरेख भावविश्व रेखाटल आहेस तिघांचही. मेलोड्रामा नाही काही नाही. डोळे भरुन येतात वाचत असताना. गोष्ट मांडण्याची स्टाईलही खूप छान जमतेय तुला. लिहीत रहा.
|
Sushya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 3:55 am: |
| 
|
पूनम, अप्रतिम कथा... खुपच छान आणि हो, मिल्याचं निरिक्षण पण तितकंच छान (सुज्ञास अधिक सांगणे नं लगे)
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:15 am: |
| 
|
>>>>> दोघांनिही ही कथा वाचली हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणायचा दुर्मिळ कसला??? दुग्धशर्करा योग म्हण! हाय काय अन नाय काय त्यात....! (हां, आता बुधवारच्या दिवशी "दुग्धशर्करा" आठवतच नसेल तर मात्र "दुर्मिळच" म्हणा बुवा ) (दिवेआगार घ्या) [आता हा कान्द्या वाईला केव्हा जाणार... अन केव्हा गणपती बाप्पाच्या पाया पडुन मी श्रीवर्धनच्या बीबीवर सान्गितलेली सुबुद्धी देण्याची प्रार्थना बाप्पाला ऐकवणार... अन मग बाप्पा माझी मागणी मान्य करणार...... कधी होणार काय की! शनिवार म्हन्जे लईच लाम्ब राहिला हे] ddd
|
Reshim
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:18 am: |
| 
|
पूनम, कथा खूपच भावस्पर्शी आहे. एकदम touching. अजून एक छान वैशिष्ट म्हणजे कथा एकाच post मधे संपते. त्यामुळे वाचताना link तुटत नाही. खूप आवडल.
|
Meenu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:43 am: |
| 
|
अरे वा लिंबुटींबु आणि वाकड्या ह्या दोघांनिही ही कथा वाचली हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणायचा... अश्या एखाद्या योगायोगावर काही लिहिता आले तर पहा >>> मिल्या अगदी हेच मनात आलं होतं माझ्याही .. पुनम मस्तच अगदी हातखंडा झालाय हं लघुकथेत तुझा .. मिल्या तुम्ही छत्रे काय ..? त्या लघुकथा लिहीणार्या पुनम छत्रे त्या कोण हो तुमच्या ..?
|
Vadini
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:55 am: |
| 
|
Psg,'डोळ्यात पाणी आले ' ह्याशिवाय दुसरे काही लिहावे असे वाटले पण काही सुचेना.' विनोदी ' आणि 'तरल मानवी भावनांनी युक्त' असे दोन्ही प्रकारचे लेखन तुम्ही सारख्याच समर्थपणे करू शकता याबद्दल तुमचे कौतुक आणि अभिनन्दन!
|
Saee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 5:51 am: |
| 
|
केवळ अप्रतिम! तुझ्या कथांचे विषय छानच असतात. आई नसलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसलं तर!! बाबा, आई आणि पोरं सगळेच सुंदर आयुष्य जगू शकतील. ज्यांनी नकळत्या वयात आई गमावली ते समजू शकतील मला काय म्हणायचं आहे.. किती लोभस लिहिलं आहेस गं..
|
Psg
| |
| Wednesday, February 07, 2007 - 6:00 am: |
| 
|
सर्वच वाचकांचे मनापासून खूप खूप आभार! तेजस ५ वर्षाच्या मानानी खूप जास्त विचार करतो का? असा विचार मीही केला होता.. पण हे सर्व प्रसंग आहेत, त्या प्रसंगांचे त्या बालमनावर परिणाम झाले आहेत आणि त्याने त्यातून त्याच्या कुवतीप्रमाणे अर्थ काढले आहेत. आईच्या मृत्युनंतर नातेवाईक ज्या पद्धतीने वागले आणि अंजली जशी वागत आहे, यातला फ़रक एखादा ५ वर्षाचा मुलगा/ मुलगी सहज समजू शकतो/ ते असं वाटलं. तसही मुलं फ़ार sharp आणि sensetive असतात. आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूपच जास्त समजतं त्यांना. आणि 'आईचा मृत्यू' सारख्या मोठ्ठ्या घटनेनंतर तर तेजसचं मन जास्तच संवेदनशील झालेलं असणार हे सगळं समजण्यासाठी. म्हणून तेजसचं वय ५ वर्षे योग्य वाटले. पुन्हा एकदा सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद. असाच लोभ ठेवा ही विनंती
|