Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 06, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 06, 2007 « Previous Next »

Shree_tirthe
Tuesday, February 06, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुशार, स्मि कविता छान आहेत.

Mankya
Tuesday, February 06, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाट बघत..कल्पांताची ... व्वा !
कविता छानय स्मि !

माणिक !


Shree_tirthe
Tuesday, February 06, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांव

मझ्या गावासारखं दुसरं गांव न्हायी
तिथं जे घडतं ते ईथं घडत न्हायी...

पहाटं ऊठून सडा टाकते
शेणाचा तिथली माय
काम करून थकल्यावर
पोरंच दाबतात तिचे पाय

मेणावर कुंकु लावणार्‍या तिथं
हायत माय-बहिणी
मायसारखं प्रेम करणार्‍या तिथं
हायत वहिणी

सांच्यापारी दिवा लावत्यात तुळशीपुढं
लेकरंबी "शुभंम करोति" म्हणत्यात देवापुढं

कुत्र्याचीबी पुजा करत्यात सटीच्या सणाला
दु:खी करत न्हायीत आम्ही कुणाच्याबी मनाला

आलेल्या पाहुण्यांचं तिथं
स्वागत होतं लई भारी
बोटव्यासंग भाकरी जेवाया
मिळते तिथल्या दारी


Imtushar
Tuesday, February 06, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन भिरभिर भिरभिर झाले गं
स्वप्नात कुणीतरी आले गं
चोरुन माझ्या ह्रुदयाला अन्
लावुन हुरहुर गेले गं

सख्याही मजला पुसती सार्‍या
चित्त हरवले माझे कुठे
नयनांत कशी ही चंचलता
अधरांना का अन् कंप सुटे
सांगू कशी त्या वेड्यांना मी
ह्रुदयी त्याने घर केले गं
मन भिरभिर भिरभिर झाले गं
स्वप्नात कुणीतरी आले गं

मलाच माझे आज कळेना
कसे सावरू खुळ्या मनाला
पुन्हा पुन्हा हे अधीर होते
गुपित मनीचे सांगु कुणाला
मलाच धोका देउन वेडे
त्याचे होउन बसले गं
मन भिरभिर भिरभिर झाले गं
स्वप्नात कुणीतरी आले गं

प्रतिमा त्याची समोर येता
नकळत मी ओठांत हसे
या डोळ्यांना क्षणभर आणिक
जग हे सारे सुरेख भासे
त्या जादूई नजरेने मी पण
रूपसुंदरी झाले गं
मन भिरभिर भिरभिर झाले गं
स्वप्नात कुणीतरी आले गं

--तुषार


Shree_tirthe
Tuesday, February 06, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुशार मस्तंच क्या बात है!!! व्वा!!!

मन भिरभिर भिरभिर झाले गं
स्वप्नात कुणीतरी आले गं
सही.


Jayavi
Tuesday, February 06, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा तुषार मजा आ गया :-)

Mankya
Tuesday, February 06, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार ... मस्तच यार !

माणिक !


Nisha_v
Tuesday, February 06, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री "गावं" छान आहे. झक्कास!!!

पहाटं ऊठून सडा टाकते
शेणाचा तिथली माय
काम करून थकल्यावर
पोरंच दाबतात तिचे पाय

सहीच.

तुशार कविता आवडली. मस्तच.


Nisha_v
Tuesday, February 06, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ना त्याच्यासाठी, ना स्वत:साठी मरायचे
आता ठरवले... फक्त कवितेसाठी जगायचे

खूप प्रयत्न केले, झोप उडाली
तरी कविता काही जमेना
दोनाचे चार शब्द लिहिले
तरी कविता कुणाला कळेना
काय करावे काहीच सुचेना?
शब्द शब्दाजवळ बसेना...

काय करू अस्मितेसाठी...
काय लिहू कवितेसाठी...
हे कोडं काही सुटेना...
काय करावे काहीच सुचेना...

बंद डोळ्यांत येते कविता
डोळे उघडता जाते कविता...
हे कोडं काही सुटेना...
कविता काही जमेना...

निशा


Mankya
Tuesday, February 06, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण निशा कवित झाली की ... छान आहे !
' शब्द शब्दाजवळ बसेना ' अस म्हणायच आहे का तुला !

श्री ... काही concept मस्त आहेत कवितेतले !

माणिक !


Nisha_v
Tuesday, February 06, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद माणिक.

चूक दुरुस्त केली. ' शब्द शब्दाजवळ बसेना '


Niru_kul
Tuesday, February 06, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ताचा सडा.....

कोपर्‍यावरचा प्राजक्त, तुला बघितलं की फुलतो...
तुझ्याबद्दल जिव्हाळा, त्याच्याही मनात झुलतो...
पण तू मात्र कधीच, त्याची दखल घेत नाहीस...
आणि तो पण वेडा, तुझी वाट पाहणं सोडत नाही...
त्याला विश्वास असतो, तू बघशील त्याच्याकडे प्रेमानं...
तो ही मग शेजारच्या वडासारखा, तरारेल मग जोमानं...
तो फुलतो, झडतो अन् पुन्हा नव्याने फुलत राहतो...
तुझ्यावर मात्र मनापासून, मूकपणे प्रेम करत राहतो...
आणि मग अचानक एके दिवशी, लग्न तुझं ठरतं...
त्याला बातमी कळताच, त्याचंही मन भिरभिरतं...
निकराचा प्रयत्न म्हणून, तो जोमानं फुलू पाहतो...
सौंदर्याचा कळस गाठून, अस्तित्व विसरुन जातो...
तरी तू मात्र येत नाहीस, दर्शन त्याला देत नाहीस...
त्याच्या निःशब्द भावनांना, तू समजून घेत नाहीस...
प्रेमभंगाच्या दुःखामध्ये, त्याचा अश्रूंशी लढा असतो...
तुझ्या पाठवणीच्या पायघडीवर मात्र, त्याच प्राजक्ताचा सडा असतो...


Mankya
Tuesday, February 06, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरु .... कल्पना छानय रे !
तुझ्या पाठवणीच्या पायघडीवर मात्र, त्याच प्राजक्ताचा सडा असतो...
हे विशेष आवडलं !

माणिक !


Manas6
Tuesday, February 06, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरु, निशा, तुषार.. कविता गोड आहेत तुमच्या.. तुषार, तुझ्या कवितेला भावगीत म्हणुन चाल लावता येईल.. प्रयत्न करुन बघ.. मानस

Swaroop
Tuesday, February 06, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तुमची सुचना बरोबर आहे.... ती कविता कुठे संपवायची याचा विचार करतोय...

"एक कविता.... अपूर्ण "

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ कागद्-पेन घेउन....
सुचतच नव्हते काही
ना धड पाउस, ना धड उन....

शेवटी कंटाळुन बाजुला ठेवुन दिले सारे
आणि सरळ आठवायला लागलो तुला...

तुझ हसणं आठवलं,
तसे टपटपले दोन चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं,
तश्या उमटुन गेल्या दोन चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खुपखुप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचुप....
मग मी आठवल्या त्या कातरवेळा,
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात....
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त लयी आणि यमकात....
कागद भरुन गेला पार....
एक कविता होत होती तयार....
आता शेवटच राहिला होता फक्त....
बाकी सगळ जमल होतं मस्त...

अन मला कुठुनसं आठवलं
आपल झालेल भांडण
तुझ्यासारखेच रुसुन बसले मग शब्द

परत थोडा मागे गेलो....
जुनंजुनं आठवु लागलो....

हाताला लागले काही निसटणारे शब्द
लिहलही मी कागदावर काहीबाही
पण ते माझ मलाच पटल नाही....
जसं आपल भांडण,
कधी कध्धीच मिटल नाही....
माझ मीच मग समजावलं मला
कधीकधी असं होतं...
राहते एखादी कविता अपूर्णच
जसं राहून गेलय आपल नातं...

स्वरूप


Shyamli
Tuesday, February 06, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है,
स्वरुप छान आहे अपूर्ण कविता,
अशीच असते ना कवितापण?
सारखं रुसणार्‍या प्रीयेसारखी
ये म्हणल तर फुरगटुन बसते आणि आता येउ नको म्हणल तर ऐकायच नाव नाही घेतं


Mankya
Tuesday, February 06, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि है स्वरुप .. सहिच आहे यार !

राहते एखादी कविता अपूर्णच
जसं राहून गेलय आपल नातं... खरंय रे !

माणिक !


Chinnu
Tuesday, February 06, 2007 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीर्थे, तुषार, निशा, निरुकुल आणि स्वरूप मस्त आहेत कविता.

Mankya
Tuesday, February 06, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारातुन कृती
कृतीतूनच संस्कृती
मोठमोठे ग्रंथ काय
वाचता येतील केव्हाही ..

नि : स्वार्थ प्रिती
मनी निरागसता
नात्याचं काय
ठरवता येईल केव्हाही ..

काय मिळवायचं
गमवायचं ठरव
फसण्याची काय
वेळच ना येईल केव्हाही ..

गरूडभरारीची जिद्द
क्षितिजापलिकडे झेप
घरट्याचं काय
बांधता येईल केव्हाही ..

लढ आयुष्यात
सत्याने सातत्याने
हारणे जिंकणे ना
आपल्या हाती केव्हाही ...

माणिक !

( टाकावी का नको अस वाटत होत .. काहि चुक असेल तर नक्की सांगा. )



Chinnu
Tuesday, February 06, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक नवा प्रयोग छान आहे. शेवटुन दुसरे कडवे अगदी पटले.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators