Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 06, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » मराठी गझल » Archive through February 06, 2007 « Previous Next »

Bairagee
Thursday, February 01, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तिच्या पोस्ट वरून जे कळतंय ते असं की सारंग ला जिथे जिथे विरोधाभास अपेक्षित आहे तिथे तो तितका प्रभावीपणे आलेला नाहीये


वैभव, नक्कीच. मी माझ्या पोष्टात फक्त काही धोके सांगितले, एवढेच. गझलकार विरोधाभासाच्या नको तितके प्रेमात पडतात असे अनेकदा दिसते. ते शक्य झाल्यास टाळायला हवे. फक्त विरोधाभासावर पोसलेला वाचकवर्ग गझलेसाठी चांगला नाही. स्वातीसारख्या गझलकाराचा तुमच्यासारखाच गैरसमज झाला असल्यास दिलगीर आहे. माझ्यावतीने तुम्ही वेगळी दिलगिरी व्यक्त केल्यास हरकत नाही.

बाय द वे, हमखास दाद घेणारे शेर लिहिणेही कला आहे, कठीण आहे. त्यांना मी कमी लेखणार नाही. आणि तुला तसे म्हणायचेही नसावे. जिगरसारखे मोठे कवी एकाच गझलेत काही अंतर्मुख करणारे, काही काही जाणकारांसाठी, काही स्वत:साठी, असे शेर पेरायचे. शेरांचा क्रमही त्यानुसार ठरवायचे. ये बात और है के दाग़-ओ-जिगर की ग़ज़लीयत किसे किसे ही नसीब हुई है!




Sarang23
Thursday, February 01, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. मतल्यात साधं सोपं जगण्याचा आणि हसता हसता रडण्याचा काय संबंध?
ज्या माणसाला निखळ हसता येतं आणि हसता हसता डोळे पाणावू शकतात तो साधा माणूस नसेल तर कोण असावा? देव की दानव?

२. विजयाच्या धुंदीत कसली भीती?
( बहुधा यशाचा आनंद निखळ नाही हे कळूनसुद्धा त्याला जाणून बुजून हरणं हा पर्याय नव्हता.. असं म्हणायचं असावं.)
अपयशाची सगळ्यात जास्त भीती कायम जिंकणार्‍यालाच जास्त भेडसावत असते... यापेक्षा अजून काय सांगू?
३. मक्त्यातही त्यागाची महती कळली नाही हे चूक वाटतं.
का? का चूक?
बहुधा तुला ( बाकी रचनेचा सूर पहाता) आसक्तीही साधली नाही आणि विरक्तीही असं म्हणायचंय.
चूक. पुर्णपणे चूक. balance of both साधला नाही असाच सूर आहे पुर्ण गझलेचा.
मग महती कळली आहे, पण कृती साधली नाही असं यायला हवं.
का? का?? काहीही काय...
४. नाती गोती च्या शेरातही तसंच झालंय. नाती त्रासदायक झाली तरीही तोडता आली नाहीत असा अर्थ अभिप्रेत असावा, पण तसा आलेला नाही.
मला काय अर्थ अभिप्रेत आहे हाच जर आपल्याला कळाला नाहीये, तर काय यायला हवं हे सांगणंही चूक आहे ना.

५. आसक्तीची ओढ अनावर म्हणजे काय?
आसक्ती म्हणजेच अनावर ओढ ना? आणि असताना नसणे जमले नाही म्हणजे काय? तसा प्रयत्न होता का? असून नसणं असं प्रयत्नपूर्वक असतं का?
आसक्ती आणि विरक्ती या दोन वृत्ती आहेत ज्यांच्यामध्ये सामान्य माणूस असतो. बाकीची दोन्ही टोके राक्षसी आणि दैवी माणसाची लक्षणे आहेत. आता इथे विरक्तीची ओढही अनावर होऊ शकली असती. पण ती पाशवी प्रवृत्तींकडेच झुकणारी जास्त आहे.
मग मला आसक्तीचीच ओढ वाटली असं म्हणणं चूक कसं?
मला वाटतय एवढं स्पष्टीकरण पुरे असावं. अजूनही शंका असेल तर मी endless बोलायला तयार आहे.

असताना नसणे हे साधं सरळ आहे. संसारात असूनही परमार्थ साधण्याचा उल्लेख आहे त्या ओळीत.


एकूण गोषवारा : आपल्याला माझ्या गझला कळत नाहीत याला कारण माझे सादरीकरण बरोबर नसावे. असो.

मात्र एक विनंती. हे सगळं स्पष्टीकरण तुम्हाला पटावं म्हणून दिलं नाहीये. जरी हे मुद्दे पटले नसतील तरी "मला हे पटूच शकत नाही" असली विधाने करू नयेत. रुपक हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा प्रश्न आहे.

गझलचं नाव खूप बोलकं होतं, पण त्याचाही काही फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये.

एका सामान्य माणसाला कधीच समतोल साधता आला नाही ऐहीकांमध्ये आणि परमार्थामध्ये हीच खंत गझलेतून उतरते.

शेर विरोधाभासावर आधारीत असला, धक्कातंत्र असलं म्हणजे लगेच दाद मिळते हे मान्य, पण मला तरी अजून असल्या लिखाणाचा मोह झालेला नाहीये. तसंच लिहायचं असेल तर नक्कीच लिहील मी. पण जे वाटतं ते लिहीणंच मला रुचतं.
पण अशाही गझला मी यापुर्वी लिहीलेल्या आहेत.
गझलेत फक्त विरोधाभासच आला पाहीजे हे चूक आहे.

असो. माझ्या दृष्टीने हे सगळे शेर जोपर्यंत मला अंतर्मुख करतायत तोपर्यंत चिंता नाही मला!


Bairagee
Thursday, February 01, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सारंग,
"शेर विरोधाभासावर आधारीत असला, धक्कातंत्र असलं म्हणजे लगेच दाद मिळते हे मान्य, पण मला तरी अजून असल्या लिखाणाचा मोह झालेला नाहीये.तसंच लिहायचं असेल तर नक्कीच लिहील मी. पण जे वाटतं ते लिहीणंच मला रुचतं.
पण अशाही गझला मी यापुर्वी लिहीलेल्या आहेत."
चांगलाच विरोधाभास आहे.:-) असो. एक दोन " अशाही" गझला लिहाव्यात. धड जमत नाही म्हणून लिहीत नाही, असे लोकांना वाटू नये:-)
असो. विरोधाभासावर आधारित शेर हा कमी दर्जाचा असा सूर लावणेही चुकीचे. चांगला शेर तो चांगला शेर. आणि टाकाऊ तो टाकाऊ.
पूर्वापारापासूनच गझलेत इतर काव्यप्रकारांपेक्षा विरोधाभासाचा वापर अधिक होतो. गझल म्हटली की विरोधाभास हवाच, हे चूक. एवढेच मला म्हणायचे होते.

"माझ्या दृष्टीने हे सगळे शेर जोपर्यंत मला अंतर्मुख करतायत तोपर्यंत चिंता नाही मला!"
मग प्रश्नच मिटला. :-)



Sarang23
Friday, February 02, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही वाक्य highlight छान केली आहेत, पण आपण मोह हा शब्द विसरता आहात! :-)

तशा गझल लिहील्या आहेत पण मोह झाला नाही.

समोर सुंदर आमरस पोळीचं जेवण असतानाही तसं वर्ज्यंच केल्याप्रमाणे शिळे तुकडे तोडणं हेही चूक आहे! जे आलय ते घ्यायचं...


Pulasti
Friday, February 02, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हा योग साधावा कसा?"

राजकारण थोर त्याचा अर्थ लावावा कसा?
प्राण तो घ्यावा कसा मी प्राण हा द्यावा कसा?

एकही नेता मिळेना का आम्हां नि:स्वार्थसा?
जो न आडातच मुळी तो पोहरी यावा कसा?

जमली सभोती पाखरे माझी पुन्हा - नि:शब्द ती
बोलती सारे डबे हा दिवस काढावा कसा?

करतो आम्हीही चार कामे देवधर्माची तरी
एवढ्याश्या मिळकतीवर खर्च भागावा कसा?

तू दिलासच चाळणीने, उधळला मी रे कधी?
सांग आता राहिलेला जन्म वेचावा कसा?

जाणणारे लोक नुरले ते अबोली वेदना
दु:ख माझे मांडणारा शब्द शोधावा कसा?

-- पुलस्ति

Bairagee
Friday, February 02, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे, बरे. सारंग़ आता मीही उत्तराचा मोह आवरतो:-)

पुलस्ति---

राजकारण थोर त्याचा अर्थ लावावा कसा?
प्राण तो घ्यावा कसा मी प्राण हा द्यावा कसा?
"प्राण तो घ्यावा कसा मी"
जमत नाही. काय म्हणायचे आहे?

एकही नेता मिळेना का आम्हां नि:स्वार्थसा?
जो न आडातच मुळी तो पोहरी यावा कसा?
"जो मुळी आडात नाही" असे करा.

जमली सभोती पाखरे माझी पुन्हा - नि:शब्द ती
बोलती सारे डबे हा दिवस काढावा कसा?
वज़नात नाही. "पाखरे जमली सभोती ही पुन्ह का?" असे काहीसेकरा.


करतो आम्हीही चार कामे देवधर्माची तरी
एवढ्याश्या मिळकतीवर खर्च भागावा कसा?
वज़नात नाही. "चार कामे देवधर्माची अम्ही करतो असे करा"
छान. खालची ओळ वि.

तू दिलासच चाळणीने, उधळला मी रे कधी?
सांग आता राहिलेला जन्म वेचावा कसा?
छानच कल्पना. "रे" इथे भरीचा वाटतो. शक्य झाल्यास टाळावा.

जाणणारे लोक नुरले ते अबोली वेदना
दु:ख माझे मांडणारा शब्द शोधावा कसा?
वरची ओळ अज़ून साधी सहज हवी.
तसेच "शोधावा" हवे की "बोलावा"?

एकंदर छान! सहजता हवी. वृत्तांन्चा अभ्या, सराव सुरु असेलच. प्रयत्नांती परमेश्वर.



Swaatee_ambole
Friday, February 02, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती, मला पाखरांचा शेर कळला नाही.
तुमच्या कल्पना छान असतात.


Pulasti
Friday, February 02, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिला शेर आधुनिक काळातल्या युद्धांमधे लढणार्‍या सैनिकाला पडलेला प्रश्न आहे. लिहितानाही मला वाटले होते की - कारण नसताना गूढ झाला आहे. बघीन काय करता येते...
शेवटच्या शेरातला "शोधावा" मला तसाच ठेवावासा वाटतो.
बाकी तुमच्या सर्व सूचनाबद्दल मनापासून आभार. मात्रांची जुळवाजुळव केली पण "वजनात" लिहिणं जमत नाही अजून. वजनाबद्दल आणखी मार्गदर्शन केलेत तर खूप उपयोग होईल.

सुधारित आवृत्ती -

============

राजकारण थोर त्याचा अर्थ लावावा कसा?
प्राण तो घ्यावा कसा मी प्राण हा द्यावा कसा?

एकही नेता मिळेना का आम्हां नि:स्वार्थसा?
जो मुळी आडात नाही पोहरी यावा कसा?

पाखरे जमली सभोती माझिया - नि:शब्द ती
बोलती सारे डबे हा दिवस काढावा कसा?

चार कामे देवधर्माची अम्ही करतो तरी
एवढ्याश्या मिळकतीवर खर्च भागावा कसा?

तू दिलासच चाळणीने, उधळला ना मी कधी
सांग आता राहिलेला जन्म वेचावा कसा?

जाणणारे ती अबोली वेदना गेले कुठे?
दु:ख माझे मांडणारा शब्द शोधावा कसा?

Pulasti
Friday, February 02, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती - पाखरांचा शेर हा मुला माणसांनी भरलेल्या पण अन्नाचे दुर्भिक्ष असलेल्या घरातल्या माउलीचा प्रश्न आहे. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!
बैरागींनी सुचवल्याप्रमाणे रचनेत जरा सहजता आणि साधेपणा आणण्याचा प्रयत्न करीन.

Meenu
Friday, February 02, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळे

का अशी यावी समोरी वादळे ?
मी किती झेलीत जावी वादळे ?

दान करुनी मी मनीची शांतता,
घेऊनीया काय यावे ? वादळे ?


चेहर्‍यावरती खुणा दिसतात का?
बोलती का सोसलेली वादळे?

पाहिल्या बदलूनही वाटा किती
भेटली सारीकडे मज वादळे


साथ रे यांनी मला इतकी दिली ..
सोयरी झाली आता ही वादळे ..

इस्लाह please
स्वातीनी सुचवलेले बदल केलेत


Swaatee_ambole
Friday, February 02, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा. आता कळलं. धन्यवाद, पुलस्ति. आणि शुभेच्छा.

Swaatee_ambole
Friday, February 02, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, चांगला प्रयत्न आहे. शेरांचे अर्थ छान आहेत. मक्ता विशेष.
व्याकरण मात्र सुधारायला हवं.

मला जितकं माहिती आहे त्यानुसार सांगायचा प्रयत्न करते. चुभूद्याघ्या.
एकदा मतला ( पहिला शेर) लिहीला की गज़लची ' ज़मीन' ठरते. म्हणजे रदीफ़, काफ़िया, अलामत आणि बेहर ( वृत्त) यांनी बनलेली चौकट. मग उरलेली गज़लभर ही चौकट ओलांडायची नसते.

तुझ्या मतल्यानुसार ' वादळे' हा रदीफ़, ईकारांत काफ़िया, ई ही अलामत आणि गालगागा गालगागा गालगा हे वृत्त ठरलं. मग पुढल्या शेरांमधे ' यावे', ' गेले', ' मज' हे ईकारांत नसणारे शब्द काफ़ियाच्या जागी चालत नाहीत.
तसंच तिसर्‍या आणि चौथ्या शेरात वृत्तभंग झालाय.

पर्याय सुचवायचा तर..

चेहर्‍यावरती खुणा दिसतात का?
बोलती का सोसलेली वादळे?

पाहिल्या बदलूनही वाटा किती
भेटली सारीकडे मज वादळे


असं काहीसं चालेल का बघ.


Chanakya
Friday, February 02, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती : छान आहे गझल

मीनु : तुमचा प्रयत्न पण छान आहे.. बाकी काय चुकले आहे ते जाणकार सांगतीलच....

मला गझलेच्या व्याकरणाविषयी एक प्रश्ण आहे. कृपया जाणकारांनी खुलासा करावा..

उदा. मतल्यात वृत्त समजा गालगागा गालगागा गालगा असे असेल (म्हण्जे एकुण मात्र १९ झाल्या) आणि नंतर एखाद्या शेरात समजा गालगागा गागालगा गालगा अशी ल आणि गा ची अदलाबदल झाली असेल तर ती गझल ठरते का? अदलाबदल आहेत तरी एकुण मात्रा १९ तश्याच आहेत म्हणून हा प्रश्ण पडला...

असे केले तर गझलची लय नक्कीच जाते पण एकूणच ती गझल तरी ठरते का?


Meenu
Friday, February 02, 2007 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती धन्यवाद ..
चाणक्य वृत्त सांभाळलं नाही आणि मात्रा बरोबर असतील तर तुम्ही म्हणता त्याप्रकारची गज़ल ही मात्रा वृत्तातील गज़ल म्हणतात. तसं शक्यतो करु नये असं जाणकारांचं मत आहे असं स्वातीनी दिलेली link आहे त्यात लिहीलं आहे. जर का वृत्त आणि मात्रा दोन्ही योग्य असतील तर त्या गज़लेला अक्षरगणवृत्तामधली गज़ल म्हणतात. (चु. भु. दे. घे.)


Bairagee
Saturday, February 03, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, यमक आणि अन्त्ययमक तसेच अलामतीचा विशेष अभ्यास करावा

Prasad_shir
Monday, February 05, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र टाईम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये माझ्या
www.sadha-sopa.com या साईटसंबंधी एक लेख प्रकाशित झाला होता.

हा लेख मटाच्या वेब साईटवर दिसत नाहिये, पण त्याची scan केलेली प्रत आपल्याला www.sadha-sopa.com/node/201 येथे वाचता येईल...

( mods ही बातमी कुठे टाकावी हे न कळल्याने येथे देत आहे, आपल्याला योग्य वाटेल त्या बीबी वर हलवावी ही विनंती...)

Sherloc
Monday, February 05, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, आता तुला कुठेही हलवला तरी आम्ही तुझ्यापर्यंत बरोबर पोहोचुच, काळजी नसावी.

Mankya
Monday, February 05, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद .... लेख वाचला रे मित्रा !
तुझी साधं सोपं आयुष्य ... हि कविता माझ्या mail वर आली होती मित्राकडुन पण मला वाटलं नव्हतं मित्रा तुझ्याशी बोलता येईल म्हणुन !

खुप छान आहे लेख ... अर्थात तुझे समर्थ लेखनच याचे कारण !
खुप शुभेच्छा तुझ्या पुढच्या लिखाणाला !

माणिक !


Yog
Tuesday, February 06, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(बघू जमतय का. नाहीतर चुका दुरुस्तीला थोर मन्डळी आहेतच.)

अन..

विझले आभाळ अन चन्द्र तेवत होता
सम्पले सहवास अन स्पर्श रेलत होता.

सुकला गाव कुणाचा कोण रडला होता
उजाड माळ अन थेम्ब वेचत होता.

पानगळीत मिटले व्रण पाकळीचे
गोठली कळी अन कोम्ब पेटत होता.

तुटले कुणाचे बोलणे कुणाशी
उरला पोरका अन शब्द झेलत होता.

उभा सावलीचा भास दाराशी
थकलेली आस अन दिवस टेकत होता.


Mankya
Tuesday, February 06, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग ... मला गझलेतलं काही कळत नाही पण ... तु जे लिहिलेस ते मात्र अप्रतिम हं ! शेवटचा शेर ( शेरच ना ? ) खुप आवडला !

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators