Niru_kul
| |
| Monday, February 05, 2007 - 6:41 am: |
| 
|
मी वाट तुझी पाहतो... तू येणार नसतेस तरीही, मन तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन थांबलेलं असतं... आणि पुन्हा एकदा माझं ह्रदय, तुझ्या आठवणींच्या कट्ट्यावर जाऊन बसतं... वेळ सरत असते.... मन मात्र थकत नाही.... तुझी वाट पाहण्याशिवाय.... मला काहीच सुचत नाही.... खडे वेचून फेकण्याची.... सवय अजून ताजी असते.... तू वाट बदललीस तरी.... पायधूळ मात्र माझी असते.... मन वाट पहात रहातं.... तू मात्र येत नाहीस.... माझ्या वेदनेला कधी.... तू जाणून घेत नाहीस.... तरीही मी तिथेच बसतो.... सूर्य अस्ताला जाई पर्यंत.... पावलं मग घरी वळवतो.... अंधार घराशी येई पर्यंत... आणि रात्रभर मग मी.. तुझ्या स्वप्नांच्या आधीन राहतो.... सकाळी पुन्हा नेहमीच्या जागी.. मी वाट तुझी पाहतो....
|
निरु मस्तंच लिहिलंय अगदी. छान.
|
Imtushar
| |
| Monday, February 05, 2007 - 6:50 am: |
| 
|
कलला रवि जरासा वाराही मंद झाला मरणाची वाट बघणे आता हा छंद झाला रचता चिता स्वत:ची मी हासलो जरासा कुणास ठाउक कसला मजला आनंद झाला स्वागतास त्याच्या मी लावल्या पताका पाहून मजकडे तो मृत्यूही धुंद झाला या शेवटच्या प्रवासा घेता निरोप त्यांचा थरारले मन का पण आवाज बुलंद झाला अनोळखी घरातुन आपलीशी साद आली आशेने मागे वळलो पण दरवाजा बंद झाला --तुषार
|
Manas6
| |
| Monday, February 05, 2007 - 9:24 am: |
| 
|
तुषार, अतिशय प्रभावी कविता!! आवडली!!
|
वैभव अभिनंदन... अश्वीनी आणि स्वातीच्या प्रतीक्रिया मस्तच.. जया मस्तच,दिनेशदांना अनुमोदन, लय अगदी.. (आणि एक शंकापण या वेळी मूड काहिसा बदलाय का? ) पेशवा कविता पटली, नेहमी लिहित जा. मानस ची पण खुप छान आहे.
|
Pulasti
| |
| Monday, February 05, 2007 - 9:41 am: |
| 
|
ही इथे लिंक - http://www.esakal.com/esakal/02042007/056DE2C97B.htm "वेदना शोधे कुणाचे घर पुन्हा" या लेखावर टिचकी मारा.
|
तुषार, कविता छानय रे. अर्थ खूप छान आहेत सगळ्याच कडव्यांचे. खरं तर बरीचशी गझलेच्या वळणावर गेलीय असे वाटतेय. (मला नियम कळत नाहीत त्यातले पण) प्रत्येक कडव्याला स्वतंत्र अर्थ आहे जसा गझलेच्या प्रत्येक शेराला असतो. पण लय कुठेतरी हरवलीय असे वाटते. ती असती तर अजून मजा आली असती. थोडी अजून घोळवली असतीस मनात तर लयीत बसणारे शब्द सापडले असते का बरं? अर्थात आहे ही छान आहेच.
|
Milindaa
| |
| Monday, February 05, 2007 - 10:03 am: |
| 
|
पेशवा, चांगली आहे कविता!
|
Mankya
| |
| Monday, February 05, 2007 - 10:09 am: |
| 
|
पुलस्ति ... लिंकसाठी धन्यवाद ! माणिक !
|
Swaroop
| |
| Monday, February 05, 2007 - 10:43 am: |
| 
|
चिन्नु, पुलस्ती, मीनु आणि तुषार.... अभिप्रायाबद्दल धन्यवाद! स्वाती, ... वैभवसाठीची कविता... मस्तच! पेशवा.... संत भेटला... ग्रेट!
|
Peshawa
| |
| Monday, February 05, 2007 - 12:50 pm: |
| 
|
वैभव तुमचे हर्दिक अभिनन्दन. आपले यश व्रुधिंगत होत राहो ही सदिच्छा!
|
Mankya
| |
| Monday, February 05, 2007 - 1:11 pm: |
| 
|
पेशवा .... कविता वाचायची राहिली होती .. आता वाचली ! अप्रतिम लिहिली आहेस ... ! माणिक !
|
Imtushar
| |
| Monday, February 05, 2007 - 1:27 pm: |
| 
|
मानस, संघमित्रा प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद संघमित्रा, कविता गझलेकडे झुकणारी आहे, परंतु गझलेच्या काटेकोर नियमांमध्ये बसणारी नाही. आणि कवितेच्या लयीबद्दल म्हणाल तर मीही थोडा विचार केला होता, पण लयीसाठी शब्दांची तडजोड होईलसं वाटल्याने नाद सोडला. --तुषार
|
Bee
| |
| Monday, February 05, 2007 - 9:22 pm: |
| 
|
तुषार, तुला इथे बघून खूपच आनंद झाला. तुझ्या सगळ्या कविता अजून मला जशाच्या तशाच आठवतात. खूप पुर्वी म्हणजे जेंव्हा बेटी, शमा, परागकण, सखी, मैत्रेयी, पेशवे हे आणिक बरेच जण इथे लिहित असतं त्यावेळी तुझ्याही कविता इथे अधुनमधुन वाचायला मिळत. आता ह्या यादीतले बरेचशे जण इथे लिहित नाहीत. लिहितात पण नियमितपणा राहिला नाही. मी तुला मध्यंतरी मेल्स देखील लिहिल्या होत्या पण त्याला लिहून आणि उत्तरे न मिळून खूप महिने.. वर्ष लोटलीत. वरील कविता वाचून परत तिच कवितांची धुंदी मनावर निर्माण झाली. तू आता परत एकदा तुझ्या जुन्या कविता इथे लिही आणि इतक्या दिवसात केल्या असतील त्याही इथे टाक.
|
>>> वत्सा तु तु नसावे तु कुणाच्या व्याखेत ओतलेले मेण असावे हे असे असेच असणे असावे... वा पेशवे! स्वरूप, तुमची ' प्रवास' कविता खूप ह्रदयस्पर्शी आहे. एक सुचवू का? पहिल्या भागातच काय सांगायचं ते सांगते ही कविता. पुढे ' म्हणजे नेमकं काय' ते कवितेनंच विशद करू नये. काही अर्थ वाचकासाठी सोडावे. तर जास्त परिणामकारक होईल असं वाटलं मला. बघा पटतं का.
|
Vasant_20
| |
| Tuesday, February 06, 2007 - 12:05 am: |
| 
|
वैभव तुमची साहीत्य संमेलनातिल गझल या बि.बि वर पाठवाल? सर्वानां आनंद होईल. वसंत
|
Imtushar
| |
| Tuesday, February 06, 2007 - 3:27 am: |
| 
|
Bee, I think I was having outdated e-mail id on my maayboli account for quite a while, so might not have received your mails.... Anyway, I have corrected it now. Am returning to maayboli after years...
|
Meenu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 3:31 am: |
| 
|
वैभवची ती गज़ल इथे आहे /hitguj/messages/75/120002.html?1165216721 मलाही असे नाव आहे गज़लचे ..
|
Sakhi_d
| |
| Tuesday, February 06, 2007 - 3:35 am: |
| 
|
तुषार आणि निलू छान आहेत कविता...
|
Smi_dod
| |
| Tuesday, February 06, 2007 - 3:38 am: |
| 
|
वाट!! अजुनही मी ईथेच आहे उभी वाट बघत...सतत ती थकली नजर क्षितिजा कडे स्थिरावलेली तु येशील?... कदाचित नाही त्याने काहीच फ़रक पडणार नाही वाट बघण्याच वरदान? मला मिळालय ते मी असे पर्यन्त तसच असणारे कवचकुंडला सारखं..... अश्वथाम्याच्या जखमेसारखं.... आता तुझ्या येण्या न येण्याने त्यात काही फ़रक पडणार नाही मी ईथेच थांबणार आहे वाट बघत..कल्पांताची स्मि
|