|
मीनु वाळवंट सुरेख.. सारंग तुझी कविता तुझा + ve attitude दाखवते.मस्तच.. वसंत छान प्रयत्न आहे.
|
Shyamli
| |
| Friday, February 02, 2007 - 4:29 am: |
| 
|
पुनम,वैशाली,गणेश(समिप),सारंग,सन्मि,मिल्या,माणिक,किरु,चिन्नु सगळ्यांन्ना खुप खुप धन्यवाद
|
Giriraj
| |
| Friday, February 02, 2007 - 7:49 am: |
| 
|
इकडे नक्की काय झाले?? मला आधी वाटले की भलत्याच BB वर तर नही आलो!
|
गिरी काही न बोलता कविता टाक एक छानशी. मानस सही रे. आणि एकदम गर्जा जयजयकार च्या चालीत म्हणता येतेय की.
|
Sarang23
| |
| Friday, February 02, 2007 - 8:43 am: |
| 
|
सगळ्यांचा आभारी आहे. मानस, सचीन ला खरंच पठव रे! छान आहे कविता! मंडळी भेटू आता पुढच्या महीन्यात. जरा बाहेर गावी जात आहे... सगळ्यांना पुढील लेखनासाठी आधीच शुभेच्छा!
|
Imtushar
| |
| Friday, February 02, 2007 - 8:59 am: |
| 
|
Sarang, have a nice break... (vaibhav shiwaay karmat naahi ka? ;-))
|
श्यामली, ' कारण' छान आहे. सन्मी, ' गाव एकच आहे' अगदी पटलं. सारंग, सुंदर कविता. मानस, मस्तच!! अश्विनी, २००% अनुमोदन.
|
Pulasti
| |
| Friday, February 02, 2007 - 9:56 am: |
| 
|
एक दोन दिवसात पुरेसा वेळ मिळाला नाही. आज सर्व (बहुतेक ) वाचून काढलं. फारच छान कविता वाचायला मिळाल्या. सारंग (वेडा), संघमित्रा (ती येते, गाव), वैभव (वृंदावन), श्यामली (कारण), मीनु (तर, वाळवंट), लोपा (प्रत्येकाजवळ) - तुम्हा सर्वांच्या कविता खूप आवडल्या!! लोपा - "भटक्याच्या" पुनर्रचनेबद्दल धन्यवाद! मीनु, वैभव, श्यामली, भ्रमर - "भटक्या" वरच्या प्रतिक्रियांबद्दल आभार. -- पुलस्ति.
|
मानस, एकदम मस्त कविता रे!
|
Pulasti
| |
| Friday, February 02, 2007 - 11:58 am: |
| 
|
मानस आत्ताच तुझी "तेंडल्या" वाचली. वा!!!!! एकदम धमाल!
|
Manas6
| |
| Friday, February 02, 2007 - 1:04 pm: |
| 
|
मग वाटे डोंगर आयुष्याचा लांघुन जावे तेथे वृंदावन आहे जेथे .. वैभव.. ही आस अमृताची...बढिया! -मानस
|
Pulasti
| |
| Friday, February 02, 2007 - 3:49 pm: |
| 
|
"दुर्दैव" हा सैनिक, याचे दुर्दैव पहा - ऊन-पावसात, बर्फ-चिखल-वाळू तुडवताना याच्या जिवाचे रान होते. बायका-पोरांना कागदावर स्पर्ष करताना...उभ्या राहतात डोळ्यांच्या काठांवर अश्रूंच्या लाटा. बंदुकीपल्याडच्या माणसाचा चेहरा पाहणे सरावाने हा टाळतो तरीही - याचा व्यावसायिक हात थरथरतोच कधीकधी. आपण समजूतदार, हे सर्व समजू शकतो. ...कारण दुनियेच्या दुकानात प्रत्येकजण घेऊन येतो आपापली दु:खांची आणि प्रश्नांची यादी, चालायचंच! पण --- माणुसकीचा इतिहास ठरवणार आहे याच्या जगण्याचा, मरण्याचा आणि मारण्याचाही अर्थ - त्या संगमरवरी राजकारणातल्या मतलबी खलबतांच्या यशापयशावर --- त्याचे काय? हा सैनिक, याचे दुर्दैव पहा. -- पुलस्ति.
|
वा! सुंदर. पुलस्ति, हा आजच्या गज़लमधला पहिला शेर ना?
|
Pulasti
| |
| Friday, February 02, 2007 - 4:58 pm: |
| 
|
अगदी बरोबर स्वाती! हा तो पहिला शेरच. मला तो गझलेच्या चौकटीत उलगडणे जमलेच नाही. म्हणून मुक्तछंदाचा आधार घेतला.
|
Jayavi
| |
| Friday, February 02, 2007 - 11:48 pm: |
| 
|
श्यामली....... अतिशय उच्च गं.... मान गये!! लिहित रहा गं.....!! वैभव, वृंदावन......... सु रे ख!! बास इतकंच मीनू, सगळ्याच कविता खूप आवडल्या गं! मानस.... मस्तच.... लगे रहो संघमित्रा, बर्याच दिवसांनी तुला वाचायला मिळालं गं..... कुठे गायबतेस गं इतकी? लोपा..... तुझ्या सगळ्याच कविता मला मनापासून आवडतात..... ही सुद्धा खूप आवडली अश्विनी.... एकदम पटेश सारंगा....... आवडेश रे!! पुलस्ति....... अप्रतिम!! आता कसं मस्त वाटतंय.... कवितेच्या बीबीवर कविताच चांगल्या वाटतात
|
Shyamli
| |
| Saturday, February 03, 2007 - 12:12 am: |
| 
|
लोपा - "भटक्याच्या" पुनर्रचनेबद्दल धन्यवाद!>>>> लोपा नाही ती संघमित्रा आहे, अश्वीनी, स्वाती,पुलस्ति,जया धन्यवाद दोस्त्स
|
वैभव, वृंदावन सुंदर आहे. तीन तीन ओळींच्या कडव्यांमधे खूप छान लय - नादमयता साधली आहे. आणि पावसाची रासक्रीडेशी सांगड तर अप्रतिम.
|
Dineshvs
| |
| Saturday, February 03, 2007 - 10:55 am: |
| 
|
श्यामली, या सगळ्या गडबडीत तुझी कविता वाचायची राहुन गेली होती, छान आहे. तु शोभा गुर्टुंचे हे गाणे ऐकले आहेस का ? उघडा पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या.
|
Mankya
| |
| Saturday, February 03, 2007 - 11:06 am: |
| 
|
दुर्दैवाने धक्का जाता जाता दिला काय होणार ... मनाचा तोल गेला उरले हतबल शरीर .... फरफटणार्या सावल्या वेदना तर कळपाने दंश करायला धावल्या मनाची ससेहोलपट ... गोठलेल्या संवेदना भावनांचा चिखल .. ठसठसतात फक्त वेदना आशेच्या किरणाभोवती संभ्रमाचे वादळ कोणाकडे पाहू ... असेल आपकर्माचंच फळ एकीकडे मी ... मीच दुसर्या बाजुला खिन्न हसलो .. संघर्ष स्वता : शीच रंगला पुन्हा संकटाच्या कल्पनेनेही थरारलो अखेर ... जीवनाच्या पटावर स्वत : कडूनच हरलो ! माणिक !
|
Jayavi
| |
| Saturday, February 03, 2007 - 11:46 am: |
| 
|
माणिक..... खूप छान व्यक्त झालीये वेदना!
|
|
|