|
Chinnu
| |
| Thursday, February 01, 2007 - 9:49 am: |
| 
|
तुषार कविता ठिके. श्यामली काय लिहु आणि कसं लिहु कळत नाहिये! दु : खात सुख मानणारी तुझी कविता किती जीवांचा आधार बनु शकते हे केवळ कल्पनातीत आहे. मला फार्फार आवडली तुझी कारण. सन्मी, तुझ्या गाव एकच ला सलाम! वस्तुस्थितीवर पडलेलं सुंदर आवरण बाजुला काढुन दाखविणार्या कविता अश्याच उत्तारोत्तर जन्मो आणि नवीन येणार्या तांड्याला रस्ते दाखविणारे दिवे मिळो हीच सदिछ्छा!
|
Meenu
| |
| Thursday, February 01, 2007 - 10:23 am: |
| 
|
मी येऊन गेले मी येऊन गेले.. तुला जाणवलही नसेल कदाचित, मी येऊन गेले.... सकाळी ऊठल्यावर तु आरशात पाहीलस, तेव्हा मीही पहात होते तुझ्याकडे आरशातुन .. तुझ्या लक्षात नसेल आलं .. मी येऊन गेले.... भर दुपारी उन्हात तु झपझप उचलत होतास पावले, तेव्हा तुझ्यामागुन मीच होते धावले .. तुला जाणवलही नसेल कदाचित, मी येऊन गेले.... संधीकाली डोळे मिटुन तु विचार करत होतास, तेव्हा त्यातही मी होतेच की डोकावले .. तेव्हाही कसं नाही लक्षात आलं तुझ्या ? मी येऊन गेले....
|
Meenu
| |
| Thursday, February 01, 2007 - 10:24 am: |
| 
|
तर..? आपल्याच घराचा रस्ता कधी जर आठवावा लागला आपल्याला तर..? आपलीच ओळख कधी जर पटेनाशी झाली आपल्याला तर..? आपलाच गाव कधी जर वाटायला लागला अनोळखी तर..?
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:13 am: |
| 
|
मीनु , तेव्हाही कसं नाही लक्षात आलं तुझ्या ? ... खुप बोलकी कविता आहे गं ! तर .. कमी शब्दात जबरदस्त अर्थ तुझी खासियत आहे ती ! माणिक !
|
Imtushar
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:33 am: |
| 
|
मीनू 'तर?...' छानच खरंच ना असं झालं तर काय होईल ना? खूपच विचार करायला लावणारी कविता आहे...
|
Meenu
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:15 pm: |
| 
|
वाळवंट रुक्ष वैराण वाळवंट... नजरेला सुखवायला, मृगजळाचा आभासही नाहीये दुरपर्यंत.. इथे आणि हालचालीतला संथपणा तोही तसाच.. भरभर पाय उचलायची सोय नाहीये इथे.. जरा जास्त जोर लावला, तर अजुनच रुतत जातो पाय या तापलेल्या वाळुत. सहन होईनासा चटका वाळुचा डोळ्यातही मागमुस नाहीये पाण्याचा रुक्ष वैराण वाळवंट...
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:28 pm: |
| 
|
डोळ्यातही मागमुस नाहीये पाण्याचा खुपच सुंदर मीनु ...! माणिक !
|
Sarang23
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:34 pm: |
| 
|
मिनू, वाळवंटाची concept छान आहे!
|
Ashwini
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:36 pm: |
| 
|
वैभव, वृंदावन उच्च आहे.
|
Sarang23
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:40 pm: |
| 
|
ध्येय नवीन वाट शोधुनी खुशाल जा पुढे विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे मधेच सागरात शीड फाटले जरी खुळे प्रयास वादळात आटले जरी नवीन श्वास घेउनी खुशाल जा पुढे विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे प्रलोभनात पाडतील ही सुखे जरी सदैव हात जोडतील ऐहिके तरी क्षणैक मोह टाळुनी खुशाल जा पुढे विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे रणात श्वास थांबलेच आजला जरी तुला न ध्येय साधलेच आजला तरी नवा विचार ठेवुनी खुशाल जा पुढे विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे सारंग
|
Ashwini
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:46 pm: |
| 
|
उत्तम कविता लिहीण्यासाठी केवळ शब्दांचं वैभव पुरेसं होत नाही ते तर तुझ्याकडे आहेच कितीतरी अधिक, प्रस्थापितांपेक्षाही त्यापेक्षा वेगळं, मनाला भुरळ घालणारं असं काय घेऊन येते तुझी कविता? की जी येताच सारं स्तब्ध होतं अन तुटूच नये असं वाटतं ही शांतता सरसर सुटणारे बाणांचे वर्षाव शब्दांनी घेतलेले मनांचे वेध ते अवघं लुप्त होऊन जातं अन तुझी कविताच सारं व्यापून जाते सांग ना वैभव, कवितेच्या प्रत्येक शब्दागणिक वाचणार्यालाच भूल घालण्याची ही संमोहनविद्या, तू कुठे शिकलास?
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:59 pm: |
| 
|
सारंगा .... तु ध्येय गाठलंस तर ! मस्तच ! अश्विनी .... छानच लिहिलस ! " वैभव " च नावहि लिहिलं तरी कविता होते कि ! व्वा ! माणिक !
|
मीनू 'मी येउन गेले' मस्त आहे गं. सारंग खूपच छान. खूप दिसांनी अशी ठाम कविता आली असावी इथे. अश्विनी कविता झकास आणि त्यातल्या मतांशी सहमत.
|
Manas6
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:13 pm: |
| 
|
आपल्या प्रिय तेंडल्यास धडाकेबाज पुनरागमनाबद्दल अनेक शुभेच्छांसह ! ------------------------------------------------ तेंडल्या, हाण पुन्हा षटकार! हवा अम्हाला धावांचा रे, पाऊस मुस्सळधार, तेंडल्या, हाण पुन्हा षटकार! शेन वार्नला, 'संताजी' तू, शोएब साठी 'धनाजीच' तू, भल्या-भल्यांची झोप उडविशी, असा भीम-संचार, तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!- १ कितीक विक्रम तुवा मोडिले, खिजगणतीत ना तुझ्या राहिले, दुमदुमतो बघ क्रिकेट-जगती, तुझाच जयजयकार, तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!-२ कोटी दिलांची असशी धडकन, क्रिकेटचा तु खराच 'अर्जुन', म्हणुनी सारे म्हणती तुज- संघाचा तारणहार, तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!-३ अनंत गौरव तुला लाभती, गर्व ना परी तुझिया चित्ती, गौरवासही वाटे हेवा, असा तु पुरस्कार, तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!-४ -मानस६
|
Kedarjoshi
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:32 pm: |
| 
|
लै भारी मानस. लगे रहो.
|
Vasant_20
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:35 pm: |
| 
|
आमच जीवन अस खडतरलेल, इवल्यश्या स्वप्नासाठी आसुसलेल, काळ्या आईची आम्ही लेकर, तुटक्या घरट्यतली पाखर, जन्मोजन्म चाले चाकरी, तरी पोटा या न भाकरी, कष्टाच जीवन पाचीलाच पुजलेल, अडाणीपणाच गालबोट लागलेल, कर्जाच ओझ पिढ्यानी यायच, सावरायच्या आत घर पसरलेल असायच डोळ्यातली स्वप्न डोळ्यातच रहायची, अनावर झाली की थेंबांनी गळायची
|
व्वा!!! एकाहून एक कविता आहेत सर्वांच्या. सारंग "ध्येय" खूपच आवडलं. मीनु "तर"विचार करायला लावतोय. मस्तंय. अश्विनी .... छान लिहिलस गं. मानस मस्तं. वसंत सुरेख लिहिलंस.
|
Farend
| |
| Friday, February 02, 2007 - 12:28 am: |
| 
|
मानस, आवडली, आता एक दादा वर येऊदे
|
आयुष्य आयुष्य कसं असतं? दु:खांनी व्यापलेलं असंत का सुखांनी भरलेलं असंत? आयुष्य कसं असतं? श्रीमंतांनी उपभोगलेलं असंत का गरीबांनी भोगलेलं असंत? आयुष्य कसं असतं? मित्राला शत्रु मानलेलं असंत का शत्रुला मित्र मानलेलं असंत? आयुष्य कसं असतं? अपयश आलेलं असंत का यश आणलेलं असंत आयुष्य कसं असतं? दिव्यात ज्योत बनून पेटलेलं असंत का कापुर म्हणून जळालेलं असंत? आयुष्य कसं असतं? आई-वडिलांसाठी जगलेलं असंत का प्रियकर्-प्रेयसीसाठी मेलेलं असंत? आयुष्य कसं असतं.........?
|
Imtushar
| |
| Friday, February 02, 2007 - 3:50 am: |
| 
|
सारंग ध्येय छान आहे. मानस, सचिन ला पाठव तुझी कविता... तोही वाचून खुष होईल.
|
|
|