Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 4:42 am: |
| 
|
विचित्र साधे सोपे जगणे जमले नाही हसता हसता रडणे जमले नाही नाती गोती जपता जपता मेलो माणुसघाणे बनणे जमले नाही न्याय मिळाला असता; पण तेंव्हाही- अन्यायाशी लढणे जमले नाही आसक्तीची ओढ अनावर होती असतानाही नसणे जमले नाही विजयाच्या धुंदीत मिसळली भीती लढता लढता हरणे जमले नाही पापाची उरली न जरीही भीती जे केले ते बघणे जमले नाही दुःखाचे स्वागत मजला ना जमले निखळ खळाळत हसणे जमले नाही त्यागाची महती ना कळली आणिक सारंगासम रमणे जमले नाही सारंग
|
शांत सागरा, आज कश्या रे निमूट लाटा? काय आज रे तुझ्या मनी खळबळते आहे?>> hii ol khup aavaDalii maanas.!!!
|
Manas6
| |
| Tuesday, January 30, 2007 - 5:55 am: |
| 
|
धन्यवाद बैरागी आपल्या प्रतिक्रियेबद्दल..पण हा रे शब्द खटकण्यामागचे नेमके कारण विशद झाले तर बरे होईल... गझल लिहिण्याचा असा काही प्रोटोकॉल आहे का?..माझ्या मते हा सागराशी होणारा संवाद आहे तर मग त्यात 'रे' शब्द असल्यास का बरे खटकावा?..कृपया प्रतिसाद द्यावा- मानस ६
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:58 am: |
| 
|
अरे मानस... अतिशय साधी गोष्ट आहे... तो रे दोनदा आला आहे. आणि ती द्विरुक्तीच घातक असते. रे चा वापर खटकत नाहीये त्याची द्विरुक्ती खटकते आहे. आता हाच शेर दुसर्या ओळीत रे ऐवजी ही किंवा ला वापरून वाचलास तर बघ कसा वाटतो. किंवा हा असा... शांत सागरा, आज कश्या रे निमूट लाटा? काय आज हे तुझ्या मनी खळबळते आहे?
|
Bairagee
| |
| Tuesday, January 30, 2007 - 7:27 am: |
| 
|
खोटे बोलणार नाही. पहिल्या वाचनात मला ही गझल विशेष आवडलेली नव्हती. सपाट वाटली होती. (अज़ूनही काही ठिकाणी सपाट आहे.) दुसर्या वाचनात आवडाया लागली. नाती गोती जपता जपता मेलो माणुसघाणे बनणे जमले नाही न्याय मिळाला असता; पण तेंव्हाही- अन्यायाशी लढणे जमले नाही आसक्तीची ओढ अनावर होती असतानाही नसणे जमले नाही ह्या तीन शेरांमुळे. वा! काही शेर सपाट, स्टॅटिक, साचलेले आहेत असे माझे मत. माहिती मिळते. आणि शेर तिथेच संपतो. शेर संपतो तिथून सुरू व्हायला हवा.तुझ्या शेरातली सहजता वाखाणण्याजोगी असते. पण साधे म्हणजे सहज नाही. मानस, सारंगने स्पष्टीकरण दिले आहे. ध. सा.
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 8:03 am: |
| 
|
बैरागी धन्यवाद! मी इतर शेरांवर विचार करतोय... काही वाटलं तर मेल करेन...
|
Devdattag
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:19 am: |
| 
|
सारंग छानच.. एक शेर सुचला यावर चेहरा तो वाटला प्रीय जरीही प्रतिमेला पण वरणे जमले नाही
|
Imtushar
| |
| Wednesday, January 31, 2007 - 4:30 am: |
| 
|
निशा, स्वातीने दिलेल्या लिंकचा उपयोग केलेला दिसत नाहियेस तू. आणि हो... मनी आणि चरणी चे यमक जुळत नाही IMHO, please correct if im wrong
|
Nisha_v
| |
| Wednesday, January 31, 2007 - 4:52 am: |
| 
|
तुशार तु म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. स्वातीने दिलेल्या लिंकचा उपयोग केला पण, तो योग्यरीत्या करता आला नाही. त्या लिंकचा काही मजकुर देत आहे. हा मजकुर वाचून मी ती गजल लिहिली आहे. तु आणि इतरांनी पण मला आणखी मार्गदर्शन करावे. गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते. नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात. जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.
|
Sarang23
| |
| Wednesday, January 31, 2007 - 5:26 am: |
| 
|
हे सगळं ठीक, पण व्याकरणाचे काय? ते ही सांगितले आहे तिथे
|
Nisha_v
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:09 am: |
| 
|
सारंग तुम्ही म्हणताय ते पटलं. पण काही उदाहरण दिले तर मला खूप बरं वाटेल. कुठं काय काय चुकलं आहे ते समजायला सोपं जाईल. धन्यवाद.
|
Pulasti
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:37 am: |
| 
|
निशा, उदाहरणेही त्या लिंकमध्ये दिली आहेत. रदिफ़, काफ़िया, मतला आणि मात्रा (बहर) या चार गोष्टी पाळल्याशिवाय गझल होणार नाही. ही सर्व कसरत करताना कल्पनेतील सच्चेपणा आणि सकसपणाही हरवता कामा नये. प्रत्येक नियम एक आव्हान आहे. मी स्वत:ही प्रचंड चाचपडतो आहे. पण आपण सर्वच गांभीर्याने आणि समजून उमजून प्रयत्न करूया! या BB वरची उदाहरणे हवी असतील तर वैभव, सारंग यांच्या गझला वाचाव्यात.
|
Imtushar
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:12 am: |
| 
|
निशा तू फ़क्त इथे paste केलेला मजकूर वाचून गझल लिहिली असशील, तर मी तुल असे सुचविन की तू ते article पुन्हा आणि पूर्ण वाच. पूर्ण समजून घे. काही गझला वाच त्यात नियम कसे implement केलेले आहेत ते समजावून घे. सुरुवातीला कविता लिही आणि नंतर गझलांकडे वळ. तुषार
|
Sarang23
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:42 am: |
| 
|
निशा... पुलस्ती आणि तुषार यांनी संगितले आहेच की तिथे दिलेली माहिती अतिशय बोलकी आणि परिपुर्ण आहे. गझलेचे सगळे नियम तिथे दिले आहेत. पण तरीही हे तुझ्यासाठी... उदाहरणात वैभवच्या गझलेचा मतला (पहीला शेर) दिला आहे. खरेच रे मना तुझे मनन करायचे किती सदैव कूटप्रश्न ! आकलन करायचे किती इथे खालील गोष्टी पहा... १. करायचे किती हा रदीफ आहे. म्हणजे अंत्ययमक. हा सगळीकडे म्हणजे सगळ्या शेरात आलच (च महत्वाचा) पाहीजे. २.मनन आणि आकलन हे काफ़िये आहेत. म्हणजे यमक. मग सगळीकडे असेच काफ़िये आले पाहीजेत. जसे सहन, जतन वगैरे वगैरे... ३. लन आणि नन अशा शब्दांनी काफ़िया संपतो. म्हणजे ल + अ आणि न + अ... म्हणजे अ ही अलामत झाली आणि ही अलामतही सगळीकडे पाळली गेली पाहीजे. ४. आता शेवटचा महत्त्वाचा नियम म्हणजे वृत्त. वरच्या ओळींमध्ये पहा लघु गुरु क्रम कसा काटेकोरपणे पाळला आहे. लगालगालगालगा... असं. आता या सगळ्या गोष्टी पाळून लिहायच की झाली गझल. त्यात काय! लिहीत रहा म्हणजे सफाईदार लिहीशील. शुभेच्छा!
|
Nisha_v तुमची कविता 'गझल' ह्या सदरात येत नसल्यामुळे खालिल ठिकाणी हलवली आहे. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=915363#POST915363
|
सारंग, न्याय मिळाला असता; पण तेंव्हाही- अन्यायाशी लढणे जमले नाही पापाची उरली न जरीही भीती जे केले ते बघणे जमले नाही दुःखाचे स्वागत मजला ना जमले निखळ खळाळत हसणे जमले नाही हे शेर कळले आणि अर्थ जो मला समजला तो चांगला आहे. काही प्रश्न : १. मतल्यात साधं सोपं जगण्याचा आणि हसता हसता रडण्याचा काय संबंध? २. विजयाच्या धुंदीत कसली भीती? ( बहुधा यशाचा आनंद निखळ नाही हे कळूनसुद्धा त्याला जाणून बुजून हरणं हा पर्याय नव्हता.. असं म्हणायचं असावं.) ३. मक्त्यातही त्यागाची महती कळली नाही हे चूक वाटतं. बहुधा तुला ( बाकी रचनेचा सूर पहाता) आसक्तीही साधली नाही आणि विरक्तीही असं म्हणायचंय. मग महती कळली आहे, पण कृती साधली नाही असं यायला हवं. ४. नाती गोती च्या शेरातही तसंच झालंय. नाती त्रासदायक झाली तरीही तोडता आली नाहीत असा अर्थ अभिप्रेत असावा, पण तसा आलेला नाही. ५. आसक्तीची ओढ अनावर म्हणजे काय? आसक्ती म्हणजेच अनावर ओढ ना? आणि असताना नसणे जमले नाही म्हणजे काय? तसा प्रयत्न होता का? असून नसणं असं प्रयत्नपूर्वक असतं का? एकूण गोषवारा : या गज़लमधे कुठल्याच शेरात अपेक्षित विरोधाभास म्हणावा तसा प्रभावीपणे आलेला नाही, किंवा मग मला नीट अर्थच कळलेला नाही. मेलवर सांगितलास तरी चालेल. इथे लिहीलास तर सगळ्यांनाच कळेल.
|
Bairagee
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:09 pm: |
| 
|
स्वाती, विरोधाभासामुळे लगेच दाद वसूल होते हे खरे. पण गझलेत विरोधाभास किंवा paradox हवाच, असे बंधन स्वत:वर लादू नये. खालच्या ओळीत पाशवी आले आहे ना मग वर मानवी हवे. वरच्या ओळीत फूल आहे ना मग खाली काटे हवे, असे बर्याच कविमित्रांना वाटते. माझ्यामते विरोधाभासासाठी विरोधाभास नकोच. अशावेळी शेर cliched होण्याचा धोका असतो.शिवाय विरोधाभास चपखल नसला तर मजाही येत नाही. असो, आसक्तीबाबत सहमत.
|
सगळे वाचले नाहीये. हळूहळू वाचेन. मानस आज फुलांची भाषा.. खूपच छान. पुलस्ति जळमटे आवडली सारंग मस्त रे.
|
Nisha_v
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:32 am: |
| 
|
पुलस्ति, तुशार, सारंग तुमच्या सर्वाचे धन्यवाद.
|
सारंग .. गझल च्या बाबतीत बराचसा स्वाती आणि बैरागींशी सहमत. काही शेरांमध्ये सपाट वाटते . अजून थोडं काम हवं होतं असं वाटत राहिलं . बाकी विरोधाभासाबद्दल मला वाटतं बैरागी ... स्वातीला तसं म्हणायचं नाहीये . म्हणजे मला तिच्या पोस्ट वरून जे कळतंय ते असं की सारंग ला जिथे जिथे विरोधाभास अपेक्षित आहे तिथे तो तितका प्रभावीपणे आलेला नाहीये , in other words तुमच्या पोस्टप्रमाणे की बर्याच शेरात सपाट वाटते गझल. मला वाटतं फक्त विरोधाभास आणि हमखास दाद घेणारे शेर म्हणजे गझल असा कुणाचा समज नसावा . स्वातीसारख्या गझलकाराचा तर नाहीच नाही. बाकी आसक्ती आणि ओढ मध्ये द्विरुक्ती आलीय हे खरंय
|