मी निघालो घरुन सांच्यापारी रस्त्यावर दिसली एक पोरगी भारी मी तर खूपच "चालू" तिला म्हणालो, "वा! छान दिसतोय शालू" मी तर गेलेली केस तिचे हळूच ओढले केस तिने जोराची माझ्या कानफाड्यात मारली झापड बाजूच्या लोकांना वाटलं कोणतरी खातोय पापड मी म्हणालो, "अगं ये भवाने, औदसे मारायला काय झालयं" ति म्हणाली, "तिकडे बघ! माझ्या भावाच्या रुपानं तुझं मरण आलय" मी म्हणालो, "ये तुझ्या भावाला घाबरत नाही पण, आता काम आहे म्हणून जातोय" ति म्हणाली, "अरे राजा थांब कि आता माझा भाऊ तुला कुठं खातोय" ये आता थांबत नाही अपुन को बहोत काम है ह्या येरीयात अपुन का बहोत नाम है ति म्हणाली, "अरे आता का झाली घाई?" मी म्हणालो, "ये मला सोड गं बाई" मी म्हणालो, "आता नको थांबवू मला... जावू दे" ति म्हणाली, "अरे थांब. माझ्या भावाला हे नाटक पाहू दे" मी म्हणत होतो,"ये सोड मला सोड मला..." ति म्हणत होती,"दादा मोड त्याला मोड त्याला..."
|
का नाही मोडला दादाने??? त्याला सुपारीच द्यायला हवी!
|
त्याला सुपारीच द्यायला हवी!>>>> भ्रमर ... ... ... ... ...
|
धन्यवाद भ्रमर, लोपा. मग कधी देताय सुपारी. तुमच्या आग्रहच असेल तर मी सुपारी घेतो पण, खाणार नाही. कारण, मी पान, सुपारी काहीच खात नाही. हो पण सुपारी जपुन ठेवेन तुमची आठवण म्हणून.
|
Psg
| |
| Wednesday, January 24, 2007 - 4:15 am: |
| 
|
तिर्थे, अक्षरश: काहीच्या काही कविता आहे हो! बीबीच्या नावाला जागलात! डोक्याला हात लावलेली smiley आहे का इथे?
|
श्री तीर्थे... भ्रमर ने जो सुपारी देणे हा शब्द वापरलाय ना त्याचा अर्थ प्रत्येक मराठी भाषिकाला कळेल (पण त्याचाहि अर्थ तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही.) आणि मी भ्रमरच्या sence of humour ला दाद दिली. तुम्हाला काहिही म्हटलेले नाही. पूनम lol
|
Shyamli
| |
| Wednesday, January 24, 2007 - 4:34 am: |
| 
|
पुनम तयार करावी लागेल पण आता
|
तिर्थे,महान आहेत हो तुमच्या कविता.. कसल्या एकाहून एक भारी `इनोदी' कविता आहेत.. त्या कविता bb वरच्या कविता आणि झुळुक वरच्या झुळुकाही इथेच आणा की.
|
Nisha_v
| |
| Wednesday, January 24, 2007 - 9:22 am: |
| 
|
नाटक पुनवेच्या रात्री नाटक होत दोन पात्री... शेजारच्या प्रेक्षकांनी दिली दाद.... वाह!!! वा!!! त्याचा आणि माझा रंगला वाद आज भांडण्यासाठी निमीत्तच नव्हते निमीत्त शोधण्यासाठी भांडण होते निमीत्त सापडत नव्हतं म्हणून पूर्वीचच निमीत्त उकरुन काढलं त्याच्या सोबतचं भांडण जास्तंच वाढलं तो म्हणाला,"कारल्याच्या भाजीत होत्या आळ्या" शेजारच्या प्रेक्षकांनी वाजवल्या जोराच्या टाळ्या मी म्हणाले, "अहो, बाजारातून भाजी आणली कोणी?... तुम्ही जेवणाची घाई केली कोणी?... तुम्ही भाजी चिरत असताना माझं तोंड कडू केलं कोणी?... तुम्ही मग, आता ओरडायचं नाही हं! हा वाद काढूनी... तुम्ही समजलं का?" मध्य रात्रीचे दोन वाजले प्रेक्षकही नाहीसे झाले दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा भांडण जागे झाले
|
Anupama
| |
| Wednesday, January 24, 2007 - 4:24 pm: |
| 
|
झुळुक आणि कविता bb वरील काही नवकवींकडून प्रेरणा घेऊन सिगारेट सारख्या ज्वलंत विषयावर... इकडे सोडू धुर की तिकडे सोडू कुठेही सोड पण आमच्यावर नको सोडू........
|
झुळुकेवर टाकु की काहीच्या.. मधे टाकु? कुठेही टाक बाबा काढुन ठेवलय डोकु! ही तर चालेलच ईथे
|
Sarang23
| |
| Thursday, January 25, 2007 - 7:43 am: |
| 
|
भ्रमर... डोकू काय... ह. ह. पु. वा.
|
Gajanan1
| |
| Friday, January 26, 2007 - 12:33 am: |
| 
|
टाक बाबा टाक इथेच कविता टाक टाक नको शाई नको. आता टायपूनच टाक. टाक बाबा टाक इथेच कविता टाक. ऐकवण्यासाठी हक्काचे 'हितगुज' नको मारू शेजार्याना हाक. टाक बाबा टाक इथेच कविता टाक वाचणारा अण्डे फ़ेकणार नाही, तू बिन्धास्त होऊन टाक.
|
सहीच मजा चाललीये ईथे! आता एवढे वाचुन तरी सगळे "नवकवी" आपल्या भारंभार कवितांना जरा आवर घालतील अशी आशा करुया.
|
Kalpak
| |
| Friday, January 26, 2007 - 11:48 pm: |
| 
|
वाऱ्या वरची वरात मधून चोरलेले काही डायलाग इथे मोडतोड करुन देत् आहोत. इथले काही(च्याकाही) कवि खुपच आहेत विनोदी(?) म्हणून सर्व वाचकांना विनंती त्यांच्या प्रत्येक शब्दाला हसून त्यांना दाखवावी सहानुभुती
|
Mankya
| |
| Tuesday, January 30, 2007 - 1:33 pm: |
| 
|
सुखांमागे धावताना मित्रांनो विवेक गहाण पडतो विकारांचा मनात प्रवेश कशाला आम्हा स्मरतो आरश्यात बघुन किती दिवस होऊन गेले पण खरं सांगु आता आरश्यात बघायलाहि न धजतो नजरेत सदा असते ध्येय पळतो .... बेभान पळतो समाधानच नसले तर राव पळण्याला अर्थच काय ऊरतो ' अर्था ' पुरते जगतो आम्ही ' अर्था ' साठी मरतो उदरासाठी सगळी उरस्फोड जीवनात कशाचा मग 'राम' राहतो खुप लांब आलो आहे थोडसं माग वळुन पाहतो कमावले गमावल्याचा हिशेब करता नयनी अश्रुंचा पाट वाहतो जगासाठी समर्थपणे नैतिकतेची धुरा वाहतो त्रयस्थपणे स्वत : कडे अपराधी म्हणुनच पाहतो तेंव्हाहि न कळले होते आताहि न अर्थ लागतो कशासाठी जगतो आम्ही कशाला माणसात राहतो ! माणिक ! मार्गदर्शन अपेक्षीत !
|
Gajanan1
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:28 am: |
| 
|
मार्गदर्शन अपेक्षित?... तुमची कविताच अनपेक्षितपणे मार्गदर्शक म्हणून सर्वान्च्या समोर आली आहे!!!
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:38 am: |
| 
|
आभार गजानन ! फक्त तेवढं " तुमची " खटकलं, " तुझी " बरं वाटेल ! माणिक !
|
एक अशीच सुचलेली कल्पना ... माघ - गणपतीचा महिना म्हणून टाकतोय
|
खेळणं बालगणेश एकदा पाळण्यात रडू लागे काळजीने लेकुराच्या उमा महेशही जागे जरी दिला किती झोका रडू थांबता थांबेना कुशीमधे आईच्याही बाळ राहता राहीना रागे भरून पाहीले प्रेम करून पाहीले दूध पाजून पाहीले वाद्य वाजून पाहीले शिवलोकात गोंधळ सारे देव धावू आले जो तो सुचवे काहीसे सारे उपाय थकले ब्रम्ह देवाला सुचली एक कल्पना नवीन पाळण्याच्या मधोमध एक टांगलं खेळणं खेळण्याच्या केंद्रभागी सूर्य फेकतो प्रकाश ग्रह फिरती भोवती सारे व्यापती आकाश रंगीबेरंगी गोलांचा खेळ आवडला खूप झाली रडणारी स्वारी एकाएकी चिडीचूप फिरु लागता खेळणं हसू आले गणेशाला रिझवण्या बाल मन खेळ झाली सूर्यमाला ~ प्रसाद
|