Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 01, 2007 « Previous Next »

Imtushar
Thursday, February 01, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव च्या अगदी म्हणजे अगदीच अप्रतिम कवितेनंतर लिहिण्याचे धाडस करत आहे


त्या क्षणास मजला केवळ
इतकेच समजले होते
त्या क्षणात एका माझे
भान हरपले होते

बघताच तुला बावरते
हलकेच पदर सावरते
आरक्त गाल का होती
हे गूढ उकलले होते

तो स्पर्श तुझा जादूई
अन् कटाक्ष होता जहरी
मला न कळले केव्हा
मी मिठीत शिरले होते

आकंठ सुखात बुडाले
जन्माचे सार्थक झाले
या अधरांवरती जेंव्हा
तू ओठ टेकले होते

--तुषार


Shyamli
Thursday, February 01, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण

पटकन कोरडी पडणारी जखम
नकोशी वाटायला लागते,
जेंव्हा
भळभळणार्‍या जखमेचीच सवय करुन दीलेली असते
मग खपली धरत असली तरी,
खरवडुन काढावीशी वाटते,
आणि त्यातुन निघणारी कळसुध्दा देउन जाते
एक अघोरी आनंद...
चला बर झालं
वाहती झाली जखम परत
आता नवीन खपली धरेपर्यंत
काळजी नाही काहिच,
दु:ख करायला आहे काहीतरी
कारण आता.

श्यामली


Princess
Thursday, February 01, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली.... जबरदस्त... "एक अघोरी आनंद देणारी कळ"...उफ़्फ़

Lopamudraa
Thursday, February 01, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग वाटे डोंगर आयुष्याचा
लांघुन जावे तेथे>>. mastay vaibhav..
दु:ख करायला आहे काहीतरी
कारण आता.>>. hmm vaa shyaamalii..


Ganesh_kulkarni
Thursday, February 01, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीजी सलाम तुमच्या"कारण"कविते ला!
मला वाटतं ही 'एक जखम सुगंधी' आहे!
मला खुप खुप भावली ही"कारण " कविता!
मनातल्या दु:खानां क्षणभर "कारण " भेटल्या सारखे वाटले!
आशाच मनाला स्पर्श करणार्‍या कवितेची मी वाट पाहतो आहे!
गणेश(समीप)




Sarang23
Thursday, February 01, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा झकास रे!
स्वाती, कविता आवडली...
मिनू, तुझी सरळ सरळ भांडण्याची तयारी असेल तरी माझी नाही. तितका मला वेळ नाही.

तुषार छान आहे रे!

श्यामली छान!

वैभव... :-(

मला जे दाखवायचं होतं ते मी दाखवलं नाही का? सरळ सरळ वाद न घालूनही यांना माझे शब्द कसे लागले याचा विचार कर.
हे मी कोणालाही उद्देशून, उल्लेखून न लिहूनही जर इतकं लागत असेल तर मग ज्यांचा सरळ सरळ अपमान (यात माझाही केला गेला हे नक्कीच विसरू नये. मात्रा मोजायचा धंदा याचसाठी बंद केला होता मी... असे अनेक...) त्यांना काय वाटत असेल?

इतका चांगला मुद्दा मांडूनही जर कळत नसेल तर बोलणंच खुंटलं... टीकेचा धनी तोच जो चांगलं आणि प्रांजळ मत देतो. एवढं कळलं हेच खूप आहे.

सगळ्यांचा आभारी आहे या नेत्रांजनाबद्दल!


Naveen
Thursday, February 01, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव जोशी तुम्ही असं मायबोलीला आणि आम्हाला सोडून गावाला जाऊ नका. आणि गेलात तरी तिथून तुमच्या कविता post करा.

धन्यवाद. तुम्हाला दगड कवितेतला संदेश आवडल्याबद्दल.

माझ्या पूर्वीच्या कवितेतलं प्रत्येक कडवं हे मागे काहीतरी घडलं आहे हेच सांगतय...मान्य आहे. म्हणून मी तुम्हाला दुसर्‍या एका पोस्त मध्ये लिहिलं होतं कि,"तुम्ही मागचे अर्चिवे वाचल्यावर तुमच्या सर्व शंका दुर होतील" जर तुमच्या जागी मी असलो असतो तर मलाही तेच प्रश्न पडले असते जे तुम्हाला पडले. असो.

पूनम ताई तुम्ही माझं नाव न लिहिता जे काही लिहिलं आहे ते कळलं. धन्यवाद.

कोण जाणे मला असं का वाटतं कि,"काहीजणांना कशाचा तरी अहंकार आहे" कदाचित माझा तो भास असेल. क्षमा असावी.

एक लिहायचं राहून गेलं.
मीपण गावाला जाणार आहे... नेहमीसाठीच. असो.

लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा आज ह्या गाण्याची खूप आठवण येतेय.

ईथे प्रत्येकाने सुंदर कविता लिहिल्या आहेत. सर्वांचे मनापासून अभिनंदन.

खाली "अहंकार" आणि "विनंती" नावाच्या दोन कविता
post करतोय. शेवटच्या.

Naveen
Thursday, February 01, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहंकार

कोकिळेला तिच्या आवाजाचा अहंकार
बिचारा कावळा घेतो माघार
हत्तीला त्याच्या शरीराचा अहंकार
बिचारा सिंह घेतो माघार
सापाला त्याच्या विषाचा अहंकार
बिचारा विंचु घेतो माघार
मोराला त्याच्या पिसांचा अहंकार
बिचारा लांडोर घेतो माघार
सुर्याला त्याच्या तेजाचा अहंकार
बिचारा चंद्र घेतो माघार
समुद्राला त्याच्या विशालतेचा अहंकार
बिचारी नदी घेते माघार
श्रीमंतांना त्यांच्या श्रीमंतीचा अहंकार
मनाने श्रीमंत असणारा गरीब घेतो माघार
अहंकाराने काहीजण आंधळे झाले
सदाचार कुठंतरी विसरून आले


Naveen
Thursday, February 01, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनंती

कुणीतरी थांबवा रे हा वाद
करतो तुम्हाला विनंती...
दिशा सोडून आज
कुठे चालली ही भटकंती

रोजच का लागते ईथे ग्रहण
सांगा कुणीतरी
आपल्यात वाढलेली
बुजवा रे ही दरी
करतो तुम्हाला विनंती...

तीळ-तीळ प्राण जातोय
हे हाल पाहूनी
तुम्ही विजवा ही आग
आनंदाचे अश्रु वाहूनी
करतो तुम्हाला विनंती...

माझी शपथ आहे तुम्हाला
विसरा मागचे सारे
नवचैत्यन्याचे येतील
पुन्हा वारे.....!
करतो तुम्हाला विनंती...

आपण सर्व एकच आहोत
जसे माळेतले मणी
माझी प्रार्थना तु तरी ऐक देवा
मस्तक ठेवतो तुझ्या चरणी
करतो तुम्हाला विनंती...


Meenu
Thursday, February 01, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन इतकं काही निराश होण्याची गरज नाहीये. आणि इतकं निराश होण्याचं कारणही नाहीये. हे तात्विक वाद होतील होतच राहतील म्हणुन तुम्ही कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही इथुन जावं म्हणुन नाही चाल्लय हे भांडण. so keep writing ... All the best !!

Sanghamitra
Thursday, February 01, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव छान आहे कविता.
तुषार छान जमलेय. दुसरे कडवे आवडले.
फक्त दुसर्‍या आणि चौथ्या कडव्यात जी लय साधलीय ती तिसर्‍यात नाहीये. चुभूद्याघ्या.
श्यामली तुझ्या आत्तापर्यंत मी वाचलेल्या कवितांत ही सगळ्यात आवडली. एकदम जमून गेलीय.


Sarang23
Thursday, February 01, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मी कुणाच्याही बाजूने भांडत नाहीये. भांडण नाहीच मुळी. तात्वीक चर्चा म्हणायला हवं. जो तो समर्थ असतो भांडायला. मी माझ्या तत्वांच्या बाजूने बोललोय... पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. किमान कुठे हेकेखोरीने मतांचा गळेमारूपणा केला नाही मी, याचाच मला आनंद आहे. तरीही कुठे भाषा चुकली असेल तर समस्त मायबोलीकरांची माफी मागतो.
यात कसला आलाय अहम?


Sanghamitra
Thursday, February 01, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्वतः केलेल्या कचर्‍याकडे डोळेझाक करणारं,
आन् रस्त्यांवरच्या खड्ड्यांना शिव्यांनी भरणारं,
गाव एकच आहे.

चिमुरडीवरचा अत्याचार निमूटपणे पहाणारं,
अन् शिल्पाच्या बाजूने ठाम उभं रहाणारं,
गाव एकच आहे.

प्लॅटफॉर्मवरच्या प्रेताला वळसा घालून जाणारं,
अन् सव्वीस जुलैच्या पाण्यामधे हातात हात देणारं,
गाव एकच आहे.

रस्त्यावरच्या कुत्र्यांना रोज अन्न वाढणारं,
अन् शिक्षण असून अनेक दिवस अर्धपोटी काढणारं,
गाव एकच आहे.

पुलाखाली, फुटपाथवर तासंतास झोपणारं,
अन् एसीच्या गारव्यातही तासात झोप आटोपणारं,
गाव एकच आहे.

नेत्यांच्या नावाने रोज बोटं मोडणारं,
अन् मतदानाच्या दिवशी, घरी झोपा काढणारं,
गाव एकच आहे.


Milya
Thursday, February 01, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे कवितेचा जन्म छानच..., गाव एकच आहे थीक आहे

लोपा, देवा तुमच्या कविता पण सुरेख....

श्यामली : कारण मस्त..

तुषार : छान लय आहे कवितेला

वैभवा वृंदावन अप्रतिम... as usual

आणि आता तात्विक वाद पुरे करा बर का.. नाहीतर मग मी पण कविता लिहेन इथे...

आणि ही पोकळ धमकी नाही


देत नाही आम्ही केवळ पोकळ धमकी
सुरु करु वाजवायला कवितेची टिमकी



Kiru
Thursday, February 01, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच सन्मे..
कविता आवडली..

हळुवार कविता लिहिणारं,
अन जहाल वाद (चर्चा??) घालणारं,
गांव एकच आहे.



Mankya
Thursday, February 01, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार .... मस्तच रे !

कारण .... श्यामली काय बोलायचं .... अप्रतिम !

sangmitra.... चित्र उभ राहिलं लगेच .... मस्त !

नविन ..... निराश होऊ नकोस ....
विसरा मागचे सारे
नवचैत्यन्याचे येतील
पुन्हा वारे.....! .... हे आवडलं !

माणिक !






Kiru
Thursday, February 01, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, कविता छान आहे.
श्यामली 'कारण' आवडली.


Niru_kul
Thursday, February 01, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मौन आता सखे मी पाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....
भावना मनाच्या मी जाळतो....

तू येणार नसतेस तरीही,
तुझी वाट पाहूनी कंटाळतो....

ठरवले तुला मी विसरायचे,
तुझ्या आठवांशी रेंगाळतो....

घाव ह्रदयाचा दाबून मी,
वेदना उराशी सांभाळतो....

होते वृष्टी अशी नयनांतूनी,
पुन्हा भिजूनी, पुन्हा वाळतो....

मनाच्या व्यथेची मला काळजी,
म्हणुनी तुला पाहणे टाळतो....

भोगतो कशाला अशा यातना,
नशीबाच्या रेखा मी चाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....
भावना मनाच्या मी जाळतो....


Chinnu
Thursday, February 01, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली देवाच्या आठवणी छाने. तो इथे येत नाही म्हणुन आठवणी येतात वाटतं. :-)
नवीन दगड जमलीये. तुमच्या कविता पाहता मला असे वाटते की तुम्हाला उपरोधिकरित्या सत्य मांडायला आवडते कवितेतुन. लिहीत रहा.
सारंग तुझी कळकळ समजतेय बाबा आम्हा सर्वांना!
मीनु तुझ्या कविता भावस्पर्शी असतात. मुख्य म्हणजे इटुकल्या कवितेत कितीतरी भावार्थ सामावलेला असतो. इछ्छुकांनी नक्किच आर्काईव्ह चाळावेत.
स्वाती जे मत वैभवने मांडलयं ते कौतुक काही अनाठायी नहिये. यु आर जस्ट बिंग मॉडेस्ट!
प्रिन्सेस, तुझी पोस्ट वाचुन बरं वाटलं. तुझ्या शब्द न शब्दाशी सहमत आहे मी. गाठोड्यातुन उत्तम काढुन द्यायची कल्पना मस्त! कविता कुठयं ग तुझी?


Chinnu
Thursday, February 01, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव वृंदावन उत्कट अगदी! कितीतरी दिवसांनी छान शब्द वाचले जसं लावण्यप्रभा, सांय सांय वारा, आयुष्याचा डोंगर! सरीवर येणार्‍या सरी त्या मेघश्यामाच्या गोपसख्याच भासल्या! वाह!!
आणि एक आवडलेली कल्पना म्हणजे सयी मिळुन आल्या. त्या सरी एकमेकांच्या जणु सख्याच वाटल्या तुम्हाला वैभव! यु आर ग्रेट! मंद सुवासिक झुळुक यावी असं वाटलं वृंदावन वाचुन!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators