Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend » Archive through February 01, 2007 « Previous Next »

Shree_tirthe
Wednesday, January 24, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! वा!!! नंदिनीजी सुरेख लिहिलय अगदी.

Nandini2911
Thursday, January 25, 2007 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियाचे वडील.. सुधीर कुलकर्णी म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं. वजनदार व्यक्तिमत्व. आणि प्रभावी डोळे. त्याचा दरारा एवढा मोठा होता की ऑफ़िसात काय पण घरात पण त्याना सगळे घाबरायचे.. अर्थात प्रिया सोडून.
ते आणि आई प्रियाला भेटायला आले होते.
"कसं वाटतय.." प्रियाला आईने विचारलं. दिवसातून एकदाच प्रियाला भेटायला जायचं असा नियम तिला नवर्‍याने घालून दिला होता.
"आहे, अजून जिवंत आहे.." प्रिया रूक्षपणे म्हणाली.
बाबा काहीच बोलले नाहीत. शांतपण खोलीतल्या खुर्चीवर बसून राहिले.
"घरी येशील ना?" आईने घाबरतच विचारलं.
प्रियाने तिखट नजरेने आईकडे पाहिलं.
"असे प्रश्न कशाला विचारतेस. ज्याची उत्तर माहीत आहे." बाबा पहिल्यादा म्हणाले.
प्रियाने घर सोडून जवळ जवळ चार वर्षे झाली होती.
"आई, तू ये थोडे दिवस माझ्याकडे.. तुला जर एवढीच माझी काळजी असेल तर... " ती म्हणाली. बाबा पाठवणार नव्हते हे नक्की होतं. पण तरीही एवढं म्हटलं तरी आईला समाधान मिळालं असतं.
"तू कशाला तिची काळजी करतेस? तिची काळजी घेणारे आहेत तिचे लोक... ते बघून घेतील." बाबा म्हणाले.
"बाबा, तुम्ही अति बोलताय. त्याच्यापैकीच एकाने माझा जीव वाचवला आहे." प्रिया म्हणाली.
"मुली, तू शांत बस बघू... " आई म्हणाली.
"का म्हणून मी शांत बसू? हे स्वत्:ला समजतात कोण? परवा असिफ़ला हवं तसं बोलले. त्याने उलट उत्तर दिलं नाही हा त्याचा सभ्यपणा."
"सभ्यपणा... अगं त्याची जातच मुळी कुत्र्याची... त्याच्याकडून माणूउसपणा मिळणार नाही..."
"बाबा, तुम्हाला कुणालाही असं म्हणायचा हक्क नाहिये. तुम्ही मला भेटायला आला होतात. आता निघालात तरी चालेल."
"प्रिया.... " आई म्हणाली...
"आई, तुम्ही नाही आलात तरी चालेल मला. पण हे असले विखारी शब्द नको मला." प्रिया म्हणाली.
"चल गं.." बाबानी हुकूम सोडला.
"अहो, जरा माझं ऐका.. तिला जरा समजून घ्या.." आईने विनवणी केली.
"काय समजून घ्या. हे बघ, तिला या जगात हवी असलेली प्रत्येक गोश्ट मी दिली आहे पण मुसलमानाबरोबर मला कसलेही संबंध नको म्हणून सांगितलय मी.. आधी तो रेहान आणि आता हा असिफ़. दुसरं कुणी मिळत नाही हिला"
"बाबा, तुम्ही निघा. " प्रिया शांतपणे म्हणाली.
"प्रिया, अगं तू तरी जरा समजूतीने घे. तुम्ही दोघानीही माझं जगणं मुश्किल केलय.." आई म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.
"आणि याला जबाबदार तूच आहेस." प्रियाने आईच्या खांद्यावर हात ठेवला. "मी नंतर फ़ोन करेन तुला... आता नको. गेली सहा वर्षं हाच विषय सुरू आहे. बाबा, मला आता कंटाळा आलाय. तुम्हाला समजावता समजावता मी एक दिवस संपून जाइन तरी तुमचा हेकेखोरपणा जाणार नाही."
"प्रिया, तु काय रंग उधळेस त्या रेहानसोबत ते मला चांगलेच माहित आहे."
प्रियाने एकदा डाव्या हातावरच्या जखमेकडे पाहिलं. "बाबा, dont worry रेहानचं लग्न झालं. त्याच्या आवडत्या मुलीबरोबर. happy? "
तिचा आवाज भरून आला. डोळ्यातल्या अश्रूना ती मोठ्या कष्टाने परतावत होती.
"काय सांगतेस?" आई म्हणाली. तिला जरा बरं वाटलं. पण ही तर वादळाची सुरुवात होती.


Nandini2911
Thursday, January 25, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हो आई, महिन्याभरापूर्वी.." प्रियाने तिचा हात आईसमोर धरल, "आणि ही माझी वेडींग गिफ़्ट.. नाझिया नावाची मुलगी आहे.."

"पाहिलस, प्रेमाची थेरे आमच्या मुलीसोबत आणि लग्न मात्र स्वत्:च्या धर्मातल्या मुलीबरोबर."
"बाबा, विषय संपला ना आता.. अच्छा,,,, म्हणजे तुम्हाला अजून असं वाटतय की मी त्याच्याशी लग्न करेन अशी भिती अजून आहे क तुम्हाला?" प्रिया उपरोधिक स्वरात म्हणाली.
"प्रिया, अगं काय हे बोलणं? तो मुलगा तुझं अयुष्य बरबाद करतोय म्हणून आम्ही सांभाळतोय तुला" आई म्हणाली.

"रेहान माझं आयुष्य बरबाद करतोय? आई, त्याला तेवढा चान्स तरी कुठे दिला तुम्ही? आधी तो वेडा आहे म्हणून आणि नंतर तो मुसलमान आहे म्हणून... कायम त्याला माझ्या आयुष्यातून तुम्ही हाकलतच आलात ना? त्याने एक मेल पाठवलं होतं मला दिल्लीतून.. मिस यु.. लिहिलेलं त्यावर सगळ्यात जास्त गहजब कुणी केला? या.. तुझ्या नवर्‍यानेच ना मला गणपतीच्या पायाची शपथ घ्यायला लावली की मी परत रेहानचं तोंड बघणार नाही म्हणून.. अजून काय हवय तुम्हाला माझ्याकडून?"

"नुसती शपथ घेऊन चालत नाही ती पाळावी लागते." बाबा गरजले.
"मी शपथ पाळली की नाही ते मला माहित आणि गणपतीला.. त्यासाठी तुम्हाला सफ़ाई द्यायची मला गरज नाही.." प्रिया म्हणाली.
"प्रिया, अगं असं बोलू नकोस.." आई म्हणाली,

"बाबा, तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितलय. गेली सहा वर्ष तोच विषय चालू आहे. तुम्हाला समजावता समजावता एके दिवशी मीच संपून जाणार आहे. पण तरी तुमचा हेकेखोरपणा जाणार नाही..
बाबा, मी तुम्हाला परत एकदा निर्लज्जपणे सांगते की माझं रेहानवर प्रेम आहे आणि त्याच्या लग्नामुळे यात काहीही बदल होत नाही.

मला जेव्हा जेव्हा रेहानला भेटावंसं वाटतं तेव्हा मी माझं आयुष्य संपवेन. पण असिफ़ मला मरू देणार नाही आणि मी अशीच तडफ़डत राहेन. आणि माझ्या या अशा जगण्यातून जर तुम्हाला समाधान मिळ्ते. तर असं तडफ़डणं पण मान्य.. "




Rupali_rahul
Thursday, January 25, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, असच पटपट लिहि गं सासु बाई....

Nandini2911
Thursday, January 25, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है..."
प्रिया अत्यंत भसाड्या आवजात गात होती.
रेहान कांदा कापत होता.
"के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये...."
"प्रिया, अब बस भी करो. आस पडोस वाले भाग जायेन्गे.."
"है कौन अपने आस पडोस मे.. ये बंगला इतने जंगल मे जो बनाया है तुमने." प्रिया म्हणाली.
"प्रिया, वो मटर पकाने से पहले खा लोगी तो सब्जी किसकी बनाऊ.." रेहान प्रियाला ओरडला.
तेवढ्यात फ़ोन वाजला. "मी बघते.." प्रिया हॉलमधे आली.
आईचा फ़ोन होता.
"बोल गं," प्रिया म्हणाली.
"कुठे आहेस तु?" आई चिडलेली होती.
"कुठे म्हणजे काय प्रत्येक वीक एंडला असते तिथेच.." प्रिया एकदम casually म्हणाली.
"कहर केलायस तू अगदी. अगं काही नाही तर बापाच्या इज्जतीचा तरी विचार कर. शोभतं का हे वागणं तुला..." आई पुढे अजून पण काहीतरी बोलत होती.
प्रियाने फ़ोन बंद केला. रेहान किचनमधून बाहेर आला.
"कौन था?"
प्रिया काहीच बोलली नाही.
"ओके, मा या बाप" त्याने विचारलं.
"मा" ती म्हणाली.
" cool . तो लंच करे?" त्याने विचारलं.
"रे, मा बहोत गुस्से मे थी... मे बाबा का गुस्सा झेल सकती हू पर मा का नही. She hates me. I cant take it anymore .."
"प्रिया, हर डीसीजन तुम्हारा है, मैने तुम्हे कभी कुछ नही कहा.. ये रिश्ता तुमने बनाया है, और तुम जब चाहो तब तोड सकती हो. मुझे वैसे भी तुम्हारे बगैर जीने की आदत हो गयी है..."
"रे, मै ये रिश्ता नही तोड सकती,, क्युंकी मुझे जीने की आदत हो गयी है.." प्रिया डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.





P_sahasrabudhe
Thursday, January 25, 2007 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या वर एक उत्तम tv serial होउ शकेल.. पाहिजे तो भाग ताणा की १०० episodes तयार...

Chinnu
Thursday, January 25, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी गुंतवुन टाकलेस बाई तु. किती बिजले तरी तुझ्या सिरियलची मात्र हमखास वाट पाहतच असते मी.

Neelu_n
Monday, January 29, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तुझ्या सिरियलची
चिन्नु पण हा डेली सोप नाहिय.. वीकली सोप पण नाहिय.. बहुधा लहरी सोप असेल. आले तर तीन भाग एकदम नाहीतर कृपया प्रतीक्षा किजीए. नंदीनी कंदील घे बघु पण खरच बहुतेक मायबोलीकर्स तुझ्या कथावाचनासाठी एकाच माळेचे मणी झालेयत.:-)

Nandini2911
Tuesday, January 30, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"पाखी, अगं माझं ऐक तरी..."
पलीकडुन फ़ोन बंद झाला. असिफ़ने आपलाच डोक्यावर हात मारून घेतला.
"रेहान, यार हसतोस काय? मदत कर ना.." पण खरंच रेहानला हसू आवरत नव्हतं. असिफ़ सकाळपासून पाखीला फ़ोन करत होता. पण ती त्याचा फ़ोन घेतच नव्हती. शेवटी त्याने रेहानच्या मोबाईलवरून तिला फ़ोन लावला पण आज पाखी ऐकायच्या मूडमधे नव्हती.

रेहान आणि असिफ़ नुकतेच बोलायला लागले होते. यामधे नाझने खूप मध्यस्थी केली होती. तसं रेहानला पण असिफ़शिवाय करमत नसायचंच.

"असिफ़, तिला सारखं फ़ोन करून सतावू नकोस. in fact तिला अजिबात फ़ोन करू नको. "
"रेहान, अब तू मुझे बतायेगा लडकी कैसे पटाते है?"
"नही रे, मै तुमसे लडकी पटाने की बात नही कर रहा हू. बिवी पटाने की बत कर रहा हू..." रेहानने हसत असिफ़च्या पाठीत धपाटा घातला.
"कुछ भी मत बोल, तुझं लग्न झालं म्हणून काय माझं पण लावणार का?" असिफ़ म्हणाला.
"पण पाखीची आणि तुझी जोडी मस्त दिसेल. ती चांद का टुकडा आणि तू खजूर मे अटका... "
" bad idea... ये कैसा लगता है, पाखी सुपरस्टार और मे सुपर बेकार.."
रेहानने हसतच विचारलं ..."कौन बोला?"
"इतना भारी दिमाग है किसका?"
"कौन.... प्रिया?"
"हा. कभी कभी सोचता हू उसके दिमागमे क्या किडे भरे है... कुछ भी बोलती है... सोचने का डीपार्टमेंट ही नही है उसके पास..."
प्रियाचा विषय काढताच रेहान गप्प झाला.
"असिफ़.. मुझे उससे मिलना है...."
" not possible " असिफ़ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"असिफ़, मला तिला बरंच काही विचारायचं आहे. माझ्या बर्याच प्रश्नाची उत्तरे तिच्याजवळ आहेत. ती माझ्या लाईफ़मधे स्वत्: आली. आणि स्वत्: निघून गेली. मला काहीही विचारायला किंवा समजायला चान्स मिळाला नाही. असिफ़ तूच सांग. do i deserve an explaination or not?
"रेहान, I can understand ur problem,. पर फ़िर भी वो तुमसे नही मिलेगी.. at least उसका बाप जिंदा है तब तक तो नही.."





Abhijat
Tuesday, January 30, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज अजून काही भाग (या कथेचे) वाचायला मिळ्तील अशी आशा करू शकतो का?

Zpratibha
Tuesday, January 30, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, अग येऊ दे कि भराभर. आणि शेवट प्रियाला मारुन तर करणार नाहियेस ना?

Sakhi_d
Wednesday, January 31, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी कथा छान आहे पण अजुन पाणि घालू नकोस... आणि जरा पटपट पुर्ण कर.........

आत तर वाटटय Admin ने नियमच केला पाहिजे पुर्ण कथाच पोस्ट करायची..........

अरे किती अंत बघणार....???


Zpratibha
Wednesday, January 31, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि पहिला भाग ७ डिसेंबर,२००६ ला वाचला. आज ३१ जानेवारी,२००७. मला तर बाई चातुर्मासाच्या पारायणाला बसल्यासारख वाटतय.

Anjalisavio
Wednesday, January 31, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निदान हि नंदिनि, कथा नियमित तरी लिहित आहे भले कधी कधी २-३ दिवस काहिच लिहिल नाहि पण काहि लोक तर कथा सुरु करुन असे गायब होतात कि जैसे.........

Nandini2911
Wednesday, January 31, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियाने गाडी पार्क केली आणि ती वाट बघत थांबली. अजून पाच मिनिटे ही झाली नसतील तेवढ्यात एक काळी मारुती येऊन थांबली.

"क्या बात है? आज तू आधी आलीस.." गाडीचा दरवाजा उघडतानाच ऐकू आलं.

"इरफ़ानचाचा, आजकाल हवा बदललेय. बर्याच गोष्टी अशा होणारच." प्रिया हसत म्हणाली.

रेहानचे अब्बा गाडीच्या बाहेर आले.
"बोलो चाचू, आज इस कनीझ को कैसे याद किया...." प्रिया नाटकीपणाने म्हणाली.
"याद तो तुम्हे हम हर वक्त करते है... बस तुमसे मिल नही पाते.." चाचा म्हणाले.
"घराते सगळे कसे आहेत?" तिने विचारलं.
"आहेत मस्त. स्पेशली रेहान, सातव्या आसमानातच असतो तो.." चाचा म्हणाले..
प्रिया काहीच बोलली नाही. "तुझ्या घरात.. सगळं आलबेल ना?" चाचानी विचारलं.
"डोंबलाचं आलबेल... बाबा हल्ली अति करतायत. वर आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचं खूळ घुसलय. जगणंच मुश्किल होत चाललय माझं...."
"प्रिया, तुझा आणि रेहानचा एकच प्रॉब्लेम आहे. You expect too much from life आलेल्या परिस्थितीशी लढण्याची हिंमत तुम्हा दोघातही नाही. आणि म्हणूनच अशी वेळ तुमच्यावर येते."
"चाचा.. मग मी काय करू.. बाबाना मी सगळं खरं सांगितलं की मी आणि रेहान फ़क्त मित्र आहोत तरी त्याचा विश्वास नव्हता. आणि आज जेव्हा मी सांगते की माझं रेहान्वर प्रेम आहे तरी त्याना पटत नाही."
"कारण तुझं सत्य ऐकून घ्यायची त्याच्यात हिंमतच नाही. तो तेच ऐकतो जे त्याला ऐकायचं असतं. आणि मला वाईट वाटतं की तू अशा माणसासाठी एवढं करतीयेस."

"चाचा... तुम्हाला माहित आहे ना. मग तरीही असं का बोलता?"
"माहित आहे? रुही... अडीच वर्षाच्या त्या बाळाला अनाथाश्रमात ठेवत होता तुझा काका... माझी तुला सांभाळायची ऐपत होती. रेहानची अम्मी पण तयार झाली होती पण मग हा माझा मित्र... अभीतक पछताता हू... क्यु मैने बच्ची को उसके हाथ मे दिया... "
प्रिया हसली.
"काय होईल. जेव्हा त्याना कळेल की मी प्रिया नाही.. रुही आहे म्हणून.."
"सांगून टाक त्याला एकदाचं. ही जी नाटकं चालवली आहेत ना ती बंद कर म्हणावं.." चाचा म्हणाले.
"इतकं सोपं आहे का?"
"प्रिया, तू ठरवलंस तर खूप सोपं आहे..."
"पण आता काय उपयोग? चाचा, मी accept केलय की मला रेहान कधीच मिळणार नाही. बाबान तेच हवं होतं आणि मला त्याच्या उपकाराचा बदला असा तर देता येणार नाही ना... "
"बेटा, मला तुझं हे असं जगणं नाही बघवत.."
"का? काय खराबी आहे माझ्या जगण्यात? पैसे मिळवते. एकटी राहते. माझ्यकडे बघायला तुम्ही आहात. असिफ़ आहे... I am happy... very happy "

"मला सगळ्यात जास्त भिती तुझ्या या खुशीची आहे....."
"चाचा.. Dont worry , मी आता पुन्हा कधीही मरण्याचा प्रयत्न करणार नाही... कारण आता मला जगण्याचा एक मार्ग अंधुकसा दिसतोय.
आयुष्यात एवढा जुगार खेळले... आता पुन्हा एक.. कदाचित शेवटचा.. हा... पण एक मात्र खरय की या जुगारात मी जिंकणार हे निश्चित... फ़क्त मी जिंकताना किती आयुष्य उधळेन हेच आता बघायचय..."


Chinnu
Wednesday, January 31, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिंकतांना किती अयुष्य उधळेन हेच बघायचय.. नंदिनी उच्च!

Manogat
Thursday, February 01, 2007 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान कलाटनि दिली कथेला
please लवकर post कर अता पुढचा भाग.....


Nandini2911
Thursday, February 01, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रिया, अब बस करो.. सुबह से पी रही हो.." असिफ़ने प्रियाच्या हातातला भरलेला ग्लास काढून घेतला..
प्रिया काहीच बोलली नाही.
"क्यु पिते हो?" असिफ़ म्हणाला.
" लोग कहे क्यु पिते हो
मन कहे क्यु जिते हो
जीने की कोई चाह नही
मरने की कोई राह नही..."
"ओके.. आगे?"
"अबे, इडियट.. आगे तेरा ससुराल... खतम हो गया शेर.. साला, तुझ्याजवळ ना कलासक्तता नावाचा प्रकारच नाही.."
" whatever .. मला एक सांग एवढे पिऊन पण तुला हे असले word बोलता येतात?"

प्रिया एकदम हसली "असिफ़, शराब दिमाग पे असर तभी करती है जब आप करने देते हो... "
"और तुम्हारे पास दिमाग है ही नही.."
"नही असिफ़.. गलत मत समझ.. दिमाग है पर दिल नही है.. जर असतं तर मी असं का केलं असतं?"
"प्रिया.. मला वीर म्हणाला की जतिनला तुझ्याशी लग्न करायचय.. Think about it "
प्रियाने डोकं सोफ़्यावर ठेवलं आणि डोळे मिटले.
"असिफ़, च्यायला. माझं लग्न कुठे आलं मधेच. मला जतिनला बरबाद करायचं नाहिये. तो खूप चांगला आहे आणि he really loves me पण नको.. असिफ़.. तो विचार पण नको. मी जशी जळतेय तेवढं पुरेसं आहे मला..."
"पण तू आयुष्यभर अशीच राहणार का?"
"असिफ़, आपल्याला भेटून किती वर्षे झाली... आठ वर्षे.. तेव्हा विचार केला होतास की असं काही होईल म्हणून.. पण काय झालं... आणि जे काही घडलं ते कुणी बदलू शकत होतं... मग आज तरी मी उद्याचा विचार का करु? रेहानला नाझिया भेटली मलाही कुणीतरी भेटेल.."
"पण मग जतिन का नको.?"
प्रियाने डोळे उघडून असिफ़कडे पाहिलं. आणि ती हलकेच हसली.
"असिफ़, अजून मी मांडलेला खेळ पूर्ण नाही झाला..."
"म्हणजे.."
"ग्लास दे इकडे आणि ऐक.. You might hate me after hearing this. but thats truth and you can not run away fom it
तुला माहित आहे ना की मला इरफ़ानचाचानी आईला दत्तक दिलय. कारण माहित आहे?"
"तुझ्या आईला लग्नानंअतर बरेच दिवस काही झालं नाही म्हणून..."
"चूक... because her husband was an impotent पण सगळ्या जगासमोर हे कबूल करायची त्याना लाज वाटली आणि मग त्यानी बायकोला वांझ ठरवलं. घरातले दुसर्‍या लग्नाच्या मागे लागले तेव्हा आईने सत्य फ़ोडायची धमकी दिली. तेव्हा मग मोठ्या उदार अंत:करणानी त्यानी मुलगी दत्तक घ्यायची परमिशन दिली. आईने मला निवडलं, पण मी मुसलमान आहे हे बाबाना कधीच सांगितलं नाही. हा तिचा बदला होता. स्वत्:चं ब्राह्मणीपण आणि पुरुषार्थ चार चौघात मिरवणार्या तिच्या षंढ नवर्याचा तिने असा पराभव केला. आणि या खेळात मी रूहीची प्रिया झाले.."
"पण मग त्याचा इथे काय संबंध?"
"तुला माहित आहे मी पूर्ण हिंदु धर्मात वाढले. मलाच माहित नव्हतं की मी कोण आहे.. पण इरफ़ानचाचा आईला फ़ोन करुन विचारायचे मी कशी आहे म्हणून.. एकदा त्याचं बोलणं मी ऐकलं.

असिफ़, त्यादिवशी मला माझा जितका तिरस्कार वाटला.. कुणीतरी माझं अस्तित्वच संपवलं होतं. इतके दिवस मी ज्या घराला आपलं म्हणत होते ते माझं नव्हतच.. मी आईला खरं काय ते विचारलं. तिनही सांगितलं.. त्या दिवशी मी घरातून निघाले. मला तिथे राहायचं नव्हतं, तसंही बाबानी मला कधी जीव लावला नाही, आणि आता आई पण परकी झाली. पण बाबाना समाजाची काळजी होती. त्याच्या इज्जतीची काळजी होती. गुराना बडवतात तसं त्यानी मला पकडून आणल्यावर मारलं. एकदाही हे नाही विचारलं की का घर सोडलस..."
"प्रिया.. तुला जास्त झालीये जाऊन झोप... "
"नाही असिफ़, आज मला बोलू दे. कारण उद्या तू तरी मला दोष देणार नाहीस.. "

"कसला दोष?"
"असिफ़, त्या दिवशी त्या क्षणी प्रिया मेली आणि रुही पण मेली. उरलं ते फ़क्त हे असं जिवंत प्रेत. मी बंडखोर झाले. बाबानी आखून दिलेल्या प्रत्येक नियमाला मी तोडलं. आधी खूप मारायचे.. पण परिणाम शून्य. मी निगरगट्ट होत गेले. नितीमूल्य, संस्कार आणि समाज कशाचीच मला पर्वा राहिली नाही. आयुष्याची होडी मी भर समुद्रात सोडून दिली.... परिणामाचा विचार न करता."


Nandini2911
Thursday, February 01, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"असिफ़, आणि रेहान माझ्या आयुष्यत आला. इरफ़नचाचानी मला त्यच्याबद्दल सगळं सांगितलं होतं. त्याला कॉलेजमधे पाठवयच्या आधी मला डॉक्टरानी त्याच्याशी कसं वागायचं हे समजावलं होतं. पण तरीही... असिफ़ जर तू त्या दिवशी आला नसतास तर आजची वेळ आलीच नसती. पण घटना ठरवून होत नाहित."
"प्रिया, चाचानी रेहनला आणि तुला मुद्दाम जवळ आणलं ना..."
"ह्म्म, त्याना आमच्या दोघाचं लग्न करायचं होतं.. पण माझ्यासाठी रेहान आणि तू फ़क्त मित्र होतात. my best fiends मी त्यावेळेला जितकं हसले तितकी नंतर कधीच नाही. मी स्वत्:ला जगापासून तोडलं होतं.. तुम्ही मला परत आणलत.. असिफ़.. तुझं आणि माझं कनेक्शन तर मला अजून नाही कळालं.... मला काहि व्हायच्या आधी तुला कसं समजतं.."
"मला तरी कुठे कळलय. पण एवढे मात्र खरं की त्यामुळे बर्‍याचदा मी तुझा जीव वाचवला."
प्रिया हसली.
"तुझ्यामुळेच तर असिफ़ मी अजून मेले नाही. मला फ़क्त तूच या जगाशी बांधून ठेवलस... आणि रेहान... बिच्चारा.. त्याला सुरुवातीला मीइ इतकं सतवलं ना की बस्स. रात्री अपरात्री मी त्याला रस्त्यावर दिसायचे.. असा घाबरायचा तो.. कित्येकदा त्याला वाटायचं की परत त्याचे भास सुरू झालेत.... पण ते त्याच्यासाठी तेव्हा गरजेचं होतं,.."
"प्रिया, तू रेहानवर तेव्हापासून प्रेम करतेस?"
"नाही असिफ़.. मी रेहानवर प्रेम केलं नाही आणि बहुतेक आजही करत नाही..."
"काय?"
"अरे, इतना क्यु डरते हो? मला प्रेम म्हणजे काय हे तेव्हा माहित नव्हतं. आजही माहित नाही.. पण आपल्या मैत्रीचे बाबाच्या कानावर जायला लागले आणि मग घरात.. रोज एक रामायण... आधी मुळात ते गाव केवढंसं त्यात परत त्या देशपांड्यासारखी कुडमुडेच जास्त.. अफ़वा पसरायला वेळ नाही लागत. रोज घरी गेलं की खरडपट्टी सुरू असायची. मी हे तेव्हा कधीच कुणला सांगितलं नाही. घर हा विषयच माझ्यासाठी लाजिरवाणा झाला होता. पण नशीब.. रेहान दिल्लीला गेला. पण बाबाचा संशय मात्र तिथेच रहिला. मी रोज घसा फ़ोडून सांगायचे की मी आणि रेहान फ़क्त फ़्रेंड्स आहोत. पण काही उपयोग नव्हता. रेहानचं मेल आलेलं बाबानी पाहिलं आणि त्या दिवशी कहर झाला. मला त्यानी गणपतीच्या पयाशी शपथ घ्यायला लावली की मी परत रेहनशी कुठलाही संबंध ठेवणार नाही.......... आणि मी गणपतीची शपथ घेतली की माझ्या आयुष्यात रेहानशिवाय कुणीही येणार नाही.. हे कदाचित प्रेम असेल किंवा माझा सूड असेल... सत्य त्या गणपतिलाच ठाऊक..."





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators