|
Meenu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:59 pm: |
| 
|
मित्रा ... मी थकुन सोडते नाद, अन् तेंव्हा ती अवतरते .. मस्तय गं ... स्मि कळेनासं झालय छान ... सारंग वेड्याचं वर्णन मस्त जमलय लोपा प्रत्येकाजवळ मस्त .... आता परत गायब होऊ नकोस ... मित्रा, तुषार स्वाती पुलस्ति भटक्याची प्रार्थना मस्त .. मनोगतावर वाचली होती.
|
Shyamli
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:05 am: |
| 
|
सध्या देवदत्ताला मायबोलीवर येता येत नाहीये, म्हणुन त्याची ही कविता त्याच्यावतीन मी पोस्ट करतीये खिडकीतून बाहेर बघत असतांना मनाच्या उंबरठ्यावर हळूच उतरतात.. आठवणी मावळत्या सुर्याकडे टक लावून बघतांना कुठल्यातरी गुढ कोपर्यातून उगवतात.. आठवणी मोकळ्या वाटणार्या वातावरणाला अचानक कुंद करतात... आठवणी भूतकाळाच्या अथांग पोकळीतून ओघळून वर्तमानाचे भविष्य ठरवतात.. आठवणी
|
Shyamli
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:20 am: |
| 
|
असताच नाही.. शब्द काही डबडबत्या डोळ्यांनी विस्कटलेले.>> वैशाली, आवडली कविता छाने. माणिक, एक क्षण, छान आहे थीम.. अन दु : खाचा आकाशाही सामावुन उरतो >>>हे आवडल, पुलस्ति,सन्मीनी लिहीलेला वाचायल जास्त छान वाटल, आवडली कविता
|
मित्रा, लोपा मस्तच! पुलस्त्ति, छान. नविन, कविता खरच छान दिसतेय!
|
Naveen
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:28 am: |
| 
|
धन्यवाद भ्रमर मित्रा. आता ही कविता कशी दिसते ते सर्वांनी सांगावे. दगड दगड मला म्हणाला, "अरे मित्रा मला मूर्ती कर... कुठल्या तरी मंदिरात भर्ती कर... येणारा-जाणारा प्रेत्येक माणूस मला मारतो लाथा... माझी ईच्छा आहे त्यांनी माझ्यापुढे ठेकवावा माथा. अहंकारी माणसांना धडा शिकवावा असं मला वाटतं... आसवांनी भरलेलं आभाळ मनात दाटतं. साथ दे मला मुर्ती कर... कुठल्या तरी मंदिरात भर्ती कर..." मी म्हणालो,"अहो दगड महाशय मी कुणी नाही मुर्तीकार पण, होतोडी, छन्नीने तुम्हाला देईल आकार..." छन्नी, होतोडीने केला वार... दगडाला दिला आकार. त्या दगडाला मंदिरात भर्ती केले नाव ठेवले चिंतामणी... आता प्रत्येकजण टेकवतो माथा त्याच्या चरणी...
|
Kiru
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:29 am: |
| 
|
कातर वेळी.. कधीतरी डोळे हळूच ओले करतात.. आठवणी मस्तच देवा..
|
Sarang23
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:33 am: |
| 
|
स्वाती आणि मिनू, ती कवींची यादी नव्हतीच मुळी!!! मला तो विषय काढायचा नव्हता पण परत जाऊन ते पुर्ण वाक्य वाचा. मिनूने अर्धवट वाक्य कसं काय वाचलं हे आश्चर्य आहे! असो. ती यादी जाणकारांची होती, कवींची नाही. कवी काय कोणी पण होतो हो...!!! आणि तुझं नाव त्यातून वगळतो मग तर झालं... एक होता वेडा तो रोज खायी पेढा जो खातो पेढा त्याचा पार होतो बेडा जो खातो पेढा तोच करतो गेम या पाचकळ खेळात कसलाच नाही नेम!!! वा!! वा!!! वा!!!!!!! काय कविता आहे झकास. झालो मी कवी. कवी व्हायला काय लागतय? अहो पण आपण लिहीलेल्या सगळ्या शब्दांची जबाबदारी कुणावर??? वाचकावर??? बाकी तुझ्या गझलच्या सगळ्या शंका साफ चुकीच्या आहेत बरं का स्वाती. वेळ मिळाला की तिकडेही सांगतोच सविस्तर... सगळ्या शब्दांची जबाबदारी घेतोय मी तिथल्या! आनंदाने!
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:32 am: |
| 
|
भूतकाळाच्या अथांग पोकळीतून ओघळून वर्तमानाचे भविष्य ठरवतात.. आठवणी देवा ... खुप आवडलं रे ! खुप खुप आभार चिन्नु आणि श्यामली ! माणिक !
|
Naveen
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:55 am: |
| 
|
मला कावळा व्हायचंय... मला कावळा व्हायचंय आलेल्या पाहुण्यांचं संकेत द्यायचंय मला कावळ्यासारखं जगायचंय मला कावळ्यासारखं मरायचंय आपल्या पिल्लांसाठी जगताना दुसर्यांसाठीपण मरायचंय म्हणून तर मला कावळ्यासारखं जगायचंय मला कावळा व्हायचंय... रक्ताचं नातं नसणार्यांना आपलं समसत जगायचंय आपल्या पिल्लांसाठी जगताना दुसर्यांसाठीपण मरायचंय मला कावळा व्हायचंय... जगातले सर्वात मोठे दोन पुण्य कावळाच करतो माणसाच्या पिंडाला स्पर्शून कावळाच मरतो मला कावळा व्हायचंय... आयुष्यात कसं जगावं? हे कावळ्याकडून शिकायचंय अनाथांना आपलं समजत कसं जगावं? हे ईतरांना शिकवायचंय मला कावळा व्हायचंय...
|
मेघधारा .. ओढ छान आहे सन्मी ... आज परत वाचली .. मस्त कविता .. शेवटच्या दोन ओळी खास .. स्मि .. कळेनासं झालंय छान आहे लोपा .. प्रत्येकाजवळ मस्त जमलिये ... एक शंका आहे ती मात्र मेलमध्ये विचारतो .. पुलस्ति .. प्रार्थना मस्त आहे .. उल्लेख राहून गेला होता. माफ़ करा .. देवा .. मावळत्या सुर्याकडे टक लावून बघतांना कुठल्यातरी गुढ कोपर् ०दयातून उगवतात.. आठवणी मधलं " सूर्यास्त " बघताना आठवणी " उगवणे " हा विचार फार फार आवडला .. तुला इथे वाचायला जमणार नसेल पण ह्या ओळींचं अभिनंदन करायला मेल करतो नक्की माणिक श्यामली शी सहमत .. एक क्षण कन्सेप्ट मस्त आहे .. नवीन .. प्रयत्न करतोय पुन्हा पुन्हा वाचून पण मला तळीराम आवडत नाहीये आणि अनुल्लेखही करायचा नाहीये .. वादंग तुमच्या कवितांमुळे झालेलं नाहीये हे मला नमूद करावसं वाटतं . तुमच्या पहिल्या कवितेत मला भावलेल्या काही ओळी होत्या तेव्हा प्रतिसाद द्यायचं वेळेअभावी राहून गेलं ... पुढील लेखनासाठी शुभेच्छा .. लिहीत रहा श्री तिर्थे .. भावना पोचल्या .. कुणी राहिल असेल तर माफ करा दिनेश .. लोपाच्या कवितेत " असताच नाही " हा विदर्भा कडचा शब्दप्रयोग असावा असे वाटते सारंगा .. माझ्यापरीने मी तात्विक वाद संपवला आहे .. तू ही सोडून दे .. स्वातीने जाणकार शब्द वाचला नाही म्हणून " ठीक आहे तुझं नाव त्या यादीतून काढून टाकतो " असं बोलू नये .. स्वातीसारख्या लोकांची कविता आणि गझल क्षेत्रातली जाण वादातीत आहे .. इथल्या कुठल्याही कवितेचं कवीच्या कल्पनाशक्तीपुढे जाऊन रसग्रहण करण्याचं सामर्थ्य तिच्या लेखणीत आहे सारंगा आणि हे आपण वारंवार अनुभवलेलं आहे . तुझ्या माझ्यापेक्षा वयाने किंवा प्रतिभेने , मानाने मोठ्ठ्या असणार्या कुठल्याही व्यक्तीबद्दल आपण असे बोलायला नको .. मीनूला वाईट वाटलं असेल असं समजून तिने जे लिहीण्याच्या प्रयत्न केला आहे ते between the lines वाच मित्रा आणि थांबवून टाक .. गझल बीबी वर उत्तरं जरूर दे .. बाकीचे विषय सोडून दे .. हक्काने सांगतोय असं समज पण चालेल ना ? गेल्या दोन दिवसात सर्व कवीमित्रांची हक्काची जागा मी अश्या पध्दतीने वाया घालवल्याबद्दल अत्यंत दिलगीर आहे तळटीप :- नवीन मी ही पोस्ट टाईप करत असताना पोस्ट झालेली तुमची " दगड " कविता आत्ता वाचली आणि त्यातील संदेश मला आवडला .. आणि हे मी कश्याचंही compensation म्हणून लिहीत नाहीये .. तुमच्या कवितेने तो संदेश पोचवला आणि लिहावसं वाटलं .. आजपासून पुढील काही दिवस कामानिमित्त मी बाहेर्गावी असेन .. सर्वांना दर्जेदार काव्यलेखनासाठी शुभेच्छ
|
Meenu
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:11 am: |
| 
|
सन्मे, मला पटतय तुला काय म्हणायचं आहे ते... पण आपण एवढाही ताल सोडायला नको एवढच मला सांगायचं आहे. आणि हे सगळं जर तुमच्या सारख्या जाणकारांनी (अगदीच नावानिशी सांगायचंझालं तर तू, वैभव, निनावी, प्रसाद दोन्हीही, बैरागी) सांगितलं तर मी समजू शकतो. पण लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण अशा लोकांनी ताशेरे ओढण्यात काय अर्थ आहे. ठीक आहे हेच आहे ना तुझं वाक्य तिथलं ..? मला इतकच म्हणायचय की कोण जाणकार आहे अथवा नाही हे ज्याचं त्याला ठरवु दे. याचा अर्थ असा होतो की यादीमधलेच लोक फक्त जाणकार आहेत तुझ्यामते... बाकीचे लोक जाणकार नाहीत हे कसं ठरवतोस तु ..? जाणकार असोत अथवा नसोत public forum वर त्यांना योग्य वाटेल ती प्रतिक्रीया ते देतील तु तुला काय योग्य वाटतय ते लिही. त्यांनी काय करावं करु नये हे सांगायच्या भानगडीत कशाला पडतो आहेस ? तु प्रतिक्रीयेवर प्रतिक्रीया देउ नकोस इथे प्रतिक्रीया देण्यासाठी ज्या कविता लिहील्या आहेत त्यावर लिही कोण कोरडे पाषाण ..? आणि परत एकदा ज्याला त्याला कुणाच्या मतांना किती महत्व द्यायचं ते ठरवता येतच ना ..? ज्याला उद्देशुन कोरड्या पाषाणांनी लिहीलय ते उत्तर देतील ..
|
Kiru
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:26 am: |
| 
|
बाप रे..!!! मला वाटतं, कोणाला काय म्हणायचय ते आता सर्वांना व्यवस्थीत समजलय. तेंव्हा आपण आता इथे थांबायच का..? आता काहीतरी छानस उतरू दे इथे.. आम्ही वाट पहातोय.
|
अय्या सारंग, सॉरी हं.. माझी चूक झाली वाचताना!! तू जाणकार म्हटलंयस.. कवी नव्हे, नाही का? पण किनई सारंग, तशी यादी करणंसुद्धा चूकच आहे बरंका! कारण बाकीचे जाणकार नाहीत हे ठरवायचा अधिकार तुला कोणी दिला? आणि नुसतं चूक नाही, तुझ्या भूमिकेशी ते विसंगतही आहे बरंका. कारण बाकीच्यांवर ही सौम्य शब्दांत भडक टीकाच झाली नाही का? अग्गोबाई!! पुन्हा घोळ!! भडक टीका चालणार आहे का? भडक शब्द फक्त नको आहेत, हो ना? छे! भलतीच बेजबाबदार झाल्ये बाई मी!!! आणि गज़लचं काय झालं म्हणे? आपल्याच रचनेवर भाष्य करायला इतका वेळ??? वैभव, स्तुतीसाठी धन्यवाद, पण ती अनाठायी आहे. असो.
|
Princess
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:44 am: |
| 
|
मी खरे तर गप्पच बसायचे ठरवले होते. कारण ना मी कवी आहे ना जाणकार. मी कोणीच नाही. पण चांगले वाचायला मिळावे म्हणुन इथे येणारी मायबोलीची अगदी नियमित वाचक आहे. काजव्याइतकाही प्रकाश नसणार्या माझ्या सारख्या रातकिड्याने सुर्य, चंद्र, तारे, काजवे यातले कोण अधिक तेजस्वी, हे पण सांगु नये का??? संघमित्रा तुझ्या पोस्टस वाचुन खरेच बरे वाटले. चांगले वाचायला मिळावे यासाठी तू प्रयत्न करतेस असे वाटते. सारंग, मला तुमच्या कविता आवडतात, हे आधी सांगते. तुम्ही चारोळी प्रकार वाचत नाही पण चारोळी वर प्रेम करणारे माझ्यासारखे इथे खुप लोक असतील. तुमच्यासारख्या मोठ्या आणि शब्द भांडाराने सजलेल्या कविता प्रत्येकाला लिहिता येतीलच असे नाही. दुसरे असे की, खुप दिवसात तिथे वाचनीय असे काहीच नसायचे. खुप काळ वाट पाहिल्यानंअतरच वाचकांचा उद्रेक झाला. केवळ तिथेच नव्हे तर कविता आणि काहीच्या काही कविता बीबी वर देखील वाचुन बघा. असो. वैभव, तुझ्याबद्दलचा आदर अजुनच वाढला. एक एवढा मोठा कवी, स्वत:ला gr8 न समजता ज्या पद्धतीने शंका विचरतो, शंकाना उत्तरे देतो हे खरेच आदरणीय आहे. आणि इथे सगळ्यानी अगदी तुझ्यासारखेच अप्रतिम लिहावे अशी अपेक्षा नाहीये, पण वाचण्यायोग्य हवे न? तु या प्रकरणात जो balanced stand घेतलायेस त्यामुळे तु केवळ एक मोठा कवीच नाही तर मोठा माणुस सुद्धा आहे हे कळले. लोपा, तु खुप छान कविता लिहितेस. आणि म्हणुनच लोकाना चांगले वाचायला मिळावे यासाठी तुझी धडपड चाललेली असते. आणि हो, मीनु... का ग इतके वाईट वाटुन घेतेस? तुला कोणी कवी नाही म्हणाले म्हणुन तुझ्या कविता वाचणे आम्ही बंद करणार नाहीयेत. मला आवडतात तुझ्या कविता. आणि खुप लोकाना आवडत असतील. हा वाद फ़क्त... फ़क्त आणि फ़क्त चांगले वाचायला मिळावे या एकाच भावनेतुन झाला होता. प्रत्येकाजवळ कवितेची थैली असते... बरोबर आहे. आपल्या जवळ असलेले कपड्याचे गाठोडे कोणी उघडायला सांगितले तर त्यातुन आपण काय काढुन दाखवणार? जे खुप सुंदर वस्त्र आहे तेच न? की सगळे जुने पुराणे फाटलेले कपडे?
|
वृंदावन ह्या ऊंच डोंगरापार तिथे तो क्षितिजावरती असतो मेघागत श्यामल दिसतो मग सोसाट्याचा वारा सुटतो सांय सांय ती घुमते पाव्याचे सूर जणू ते सर सरीस घेउन येते जैसे सयी मिळूनी आल्या गोपिकाच त्या जमलेल्या लावण्यप्रभा प्रकटावी कोणी वीज तशी लखलखते राधिका तिथे अवतरते अन सुरू होतसे रासक्रिडा ती नगरी भिजून जाते भक्तीरसात न्हाते अनिमिष नजरेने किती वेळ मी बघतो लीला त्याची मज ओढ लागली ज्याची मग वाटे डोंगर आयुष्याचा लांघुन जावे तेथे वृंदावन आहे जेथे
|
Shyamli
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:01 am: |
| 
|
वाह.... .. .. ..
|
Mankya
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:04 am: |
| 
|
वृंदावन .... जबरीच मित्रा ( वैभव ) ! मीनू ..... तुझ्या कविता मलाही खुप आवडतात हो ! स्वाती " प्रतिक्रिया " सुद्धा किती बोलकी ! आणि हो मित्रा ( वैभव ) धन्यवाद ! माणिक !
|
Kiru
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:16 am: |
| 
|
वा!!! वैभव अगदी रोमांच उभे राहीले शेवट वाचून.. क्या बात है!! सर सरीस घेऊन येते जैसे सयी मिळूनी आल्या गोपिकाच त्या जमलेल्या खूप सुंदर..!!
|
Meenu
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:36 am: |
| 
|
मग वाटे डोंगर आयुष्याचा लांघुन जावे तेथे वृंदावन आहे जेथे >>>> मस्तच वैभव .. कळस आहे हे कडवं princess , माणक्या धन्यवाद .. पण तो मुद्दा नाहीये रे .. असो.
|
Smi_dod
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:57 am: |
| 
|
मग वाटे डोंगर आयुष्याचा लांघुन जावे तेथे वृंदावन आहे जेथे >>वैभव... खुपच सुंदर रे!
|
|
|