|
Mankya
| |
| Wednesday, January 31, 2007 - 7:03 am: |
| 
|
ओहो लोपा .... मस्त आहे कल्पना ! माणिक !
|
Imtushar
| |
| Wednesday, January 31, 2007 - 7:40 am: |
| 
|
नवीन त्रिकोण बर्यापैकी जमलाय... फ़क्त ५ वी, ११ वी आणि १३ वी ओळ थोडी लांबव. तू dots (.....) वापरू शकतोस, आणि हो, लांबवताना त्या ओळी एवढ्याच लांबव की पुढच्या ओळीपेक्षा लांब होणार नाहीत. मग छानच दिसेल कविता. बाकी, सारंग, कालची डोकेफोड वायाच गेली म्हणायची आणि काय?
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 31, 2007 - 8:14 am: |
| 
|
संघमित्रा छान आहे कविता. लोपा, शेवटुन दुसर्या ओळीत असतातच नाही का ? , अशी पुर्ण ओळ हवी होती.
|
मित्रांनो कविता वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल आभार. लोपा "प्रत्येकाजवळ " खूपच छान आहे. खूप दिवसांनी रात्री छतावर चांदण्या मोजत आणि आयुष्याचे हिशेब मांडत बसणं आठवलं. तुषार
|
Chinnu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 9:30 am: |
| 
|
सारंग वेड्याचं वर्णन ब्रिलियंटली केलयस. मेघधारा ओढ मस्त. स्मि, कधिपासुन होतयं अस सर्व? गोड आहे हं कविता. नवीन तुमची कविता काहीच्या काही मध्ये शोभली असती. सन्मी, कविता अवतरण्या आधीची घालमेल परफेक्ट मंडली आहेस. लोपा, दरवेळी तुझी कविता भिडुन जाते गं. आणि ही तर उच्च! एका क्षणासाठी माझीच डायरी आली समोर! दिनेशदा मला तरी असतातच ना बरोबर वाटले. सारंग काळंकभिन्न नभ हे द्योतक आहे दुष्ट जगाचं. ते स्ट्रेस करण्यासाठी म्हणुन काळ्याकभिन्न योजिले असावे, असे मला वाटते. लोप, सॉरी हं, तुझ्यावाटची मीच सांगतेय म्हणुन. तीर्थे तुमची सगळी उद्विग्नता स्पष्ट मांडलीत. लिहीत नक्किच रहा आणि इथे उत्तमोत्तम पोस्ट करा मात्र! मानस तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभार.
|
Mankya
| |
| Wednesday, January 31, 2007 - 9:38 am: |
| 
|
chinnu..... ती लिंक अशी पाहिजे बहुतेक ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्/cगि-बिन्हित्गुज्शोवगि?त्प्c=७५&पोस्त्=९१४५८३#PऑSट१४५८३ .... बरोबर ना ? माणिक !
|
Chinnu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 9:43 am: |
| 
|
अरे वा, माणिक धन्यवाद. लिंक द्यायचा अभ्यास नाही रे केला मी आता एडिटलं पोस्ट.
|
Niru_kul
| |
| Wednesday, January 31, 2007 - 9:44 am: |
| 
|
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय.... डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय... जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय... डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय.... कट्ट्यावर मित्रांसोबत सिगरेट पिताना, हे असं होऊ शकेल, असं वाटलं नव्हतं; मरणाचं भय कधी, माझ्या मनात दाटलं नव्हतं; आता मात्र माझ्या ह्रदयाचा, अगदी थरकाप झालाय... डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय.... हॉस्टेलच्या गच्चीवर नेहमीच, आमची मैफल जमायची; आनंद-दुःख साजरं करण्यासाठी, अलगद मदिरा प्राशन व्हायची; दारुच्या जागी आज हाती, मृत्युचा प्याला आलाय... डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय.... जगण्याच्या मजेसाठी, मरणाचं भांडवल मी घेतलं; स्वातंत्र्याच्या नावाखाली, मृत्युलाच जोपासलं; आज पहिल्यांदाच मी, अंत एवढ्या जवळून पाहीलाय... डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय.... जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय... डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय....
|
Chinnu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 9:55 am: |
| 
|
निरुकुल, चटका लावणारी वस्तुस्थिती आहे असा cancer . तुमच्या कवितेवरुन, देव करो आणि बोध होवो स्मोकर्स ना!
|
Mankya
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:08 am: |
| 
|
अरे वा ..... निरज .... सहिच वर्णन केलयस ! पण मी तर स्मोक करतो कि .....! माणिक !
|
Manas6
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:01 am: |
| 
|
sanghamitraa, tujhee kavitaa chaan aahe
|
Nisha_v
| |
| Wednesday, January 31, 2007 - 1:01 am: |
| 
|
पहिलाच प्रयत्न आहे कुठे काय चुकतय सांगावे. मार्गदर्शन करावे. तुझ्या स्पर्शाने निर्माण झाली नवचैतन्याची लहर माझ्या मनी नदी सागराला मिळते विसरून तिचे अस्तित्व मी ही वाहते माझे अस्तित्व तुझ्या चरणी तु चोर! चोरले माझे काळीज मला न कळता माझे काळीज बोलु लागले "तुच माझा धनी" लांडोराचे अश्रु बघता मोर नाचला थुई थुई तुझ्या संगतीने दुर झाल्या माझ्या लाख अडचणी भास्कराने केले तेजोमय...तेजात नाहून विजलास कसा? दिव्यात पेटले तुझी ज्योत होऊन त्या क्षणी
|
>>>> मी थकुन सोडते नाद, अन् तेंव्हा ती अवतरते.. सन्मे, झकास. लोपा, ' प्रत्येकाजवळ' छान आहे. आणि हो, आता वाद उकरून काढायचा नाहीये, पण सारंग, तू अशी ' कवींची यादी' वगैरे करणं चूक आहे. मीनू किंवा इतर कुणीही ते मनावर घेऊ नये.
|
Mankya
| |
| Wednesday, January 31, 2007 - 1:22 pm: |
| 
|
एक क्षण .... आलेला गेलेला ना कळतो पण आपण तो जगतो काही विशेष असलं तर स्मरतो नाहीतर त्याची काय किंमत करतो एक क्षण .... सुखाचा सारं आयुष्यच समेटुन घेतो अन दु : खाचा आकाशाही सामावुन उरतो एक क्षण .... सखीच्या सहवासात प्रितिगन्ध घेउन फुलतो विरहाचा मात्र कातरवेळी जीवघेणा ठरतो एक क्षण .... रागाचा बरंच काही हिरावून नेतो चैतन्याचा वातावरण मंगलमय करतो एक क्षण .... आसक्तीचा विवेक विकार कोण बघतो विरक्तिचा कशाला कशाचा विचार करतो एक क्षण .... कधी मला तुमच्यापासुन हिरावुन नेतो तर कधी तुमच्याशी अनमोल ऋणानुबंध देतो .... एक क्षण ....! माणिक ! स्वाती एखादि मस्त कविता पण येवु दे ना !
|
Chinnu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 2:17 pm: |
| 
|
माणिक क्षणाचा गोषवारा मस्त. सुरुवातीच्या ओळी जरा गद्य वाटल्या फ़क्त. तुमची चारोळी पण छाने.
|
Pulasti
| |
| Wednesday, January 31, 2007 - 3:08 pm: |
| 
|
"भटक्याची प्रार्थना" वर्षानुवर्षं माझ्या तांड्याबरोबर या वाटेवरून चालता-चालता, एक कळलंय मला - रात्र संपायची प्रार्थना करू नये कुठल्याच तांड्याने. कारण, कुणाच्याही प्रार्थनेने संपत नसते रात्र, केवळ सरते, सरकते - एका वाटेवरून दुसऱ्या वाटेवर एका तांड्यावरून दुसऱ्या तांड्यावर. प्रार्थना करावी ती ही की - माझ्या तांड्याकडे असावेत पुरेसे दिवे, रात्रींतून मार्ग काढण्यासाठी. आणी, भेटला जर कधी वाटेत दुसरा तांडा, दिव्यांवाचून चाचपडणारा, तर... देता यावेत आपल्याकडले काही दिवे - निर्लेप हातांनी. -- पुलस्ति
|
Chinnu
| |
| Wednesday, January 31, 2007 - 3:14 pm: |
| 
|
घेतले बरं दिवे, आता रस्ता एकदाचा सापडला की झाले! वरिष्ठांनी ही प्रार्थना लाल अक्षरात वर अडकवावी ही विनंती!!! मस्तयं पुलस्ति!
|
Saurabh
| |
| Wednesday, January 31, 2007 - 3:36 pm: |
| 
|
त्रिकोण छान जमलाय महान कॉमेंट आहे ही! संघमित्रा सुरेख कविता!
|
Naveen
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:16 pm: |
| 
|
धन्यवाद तुम्हाला त्रिकोण आवडल्याबद्दल.
|
पुलस्ति आवडला तुमचा मुक्तछंद. भाषा छान आहे. फक्त ओळी नीट तोडल्या नाहीयेत बहुतेक. त्यामुळं काहीतरी गद्य लिहीलंय असं दिसतं पण वाचल्यावर त्यातली मुक्तलय लक्षात येतेय. चुभूद्याघ्या. फक्त काही new lines टाकून परत देतेय. वर्षानुवर्षं माझ्या तांड्याबरोबर या वाटेवरून चालता-चालता, एक कळलंय मला - रात्र संपायची प्रार्थना करू नये कुठल्याच तांड्याने. कारण... कुणाच्याही प्रार्थनेने संपत नसते रात्र, केवळ सरते, सरकते - एका वाटेवरून दुसऱ्या वाटेवर, एका तांड्यावरून दुसऱ्या तांड्यावर. प्रार्थना करावी ती ही की - माझ्या तांड्याकडे असावेत पुरेसे दिवे, रात्रींतून मार्ग काढण्यासाठी. आणी, भेटला जर कधी वाटेत दुसरा तांडा, दिव्यांवाचून चाचपडणारा, तर... देता यावेत आपल्याकडले काही दिवे - निर्लेप हातांनी. - पुलस्ति
|
|
|