Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 31, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through January 31, 2007 « Previous Next »

Naveen
Wednesday, January 31, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदिरा...एकच प्याला

माझे गुरु तळीराम
माझ्या मुखी त्यांचेच नाम

रोज सकाळी गुरुची पुजा करतो
मदिरेचा प्याला त्यांच्या नावाने भरतो

मदिरेची कमाल आहे धम्माल....
एकदा गेली पोटात... कि सगळेच बोलू लागतात
न पिणारे लोकंही मग... चमच्याभर दारू मागतात

डाॅक्टरांनीच सांगितले..."ग्लुकोज बरोबर दारूला तोलणे"
मुक्या माणसालापण आले... खडखड बोलणे

बरं का गुरुजी... मी जोपासला आहे तुमचा वारसा
आज प्रत्येकजण... बनू पाहतोय तुमचा आरसा

गुरुजी आपल्या मदिरापान मंडळाच्या
सदस्यांची संख्या वाढली
जागे-अभावी, मी आणि सहकार्‍यांनी
शेजारची भिंतदेखील पाडली


Sanghamitra
Wednesday, January 31, 2007 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा छान आहे अगदी.
सारंग वेडा खूपच छान जमलीय हं. शिवाय सगळे नियमही पाळतेय तुझी कविता :-)
हो आणि एक राहिलंच. अरे बाबा मला कशाला त्या दिग्गजांच्या पंक्तीला बसवलंस? तेवढा अधिकार नाही माझा खरंच.
आता इतका वाद जिच्यासाठी झाला त्या कवितेसाठी...



Sanghamitra
Wednesday, January 31, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



ती येते...

मी लाख विनवुनी पाही.
ती मला जुमानत नाही.
कोंडता उफाळुन येते.
ये म्हणता दडून राही.

कधी पारंपरीक साज
अन् वाणी ठसकेबाज.
कधी अलंकार त्यागुनी,
पांघरून घेई लाज.

कधी गालावरचा तीळ,
कधी देवावरची भक्ती.
कधी निसर्ग हो रमणीय,
कधी प्रेमामधली शक्ती.

कधी खळाळ होइ झर्‍याचा,
कधी लाटांवरती नाचे.
कधी सुसाट बोलत राही,
कधी शब्द होति सोन्याचे.

कधी नियम पाळुनी सारे,
आदर्श बालिका होते.
कधी वरुनि मुक्तछंदाला,
बंधने झुगारुन देते.

कधी दिवस मावळुन जातो,
रात्रहि तशीच सरते.
मी थकुन सोडते नाद,
अन् तेंव्हा ती अवतरते.

- संघमित्रा


Shyamli
Wednesday, January 31, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय हाय, सन्मी क्या बात है!
स्मि, छान आहे "कळेनासच झालय"

सारंग, वेडा छाने शेवटच्या ओळी जास्त आवडल्या

मेघा, वाह...


Sarang23
Wednesday, January 31, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा, छान आहे कविता...

मि थकुन सोडते नाद,
अन् तेंव्हा ती अवतरते.


हे विशेष आवडले!

नविन? तुला पुर्ण कवितेतून काय deliver करायचं आहे जरा स्पष्ट करशील का? मला दोनच गोष्टी कळाल्या. एक तर दोन दोन ओळींमध्ये बर्‍यापैकी अर्थ आहे आणि दुसरी म्हणजे प्रत्येक पुढची ओळ पहिल्या ओळीपेक्षा थोडी लांब आहे. अगदी मध्यापर्यंत! आणि तिथून बरोबर कमी कमी होत जाते, त्यामुळे त्रिकोण छान जमला आहे!


Naveen
Wednesday, January 31, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग सर्व प्रथम धन्यवाद. माझ्या कवितेतलं काहीतरी आवडलं त्याबद्दल. तो त्रिकोण जाणून्-बुजून तयार केला. कारण प्रत्येक दारू पिणार्‍या माणसाच्या आयुष्यात असे तिकोण असतात.

आता कवितेबद्दल...
"एकच प्याला" नावाचं नाटक बघितलं अथवा ऐकलं असेल. त्या नाटकावर आधारीत ही कविता लिहिली आहे. त्या नाटकात "तळीराम" नावाचा मदिरा सम्राट हा काही माणसांना दारूचे वेड लावतो.

दारू पिणार्‍या प्रत्येक माणसाने त्यांची पुजा केलीच पाहिजे असं मला वाटतं. (हो पण, मी नाही पित बरं का!) फक्त दारु पिणार्‍या माणसाला त्यांच्याबद्दल काय वाटायला हवं तेच लिहिलं आहे.

थोडक्यात तो(दारु पिणारा माणूस) दारुचे गुण-गाण गातोय.
आणि तळीराम सारख्या गुरुला सांगतोय कि "बघा मी तुमच्यासाठी काय्-काय करतोय"


Imtushar
Wednesday, January 31, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा,
कविता फ़ारच सुरेख आहे.

कवितेला फ़ार छान नाद आहे.

तुषार


Mankya
Wednesday, January 31, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा .... मस्तच !

माणिक !


Lopamudraa
Wednesday, January 31, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा सुंदर लिहिलिये ओढ...
संघमित्रा कविता फ़ार फ़ार छान आहे..., सारंगची वेडा ही सुध्दा सुंदर आहे(आणि सारंगकडुन खुप दिवसांनी वेगळी कविता वाचायला मिळाली !!!)

काल मात्र एक कळले माणुस चांगल्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. वाईट मात्र आवर्जुन जपत असतो. आणि या गोष्टी साठवुन ठेवतो.

बाकी संघमित्रा (तुझे मुद्दे सुध्दा आवडले.)आणी मेघा तुमच्या कवितांनी मुड बना दिया.. अजुन छान हलक्या फ़ुलक्या येउ द्या रे.


Shree_tirthe
Wednesday, January 31, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!!

मदिरेची कमाल आहे धम्माल....
एकदा गेली पोटात... कि सगळेच बोलू लागतात
न पिणारे लोकंही मग... चमच्याभर दारू मागतात
वा!! नवीन मस्तंच.

संघमित्रा कविता मस्तंच आहे. व्वा!!!

कधी दिवस मावळुन जातो,
रात्रहि तशीच सरते.
मी थकुन सोडते नाद,
अन् तेंव्हा ती अवतरते.

सहीच.


Kiru
Wednesday, January 31, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, 'वेडा' मस्तच जमलीय.
सन्मे.. 'ती' अप्रतिम आलीये..


Meghdhara
Wednesday, January 31, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा.. खळाळ.. आहा!
अरे व्वा अज्जुक्का तुही खुप दिवसांनी.. तुझ्यासोबत बेटीची आठवण आली..

श्यामली वैशाली मुड बना रहने दिजीये..

नवीन तुमने अभी पीही नही..

मेघा


Ajjuka
Wednesday, January 31, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवितेच्या इथे आल्यावर बेटीची आठवण झाली नाही असा एक दिवस नाहीये. बाकी माझ्याबद्दल म्हणशील तर मी अभिप्रायापुरतीच आहे आता. मला नाही वाटत पूर्वीसारखं बरं कवित्व जमेल मला.

Ajjuka
Wednesday, January 31, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सन्मे वा गं.. मस्त वाटलं

Shree_tirthe
Wednesday, January 31, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग तुमची "वेडा" कविता खूपच आवडली.

Lopamudraa
Wednesday, January 31, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाजवळ..

आयुष्याच्या अवकाशात
काळ्याकभिन्न नभात..
प्रत्येकाजवळ
काही उजळ क्षण.. असतातच नाही का...
चांदण्यासारखे टिमटिमते..!

धुसर होत जाणार्‍या काही
आठवणींसारखे..,
पानापानात ठेवलेल्या
सुकल्या फ़ुलांचे फ़िक्कट
होत जाणारे रंग.....
प्रत्येकाच्या डायरीत
त्यासोबत.. असताच नाही..
शब्द काही डबडबत्या डोळ्यांनी विस्कटलेले...




Shree_tirthe
Wednesday, January 31, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे कुणी समजणार नाही
माझ्या मनाला
तु तरी साथ देशील का
मज वेड्याला?

सर्वच म्हणतात,
"आला वेडा दगड मारा त्याला"
मला तु तरी पाजशील का
पाण्याचा प्याला

ह्या हुशार लोकांत
मी एक वेडा
मला तु तरी भरवशील का
प्रेमाच्या दोन शब्दांचा पेढा?

पोटा-पाण्यासाठी आलो ह्या गावी
पण, आजही आहे उपाशी
तु तरी नेशील का
मला घराशी?

लोकं मला पाहून म्हणतात,
"दोन शब्दांसाठी कवी झाला"
पिंट्या, बाळ्या दगड मारा
तिकडून वेडा आला

दोन शब्दांसाठी कवी झाला
दगड मारा वेडा आला


Kiru
Wednesday, January 31, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो...!!
अप्रतिम लोपा..!
.. .. .. ..

Shree_tirthe
Wednesday, January 31, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रत्येकाजवळ" छान आहे. वा!!!

Sarang23
Wednesday, January 31, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, काळ्याकभिन्न नभात..
ही कल्पना सोडून कविता छान वाटली.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators