Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 31, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through January 31, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Tuesday, January 30, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> घाणेरड्या भाषेत लिहीलेल्या कवितांवर आक्षेप नाही घ्यायचा ? ते ही वारंवार अनुल्लेख आणि समज देऊन झाल्यानंतरही ?
वैभव मुद्द्याचं बोललास.
सारंग मला वाटतं आता हळूहळू तूही त्याच मुद्द्यावर येतोयस. का रे बाबा तुला ते ती आई होती म्हणुनी चं विडंबन(मी वाचलं नाही) खटकलं ते कशासाठी? सुंदर कवितांबद्दलच्या कळवळ्यामुळेच ना.
मग उगीच लिहू द्या लिहू द्या हे उदारमतवादी धोरण कशाला?
आणि नवशिके होतकरू, उदयोन्मुख यांत आणि नचकवींत (म्हणजे जे कवीच नाहीत ते) काही फरक नाही का म्हणे?
स्वाती मग आत्ता तू लिहीलंस तेही त्या तळमळीतून आणि उद्वेगातूनच ना. :-)
एक पोस्ट लिहून preview करून पोस्ट करेपर्यंत किमान चार नवीन पोस्ट्स येतायत. (काही लोक या स्पीडने कविता टाकतात ती गोष्ट वेगळी):-)
चला माझाही पूर्णविराम.


Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक interesting किस्सा आठवला रे वैभव. दुर्बोधतेच्या मुद्द्यावरून. आम्ही एका interpersonal skills development program ला गेलो होतो. तिथे what is communication? असा एक प्रश्न विचारला त्या instructor ने. आम्ही म्हणालो fully technical की sender, receiver and media वगैरे आणि हा media म्हणजे बोलणे. जी सगळ्यात सुबोध गोष्ट आहे(इशार्‍यांपेक्षा). मग तीने एक उदाहरण दिले. एका मुलाला समोर उभे केले आणि काहीही न बोलायला सांगीतले.आणि आम्हा सगळ्यांना विचारले की हा काय बोलतोय... मग अनेक उत्तरे आली की तो थकला असावा, त्याला बोलायची इच्छा नसावी वगैरे वगैरे... म्हणजे काय? तो काहीही बोलत नसताना त्याला हे बोलायचे असेल असा त्याच्या एकंदर body language वरून अंदाज बांधला. हाच प्रयत्न आपण कवितेच्या बाबतीतही आमलात आणला तर दुर्बोध कविता नक्कीच कळेल.
आणि मग जगात कुठलीच गोष्ट अर्थहीन राहणार नाही... (आणि ती अर्थहीन नसतेच असे माझे मत आहे. अर्थात हे माझे मत)


Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव... झिंज्या नाही रे उपटणार मी तुझ्या... शेवटी काहीही केलं तरी एका मित्रालाच दुसर्‍या मित्राची काळजी :-)

सन्मे... माझा मुद्दा एकच आहे. जो माझ्या सगळ्या पोस्टमध्ये bold मध्ये आला आहे.

(काही लोक या स्पीडने कविता टाकतात ती गोष्ट वेगळी) ह. ह. पु. वा.
चला मंडळी मी पण निघतो. पण एकंदर मला एका गोष्टीचा मनापासून आनंद झाला की आपल्या सगळ्यांना किमान चांगल्या साहीत्याची कळवळ आहे! भरून पावलो.

स्वाती: खाली मी कविता टाकली आहे म्हणून इथेच... ते हसणे उपरोधीक होते. कारण त्याचा रोख माझ्याकडे आहे...
आणि मी त्या वाक्याला हसलो. इतक्या भराभर कविता पोस्ट केल्या तरी मी दर्जा घसरणार नाही याची नक्कीच काळजी घेईन...
काय म्हणायचय हे माहीत असेल तर टाईप करायला एवढा वेळ लागत नाही. :-)
आणि वर जे वैभवला कंसात लिहीले ना मुक्तछंदावर टोमणा वगैरे अशी बरीच वाक्ये उरोधीकच होती...
असो आता थांबवतो मी माझ्याकडून



Imtushar
Tuesday, January 30, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SPOT ON sarang!

(what is this??? i cannot post message with less than 4 words!!!)

Swaatee_ambole
Tuesday, January 30, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> (काही लोक या स्पीडने कविता टाकतात ती गोष्ट वेगळी) ह. ह. पु. वा.

असं हसू नये सारंग.. फक्त प्रोत्साहन द्यायचं ना?

Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

     वेडा

कुणी म्हणाले मुर्ख असावा
कुणी म्हणाले प्याला
कोण बोलले काय, कशाचे
भानच नव्हते त्याला

साधा भोळा माणूस अगदी
स्वभाव सुद्धा साधा
काय जाहले कुणा ना कळे
झाली कसली बाधा?

रोज भेटतो असा झाडतो
भर रस्त्यावर पाय
अशा माणसासोबत आपण
बोलावे तरी काय?

कशी लागली आग आतुनी?
काय असावे झाले?
घशास नुसती कोरड कोरड
आणिक डोळे ओले

गल्लोगल्ली फिरतो आता
मधेच खो खो हसतो
मधेच इतका शांत राहतो
कुणामध्येही नसतो

मुले मारती दगडे अन
हा कपडे टाकुन पळतो
लाख माणसे हसती अन
हा आतून तिळतिळ जळतो

कधी एकटा शांत बसून हा
केस खाजवीत हसतो
काळ्या कळकट त्वचेस आणि
हळूच सोलत बसतो

या सगळ्यातून भर माध्यान्ही
त्यास लागता डोळा
खोल आतुनी वठलेला तो
दिसतो चोळामोळा

अन रात्रीचा कर्णबधीरशा
मारत बसतो बोंबा
जणू देवाला विचारतो हा
"सांग कुठे रे थांबा"


सारंग



Vaibhav_joshi
Tuesday, January 30, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाली नाव कशाला रे ? काहीतरीच वाटंतय ते

छान आहे कविता


Imtushar
Tuesday, January 30, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

apratim
genius
brilliant

-Tushar

Meenu
Tuesday, January 30, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग तु मला कवी म्हणुन मान्यता दिली नाहीस तरी मत मांडायला काय हरकत आहे ..?
१. public forum वर post केल्यावर ज्या काही प्रतिक्रीया येतील त्या स्विकारायला हव्यातच. त्याबद्दल हळवं होऊन कसं चालेल ?
२. इतरांच्या प्रतिक्रीयांना किती महत्व द्यायचं ? , कुणाच्या प्रतिक्रीयेला महत्व द्यायचं ? ते प्रत्येकजण आपापल्या परीने ठरवत असतोच की ..
३. वाचकांना (कवी नसलेल्याही) त्यांचं मत देऊ दे रे ..
४. आणि बर मी आत्ताच वरच्या सगळ्या post एकत्रीत वाचल्या. आणि वाचल्यावर मला असं वाटलं की तुझा मुळ मुद्दा सोडुन दिलास आणि वैभवच्याच बाजुला आलास .. असो.


Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मिनू, हे तुझं पहिलं वाक्य मला खटकलं. हा वाद थांबवण्यासाठीच मी ती कविता पोस्ट केली आहे. त्यामुळे थांबतो. पण तुझा ४ था मुद्दा पटला नाही. माझा आणि वैभवचा मुद्दा एक झाला तरी आम्ही काय discuss करतो आहोत मग? :-) महत्त्वाचा मुद्दा तर एक आहेच पण वैभवची माझ्या पहिल्या पोस्टला दिलेली प्रतिक्रिया वाच मग कळेल की वादाचा मुद्दा काय आहे ते. मुळात तोच पहीले समजायला हवा. असो...

वैभव, तुषार धन्यवाद.
वैभव, अरे ते नाव टाकण्याची माझी सवय आहे. :-) पण काही हरकत नाही म्हणा, नाहीतरी कवी आणि वेडा यांच्यात बरीच साम्यदर्शके आहेत :-)


Mankya
Tuesday, January 30, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मात्र पटलं रे सारंगा .... कवितेबद्दल म्हणतोय !

वेडा ...... लै भारी कविता आहे भावा !

माणिक !


Meenu
Tuesday, January 30, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मिनू, हे तुझं पहिलं वाक्य मला खटकलं.>>> खटकायची काय गरज ? तुच स्वच्छ म्हणलस ना वर नावं घेउन (वैभव, निनावी, सन्मी, दोन्ही प्रसाद, बैरागी हेच कवी आहेत म्हणुन) आणि मी हळवी वगैरे होऊन लिहीत नाहीये कारण मीही स्वतःला कवी वगैरे समजत नाही. असो वाद नको तर नको.

Shyamli
Tuesday, January 30, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याला कुणालाही दुखावण्याचा अधीकार नाही
मुद्दा पट्ला.

१)ईथे अगदी दर्जेदार कविता वाचायला मीळत नसल्या तरी मनाला स्पर्शणार्‍याही किमान वाचनीय,ईथे शोभनीय तरी असतात(मग त्या मुक्तछंदातल्या असो,कींवा गझल असो).
२)आपण सगळे ज्या कोणाबद्दल बोलत आहोत तो वाद नवीन्-जुना अथवा नामांकीत्-नवोदीत असा नाहीचे,
३)इथले सगळेच जण आधी कविता वाचतात आणि मग नाव.त्याशिवाय आम्ही हे बोलुच शकलो नसतो
४)बर एका व्यक्तीला नाही कळली आवडली कविता, ठीक आहे,पण एखाद्या व्यक्तीची कविता कुणालाच कळत्-आवडत नसेल ते ती व्यक्ती फक्त ईथे नवीन(नवीन ह्या id बद्दल बोलत नाहीये मी) आहे म्हणुन नसत ते, तर कविता म्हणुन जे काही लीहीहील आहे त्यात अगदी मनातुन येणारा भाव जो शब्द घेउन उतरतो तो तरी जाणवावा न! तेही नाही तरीही काही म्हणु नये????
नाही बसवल गप्प याचं कारण कदाचित गुलमोहरावरच प्रेम असेल.
नुसती यमकाची जुळवाजुळवी आणि काहीही, एक वाचक म्हणुनच वाचवत नव्हती म्हणुन बोलुन गेले.
कुणालाही दुखवण्याचा उद्देश माझा कधीच नसतो.


आणि कीमान आपल इथे हसं होतय ही जाणून घेउन तरी जे लीहीतोय त्यावर सगळ्यांनी विचार करावा अस वाटत होतं(आधी मी)





Naveen
Tuesday, January 30, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग तुमची "वेडा" नावाची कविता खूप आवडली. कदाचित तो मीच असल्यामुळे.

मान्यवरांची दाद मिळण्यासाठी
कविता अगदी सुरेखच असावी लागते
नाहीतर आपलीच कविता
आपल्याला न्याय मागते

हे कडवं अजून वेगळं करू शकला असतास...

असं तुम्ही मला म्हणालात. पण, कशाप्रकारे वेगळं करायचं हे नाही सांगितलं. कृपया सांगावे.


Smi_dod
Tuesday, January 30, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय हा कविता बी बी च आहे ना?मी खरतर कविता पोस्ट करायला आले पण हे बघुन संभ्रम निर्माण झालाय..:-)

आणि कीमान आपल इथे हसं होतय ही जाणून घेउन तरी जे लीहीतोय त्यावर सगळ्यांनी विचार करावा अस वाटत होतं(आधी मी.....)>>>>>>>>>>>>>>...बरोबरे...पण हस होतय ते का आणि रास्त आहे का?हा ही मुद्द महत्वाचा नाही का?मुठभर हसतात म्हणुन दर्जा चांगला नाहीच हे आपण नाही म्हणुन शकत..... चांगल किंवा वाईट ही व्यक्तिसापेकक्षतेकडे झुकतय का हे बघायला हवे..आणि अगदी प्रांजळ मत द्यायच तर मला पण हे वादंग बघुन वाटायला लागले की ही केवळ टीके साठी टीका अशी झोड तर नाही ना उठवली?

Manas6
Tuesday, January 30, 2007 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन रात्रीचा कर्णबधीरशा
मारत बसतो बोंबा
जणू देवाला विचारतो हा
"सांग कुठे रे थांबा" ..very brillianttly written



Meghdhara
Tuesday, January 30, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो पुन्हा कवितेकडे..

ओढ..

सळसळत आरपार
तुझं अस्तित्व जाणवताना
नी माझं मीपण विलीन होताना..
शिल्लक राहिलेली ओढ
उत्तरदायीत्व नाकारते.
तीच्या असण्याचं प्रयोजन,
मी सोयीस्करपणे डोळेझाक करते.
कदाचीत माझी आत्मप्रौढी,
कदाचीत प्रेमाची धुंदी..
पण खरं सांगु?
मोकळेपणी चांदण्यात
किंवा रखरखीत उन्हात
जेव्हा तुझा साथीने तटतटुन
माझी पंचेंद्रिये आरक्त होतात
जगायची सारी आसक्ती एकवटून,
तुझे हुंकार
श्वासागणीक आत येतात..
तेव्हा मी 'मी' अस्तेच कुठे?
आणि तू...
तू आणि मी..
काय एकमेकांना ओढणार?
आपला संवाद हे फक्त निमित्त..
बाकी आत होतेय ती गळाभेट,
ओजस्वी स्त्रोतांची
आणि बाहेरुन उधळलेल्या
झंझावातात
आपण ओढले जातोय
आपोआप...

मेघा


Naveen
Tuesday, January 30, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी सर्व post वाचले. त्यातून असं जाणवलं कि, "हे सर्व प्रकरण फक्त गैरसमज झाल्यामुळेच वाढलं असावं" असो. हा वाद ईथेच संपला असं मी समजतो. आणि आशा करतो पुन्हा अशाप्रकारचे वाद होणार नाहीत.

सारंगच म्हणणं अगदी योग्य आहे पण का कुणाला पटलं नाही ते देवच जाणे.

जर ईथे कुणाला वाटत असेल कि ह्या सर्व प्रकरणाला मी (नवीन)च जवाबदार आहे तर, मी(नवीन) ह्या पृथ्वी तलावरचा एक क्षुद्र प्राणी आपल्या समस्त जाणकारांची माफी मागतो. क्षमा असावी.


Ajjuka
Wednesday, January 31, 2007 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा,
खूप दिवसांनी का ग? छान आहे!


Smi_dod
Wednesday, January 31, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला आता मी एक कविता टाकते(घाबरत).जाम टेन्शन आलय..:-)

कळेनास झालय!!!!

कळेनास झालय असं
काय व्हायला लागलं ते........
कुठुन तरी खुप ओळखीचे
बासरीचे सुर येतात
त्यात भान हरपता हरपता
अचानक अनोळखी होतात

कळेनास झालय असं
काय व्हायला लागलं ते........
शब्दभ्रमा सारखे
नजरेचे भ्रम व्हायला लागले
भास सगळे खरे वाटायला लागले

कळेनास झालय असं
काय व्हायला लागलं ते........
एखादा चेहरा खुप ओळखीचा
नव्हे माझाच वाटायला लागतो
जवळ गेल्यावर मुखवटाच निघतो

कळेनास झालय असं
काय व्हायला लागलं ते........
आपल आपल म्हणुन
जपलेलं..झटकन
परकं होउन दूर जातं

कळेनास झालय असं
काय व्हायला लागलं ते........
कुठुन तरी साद येते
प्रतिसाद द्यायच्या आत
दुसरीच प्रतिसाद ऐकु येते

कळेनास झालय असं
काय व्हायला लागलं ते........
अचानक मेघ भरून येतात
सरी त्या झेलण्या साठी
अधिरतेने डोळे मिटावे....
तर लखकन उन पडतं

स्मि







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators