Chinnu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:17 am: |
| 
|
वैभव आणि सन्मीला अनुमोदक. सारंग अहो मुद्द्याच बोला! लोपा नाजुक प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद. हळवी नको होवुस बाई. तुला कुणीही काहीहि म्हणु शकत नाही. तु छान लिहितेस, हे तुलाही माहित आहे. असो. नवोदित कुणीच नसतो. पहिली कविता फ़क्त नवोदिताची, पण दुसर्या कवितेबरोबर जबाबदारी येते कवीची. ती ज्याची तो निभवितो. पण इथे बाकी सर्व देखील मदत करतातच. नाही असे नाही. पण सन्मी जे ३५ % म्हणतेय ते फार कणवेने म्हटले आहे. सुज्ञ लोकास सांगणे नलगे पुढचे.
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:22 am: |
| 
|
प्रिय वैभवराव... आपल्याला अजूनही एकूण माझ्या सगळ्या बोलण्याची सांगड घालता आलेली नाही हे पाहून खेद वाटतो. मी चारोळीवर जात नाही म्हटल्यावर तिथल्या भडक प्रतिक्रियाही वाचल्या नसतील ही साधी गोष्ट आपण कशी विसरता आहात वैभवराव? आणि ओघाने तिथल्या प्रतिक्रिया भडक आहेत हे न जाणल्यामुळे मी त्या लोकांना वेठीस धरतच नाहीये ही साधी गोष्टही आपल्या लक्षात येवू नये का? आपण एकंदर माझ्या पोस्टचा भरपुर विपर्यास केला आहे... त्याबद्दल आभारी आहे. मी इथेच मागच्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की भडक प्रतिक्रिया देवू नका. मी कुणावरही तोंडसूख घेत नाहीये. पण मला "तोंडसूख" हा आपला शब्द personally खटकला. I mean it. तूम्ही हे असं म्हणूच कसं शकतो की मी तोंडसूख घेतोय म्हणून? लोपा... मी तुला नावं ठेवली??? कुठे???? काय गम्मत आहे राव! मुळात हे नविन आणि जुने आले कुठून???? आणि मी नवीन हा त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करतोय. इथे कुणीही जुना झाला म्हणजे जाणता झाला असा गैरसमज करून घेऊ नये. अक्कल ही वयाबरोबर कधीच वाढत नसते अशी माझीच एक कविता आठवली...
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:29 am: |
| 
|
चिन्नू बाळा... आणि आम्हाला मोदक नाही? अस नाही करायचं बर का... वैभव... आणि एका कवीनेच कवितांना अर्थ असायलाच हवा असे नही म्हणणे , मुक्तछंदासारख्या काव्यप्रकाराची टर उडवणे ह्या गोष्टी बरंच काही बोलून जातात नाही ? ( बोजड शब्द + मात्रा + यमक ) - आशय = कविता आता मात्र वैभवा मला हसावं की रडावं तेच कळत नाहीये. आता कंसात यासगळ्या गोष्टी नमूद कराव्या लागणार असतील तर गद्यही अवघडच म्हणायचं...
|
आफताबला याच कारणासाठी एका विडंबनावरून मी आणि निनावी बोललो होतो, आणि तेही अतिशय नम्र शब्दात>>>त्याच आफ़ताब ला विनम्र शब्दात सुध्दा मी काही म्हटले नव्हते कारण की मला त्या चारोळीत काहीही अक्षेपार्ह अथवा, अगदीच सुमार असे काहीच दिसले नव्हते. चारोळी म्हणून ती व्यवस्थीत होती. तेव्ह्या तुला तो नविन आहे म्हनुन सांभाळुन घ्या असे का म्हणाcएसे वाटले नाही?
|
चिन्नू बाळा... आणि आम्हाला मोदक नाही? अस नाही करायचं बर का...>>>> आता ही खिल्ली उडवली नाही का? खाली परत post टाक आता कुठे खील्ली उडवली मी? गम्मतच आहे!!
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:40 am: |
| 
|
लोपा... कुठली चारोळी? आफताबने ती गेली तेम्व्हा रिमझीम या कवितेचे विडंबन टाकले होते. त्यातल्या काही ओळी पुसटश्या आठवत आहेत... ती आई होती म्हणूनी... इथे त्याने... ती बाई होती म्हणूनी मी तिला चिकटलो वगैरे लिहीले होते. आणि मी फक्त त्याला अशा सूंदर विषयावरच्या विडंबनामध्ये किमान चांगला विषय तरी निवडावा अशी सुचना केली होती. आणि किमान एक कवी म्हणून ही सुचना मी नक्कीच देऊ शकतो. काय? आणि त्यावेळी तुझा काहीही संबंध नसताना तू माझ्या जीवनातली घडी या विडंबनावर एक सूंदर भडक मत प्रदर्शीत केलं होतं याचीच मी तुला आठवण करून दिली यात माझी काय चूक आहे तेवढे सांग.
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:42 am: |
| 
|
आता तिला जर माझ्या पोस्टमध्ये मुद्दाच दिसत नसेल तर मग माझ्याइतका दुर्बोध लेखक सोधून सापडणार नाही. हो ना...
|
मला तुझा पूर्ण approach च खटकलाय सारंगा I MEAN IT टीकाकारांच्या साहित्यांची मूल्यं तपासणारे आपण कोण ? आणि टीका करणारे सगळे कवीच कुठे होते ? घाणेरड्या भाषेत लिहीलेल्या कवितांवर आक्षेप नाही घ्यायचा ? ते ही वारंवार अनुल्लेख आणि समज देऊन झाल्यानंतरही ? आणि जर टीकाकारांच्या कविता टाकाऊ होत्या तर तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी का नाही लिहीलं तसं ? आज आपण टीकाकारांना विचारतो की तुमच्या कविता कश्या होत्या ते आधी बघा . म्हणजे आपण टीकाकारांवर टीकाच करतोय ना ? मग उद्या हाच प्रश्न त्यांनीही आपल्याला विचारला तर ? असो . तुला हे का घडलं नीट माहीत नाहीये
|
Chinnu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:45 am: |
| 
|
सारंग बाळा, मोदकच का? तुला जे हवे ते घे!! म्हणणं इतकच की मुद्दा भरकटला. गैरसमज नकोत.
|
सारंग मला तर ती जीवनाची घडी तु लिहिलेल होतं हे तेव्हा तरी नक्किच माहित नव्हत मी बहुदा दिनेश्दांना अनुमोदन(मोदक) देत होते. (पण मला हे नक्कि आठवत्य की मी मायबोली वर आल्या आल्या एका कवयत्रीचा आणि तुझा वाद झाला होता तेव्हा तुझी बाजु घेणारी मी एकटी होते.) आत्ता लक्षात आल माझ्या म्हणुन तु मला अनुलेखाने मारत होतास होय, मी समज्तेय माझ्या कविता तुला आवडल्या नाहित .. असो जाउदे मी निघाले..
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:00 am: |
| 
|
चिन्नू गैरसमज होणार नाहीत याची हमी देतो. तू पण गैरसमज करून घेऊ नकोस. असो. सोड ते... लोपा... अनुल्लेख फक्त एकाच कारणामुळे करतो मी. कविता आवडली नाही तर... आणि मी तरी माणूस पाहून कधीच कविता वाचत नाही. लोपा... दिनेशदांच्या चांगल्या प्रतिक्रियेला वाईट शब्दात अनुमोदन कसे काय देतात? अजूनही तिथे जाऊन पहा हव तर... विडंबन छान आहे असंच म्हणाले होते ना दिनेशदा असो पण तुझाही काहीतरी भलता गैरसमज झाला असावा. सोड ते... वैभव... सगळेच शिकाऊ म्हणायचं आणि एकीकडे बाकीच्यांना रटाळ म्हणायचं हे दुहेरी आहे . अरे वैभवा... मला हेच सांगायचय की आपणही पुर्वी अशाच कविता केल्या होत्या हे विसरून कसं चालेल...? आज आपण टीकाकारांना विचारतो की तुमच्या कविता कश्या होत्या ते आधी बघा . म्हणजे आपण टीकाकारांवर टीकाच करतोय ना ? मग उद्या हाच प्रश्न त्यांनीही आपल्याला विचारला तर ? अरे वैभवा... मला हेच सांगायचय की आपणही पुर्वी अशाच कविता केल्या होत्या हे विसरून कसं चालेल...? आणि शेवटपर्यंत मी हेच म्हणतोय की आपण एकमेकांना संभाळून घ्यायला पाहीजे. ज्या आक्षेपार्ह पोस्ट वाटत असतील त्यावर admin ला घेऊ दे ना आक्षेप. आपण फक्त त्यंना सांगू शकतो. परत सांगतो की टीकाकार होणं सोप्पं नाहीये मित्रा. त्यासाठी अजून बर्याच गोष्टी हव्यात. आता इथल्या प्रत्येक कवितेची अशी चीरफाड करायची ठरवली तर कसं होईल? करायची का? किती जणं असं केल्यावर इथे लिहीतील. बोलणारा काय रे... सगळ्यात भारी कोण... त्याने काय म्हटलय... मग आपणही तेच म्हणू असा approach ठेवतात. शेवटी सगळे उगवत्या सुर्यालाच नमस्कार करतात रे! पण माझ्या एकाही पोस्टमध्ये वाद वाढवण्यासारखं काहीही material नसताना तू भरपूर वाद लांबवलेला दिसतोय. त्या कविता... ज्या काही (आई या विषयावरच्या) असतील त्या जर आक्षेपार्ह आहेत तर त्यावर admin ला बोलू द्या ना... तुला हे का घडलं नीट माहीत नाहीये... मला ते जाणण्याची गरजही वाटत नाही. कारण पुर्वी मी आणि स्वाती दोघेच अशा प्रकारच्या दर्जा खालावलेल्या कवितांबद्दल बोलत होतो आणि तेंव्हा समर्थन करायचं सोडून बाकीचे लोक माझ्याच साहित्यावर तुटून पडल्याचा हास्यास्पद प्रकार मला पुर्वीही पहायला मिळालाय आणि तो आजही मिळतोय. एवढा चांगला मुद्दा मांडूनही लोकांना मुद्दाही सापडत नाहीये. काय म्हणावं याला. यांना जर साधा मुद्दा सापडत नसेल तर कवितेतला अर्थ कळेल का? कुणालाही घालून पाडून प्रतिक्रिया देण्याचा आपल्याला काय हक्क आहे एवधा आणि एवढाच माझा मुद्दा आहे अरे किमान कुणाला चांगल्या गोष्टी सांगता येत नसतील तर वाईट गोष्टीही सांगू नयेत...
|
अरे हे काय चाललंय इथे? मी खरंतर अश्या वादांमध्ये पडायचं नाही असं ठरवलं होतं, पण आता रहावत नाही. १. सन्मी आणि भडक प्रतिक्रिया देणारे सर्व, तुमची तळमळ मला कळते. पण मध्यंतरी एका प्रकरणात मला ऎडमिन यांनी (सौम्य भाषेत आणि काही आगंतुकांनी कठोर भाषेत) अशी 'समज' दिली होती की 'दर्जाची कात्री लावायची नाही' असं मायबोलीचं धोरण आहे. मग तुम्ही आणि मी चिडून काय होणार? २. आणि यात गंमत अशी आहे, की दर्जा ही फार सापेक्ष गोष्ट आहे. कलेच्या बाबतीत 'नियम' असं काही नसतंच. काही कविता प्रचलित नियम मोडतात आणि नवीन नाणी पाडण्याइतक्या चांगल्या असतात. तर काही सगळे नियम पाळूनही नाहीच भिडत. बरं, ज्या कविता तुम्हाआम्हाला आवडतात, त्या न आवडणारे कितीतरी लोक इथे मायबोलीवरच आहेत. त्यांना आपण काय उत्तर देणार? तेव्हा ही तळमळ कितीही खरी असली तरी व्यर्थ आहे. २. नवीन (आयडी आणि कवीही) आम्ही आजवर इथे लिहीत आलो, चर्चा करत आलो ते सर्वांनी एकमेकांच्या मदतीने शिकू, सुधारू या भावनेने. तेव्हा प्रतिक्रियांमागच्या भावनेचा आदर करायला शिका. इथे कोणीही कसलं शत्रुत्व आहे म्हणून वाईट अभिप्राय देत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. जुने-नवे असं काहीही नाहीये. तेव्हा जरा तो चष्मा उतरवून आत्मपरीक्षण करता आलं तर बघा. ३. सारंग, तू माझ्या कवितेचा असा चुकीचा संदर्भ का देतोयस? इथे कुणीच काहीच 'तोडायला' निघालं नाहीये. ४. >>>>>>> अरे मित्रा... सहजपणे जर सगळ्याच कविता कळू लागल्या तर मग पद्यात आणि गद्यात फरक काय (परत एक मुक्तछंदावर टोमणा) आता कंसात यासगळ्या गोष्टी नमूद कराव्या लागणार असतील तर गद्यही अवघडच म्हणायचं... म्हणजे नक्की काय सारंग? आता वैयक्तिक मला दुर्बोध कविता आवडत नाहीत, पण त्या आवडणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे हे मी अमान्य करू शकत नाही. कवितेने निदान एक अर्थ ताबडतोब द्यावा असं माझं मत. नादमयता ही एकमेव कसोटी कशी असू शकते? मग कुठलाही तराणा म्हणजे काव्यच का? आणि मुक्तछंदाबद्दल नक्की काय म्हणाला आहेस? नाही, माझ्या एका मुक्तछंदातल्या कवितेचंच उदाहरण दिलं आहेस म्हणून विचारते.
|
मग तू कशाला बोलला होतास आफ़ताब च्या आई ह्या विषयाच्या विडंबनावर ? admin ला बोलू द्यायचं होतंस
|
Milindaa
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:11 am: |
| 
|
मग तू कशाला बोलला होतास <<< आता काय झिंज्या उपटणार का दोघे एकमेकांच्या?
|
नाही मिलिंदा .. तुझा गैरसमज झालय .. हा तात्विक वाद आहे .. आम्ही चांगले मित्र आहोत
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:14 am: |
| 
|
वैभव... मी तुझ्या ज्या मार्गाचं अनूमोदन केलं होतं ना तो मार्ग स्विकारला होता म्हणजे मी माझी बाजू तिथे नक्कीच clear केली होती आणि हा विशय आपण रात्री discuss करू. ठीक आहे? स्वाती... तोडणे या शब्दाचा तूच चुकीचा अर्थ लावू नकोस. please . दुर्बोधता आणि मी हे पुस्तक वाच गं... मुक्तछंद... आपल्या दोघांचेही आवडते कवी म्हणून मी कुसुमाग्रजांचच उदाहरण देतो. त्यांच्या गद्य कविता देखील वाचताना एक वेगळी लय जाणवते. para त्यांनी तोडून तोडुन कधीच उतरवलेला नाही. बस एवढंच... बाकी अजून गैरसमज वाढवू नका. पण परत एकदा सांगतो... आपल्याला कुणालाही भडक प्रतिक्रिया देण्याचा अधीकार नाही. स्वाती... मुद्दा क्र १... मी आधीच याविषयी वर चर्चा केली आहे. योग्य तेच बोललीस तू. २ अनुमोदन.. मी ही हेच सांगतोय नाही का... परत २ पुन्हा तेच. मी ही हेच सांगतोय. ३ आणि ४ वर लिहीलंच आहे.
|
Sarang23
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:16 am: |
| 
|
मिलींदा.. वैभवच्या पोस्टला अनुमोदन... आपण सगळेच हा वाद चांगल्या spirit ने घेऊ या अशी विनंती. वर बरेच गैरसमज झालेत ते पुढे होऊ देऊ नका...
|
Milindaa
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:16 am: |
| 
|
वैभव, तू माझ्या पोस्ट्मधली smiley बघायला विसरलास... आणि मी ते एडीट केलेलं नाही
|
Imtushar
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:22 am: |
| 
|
वैभव, उष:काल होता होता ची मदत मी फ़क्त कवितेच्या संदर्भविरहीत रसग्रहणाचे उदाहरण देण्यासाठी केला होता. तो सामाजिक आणि राजकिय (आणि म्हणून व्यापक) संदर्भ आहे म्हणून सोडल तरी, बाकीच्या थोर कविंनी व्यक्तिगत आयुष्यातील संदर्भ वापरलेले आहेत. सुर्वे हे एक उदाहरण, दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे दुसरं आणि अजून ठळक. पाडगावकरांनी कैक तत्कालीन संदर्भ वापरले. आता या सगळ्या कविंचं काव्य केवळ 'व्यक्तिगत, तत्कालीन सामाजिक अथवा राजकिय' संदर्भ समजला नाही म्हणून वाईट ठरत नाही माझा मुद्दा इतकाच होता. आणि कवितेल अर्थ असायलाच हवा (भलेही कविता अगदी दुर्बोध असो... अगदी पेशव्यासारखी (पेशवा कोण ते विचारू नका)), व्याकरणाच्या किमान (?) निकषंवर कविता उतरायला हवी, मुक्तछंद का होईना पण छंद हवा वगैरे सर्व मतांशी मीही सहमत आहे. तुषार
|
अरे पण मला प्रश्न पडला ना . हसत खेळत का होईना उपटायला माझ्या अश्या किती झिंज्या शिल्लक आहेत ? मग मॅच एकतर्फी नाही का होणार ? सारंग .. बोलू आपण .. ना नाही माझी .. मी तुला बॅकग्राउंड सांगतो आणि तू तुझ्या पोस्टमधली बरीच वाक्य पुन्हा म्हणून दाखव मित्रा .. तुषार .. मेलवर बोलू .. असो . धन्यवाद .. माझा पूर्णविराम ...
|