Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 30, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through January 30, 2007 « Previous Next »

Naveen
Tuesday, January 30, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजेश तुम्ही जे लिहिलेलं आहे ते मी ठरवलंच होतं कि, "पुन्हा ईथे कधी लिहिणार नाही" पण, मी तरी काय करणार? कारण एक म्हण आहे कि "देव तारी त्याला कोण मारी" अगदी असच घडलं. सारंग, पुजा हे माझ्यासाठी देव होऊन आले. कारण तुम्हाला माहीतच असेल. हो ना!
जर माहीत नसेल तर सारंग आणि पुजा ह्यांनी जे लिहिलेलं आहे ते वाचावे ही विनंती.(ईछा असेल तर)

सारंग, पुजा धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिल्यामुळे बरं वाटलं. राजेशनी लिहिल्याप्रमाणे मी ठरवलंच होतं कि "पुन्हा ईथे लिहिणार नाही" पण "देव तारी त्याला कोण मारी" हे ही तेवढच खरं आहे.

सारंग
"Successive failures are not always the result of less and undirectional efforts, but are always of ones attitude!" ,
"फूटी आँख विवेक की लखै ना संत असंत
जाकै संग दस बीस है ताको नाम महंत..!!"
मी हे कधीच विसरणार नाही.

चिन्नु
यमाने जर आत्मा मुक्त केलाच नाही तर देव जन्माला कसा घालणार? म्हणून यमाला साकडे ह्यासाठी घालायचे कि माझा आत्मा तूमच्यापासून(यमापासून) मुक्त करू नका.

वैभव जोशी
अहो राग कसला? बहुतेक तुम्ही काही दिवसांपासून कविता
BBवर नव्हता वाटतं. मागचे काही Archive वाचल्यावर तुमच्या सर्व शंका दुर होतील असं वाटतं मला. असो.
कवितेतला / ली " तू " हे एकाच व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे.
आणि "तुम्ही" हे अनेक व्यक्तींसाठी लिहिलेलं आहे.
त्या "तू" नावाच्या व्यक्तीचं मी नाव सांगू ईच्छित नाही आणि सांगणार पण नाही.
त्या एका व्यक्तीने सुरू केलेल्या कामात बर्‍याच लोकांनी सहभाग नोंदविला म्हणून त्या सर्वांसाठी "तुम्ही" हा शब्द वापरला.
'वाद" होता तो कदाचित माझ्या भल्यासाठी. म्हणतात ना "वाहत्या गंगेत प्रत्येकजण हात धुवून घेतो" अगदी असंच घडलं. पण "वाद" नेमका काय होता हे तुम्हाला मागचे काही आर्चिवे वाचूनच कळेल.
एकदम माणसाचा जन्म घेणार नाही अशी प्रतिज्ञा का ? कारण आयुष्यात आलेल्या काही दु:खांमूळे माणूस खचून जातो आणि त्यातूनच अशाप्रकारची प्रतिज्ञा घ्यावी वाटते.
माणसाच्या हातात नसतं पण, आपल्याला आपल्यावर जर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड वाटत नसते.

तुमचं म्हणनं अगदी योग्य आहे. मागची एकही गोष्ट माहीत नसेल तर हे सर्व प्रश्न मनात येणारच.
तुमची आकलन शक्ती अजिबात कमी पडत नाहीय. हे तुमच मोठेपण आहे कि "तुम्ही असं म्हणताय"





Sanghamitra
Tuesday, January 30, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा तेंव्हापासून आवडली.
मोठी झालीय तर काय झालं? शेवटपर्यंत वाचू वाटतेय आणि ताणलेली नाहीये. एखाद्याची उंची आईवडील ठरवू शकत नाहीत तसंच कवितेच्या लांबीचं. पण नैसर्गिक लांबी नाही म्हणून काठीचे टेकण दिले तर त्याचा विदुषक होतो हे नक्की. :-)
वसंत रात्र कवितेची कल्पना छानय.
मीनू तुझे अभंग आवडले.

वैभव तू लिहीलेयस ते सगळे मान्य पण एक सांगू? असा विनय समजूतदार लोकांना दाखवावा. तुझा वेळ कशाही खरडलेल्या मराठीसदृश ओळींवर निरुपणं करण्यात घालवू नकोस.
कविता ही काही शिकवण्याची गोष्ट नाही. ती आतच असायला हवी. हं काही बाजू लंगड्या असतील तर थोडे पॉलिशीन्ग करून आणि साधना करून जमेल खरे पण मुळात कशातच काही नसेल तर कशाला वेळ घालवायचा?
भाषा, कल्पना, मांडणी आणि ओघ यापैकी काहीतरी हवं की कवितेसारखं.
ज्यांना मराठीच्या किमान एका बोलीभाषेचं व्याकरण आणि शुद्धलेखन जमत असेल त्यांनीच लिहावं इथं.
खरं म्हणजे आता "तुमची कविता आवडली" सारखी "तुमची कविता अज्जिबात आवडली नाही" अशा प्रतिक्रिया द्यायची वेळ आलेलीच आहे.
सारंग काही दर्जा राखायचा असेल तर असा उदारमतवादीपणा चालणार नाही मित्रा.
कवितेसाठी पण एक " testing area " सुरू करावा आता.


Chinnu
Tuesday, January 30, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि भातुकली टचिंग ग. आठवणी सांडल्या, तुकडा रेंगाळला, खुप भिडुन गेलं.
नवीन खुलाश्याबद्दल धन्यवाद.
हाय सन्मी! हाय वैभव!


Indradhanushya
Tuesday, January 30, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी... testing area ऐवजी Feedback BB सुरु करावा... फ़क्त कवितेसाठी
वैभव, सारंग, सन्मी... गतीरोधक फ़ार झाले आहेत... तुमच्याही कविता येऊ देत... :-)


Mankya
Tuesday, January 30, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक डाव जिंकुन
बाकी सारे हरलो

स्मि ...... हे आवडलं !

माणिक !


Lopamudraa
Tuesday, January 30, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस आणि पुलसती अनुवादीत कविता टाकायची link दिलिये.
मानस देशाचे गीत खरच सुंदर आहे, मस्त...!!!
स्मिता कविता छान आहेत.
पुजा तुझी मोठ्ठी कविता आवडली,
चिनु तर प्रश्नच नाही अगदी नाजुक लिहिते.
नविन तुमच्या कवितेत काय चुकले हे सांगण्याइतकी मी कवयत्री नाही, पण वाचक म्हणून आवडली नाही.
ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस०३३८५३०८९्त्म्ल?११६०९८१४६६

Imtushar
Tuesday, January 30, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
बर्‍याच कवितांना संदर्भ असतो... it should be self descriptive without any explanations हा हट्ट सगळीकडेच योग्य नाही. e.g. सुरेश भटांची उष्:काल होता होता... ही सन्दर्भाविरहीत ही भावते ती केवळ तिच्या काव्यमूल्यांमुळे. आणि हे केवळ एक उदाहरण...

नवीनच्या कवितेबद्दलच बोलायचे झाले तर पहिली तीन कडवी मला तरी व्यवस्थित समजली आणि काव्याचा दर्जाही बरा वाटला (इतर कविंसोबत तुलना कराल तर well above average... .

ह्या चळवळीत तुम्ही सर्व एकत्र आलात
पण, मी मात्र एकटाच पडलो

हे तर खरच खूपच स्पर्शून गेलं... त्यातील वेदना समजली, भिडली आणि नवीन सारख्यांच्या काव्यात सुधारणा व्हावी यासाठी जे समीक्षक प्रयत्न करत होते त्यांना अंतर्मुख करण्याची क्षमता असलेली वाटली.

शेवटच्या ३ मध्ये नवीन च्या भावनांनी त्याच्या कवितेवर कुरघोडी केली... भावनेच्या भरात कविता लिहीणे आणि भावनांना कवितेत उतरवणं यातील फ़रक नवीन ला जर समजला नसेल अद्याप, तरी समजायला फ़ार वेळ लागणार नाही.




Naveen
Tuesday, January 30, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुशार तुम्ही खूपच सुंदर पध्दतीने विश्लेषण केलं आहे...धन्यवाद.
आभारी आहे.

मान्यवरांची दाद मिळण्यासाठी
कविता अगदी सुरेखच असावी लागते
नाहीतर आपलीच कविता
आपल्याला न्याय मागते

काही म्हणा, प्रत्येकाच्या कवितेची
एक वेगळीच शैली असते
भरमसाठ कवितांनी भरलेली
प्रत्येकाजवळ एक थैली असते

हो ना?


Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very well said Tushar...

वा रे नवीन! खास म्हणजे एकदम खास!!
पण पहिलं कडवं अजून वेगळं करू शकला असतास...

सगळ्याच कवितांना अर्थ असावा हा अट्टाहास एकदम चुकीचा आहे. अनाकलनियाचे काहीतरी आकर्षण असतेच की! आणि नादमय शब्दयोजन अशा गुढ कवितेला नक्कीच पोषक असतं... मला तशाच कविता जास्त भावतात. कारण मग प्रत्येक वेळी वाचताना नवीन अर्थ मिळतो. असो हा वेगळा मुद्दा आहे...
आताची नवीनची कविता तशी खूप amature जरी असली तरी इथे लोक ज्याप्रकारे प्रतिक्रिया देताहेत तितकी टाकाऊ निश्चीतच नाही.
आणि वर ज्या ज्या कवींवर टीकेची झोड केली आहे ती नाहक आहे. त्याला काहीही अर्थ नाही.
मला वैभवच्या मताचे समर्थन करावेसे वाटते... अरे जर तुम्हाला कविता आवडली नसेल तर कारणे सांगा.
का आवडलं नाही हे सांगायला कुठल्याही समिक्षकाची गरज नसते! ती गरज आवडलं असेल तर का आवडलं हे सांगयला लागते!!
उगीच री ओढत बसण्यात काही अर्थ नाही. जे चुकतायत त्यांच्या चुका तरी दाखवा किंवा त्या सापडत नसतील तर किमान दुखर्‍या शब्दांच्या टीका तरी बंद करा.

जे टीका करत आहेत त्यांनी परत एकदा आपली कविता, विषय वैविध्य, विषयाची मांडणी, मात्रांचा सम प्रमाणातात वापर या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा

सगळ्यात मह्त्त्वाच... कोणीही जन्मतःच कवी नसतो. तो घडतो. पण सगळेच जण टीका उत्कर्षासाठी वापरतील अस नाही. काही त्यातून खच्ची होतानाही मी पाहिलेले आहेत.

जे इथे टीका करतायत त्यांनीही अशा कित्येक रटाळ आणि भारंभार कविता लिहिल्या असतील, पण त्यांना अशी वागणूक मायबोलीवर मीळाली का?

शेवटी इतकच की आपल्याला कुणालाही दुखवायचा अधीकार नाही. आवडलं नाही तर अनुल्लेख आहेच. आणि खूपच वाटत असेल तर स्वातीने म्हटल्याप्रमाणे constructive criticism करा. पण कृपया कोणालाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देवू नका ही विनंती.
कुणी लिहावं आणि कुणी नाही हे सांगण्याचा कुणालाच अधीकार नसतो. ते ज्याचं त्याने ठरवावं. विचार व्यक्त करण्याची स्वतःची प्रत्येकाची वेगळीच शैली असते, आपण फक्त तीचा आदर करावा.
शेवट स्वातीच्या कवितेच्या ओळीनेच करतो...

अरे, नीट जोडता आलं नाही इथवर ठीक होतं..
नीट तोडताही येऊ नये...???



Kiru
Tuesday, January 30, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा कवितेचाच BB ना!!
सारंगा, एवढी मेहनत घेण्यापेक्षा(लाल, निळं, काळं, पुन्हा निळं) एखादी छानशी कविता लिही बघू.


Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरू... लाल, निळं, काळं.. पुन्हा निळं. पुन्हा निळं काय...

Vaibhav_joshi
Tuesday, January 30, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खरंच सखेद आश्चर्य वाटतं .सामाजिक,राजकीय इतिहास,स्वातंत्र्य चळवळी अश्या संदर्भांची एका माणसाचे चार जणांशी झालेल्या मतभेदांशी कशी काय तुलना होवु शकते?
उषःकाल होता होता चा संदर्भ सोडला तरीही त्या कवितेतली ओळ न ओळ अजूनही ऍप्लिकेबल आहे.

नवीनच्या कवितेत पहिलं कडवं काय सांगतं? कसले दोन शब्द?संदर्भ नसेल तर काय कळणार ह्यातून? रोजच वाढतेय चळवळ म्हणजे काय? त्या आधी इतर लोक सामील झाल्याचा उल्लेख नको काय? असो. पुन्हा त्याच विषयावर तेच लिहीण्यात काही अर्थ नाही.तुषार तुमचे विचार तुमचे आहेत,माझे विचार माझे .

सारंग...

" सगळ्याच कवितांना अर्थ असावा हा अट्टाहास एकदम चुकीचा आहे. "

विषयच मिटला
" अनाकलनियाचे काहीतरी आकर्षण असतेच की! आणि नादमय शब्दयोजन अशा गुढ कवितेला नक्कीच पोषक असतं... मला तशाच कविता जास्त भावतात. कारण मग प्रत्येक वेळी वाचताना नवीन अर्थ मिळतो ..... "

अर्थ नसावाच अश्या लिहीलेल्या कवितेतून गूढ उकलत प्रत्येक वेळी नवीन अर्थ ?


" मला वैभवच्या मताचे समर्थन करावेसे वाटते... अरे जर तुम्हाला कविता आवडली नसेल तर कारणे सांगा.
का आवडलं नाही हे सांगायला कुठल्याही समिक्षकाची गरज नसते! ती गरज आवडलं असेल तर का आवडलं हे सांगयला लागते!! "
तुला आवडली आहे असं तू लिहीलंच आहेस सांग ना नवीन च्या कवितेत काय आवडलं?

मला कालही स्वातीच्या ब्लॉगवरील संत कबीरंच्या दोह्याचा तुझ्या पोस्टशी असलेला संदर्भे कळला नव्हता आणि आत्ताच्या ह्या तिच्या कवितेतल्या दोन ओळींचाही समजत नाहीये
एकीकडे फारच क्रूरपणे टीका करणारयांनी तोडलं म्हणायचं आणि दुसरीकडे
" नीट तोडताही येऊ नये ? "
असं विचारायचं.
काही कळलं नाही


मला फक्त दुखरया शब्दांत टीका करू नये इतकं पटलं



Kiru
Tuesday, January 30, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीनभाऊ, नवीन असतानाही फार गोंधळ घातलात इथे राव तुम्ही..

Sanghamitra
Tuesday, January 30, 2007 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, तुषार सगळ्याच कवितांना सोपा आकलनीय अर्थ असावाच असा हट्ट नको हे पटलं.
पण कुठंतरी काहीतरी भावणारं असावं की नको?
चुकीचे शब्द, भाषा आणि अर्थहीन वाक्यं तुम्हाला टोचत नाहीत का?
तुषार मी हे लिहीलं ते नवीन साठी नाही बरं का. त्याच्या कविता इतर काही जबरी मारेकरी (कवितांचा मारा करणार्‍या) कवींपेक्षा नक्कीच खूपच बर्‍या आहेत.
वैभवने दोनदा कवींना समजावण्याचा प्रयत्न केला म्हणून लिहीलं ते.
एकूणच कवितेचं असं रसग्रहण काही पटत नाही. पण समजली,आवडली, भावली, भिडली, स्पर्शून गेली यातल्या कुठल्या तरी प्रकारात ती बसायला हवी (स्वतःसाठी नव्हे इतरांसाठी.)
इथं लिहीणार्‍या सगळ्यांना कवी म्हणणं म्हणजे ३५ टक्क्यांचा निकष न लावता सगळ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्यासारखं आहे. निदान ३५ टक्के पडत असतील तरच त्यांना पुढचं शिकवण्यात अर्थ आहे.
असो.

किरू आधी सगळे अर्काईव्ह्ज वाचून काढ आणि मग (सहनशक्ती असेल तर) पुढच्या कवितांची मागणी कर :-)


Kiru
Tuesday, January 30, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, अगं मी मारेकर्‍याला कविता लिहायला नाही सांगीतलं

Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे विचार तुमचे आहेत,माझे विचार माझे .
पटलं.
अर्थ नसावाच अश्या लिहीलेल्या कवितेतून गूढ उकलत प्रत्येक वेळी नवीन अर्थ ?
आपण यावर भेटीअंती बोलू :-) हा एक वेगळा विषय आहे हे मी वरही सांगितले आहे.

सांग ना नवीन च्या कवितेत काय आवडलं?
माझी त्या कवितेवरची प्रतिक्रियात्मक पोस्ट तू बहुदा नीट वाचलेली दिसत नाहीयेस. ती जरूर परत वाच.

मला काल स्वातीच्या दोह्याचा
ओ देवा, थांबा राव.... दोहा कबिरांचा आहे :-)

मी कवितेची दाद एका english quote आधी थांबवली होती. पुढच्या दोन्ही गोष्टी personally नवीन साठी होत्या. त्याला सांगायचं होतं की १० जणांनी एकट्याला ओरडून रडून खोटं सांगीतलं तरी खरं लपत नाही. तो दोहा पण परत नीट वाच.

एकीकडे फारच क्रूरपणे टीका करणारयांनी तोडलं म्हणायचं आणि दुसरीकडे...
मी असं कुठे म्हणालो की नीट तोडलय म्हणून???!!! ते जर नी ट तोडलं असतं तर मला एवढं लिहायची गरजही नसती पडली. इथे नीट तोडन्यचं काम तुझ्यासारखे फार थोडे लोक प्रामाणिकपणे करतात. ज्याला constructive criticism म्हणालो मी...(स्वातीने वर लिहीलय)

मला फक्त दुखरया शब्दांत टीका करू नये इतकं पटलं
हाच तर मुख्तसिर आहे! ज्याच्यासाठी मी एवढे कष्ट घेतोय!

सन्मे, मला पटतय तुला काय म्हणायचं आहे ते... पण आपण एवढाही ताल सोडायला नको एवढच मला सांगायचं आहे. आणि हे सगळं जर तुमच्या सारख्या जाणकारांनी (अगदीच नावानिशी सांगायचंझालं तर तू, वैभव, निनावी, प्रसाद दोन्हीही, बैरागी) सांगितलं तर मी समजू शकतो. पण लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण अशा लोकांनी ताशेरे ओढण्यात काय अर्थ आहे.

लोपा... मी चारोळि हा प्रक्कार मुळिच वाचत नाही. आज विषय निघालाच आहे आणि तू दिलेलं वाक्य एकदम resembling आहे म्हणून सांगतो. आफताबला याच कारणासाठी एका विडंबनावरून मी आणि निनावी बोललो होतो, आणि तेही अतिशय नम्र शब्दात. आणि तू त्यावेळी माझ्या एका विडंबनाचाही उल्लेख केला होतास... त्यावेळची तुझी भाषाही अगदी अशीच होती. आठवतय का? असो... त्यावेळीही माझा stand असाच होता.
ही वादविवादाची जागा नाही. आणि उगीच इथली जागा वाया घालवण्यात काही अर्थ नाही. खरं ना...




Vaibhav_joshi
Tuesday, January 30, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" सगळ्याच कवितांना अर्थ असावा हा अट्टाहास एकदम चुकीचा आहे. "

????????????????????????????????????????????????

अर्थ नसावाच अश्या लिहीलेल्या कवितेतून गूढ उकलत प्रत्येक वेळी नवीन अर्थ ?
आपण यावर भेटीअंती बोलू :-) हा एक वेगळा विषय आहे हे मी वरही सांगितले आहे.
बोलू की .. पण " हा वेगळा मुद्दा आहे " हे वरच्या पोस्टमध्ये नंतर लिहीलेलं आहे
:-)

by the way स्वातीचा दोहा असं चुकून लिहील्याचा वापर होणार हे लक्षात आल्याने मी त्याचं श्रेय संत कबीरांना आधीच दिलं होतं हे तुझ्या चाणाक्ष नजरेत आलंच असेल
:-)



Sarang23
Tuesday, January 30, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" सगळ्याच कवितांना अर्थ असावा हा अट्टाहास एकदम चुकीचा आहे. "

आयुष्यातल्या सगळ्याच प्रश्नांना
उत्तरे असतातच असं नाही
तरी ते प्रश्न मात्र असतात
त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही

अरे मित्रा... सहजपणे जर सगळ्याच कविता कळू लागल्या तर मग पद्यात आणि गद्यात फरक काय (परत एक मुक्तछंदावर टोमणा) आता कंसात यासगळ्या गोष्टी नमूद कराव्या लागणार असतील तर गद्यही अवघडच म्हणायचं... :-)

इथे काही काही सोयी झकास आहेत बरं का... लिहीलेल edit करता येतं...
तें संत कबीर आपण त्यानंतर पाच पोस्ट आल्यावर edit केलत वैभवराव :-)


Vaibhav_joshi
Tuesday, January 30, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्नांना उत्तरे नसणे आणि प्रश्नांना अर्थच नसणे एकच का मग ?

सहज कळायला हव्यात असं कुठे म्हणालो ? सहजता ही एक लिहीणार्‍याची तबीयत आहे पण . गूढ लिहीणार्‍यांनी गूढ लिहावं पण त्यातील अर्थाचा अट्टाहास धरण चूक कसं ? किमान एक अर्थ लागायला नको ? पुढचे शेकडो अर्थ वाचणार्‍यावर अवलंबून आहेत .
माझा दोन्ही पद्ध्दतींना आक्षेप नाहीये पण आपल्या मते

पृथ्वीचे प्रेमगीत म्हणजे कविता आणि

प्रेम म्हणजे प्रेम असतं
कसे सरतील सये
अताशा असे हे मला काय होते

हे गद्य
असे आहे काय ?

सोयी झकास आहेत हे मान्य . ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला देता येतं आणि उत्तरं देण्यापासून सुटका म्हणून पण वापरता येतं . चला सोयीच्या मुद्द्यावर तरी एकमत झालं

तुम्ही चारोळी वाचत नसाल सारंगराव तर बाकीचे लोक का भडकले हे तुम्हाला माहीत नसताना त्यांच्यावर तोंडसूख घेणं चूक आहे

मी तुला मागून मिठी मारतो
मग आरशात बघतो

सारख्या काव्याला आपण कुठल्या तरी बैठकीत दुजोरा दिलां असता काय ?

आणि एका कवीनेच " कवितांना अर्थ असायलाच हवा असे नाही " म्हणणे , मुक्तछंदासारख्या काव्यप्रकाराची टर उडवणे ह्या गोष्टी बरंच काही बोलून जातात नाही ?


( बोजड शब्द + मात्रा + यमक ) - आशय = कविता


Lopamudraa
Tuesday, January 30, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारांग एकी कडे तु नविन म्हणुन बाजु घेतोय आणि नविन म्हणुन मला नाव ठेवतोय नक्कि काय म्हणाय्चेय तुला??
तुला वैय्क्तीक मी काहीही म्हटलेले नसत्ताना.. ..
मी आजही नविनच आहे, आणी जुन्या व्यक्तिनी वाइट म्हटलेले मी आणी इतरानी खुप वेगळ्या प्रकारे घतले. असो मी माझे post delet करते, इथल्या झक्कस्स सोयींचा वापर करुन...
वैभव ला मी खुप मोठ्ठा कवी मानते पण त्याचीही कविता जर आवडली नाही तर आम्ही बिन दिक्कत पणे सांगतो, जाउ दे वैभव एव्हढ्या वेळात एखादी " नविन " कविता तयार झाली असती. D:
btw archive मधल्या चारोळ्या वाचुन बघ ह...!!
चीनू हळवी वैगैरे नाही होत ग, पण जर यांना एवढ्या भावना समजतात तर त्याना हे नक्कि समजत असेल ना कि दुसर्‍याला नक्कि काय म्हणाय्चेय???





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators