|
Imtushar
| |
| Thursday, January 25, 2007 - 11:54 am: |
| 
|
चाणक्य, छंद आणि वृत्तांमध्ये कुठे कविता तर हरवत नाही ना? मित्रांनो, गज़लेमध्ये फ़क्त मीटर जमत असेल आणि एखादी मात्रा इकडची तिकडे झाली तर चालते का? पण एकंदरीत सगळ्यांच्याच कविता छान आहेत.
|
अभिजीत, पुलस्ती, चाणक्य, तुमचे प्रयत्न छान आहेत. आवडले. इच्छुकांसाठी गज़लेच्या बाराखडीची ही लिंक ( पुन्हा) देत आहे.
|
Nisha_v
| |
| Friday, January 26, 2007 - 5:27 am: |
| 
|
स्वाती लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या लिंकचा खूप उपयोग होईल.
|
Bairagee
| |
| Friday, January 26, 2007 - 10:20 am: |
| 
|
पूजाएस '' तेव्हापासून......'' फार फार आवडली. असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?
|
Manas6
| |
| Friday, January 26, 2007 - 11:36 am: |
| 
|
आज फुलांची भाषा..... आज फुलांची भाषा मजला कळते आहे गंध भरोनी ऊर अता दरवळते आहे उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही? कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे? शांत सागरा, आज कश्या रे निमूट लाटा? काय आज रे तुझ्या मनी खळबळते आहे? आज वाल्मिकी पुन्हा करा सुरवात नव्याने, क्रौन्च होऊनी ऊर आज भळभळते आहे एक पालखी आज जरी ही दूर निघाली, नजर 'आतली' मात्र मजकडे वळते आहे! आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला , पान नि पान तयाचे हे सळसळते आहे! - मानस६
|
Pulasti
| |
| Friday, January 26, 2007 - 12:00 pm: |
| 
|
मानस - आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला , पान नि पान तयाचे हे सळसळते आहे! वा!!!
|
Pulasti
| |
| Friday, January 26, 2007 - 12:03 pm: |
| 
|
"जळ्मटे" गांडीव धरणार्या करांवर आसवांची जळ्मटे? निश्चयाला शाप आहे - भावनांची जळ्मटे. मज मिळाले सर्वकाही नेहमी, दुर्दैव हे! शांतवू चित्ता कसे असता सुखाची जळ्मटे. केवीलवणे हास्य होते, अन हरपतो हुंदका चढती अशी संवेदनांवर ही यशाची जळ्मटे. व्हायचे होऊन गेले, वाद मिटले, पण तरी अंतरी चिकटून बसली त्या क्षणांची जळ्मटे. लोकशाही भारताचे स्वप्न होते, काय उरले? संमोहलेली अन भुकेली ही मतांची जळ्मटे.
|
मानस, छान आहे गज़ल. पुलस्ती, सगळ्याच कल्पना छान आहेत. पण मला मात्रांत मात्र गडबड वाटत्ये. चुभूद्याघ्या.
|
मानस, छान! पण ऊर भळभळते आहे ही शब्दरचना ठीक नाही वाटत. ऊरातली जखम भळभळते नाही का?
|
Manas6
| |
| Saturday, January 27, 2007 - 10:59 pm: |
| 
|
पुलस्ती, स्वाती म्हणतेय ते बरोबर आहे.. काही ठिकाणी मात्रांची गडबड आहे..मी काही शेर परत लिहिले आहेत...बघ कसे वाटतात ते?(कृपया चु.भु.दे.घे) ज्या करी गांडीव त्यावर आसवांची जळमटे? निश्चयाला शाप होती भावनांची जळमटे. मज मिळाले सर्वकाही नेहमी दुर्दैव हे! शांतवू चित्ता कसे असता सुखाची जळमटे. दीनवाणे हास्य होते, अन हरपतो हुंदका ग्रासती संवेदनांना ही यशाची जळमटे. व्हायचे होऊन गेले, वाद मिटले, पण तरी अंतरी चिकटून बसली त्या क्षणांची जळमटे. लोकशाही भारताचे स्वप्न होते, पण अता? मोहलेली अन भुकेने ही मतांची जळमटे. मतला आणि ४था शेर खुप आवडले..पण ३ऱ्या शेराचा अर्थ स्पष्ट होत नाही. -मानस६
|
Pulasti
| |
| Sunday, January 28, 2007 - 10:03 pm: |
| 
|
मानस, स्वाती - मात्रांची गडबड लक्षात आणून दिल्याबद्दल फार आभारी आहे. पुढच्या वेळी मात्रांची नीट काळजी घेईन. कविता मायबोलीवर टाकायची थोडी घाई केल्याबद्दल क्षमस्व. मानस - ३र्या शेराबद्दल - आयुष्यातले टप्पे पार करता करता.. नकळत.. आपल्याला आपली स्वत:ची आणि इतरांचीही सुखं आणि दु:खही पूर्वीइतक्या तीव्रतेने जाणवत नाहीत. संवेदना बोथट होत जातात. आणि, आपल्याला मिळालेल्या यशाचा याच्याशी कुठे तरी संबंध असतो. अर्थात, हा झाला मला अभिप्रेत असलेला अर्थ. म्हणावा तसा शेरातून पोचत नहिये हे खरं! -- पुलस्ति.
|
Mankya
| |
| Monday, January 29, 2007 - 2:56 am: |
| 
|
मानस .... गझल मस्तच आणि भ्रमराला अनुमोदन .... तेवढ जखमेचं कर ना काहितरी ! पुलस्ति ......Brilliant concept !..... छानच कल्पना मांडलीयेस ! माणिक !
|
Poojas
| |
| Monday, January 29, 2007 - 10:27 am: |
| 
|
सांगतो मी आज माझ्या भावनेच्या वादळाला.. मी मनाच्या उंबर्याला.. आज ओलांडून गेलो.. मागतो मी ते तुझे हसणे.. तयाचा मी दिवाणा.. त्या तुझ्या दिलकश अदांनी.. आज वेडावून गेलो.. पाहिले मी स्वप्नं जो सारा तुझा आभास होता.. त्या धुक्याच्या अस्तराला.. आज लाथाडून गेलो.. बांधतो मी आसवांचे घर उन्हाच्या पायथ्याला.. आज जखमांचा मनोरा.. अंतरी घडवून गेलो.. ठरवले कित्येकदा.. विसरायचे तुज या क्षणाला.. तू पुन्हा स्वप्नात येता.. वाट तव अडवून गेलो..!!!! ही गझल होऊ शकते काय????? माझा मात्रांचा अभ्यास नाहीये... So...Please दोस्तहो चुकांची दुरुस्ती करुन द्याल ना.. हा पण.. अक्षम्य चुका असल्यास मात्र.. CBDG ....!!
|
Sarang23
| |
| Monday, January 29, 2007 - 10:48 am: |
| 
|
पुजा, मतला (पहीला शेर) नाहीये इथे. बाकी व्याकरण ठीक वाटतय... सांगातो... ही टायपींगची चूक असावी. ते सांगतो अस वाचलं...
|
Chinnu
| |
| Monday, January 29, 2007 - 11:32 am: |
| 
|
पुजा, हे बघ कसयं? सांगतो मी वादळाला, आज सांडुन गेलो मी मनाच्या उंबर्याला आज ओलांडुन गेलो! बाकी ठीक आहे. शेवटच्या ओळीत " वाट तव अडवुन गेलो " मुळे थोडी लय बिघडल्यासारखी वाटली. जाणकार सांगतीलच. मस्त आहे. लगे रहो!
|
Pulasti
| |
| Monday, January 29, 2007 - 12:18 pm: |
| 
|
"भळ्भळणार्या" ऊराबद्दल. तांत्रिकदृष्ट्या "जखम" भळ्भळते, ऊर नाही - मीही तसा या प्रतिक्रियांशी सहमत होतो. पण... "माझं अख्खं ऊरच एक जखम होऊन बसली आहे, आणि म्हणून जखम नाही तर ऊरच भळ्भळते आहे" असंही स्पष्टीकरण चालू शकेल. -- पुलस्ति.
|
Pulasti
| |
| Monday, January 29, 2007 - 12:24 pm: |
| 
|
पूजा, "भावनेच्या वादळाला आज मी सांगून गेलो मी मनाच्या उंबर्याला आज ओलांडून गेलो" असे केले तर मतल्याचा प्रश्न अर्थाला धक्का न लावता सुटेल असे वाटते. "आज जखमांचा मनोरा.. अंतरी घडवून गेलो.." -- वा!! -- पुलस्ति.
|
Manas6
| |
| Monday, January 29, 2007 - 1:03 pm: |
| 
|
पूजा, पुलस्तीशी मी सहमत आहे.
|
मानस शांत सागरा, आज कश्या रे निमूट लाटा? काय आज रे तुझ्या मनी खळबळते आहे? वाह ! फार आवडला शेर ... गझल छान . पुलस्ती कल्पना छान आहेत. मानसशी सहमत . मतला व चौथा शेर आवडला . मात्रांवर काम चालू असेलच .. पूजा .. आतापर्यंत तुला मतल्यात काय बदल करावा लागेल ते कळलं असेलच ... मला अर्थाच्या दृष्टीने तिसरा शेर योग्य वाटला आणि आवडला .. बाकी पूर्ण गझलवर अजून खूप काम व्हायला हवं असं वाटलं .. तुला मात्रांची जाण आहे हे तुझ्या छन्दबध्द कवितांतून पाहिलं आहेच .. पण आशयघन लिखाण सोप्या भाषेतून ते सुध्दा दोन ओळीत थेट पोहोचवणे ही जराशी अवघड कसरत आहे .. तू जर एक एक शेर घेऊन तुला काय म्हणायचंय हे लिहीलंस तर चर्चा करता येईल पुलस्ती , मानस , पूजा नावीन मित्रांच्या गझल बघून मस्त वाटलं .. असेच लिहीत रहा इथे
|
Bairagee
| |
| Monday, January 29, 2007 - 11:00 pm: |
| 
|
मानस, तुझी ही गझल कुठेतरी वाचल्यासारखी वाटते आहे. मनोगतावर बहुधा. मतला मस्त. शांत सागरातले "रे रे" खटकते रे एकंदर अज़ून सफ़ाई आली तर उत्तम होईल. पूजा, प्रयत्न चांगला पण शेर अस्पष्ट. पुलस्ति जळमटे हे अन्त्ययमक आणि कल्पना आवडल्या.
|
|
|