Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through January 29, 2007 « Previous Next »

Saurabh
Friday, January 26, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावानुवाद खासच! सही जमलंय..

Bairagee
Saturday, January 27, 2007 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजाएस '' तेव्हापासून......'' फार फार आवडली.

असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?



Tanyabedekar
Saturday, January 27, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आरती प्रभुची कविता वाचल्यासारखी वाटते. का कोण जाणे आज हा सगळा बीबी वाचल्यावर तीची आठवण आली.
एक होता कवी, त्याला वाहव्वा हवी.


Vasant_20
Saturday, January 27, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मला दारु चढत नाही'
ही कविता कुणाकडे आहे का?
कवीचे नाव आठवत नाही.


Shree_tirthe
Sunday, January 28, 2007 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद गणेश बेहेरे.

तुम्ही सर्वांनी खूपच सुंदर कविता लिहिल्या आहेत.
एकदम मस्तं.


Vasant_20
Monday, January 29, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्र

निःशब्द काहीही न बोलणारी
स्मशानातली रात्र
स्टोव्हची घरघर चालु असणारी
स्टॅण्ड वरची रात्र,
कामावरुन दमुन आल्यावर लगेच
झोपणारी रात्र,
डोळ्यात तेल घालुन अभ्यास
करणारी रात्र,
अवख़ळपणे बागडणारी मधुचंद्राची
रात्र,
विरहाची वाट पहाणारी
व्याकुळ रात्र,
उद्याची नवी आशा घेऊन येणारी
रात्र,
कधीच न उठणारी काळरात्र,
रात्र


Mankya
Monday, January 29, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंत ..... कल्पना आवडली !

स्टोव्हची घरघर चालु असणारी
स्टॅण्ड वरची रात्र .... हे खुपदा अनुभवलय पण शब्दात तु उतरवलस !

शेवटच्या ओळीत जराशी गडबड वाटते.

माणिक !


Naveen
Monday, January 29, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!!! वसंत सही. यार.

Naveen
Monday, January 29, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यासारख्यांच हसं होवू नये
म्हणून तुझी चालली तळमळ
तु दोन शब्दांनी सुरु केलेली
रोजच वाढतेय चळवळ

ह्या चळवळीत तुम्ही सर्व एकत्र आलात
पण, मी मात्र ऐकटाच पडलो
मी मलाच प्रश्न विचारत
स्वत्:च्या अस्तित्वावर रडलो

सर्वांचे टोमणे ऐकून घ्यायचे
ही रोजचीच झालीय सवय
माझ्या सावलीला वाटते
आता माझेच भय

सावलीने साथ सोडली
आता, मी जाणार यमाकडे
पुन्हा माणसाचा जन्म देऊ नको
म्हणून... यमाला घालणार साकडे

सर्वकाही विसरून गेलो होतो
दोन शब्द लिहिण्याच्या नादात
मज वेड्याला काय माहीत
लवकरच सापडणार आहे एका वादात

असो. खूप त्रास दिला तुम्हाला
आता ह्यापुढे देणार नाही
काही झालं तरी...पुन्हा
माणसाचा जन्म घेणार नाही


Vasant_20
Monday, January 29, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणक्या आणि नवीन धन्यवाद.
सुचवलेले बदल नक्की अमलात येतील.
वसंत.


Rajankul
Monday, January 29, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असो. खूप त्रास दिला तुम्हाला
आता ह्यापुढे देणार नाही
काही झालं तरी...पुन्हा
माणसाचा जन्म घेणार नाही>>>..
खाली लिही रे
पुन्हा इथे कधी लिहिणार नाही.


Sarang23
Monday, January 29, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! नवीन, छान आहे ही कविता!
फक्त एक दोन ठीकाणी झालेली गल्लत सोडता सुरेख साधलीये अपयशाची व्यथा...
पण...
Successive failures are not always the result of less and undirectional efforts, but are always of ones attitude!

आणि

फूटी आँख विवेक की लखै ना संत असंत
जाकै संग दस बीस है ताको नाम महंत..!!


हे ही वास्तवच आहे! (यासाठी ताईचे आभार, जीने हा दोहा आपल्या blog वर टाकला...)

लिहीत रहा. शुभेछा!

वसंत, रात्र छान!
पण शेवट वेगळा हवा होता असे वाटले... आयुष्यातल्या सगळ्याच प्रकारच्या रात्रींचा परामर्श घेणारी कविता होऊन जाते शेवटामुळे... आणि तिथेच कवितेला धोका संभवतोय असे वाटते. अर्थात हे माझे मत...



Chinnu
Monday, January 29, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंत रात्र छान आहे, पण लिहितांना एका ओळीत दोनच शब्द लिहा, म्हणजे तुटक वाटणार नाही.
नवीन यमाला साकडे? की देवाला साकडे?


Poojas
Monday, January 29, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी..

नवीन.. मलाही आवडली तुमची कविता..!!

तुम्हाला ज्या काही प्रतिक्रीया मिळाल्या त्यांचा तुम्ही गांभिर्याने विचार करताय तर.....
Good going.!!...
मला तरी असं वाटतं..की कवितेला जन्म देणं जमतय तुम्हाला..
हा.. थोडं वळण मात्र लागयचंय.. !!.. पण.. गुलमोहोरवर आलात की आपोआपच होतील काव्यसंस्कार.. rather तुमचा हा प्रयत्न तर त्याचीच साक्ष देतोय..

Very nice !!! ............. असंच लिहीत रहा..


Chinnu
Monday, January 29, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा

चांदण्याच्या धुंद रात्रीत शुभ्र नाहती फुले
तुझ्या डोळ्यात, तुझ्या हास्यात निर्मळ हसती फुले!

मम हृदयाचे पाणी पाणी, कशी जीवघेणी खळी
आणिक ओठामधल्या शब्दकळ्यांचे गीत गाती फुले

पुसटता स्पर्श तुझा, निसटती नजर खाली
गुपित मनाचे तुला सांगता लाजलाजती फुले

शीळ घालतो खट्याळ वारा, कुजबुजते मखमाली
पदरात तुझ्या भान हरपुनी हळुच डोलती फुले

तु नसता सगळे स्तब्ध, खिन्न तो वनमाळी
ये प्रिया! रास रचु या, तुझीच वाट पाहती फुले!!


Mankya
Monday, January 29, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुसटता स्पर्श तुझा, निसटती नजर खाली
गुपित मनाचे तुला सांगता लाजलाजती फुले

........ वाह chinnu जबरीच !

माणिक !


Chinnu
Monday, January 29, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... .... धन्यवाद माणिक.

Vaibhav_joshi
Monday, January 29, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन ...
राग मानू नका पण तुमची कविता मला नाही समजली .. त्यातून नक्की काय म्हणायचंय हेच कळलं नाही . मी कुठल्याही कवितेकडे एक कलाकृती म्हणून बघतो .. it should be self descriptive without any explanations त्या point of view ने तुमची कविता अजिबातच समजली नाही . म्हणजे आणखी दोन वर्षानी मागचं कुठलही background माहीत नसताना ही कविता समोर आली तर मला असे प्रश्न पडतील

१ ) कवितेतला / ली " तू " कोण ?
२ ) मग त्याच एकदम दुसर्‍या कडव्यात " तुम्ही " कसं झालं ?
३ ) कसला वाद ?
४ ) एकदम माणसाचा जन्म घेणार नाही अशी प्रतिज्ञा का ?
५ ) ते माणसाच्या हातात असतं का ?

आपण कदाचित अतिशय उद्विग्न मनःस्थितीत हे लिखाण केलं असेल . मला पूर्ण आदर आहे . पण आअधी म्हट्ल्याप्रमाणे तुम्ही जी कुठली गोष्ट ह्या उद्विग्नतेच्या मागे असेल ती पुसून हे वाचून बघा . तुम्हालाही हे प्रश्न पडावेत अशी मला आशा आहे .

त्याचसोबत मी हे ही नमूद करतो की माझी आकलनशक्ती कमी पडत असावी म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही किंवा ज्यांना कुणाला ही कविता पूर्ण समजली आणि आवडली , त्यांनी त्याचा अर्थ इथे द्यावा जेणेकरून माझ्यासारख्या न समजलेल्यांना उपयोग होईल

धन्यवाद


Smi_dod
Monday, January 29, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भातुकली

चुल बोळकी
लुटुपुटीचा संसार
भातुकलीच्या खेळात
भान हरपुन गेले
खेळता खेळता
भातुकली आहे हेच
विसरायला झाले
पण झाली वेळ
आप आपल्या घरी जायची
तेव्हा मोठ्या अनिच्छेने
आवरला सगळा पसारा
आठवणी सांडल्याच पण
त्या जागेवर... ....
कुठेतरी एखादा तुकडा
रेंगाळलाच मागे
भातुकली संपली
तरी अजुनही भातुकलीत
बघितलेली स्वप्ने येतात
रात्रभर डोळ्यात वस्तीला
जाताना ठेवुन जातात
ओघळुन वाळलेल्या
अश्रुंच्या माळा
मिटल्या पापण्यांच्या कडेला


स्मि


Smi_dod
Monday, January 29, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारीपाट

एक घर पुढे
दोन घरे मागे
कधी मनासारखे दान
तर कधी हातातुन
निसटलेले दान
बघता बघता सारीपाठ
रंगात येतो.....
विजयाच्या उन्मादात
डाव संपल्याचे
लक्षातच आले नाही
बाजी जिंकुनही
हरलेले मोहरे नजरेसमोरुन
ढळले नाही..
खरच जिंकलो की..
एक डाव जिंकुन
बाकी सारे हरलो


स्मि





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators