Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 26, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through January 26, 2007 « Previous Next »

Ganeshbehere
Thursday, January 25, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिंकली लढायी...मातृभूमीच्या आशिर्वादाने
वीरांनो... द्या भारत मातेचे नारे


श्री तिर्थे,
कविता खुप छान आहे. सगळ्यांना २६ जानेवारी निमित्त हार्दिक सुभेछा.

भारत माता की जय.........!!!!










Swaatee_ambole
Thursday, January 25, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, कवितेबद्दल छान लिहीलंयस.
बाकी सारंगचं म्हणणं पटतंय मला. ताशेरे ओढण्यापेक्षा जमल्यास सुधारणा सुचवू एकमेकांना. (constructive critisism) . आणि त्यापलिकडची केस वाटत असेल तर अनुल्लेख आहेच. :-)


Swaatee_ambole
Thursday, January 25, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा, झकास. थोडी लांबली हे खरं, पण शब्द, लय आणि अर्थ छान आहे. :-)

Hems
Thursday, January 25, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूजा , तुझी कविता अगदी लयबद्ध आहे आणि अर्थपूर्णही ... आवडली मला !

वैभव, सारंग,स्वाती...परीक्षणाआधी आत्मपरीक्षण घडावं...खरंय !
" मायबोलीवरच्या प्रतिक्रिया " यावर बरेच वेळा चर्चा / मतांतर झालेली आहेत. पण कोडं अजून उलगडलेलं नाही !


Milindaa
Thursday, January 25, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well said Sarang

Devdattag
Thursday, January 25, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नं...

उगवला अजून एक दिवस
रात्रीला एका अंधार्‍या कोठडीत ढकलून
बंद केलय कुलूप लावून
आणि फेकुन दिलीये किल्ली त्या अथांग पोकळीत
पण.. बघ ती फट बघ
तिकडे त्या कोठडीच्या दाराजवळ
तिथून काही स्वप्नं
बाहेर पडायचा प्रयत्न करताहेत
पण जमत नाहिसं वाटतंय
तीथे चढाओढ चाललेली दिसतेय बाहेर यायची
ते बघ, ते स्वप्न कसा पाय ओढतंय दुसर्‍याचा

बराच वेळ चाललय नाही असं
आता ती धडपड शांत झालेली दिसतेय
संथ झालेले दिसतायेत सगळे आवाज
आता निजतिल बहुदा सगळे
बहुदा उद्याच्या रात्रीची वाट बघत


Chinnu
Thursday, January 25, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिमा

दारात अडकुन पडलेली
तुझी शंभराव्वी कविता..
वार्‍याने हात दिला
तशी कविता आत आली..

" किती दिसांची आस होती
यमकांबरोबर भाव झेलायची
पण तु का येत नाहीस हल्ली
सुरपारंब्या खेळावयाला? "

कवितेच्या अबोध, दयाळु प्रश्नाने
जखमा ठसठसु लागल्या
ओठ आवेगाने थरुथरु लागले
शब्दांनी उडी मरली ती कुंपणाबाहेरच!!

" निघालो होतो मी मागे
भावार्थ रंगवायला
जगाला खोट्या-चढविलेल्या
मुखवट्यांपासुन वाचवायला!

उचलला हातोडा केला निर्धार
हर हर महादेव आणि
झाला पहिला वार!
वीज कडाडली, धरा सुन्न जाहली
गळला हातुन हातोडा-

-कपाळाला खोक होती पडली
आरसा समोर होता दीनवाणा
आणि सभोवती माझीच होती प्रतिमा-विखुरलेली!! "


Chinnu
Thursday, January 25, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो थोडा कल्पनाविलास आहे. काही चुकल्यास CBDG!

Manas6
Thursday, January 25, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शब्दफुलांचे असंख्य झेले.. अनंत आशा..
मुठीत काही मिठीत थोडे साठवण्याची..
...पूजा...वा वा निव्वळ अप्रतिम...स्त्री-सुलभ भाव दर्शविणारी हळवी कविता..वा..
-मानस


Chinnu
Thursday, January 25, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा स्वप्नशैशव छान आहे, कल्पना खुप सुंदर आहे. मीनु, चेहेरा आवडली. पूजा, भरभर वाचली ' तेव्हापासुन ' , अगदी गुपीत कळेपर्यंत थांबवलीच नाही नजर! मस्त आहे कविता.

Menikhil
Thursday, January 25, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवस झालेत मोकळ आभाळ पाहिल नही
चार तारे जोडून नक्शत्र राशी बनवल्या नाही

बरेच दिवस झालेत मस्त शिट्टी वाजवली नाही
रस्त्यावरून जाणार्‍या पोरीकडे वळुन वळुन पाहिले नाही

बरेच दिवस झालेत समईत तेल घातले नाही
स्वच्छ धुवून पाय, 'शुभंकरोती' म्हटले नाही

खरच.... बरेच दिवस झालेत आरश्यात स्वत्:ला पाहिलच नाही
कॉम्प्यूटरच्या बटनान्शिवाय सूर्याने काही उगवलच नाही.....


Meenu
Thursday, January 25, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे असं का होतय? उगीच कुणीही कुणाला नावं ठेवू नका रे...>>> सारंग उगीच ?
आणि जे नावं ठेवतायत त्यांनी आधी स्वतःच्या साहित्यावर पण विचार करावा ही विनंती आहे.>>> हं पण जे प्रतिक्रीया देताहेत ते सर्व लेखक असलेच पाहीजेत असं कुठे आहे. वाचकांना ही प्रतिक्रीया द्यायचा अधिकार नाहीये का ?
असल्या भडक प्रतिक्रिया देताना तर याची फारच काळजी घेतली पाहीजे.>>>मान्य आहे भडक प्रतिक्रीया देताना काळजीपुर्वक द्यायला हव्यात.
ज्याला जसं लिहायचय तसं लिहू द्या. दाद मिळाली नाही की आपोआप समजतंच.>>> बरेच दिवस कुणी दाद दिली नाही ( aka अनुल्लेख) तरीही जेव्हा आपोआप समजलं नाही तेव्हाच भडक प्रतिक्रीया यायला सुरुवात झालीये. archieves बघ हवं तर. तरीही ज्याला जसं लिहायचं तसं लिहु द्या असच असेल तर ठीक आहे. तसं तर ज्या लोकांनी इथे प्रतिक्रीया (तुला भडक वाटलेल्या) दिल्यात त्यांना काय फरक पडतो ? आणि इथल्या दर्जाबद्दल त्यांना नक्कीच काळजी वाटली तेव्हाच तर त्यांनी लिहीलं ना ? एक मात्र नमुद करावसं वाटलं की प्रतिक्रीया भडक असल्या तरी त्या देण्यामागे कुणाचाही हेतु वाईट नव्हता intentions were not bad मला स्वतःला तर त्यांचं होणारं हसु थांबावं म्हणुन तरी सांगावं असं नक्कीच वाटलं होतं. ईथे प्रतिक्रीया न देउन त्यांचं होणारं हसु पाहण्यात तरी काय अर्थ होता ?
आणि बाकी नियमांबाबत वैभव ने खूप छान विवेचन केलं आहेच!>>> हो.
तर समस्त कवी मंडळींना माझ्याकडून पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!>>>> माझ्याकडुनही !!

स्वाती अनुल्लेख आहेच गं पण काही वेळा असही वाटतं ना की अनुल्लेख का होतोय हे कळलं तर सुधारणा करता येईल कदाचित.
असो. असं आपलं मला वाटलं.



Smi_dod
Thursday, January 25, 2007 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे बर्‍याच दिवसा पासुन वाचतेय मी.खरतर मौन पाळल होत.कारण कोणी काय लिहावे कसे लिहावे हे ठरवण्याचा अधिकार ज्याचा त्याचा. आणि प्रत्येकाची विचार प्रतिभा वेगवेगळी असते. पण ईथले वातावरण डहुळल्या सारखे वाटायला लागले. अगदी प्रस्थापित आणि नवोदित असे स्वरूप त्याला यायला लागले. आणि कुठेतरी खटकायला लागले.त्यामुळे हा प्रपंच

हा पब्लिक फ़ोरम आहे. हे वाचणारे खूप लोक असतात अगदी जगाच्या कानाकोपर्‍यातुन. आपण ईथे लिहिलेले असे सगळीकडे जात असते अर्थात आपण ही आत्मपरिक्षण करावे आपण लिहितोय हे खरच त्या साठी योग्य आहे का. लिखाण हे स्वान्तसुखाय असते हे मान्य पण त्याचा दर्जा आपणच टिकवायचा.एक व्यासपीठ यामुळे आपल्याला मिळालय तर त्याचा उपयोग फ़ार सुंदर रितीने करुयात

केवळ अनुल्लेख करणे, खिल्ली उडवणे हे प्रकार थांबवुयात... प्रोत्साहनाच्या चार शब्दांने प्रत्येकालाच हुरूप येत असतो.क्वचित चुका सांगीतल्यातर बदल ही घडवुन आणता येतो.पण सतत हे असे नको...तरीही मित्रांनो सारंग म्हणतो तसे सगळ्यांनी लिहित रहा.सगळ्यांना माझ्या शुभेच्छा.उत्तमोत्तम लिहा त्या लिखाणासाठी आम्ही वाचक आतुर असतो. हा कवितेचा बी बी आहे याचे भान ठेवुन ईथे फ़क़्त कविताच लिहुया


Manas6
Friday, January 26, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा.राम स्वरुप, 'सिंदूर' -ह्यांच्या हिंदी कवितेतील काही कडव्यांचा स्वैर भावानुवाद.

(मूळ स्त्रोत-
www.anubhuti-hindi.org)


तो छंद लिहावा...!

कधी वाटते मला, असा तो 'छंद' लिहावा!
मना-मनातुन रसिकांच्या, 'मकरंद' लिहावा!

श्वास दरवळे ज्याचा, साऱ्या जीवनभर ह्या,
वसंत करतो आर्जव - मी तो 'गंध' लिहावा!

लाट रसांची उसळुन येता देहामध्ये,
'मधाळ मुक्ती' अन, 'बाहुंचा बंध' लिहावा!

तिन्ही काल हे विरुन जाती क्षणात सारे,
-यमुनातीरीचा तो 'परमानंद' लिहावा!

कोण रुक्मिणी कृष्णाची,ठावे जगतासी,
कोण असे राधा ती?- तो 'संबंध' लिहावा!

-मानस६



Mankya
Friday, January 26, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू ......
थोड्या वेळानी काहीच ऐकु येईनासं होतं ..
नुसतेच अविर्भाव दिसायला लागतात ..
मस्तच गं !

मानस ....." सिंदुर " सापडली नाही मित्रा पण तुझा स्वैर भावानुवाद भावला ! खुपच सुंदर !!

कोण रुक्मिणी कृष्णाची,ठावे जगतासी,
कोण असे राधा ती?- तो 'संबंध' लिहावा! ..... छानच !

माणिक !


Lopamudraa
Friday, January 26, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु मस्त काय सुंदर लिहिले आहेस.

प्रजासत्त्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!!!
आज देशाबद्दल लिहा, काहितरी छान वाचायला मिळु द्या.
सारंग ह्म्म चला आजपासुन प्रोत्साहन देउया.मानस अनुवाद चांगला आहे पण तो विभाग वेगळा आहे.


Nisha_v
Friday, January 26, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा,
ईथे वाचू शकतेस देशावरची कविता.

पूजा, देवदत्त, चिन्नु, मानस तुमच्या कवितापण छान आहेत.

भारत माता की जय

Manas6
Friday, January 26, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपामुद्रा..देशावरची कविता गणराज्य दिनानिमित्त!

रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या, 'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर' ह्या इंग्रजी कवितेचा मराठी भावानुवाद.

मूळ इंग्रजी कविता

'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर,ऍंड द हेड इज हेल्ड हाय,
व्हेअर नॉलेज इज फ़्री,
व्हेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इनटु फ़्रॅगमेंटस,
बाय नॅरो डोमेस्टीक वॉलस,
व्हेअर वर्डस कम आऊट फ़्रॉम द डेप्थ ऑफ़ ट्रुथ,
व्हेअर टायरलेस स्ट्रायव्हींग स्ट्रेचेस इटस आर्मस टुवर्डस परफ़ेक्शन,
व्हेअर द क्लीयर स्ट्रीम ऑफ़ रीझन हॅज नॉट लॉस्ट इटस वे,
इनटु द ड्रेअरी डेझर्ट सॅंड ऑफ़ डेड हॅबिट,
व्हेअर द माईंड इज लेड फ़ॉरवर्ड बाय दी,
इनटु एव्हर वाइडनींग थॉट ऍंड ऍक्शन,
इनटु दॅट हेव्हन ऑफ़ फ़्रीडम, माय फादर, लेट माय कंट्री अवेक !
--------------------------------------------------------------------


ऐसा स्वर्ग स्वातंत्र्याचा....!

निर्भय मन अन, उन्नत माथा सदा येथ वसु दे,
ऐसा स्वर्ग स्वातंत्र्याचा, प्रभु अम्हा तु दे!
ज्ञान सरिता मुक्त वाहती,
मनी भिती,वा भिंती नुरती
गाभ्यातुन सत्याच्या येथे, शब्द सदा उमटु दे,
ऐसा स्वर्ग स्वातंत्र्याचा, प्रभु अम्हा तु दे!

पुर्णत्वाचा ध्यास सदोदित,
श्रमती बहु हे, बाहु अविरत,
सुमतीच्या सरितांचे, कधी ना वाळवंट बनु दे,
ऐसा स्वर्ग स्वातंत्र्याचा, प्रभु अम्हा तु दे!

नित्य प्रभु ह्या हृदयी वससी,
सन्मार्गाला अम्हा दाविसी,
दिव्य विचार नी भव्य कृतींची, क्षितिजे विस्तरु दे,
ऐसा स्वर्ग स्वातंत्र्याचा, प्रभु अम्हा तु दे!
--मानस६



Pulasti
Friday, January 26, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस - "सिन्दूर" अनुवाद खूप आवडला! अभिनंदन!!
लोपमुद्रा - अनुवाद असा वेगळा विभाग मायबोलीवर आहे का? तो काव्यधारा मधे आहे की दुसरीकडे कुठे?

Chinnu
Friday, January 26, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोपा, निशा.
मानस अनुवाद एवढा सुंदर आहे तर तुमच्या गझल आणि कविता किती सुंदर असतील! नक्की पोस्ट करा.
मीनिखिल तुमची " बरेच दिवस " छान आहे, फ़क्त शेवटची ओळ ज .. रा अडकतेय वाचतांना. पहा तेव्हढ.
स्मि, मीनु, सारंग, वैभव, स्वाती चला लिहु या!
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेछ्छा!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators