Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » मराठी गझल » Archive through January 25, 2007 « Previous Next »

Swaatee_ambole
Monday, January 22, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या, महिना बदलला? आता धन्यवाद इथेच देते.

माणिक, सारंग, मीनू, श्यामली, जया, धन्यवाद.
दिनेशदा, भाई, उपास, बदल सुचवल्याबद्दल खरंच आभारी आहे. पण 'निकामी' ची द्विरुक्ती हेतुपुरस्सर केली होती.. त्यामुळे ती ओळ तशीच ठेवायला आवडेल मला.. चालेल ना?

वैभव, बैरागी, माझं नवशिकं लिखाण तुम्ही दिग्गजांनी इतक्या बारकाईने वाचून त्यात सुधारणा सुचवाव्यात ही माझ्यासाठी खरंच मोठ्या अप्रुपाची गोष्ट आहे. असाच लोभ रहावा ही विनंती.

पण असं म्हणतानाच मी काही सुचवण्या नम्रपणे नाकारणार आहे.

१. मला ' बाजार' आणि 'सांत्वनांचा' दोन्ही अजूनही रुचत नाहीयेत.
२. ' पाहुणे' चे सगळे कंगोरे 'परक्या माणसां'त येत नाहीत असं मला वाटतं. तेव्हा हे दोन शेर सद्ध्या असेच ठेवत आहे.
३. ' त्याचा' आणि ' अपुला' मधे मात्र आता मीच गोंधळले आहे. ' त्याचा' इंग्रजी वाटतोय, पण अर्थ convey करतोय, मग ' अपुला' सारखी तडजोड करावी का, हे ठरवता येत नाहीये मला. तेव्हा सद्ध्या माझ्याकडे तो शेर मी मूळ स्वरुपातच save करत आहे.

( एकूण ' काही' म्हणत मी सगळ्याच सूचना नाकारल्या बहुतेक.) :-)


Dineshvs
Monday, January 22, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वती, मला कुंपणाच्या आत काहिच नाही, म्हणुन ती कुचकामी, असा काहितरी अर्थ असायला हवा होता, असे वाटले. तुलाच सुचेल काहितरी.

Bairagee
Tuesday, January 23, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिग्गजबिग्गज!!! स्वतःला कमी लेखून केलेली स्तुती आवडत नाही. :-) निनावी, इतके चांगले लिहितेस. नवशिकी वाटत नाहीस. असो.

तर' त्याचा' इंग्रजी वाटतोय काय आहेच. पण अर्थ 'कन्वे' होतोय ना, मग प्रश्न्नच मिटला.:-) पण इथे 'त्याचा' वापरणे चुकीचे आहे, हे माहीत असते तर 'त्याचा' वापरले असतेस काय? 'अपुला' हे 'आपला'चे केवळ एक रूप आहे. गुरूऐवजी २ लघू शक्य झाल्यास टाळावेत. पण भाषेबाबत 'त्याचा'सारखी सहज टाळण्याजोगी तडजोड नकोच. कवीच (त्यातही चांगले कवी/कवयित्री) 'असली' भाषा वापरू लागले तर कसे?
( एकूण ' काही' म्हणत मी सगळ्याच सूचना नाकारल्या बहुतेक.) :-)
:-) :-) :-)



Chanakya
Tuesday, January 23, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती गझल फ़ारच छान आणि त्यावर बाकिच्यांनी केलेला इस्लाह पण

Vaibhav_joshi
Wednesday, January 24, 2007 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूटप्रश्न !!!


खरेच रे मना तुझे मनन करायचे किती
सदैव कूटप्रश्न ! आकलन करायचे किती

चुकून या हवेत तू असायचास जीवना
म्हणून पोकळीस ह्या सहन करायचे किती

तुझी रुपे , तुझ्या छटा , तुझा न रंग राहिला
उगाच आसवांस मी जतन करायचे किती

पुरे मला दिलेस तू उधार श्वास जेवढे
अजून मागुनी अधःपतन करायचे किती

पुन्हा जुने स्मरण तुझे , पुन्हा नवीन धुंदणे
कधी न तृप्तता असे व्यसन करायचे किती

अशी कुठे न आहुती जया नसे फलश्रुती
असे म्हणून स्वप्न मी दहन करायचे किती


Meenu
Wednesday, January 24, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकून या हवेत तू असायचास जीवना
म्हणून पोकळीस ह्या सहन करायचे किती >>> वाह क्या बात है ..

अशी कुठे न आहुती जया नसे फलश्रुती
असे म्हणून स्वप्न मी दहन करायचे किती >>> सुंदर ..



Shyamli
Wednesday, January 24, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा जुने स्मरण तुझे , पुन्हा नवीन धुंदणे
कधी न तृप्तता असे व्यसन करायचे किती>>>
वाह वा!!!

Kmayuresh2002
Wednesday, January 24, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी कुठे न आहुती जया नसे फलश्रुती
असे म्हणून स्वप्न मी दहन करायचे किती...वैभवा,जवाब नही दोस्त..:-)


Lopamudraa
Wednesday, January 24, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकून या हवेत तू असायचास जीवना
म्हणून पोकळीस ह्या सहन करायचे किती >>. vaa vaa vaibhav.. best!!!

Chanakya
Wednesday, January 24, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वैभव वा खासच. जरा हटके आहे गझल

वैभव नंतर गझल post करायचे धाडस करत आहे. सांभाळुन घ्यावे. -

टाकून खाली शस्त्रे, बघ पार्थ आज गेला
बनुनी बृहन्नडा रे, पुरुषार्थ आज गेला

जगणे असह्य केले मातापित्यांचे ज्याने
घालून श्राद्ध त्यांच्या, स्मरणार्थ आज गेला

शत्रूंच्या छातीवरती घाव खूप घातले
दोस्तांना करुनी दगा, मग स्वार्थ आज गेला

लिलाव भक्तीचा चाले, देह देवळातुनी
विकुनी ईश्वर आतला, परमार्थ आज गेला

गझल जिला म्हणले तो शब्दांचा सांगाडा
निष्प्राण करुनी त्याला, भावार्थ आज गेला


Swaatee_ambole
Wednesday, January 24, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम, वैभव!
मक्ता तर.. जियो!!


Pulasti
Wednesday, January 24, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव - फारच छान गझल!
पुन्हा जुने स्मरण तुझे , पुन्हा नवीन धुंदणे
कधी न तृप्तता असे व्यसन करायचे किती -- वा!!

चाणक्य - विचार सकस आणि सुस्पष्ट आहेत. रचनेत थोडी अजून सफाई आणता येईल असे वाटते. उदा. "टाकून खाली शस्त्रे, बघ पार्थ आज गेला" च्या ऐवजी - टाकून शस्त्र खाली, बघ पार्थ आज गेला. चु.भू.द्या.घ्या.

Swagat_samiti
Wednesday, January 24, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pulasti मायबोलीवर तुमचं स्वागत!

Milindaa
Wednesday, January 24, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, ही नवीनच समिती आलेली दिसते

Pulasti
Wednesday, January 24, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलं आवडली, आणि स्वागतही! धन्यवाद!!

Bairagee
Wednesday, January 24, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,

चुकून या हवेत तू असायचास जीवना
म्हणून पोकळीस ह्या सहन करायचे किती
वा!

सलग किमान ३ लघू (३ अ स्वर) असणारी यमके आवडली.


Bairagee
Wednesday, January 24, 2007 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चाणक्य,
शस्त्रे नुसती टाकली तरी चालतील. इतर ओळींबद्दल असाच विचार करून बघा.
रचना ठीक. छंदांचा, वृतांचा अभ्यास सुरू असेलच.



Jayavi
Wednesday, January 24, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा..... मस्तच :-)
अशी कुठे न आहुती जया नसे फलश्रुती
असे म्हणून स्वप्न मी दहन करायचे किती
मस्तच!!


Chanakya
Thursday, January 25, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती : धन्यवाद. गम्मत म्हणजे मी आधी 'टाकून शस्त्र खाली' अशीच रचना केलेली पण शस्त्र च्या ४ का ३ मात्रा असा संभ्रम पडला म्हणून बदलले...

बैरागी : खूप धन्यवाद तुमच्या सुचनेबद्दल.. तुम्ही जर काही specific सुचना केल्यात तर मल मदत होईल शिकायला...

छंदांचा, वृत्तांचा तितकासा अभ्यास नाहीये...

शाळेतली मराठी व्याकरणाची पुस्तके परत चाळली पाहिजेत आता

एकंदरीत ही गझल काही जमलेली नाहिये मला


Sarang23
Thursday, January 25, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा..., आहाहा!!!
बैरागीशी सहमत... काफिया आवडला!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators