Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » झुळूक » Archive through January 25, 2007 « Previous Next »

Lopamudraa
Wednesday, January 24, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थन्क्स ह.. श्यामली, मीनु दोन्हि शब्द जुळुताहेत. पण मला आता प्रश्न पडला आहे की मी कोणता शब्द वापरु " मजला " की " कशाला "


Jo_s
Wednesday, January 24, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची स्पेलींग बघून आमचे सर शेवटी ओरडायचे, अरे तुमची स्पेलींग वाचून मला माझी बरोबर का तुमची हे कळेनास होतं.
मला वाटत इथल्या जुन्या लोकांच असच झालय


Ganesh_kulkarni
Wednesday, January 24, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीजी,
याचा अर्थ काय आहे?


Shyamli
Wednesday, January 24, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीचच झालय
मी तीथे आणि तू ईथे
आपली न होणारी भेट
आणि होणारी चुकामुक
श्यामली


गणेशजी,
अर्थ अगदि सरळ साधा आहे हो,

मी तीथे आणि तू ईथे>>>
म्हणजे माझ मन तुझ्याकडे तर तुझ मन माझ्याकडे आहे,आणि या मुळे आपली भेट न होता चुकामुक होतीये. अर्थ सांगण्याच्या नादात edit करण्याऐवजी चुकुन delete केली गेली चारोळी

Ganesh_kulkarni
Wednesday, January 24, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीजी,
अर्थ असा आहे तर!
ओके!.


Ganesh_kulkarni
Thursday, January 25, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तुला दिसलो की
तू हसतेस
मनातल्यां दु:खानां तू असं
कितीदा फसवतेस?
गणेश(समीप)


Meenu
Thursday, January 25, 2007 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोल खोल काळजापर्यंत,
पोचते एखादी कळ ..
असह्य वेदना जन्म घेते,
तिचीच मग कविता होते ..


Shree_tirthe
Thursday, January 25, 2007 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! वा!!! मीनु अप्रतिम काय सुंदर लिहिता तुम्ही. वा!!!

Naveen
Thursday, January 25, 2007 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनुजी मी तुमच्या ऐवढा मोठा तर नाही कि प्रश्न विचारावा. एक शंका आहे म्हणून विचारतो. कृपया मी नवीन आहे समजून घ्या मला.

खोल खोल काळजापर्यंत,
पोचते एखादी कळ ..
ईथपर्यंत कळालं पण,
असह्य वेदना जन्म घेते
ईथे प्रश्न पडतो "वेदना" एक आहे का दोन असं मोजता येतं का?
एक "कळ" आहे हे मान्य.
असह्य वेदना जन्म घेते का असह्य वेदना जन्म घेतात?

खोल खोल काळजापर्यंत,
पोचते एखादी कळ ..
असह्य वेदना जन्म घेतात,
त्यांच्याच मग कविता होतात..
असं चालेल का?


Meenu
Thursday, January 25, 2007 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"वेदना" एक आहे का दोन असं मोजता येतं का?>>>
नाही ना, नाही मोजता येत .. मग नुसतं वेदना जन्म घेते म्हणलं तरी चालेल की .. नाही चालणार ..? जी कळ अपेक्षित आहे ती जीवघेणी आहे. त्यावेळची वेदना मला एकच जाणवतय. उदाहरणार्थ जोरदार कुणी तरी वार केला की एकदम जे दुःख जाणवतं ते .. नंतर किरकोळ दुखत राहतं त्याबद्दल नाही बोलत आहे मी आत्ता ..
आणि अरे मी काही मोठी वगैरे असं काही नाहीये मीनुच म्हण तु आपलं मला ..
शंका विचारायला काहीच हरकत नाहीये मी माझ्या परीनी उत्तर देईन.
तु म्हणतो आहेस तसंही लिहील कदाचित कुणी आणि ते चुक ठरणार नाही असं वाटतय. शेवटी प्रत्येकानी वेदना कशी अनुभवावी ते कसं ठरवणार आपण ..?


R_joshi
Thursday, January 25, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक थेंब अश्रुचा
नकळत असा ओघळतो
जखम होते माझ्या मनी
वेदना तुझ्या चेह-यावर उमटवतो

प्रिति:-)


R_joshi
Thursday, January 25, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असह्य वेदनांचे जीवन
तु सुसह्य आनंद देऊन जा
असह्य वेदनांवर माझ्या
तु हलकेच फुंकर मारुन जा.

प्रिति:-)


Shree_tirthe
Thursday, January 25, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति बर्‍याच दिवसांनी!

मी आलो दुर करण्यास तुझ्या वेदना
माझ्या सखीवर तरस खा रे तु जिवना


Naveen
Thursday, January 25, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु धन्यवाद. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे.
"शेवटी प्रत्येकानी वेदना कशी अनुभवावी ते कसं ठरवणार आपण ..?"


Deep_tush
Thursday, January 25, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असह्य वेदंनाचे जीवन....
वा प्रिति ख़ुपच छान चारोळी आहे
जस जीवनच या ओळीत बांधलेल आहे....

तुशार.....


Ganesh_kulkarni
Thursday, January 25, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असह्य वेदनांचे जीवन
तु सुसह्य आनंद देऊन जा

प्रीति,किती बोलुन जातात या ओळी!
ग्रेटच!
गणेश(समीप)


R_joshi
Thursday, January 25, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्री, तुषार, गणेश:-)

मी एकटिच होते
सोबतिस अंधार दाटला
एकांताच्या समयी
तुझ्या आठवणिने
माझा श्वास कोंडला

प्रिति:-)


R_joshi
Thursday, January 25, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री

मीच बरसणारा मेघ
माझ्यावरच कशी बरसु
मीच तरसलेले जीवन
माझ्यावरच कशी तरसु

प्रिति:-)


Ganesh_kulkarni
Thursday, January 25, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातंत्र्यासाठी आपल्याच देश बाधंवानी
झेलल्या गोळ्या
त्याच्यांच बलिदानावर किती जणांनी तरी
भाजल्या पोळ्या!
गणेश(समीप)


Shree_tirthe
Thursday, January 25, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! प्रिति, गणेश मस्तं.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators