|
Shrini
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:05 am: |
| 
|
पूजा, कवितेची लय मस्तच आहे, पण शब्द आणि अर्थही खूप परीपक्व वाटला! well done!
|
Reshim
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:10 am: |
| 
|
मी मायबोलिची नियमित वाचक आहे. सध्याच्या कविता पाहुन असे वाटते कि थोडे दिवस कवितांचा विभाग बंदच ठेवावा. बाय द वे, हे 'बीबी' म्हणजे नक्की काय? वाचक बरेच दिवस असले तरी मला बाकी डिटेल्स माहित नाहीत.
|
पूजा, पूर्णतेचा ध्यास असला की अशी छान कविता होते! छान, अशीच लिहीत रहा!
|
Meenu
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:35 am: |
| 
|
BB: Buletin Board .. .. बहुतेक करुन आपले सगळे लाडके कवी लागतीलच इतक्यात काहीतरी लिहायला. विभाग बंद करायची वेळ बहुधा नाही यायची
|
पूजा, अगं लाम्बलचक का होईना.. कविता तरी आहे ती. बरं वाटलं..
|
Naveen
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:36 am: |
| 
|
अहो नंदिनी, कोमा म्हणजे प्रदीर्घ काळापासून बेशुध्द अवस्थेत असणे. हो ना? मुन्नाभाई MBBS चित्रपट बघितला नाही का? अहो त्यात तर मुन्ना आनंद भाईला कोणत्या अवस्थेतून बाहेर काढतो माहीत आहे ना? त्यातूनच मला कविता सुचली. अहो भ्रमर तिला कविता ऐकवल्यावर ति कोमातून direct वर गेली नाही तर, ति कोमातून बाहेर आली आणि तिला सर्व काही आठवलं. आजीला ह्यासाठी आणलं कारण, आजीने ज्यावेळी त्या दोघांना(त्याला आणि तिला) जेव्हा राजा-राणीची गोष्ट सांगितली त्यावेळी त्या दोघांत खूप काही घडलं होतं. ते तिला आणि त्यालाच माहीत. आणि हो, हे सगळं तिला ऐकवल्यामुळेच तर ति कोमातुन बाहेर आली.
|
Shyamli
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:52 am: |
| 
|
क्या बात है पूजा, मस्तच
|
नवीन, सध्या एवढे वाचलेत तरी पुरे. http://en.wikipedia.org/wiki/Coma
|
Meenu
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:39 am: |
| 
|
किती दिवस झालेत नाही .. आपल्याला भेटुन ? चार सहा महिने बहुधा .. कि जास्तच ? आठवत नाहीये का नक्की ? हो ना ! ते एक बरय .. विसरतोच आपण सगळ काही .. एकदा कसं ? सगळेच तुझ्यासारखे दिसायला लागले होते बोलले नाही तुला, पण मनातुन मीही घाबरले होते वाटलं .. संपलं सगळं .. लागलं बहुधा वेड .. डोळे घट्ट मिटुन घेतले तरी, स्वच्छ दिसायची तुझी हसरी नजर .. आणि गालावरची ती जीवघेणी खळी .. पण गंम्मत म्हणजे परवा अशीच बसले होते .. तुझी आठवण रेंगाळत होती मनात जराशी, म्हणुन सहज डोळे मिटले .. गालावरची खळी नाही म्हणायला दिसली तशी .. पण जरा पुसटच झालाय आता तुझा चेहरा आणि इतर कुणाकुणाचे चेहरेही त्यात, मिसळायला लागलेत की काय कोण जाणे ..?
|
Krishnag
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:49 am: |
| 
|
इथल्या कविंच्या प्रतिभेने प्रभावित आम्ही सरसावलो आम्ही चोरीला घेउनी कवन आमुचे आलो आपणास भेट द्यायला मित्रांनो माझाही थोडा सहभाग!!! आम्ही कोण म्हणूनी काय पुसता आम्ही असू कोडगे मार शब्द टोमण्यांचा आम्हा फुला समान भासे शब्द गाठोड्यातील सारे गोळा करुनी घेतो नाठाळ वृत्तीचा आमुच्या मुलामाच त्यास देतो करुनी सरमिसळ भावनांची काव्य आमुचे सजवितो ताकासंगे शेवया आम्ही खुशाल वरपीत जातो ते आम्ही टाकू कविता वाचा न वाचा तुम्ही पेरिले आम्हीच आयडी आता वाहवा देण्यापरी का पुसता आमुची ओळख तुम्हा नसे ठाव का आमुच्या नावाच्या गजरात आज तुम्हीच मग्न असा
|
नविन, मित्रा हे सगळ पुराण सांगायला लागतय हेच कवितेच अपयश आहे अस नाहीका वाटत तुला???
|
Naveen
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:52 am: |
| 
|
कदाचित तुमच म्हणणं बरोबर असेलही पण त्यातील भाव कोणतरी समजून घेईल असं वाटलं होतं. असो. पण मला नाही वाटत हे कवितेच अपयश आहे कारण, यशाची पहिली पायरी म्हणजे अपयश असं कुठे तरी वाचलं होतं.
|
Meenu
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:49 am: |
| 
|
कधी कधी सगळे जमतात, खुप काय काय बोलत असतात ? नुसतं बघत रहावसं वाटतं मला .. साठवुन घ्यावसं वाटतं सगळं काही .. थोड्या वेळानी काहीच ऐकु येईनासं होतं .. नुसतेच अविर्भाव दिसायला लागतात .. कुणाचे हसण्याचे, वेडावण्याचे, एकमेकांच्या कोट्यांना दाद दिल्याचे, हसता हसता डोळ्यात आलेलं पाणी पुसल्याचे, त्या सगळ्या दृष्याचा एकत्रित असा, एक परीणाम तयार होत जातो माझ्या मनात .. मग पुन्हा खुप काळानंतर कधी तरी, डोळे मिटुन रवंथ केल्यासारखे, पुन्हा पुन्हा, जगता येतात मला ते सारे क्षण ..
|
मिनु, व्वा! मस्तच जमलीये!
|
Shyamli
| |
| Thursday, January 25, 2007 - 6:03 am: |
| 
|
वाह.... मीनु!!! ... .. ... .. .....
|
भारत माता ह्या मातृभूमीचे...शूर आम्ही पुत्र शत्रुसंगे लढवयास...आखले आता सुत्र धनुष्यबाण उचला वीरांनो...शत्रुवरी करूया वार आता लढायीस आम्हा करायची सीमा पार ह्या आईचे अनंत उपकार आपुल्यावरती सख्यांनो... आक्रमण करुया त्या शत्रुवरती जय्-जयकार करा मातृभूमीचा बोला भारत माता की जय ह्या आईच्या आशिर्वादाने होणार आपुलाच विजय बोला भारत माता की जय... बोला भारत माता की जय... भारत माता आपुली जननी झेंडा फडकवा उंच गगनी जिंकली लढायी...मातृभूमीच्या आशिर्वादाने वीरांनो... द्या भारत मातेचे नारे भारत मातेच्या नावाने गगन भरा सारे गगन भरा सारे..... बोला भारत माता की जय!
|
श्री, उद्या २६ जानेवारी आहे त्यामुळे का? जिंकली लढायी...मातृभूमीच्या आशिर्वादाने वीरांनो... द्या भारत मातेचे नारे भारत मातेच्या नावाने गगन भरा सारे गगन भरा सारे..... बोला भारत माता की जय! वा क्या बात है!
|
Psg
| |
| Thursday, January 25, 2007 - 6:29 am: |
| 
|
मीनु, दोन्ही कविता सही आहेत! लिहत रहा बाई इथे!
|
Nisha_v
| |
| Thursday, January 25, 2007 - 6:34 am: |
| 
|
श्री काय सुंदर कविता लिहिलीय तुम्ही. मस्तंच. भारत मातेच्या नावाने गगन भरा सारे द्या भारत मातेचे नारे व्वा!!! भारत माता की जय!!!
|
Sarang23
| |
| Thursday, January 25, 2007 - 7:24 am: |
| 
|
इथे असं का होतय? उगीच कुणीही कुणाला नावं ठेवू नका रे... आणि जे नावं ठेवतायत त्यांनी आधी स्वतःच्या साहित्यावर पण विचार करावा ही विनंती आहे. असल्या भडक प्रतिक्रिया देताना तर याची फारच काळजी घेतली पाहीजे. ज्याला जसं लिहायचय तसं लिहू द्या. दाद मिळाली नाही की आपोआप समजतंच. आणि बाकी नियमांबाबत वैभव ने खूप छान विवेचन केलं आहेच! तर समस्त कवी मंडळींना माझ्याकडून पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!
|
|
|