|
Abhijat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 3:02 am: |
| 
|
"रेहान.. मै तुम्हे सब समझा दूंगा.. पर अभी नही. तू परत जा.. प्लीज.." नन्दिनी कपुर... कहानी freind freind की... तु परत जा ऐवजी "तु वापस जा" हवे होते ना? >>तू परत जा हे मराठी वाक्य असू शकते ना पण!
|
Suvikask
| |
| Tuesday, January 16, 2007 - 5:32 am: |
| 
|
नो कॉमेंट्स श्श.. .श्श. श्श..
|
Chyayla
| |
| Tuesday, January 16, 2007 - 12:37 pm: |
| 
|
अभिजीत, हो मराठी वाक्य असु शकते कबुल कबुल कबुल.... आता मी तीनदा म्हटले. ठिक आहे ना... अरे मला तसे उगीच वाटुन गेल. मग क्या हुआ? नन्दिनी लवकर लिहो ना...
|
Maanus
| |
| Wednesday, January 17, 2007 - 12:32 am: |
| 
|
"बात करती हू. तुम्हारी हर बात मानती हू. का मी तुला एवढं समजून घेते? का मी तुझे सगळे नखरे सहन करते? हेच विचारायचं आहे ना?" तो काहीच बोलला नाही. "I am glad that you asked me at least today. रेहान, मी promise केलं होतं की तुझी मी काळजी घेईन. It was not personal. I was getting paid for it. गिनके पैसे लिये है मैने तुम्हारे दोस्त बनने के.. अजून काही माहिती हवी असेल तर विचार तुझ्या अब्बाला. त्यानेच तर विकत घेतलय मला..." या वाक्याचा इथे काहीतरी संबध असावा...
|
बाप रे.. मी घाबरलेच.. म्हटलं हा भाग कुणी टाकला.. सस्पेन्स कसा काय कळला? तेवढ्यात लक्षात आलं आपणच आधी एप्रिल फ़ूलमधे लिहिलय... दिवे घे रे माणसा..
|
Jhuluuk
| |
| Wednesday, January 17, 2007 - 4:57 am: |
| 
|
नंदिनी, तुच ग काय असा सस्पेन्स जाहिर केलास माणसाने तर फक्त शक्यता वर्तावली होती ना... पुढचा भाग ?
|
Sakhi_d
| |
| Wednesday, January 17, 2007 - 5:19 am: |
| 
|
माणसा तुला मेल केलाय चेक कर
|
Dhoomshaan
| |
| Wednesday, January 17, 2007 - 10:26 am: |
| 
|
काय sollid story आहे रे ही............. च्या मारी, सगळी एका दमात वाचुन काढली......... Nandini, आपले चरण तेव्हढे दाखवाल का?????? नाही, पाया पडुन घेतो, काय?? बरं, चरण नाही निदान चरणांचा फोटो तरी..... plz,plz,plz,plz,plz,plz........plz!!!!!!!
|
Prasik
| |
| Wednesday, January 17, 2007 - 5:15 pm: |
| 
|
कथेचा शेवट नक्कीच गोड आहे. just like... And They Lived Happily Ever After .... आसिफ़ आणि नाझ चे काय होते हे मात्र नक्कीच वाचण्यासारखे असेल. ..........कथा आवडली
|
एकदम बरोबर पण आसिफ बरोबर पाखीला विसरून कसे चालेल? तिचे काय
|
Manogat
| |
| Thursday, January 18, 2007 - 12:57 am: |
| 
|
नंदीनी, रोज पुढच्या भागाची वाट बघुन थकले, मला आता म्हणाव लागेल, "तु छुपि है कहा हम तडपते यहा..." अता suspense चा बरच उलगडा झाला आहे म्हणुन आतुरत पण वाढली आहे, So please post the next part soon
|
friends, due to some unavoidable circumstances, I could not post next chapters. Sorry for the delay, In coming one or two days, I will start posting next chapters, Thanx for your encouragement.
|
पाखी प्रियाच्या जवळ बसली होती. प्रिया शांतपणे झोपली होती. पाखीला इथुन जावंसं वाटतच नव्हतं. प्रियाला हॉस्पिटलमधे ठेवलय हे कळताच ती धावत आली होती.. प्रिया असं काही करेल हे तिच्या गावीही नव्हते. प्रिया आता ठीक होती. पण तरीही ती पूर्ण बरि होईपर्यंत तिला परत न्यायला जतिन तयार नव्हता. असिफ़ हातामधे किलोभर फ़ळं घेऊन आला. दिवसातून तीनदा तरी त्याची इकडे चक्कर असायचीच. आल्या आल्या तो ओरडला.. "हाय पाखी.." "श्श. प्रिया आताच झोपलिये.." "अरे, फ़िकर नॉट.. ती झोपली की उठतच नाही... चाहो तो ढोल भी बजा लो.." त्याने सफ़रचंद कापलं.. आणी पाखीच्या हातात अर्धं दिलं. "मला वाटलं तू प्रियासाठी आणलयस" " She hate apples " असिफ़ म्हणाला. "असिफ़, तू प्रियाला इतकं ओळखतोस?" "पाखी.. प्रिया माझी बेस्ट फ़्रेंड आहे. पण त्याहूनही जास्त असं तिचं आणि माझं नातं आहे.." "प्रिया पण मला एकदा हेच म्हणाली होती... असिफ़, प्रियाने असं का केलं हे माहितिये तुला?" असिफ़ने प्रियाकडे पहिलं. "पाखी, प्रियाने हे पहिल्यादा केलं नाहिये. आणि ती परत करेल हेही मला माहित आहे..." "पण का?" असिफ़ हसला.. हलकेच.. "कारण तिने तिच्या आयुष्याला स्वत्:च थांबवून ठेवलंय. पॉजचं बटण दाबल्यासारखं. तिच्याबरोबरचे खूप पुढे निघून गेले पण ति मात्र तिथेच आहे... एकटी.."
|
Prasik
| |
| Monday, January 22, 2007 - 6:04 pm: |
| 
|
नन्दिंनी परत आल्याबद्दल धन्यवाद. कुठे गायब झाला होतात . १७ ते आज २२ ( माझ्याकडे २३ झालेत ) जानेवारीच्या प्रत्येक दिवस आणि रात्री या BB ला भेट देण्यासाठी माझ्यासारखेच कित्येक मायबोलीकर येथे येऊन गेले असतील. बाय द वे पॉज च्या बटनाची संकल्पना आवडली. पुढची पोस्ट लवकर येऊ दे.
|
Uno
| |
| Tuesday, January 23, 2007 - 1:50 am: |
| 
|
Prasik, I Agree, Me Pan asach karat Hote, Nandini Lihig Patkan.
|
Manogat
| |
| Tuesday, January 23, 2007 - 2:11 am: |
| 
|
Welcome back Nandini! good start again
|
नाझिया रेहानचे लहानपणाचे फ़ोटो बघत बसली होती. मोहसीना, रेहानची चार नंबरची दिदी आणि साजिदा तिला माहिती देत होत्या. रेहानच्या अब्बाना फ़ोटोग्राफीची भरपूर आवड होती त्यामुळे रेहानचे अक्षरश: ढिगाने फ़ोटो पडून होते. रेहान आणि नाझच्या लग्नाला जवळ जवळ महिना होत आला होता... पण रेहान हल्ली फ़ार शांत असायचा. कारण कुणालाच माहित नव्हतं. असिफ़ने घरी येणं पूर्ण बंद केलं होतं. "रेहान, ये कौन है?" नाझने विचारलं. तो भानावर आला. तिच्या हातात एक जुना black and white फ़ोटो होता. तो असेल पाच सहा वर्षाचा त्या फ़ोटोत. सोबत एक दोन तीन महिन्याचं बाळ होतं. "याद नही... बहुत पुराना फ़ोटो है..:" तो म्हणाला.. "क्या रेहान,, तुम्हे याद नही?" मोहसीनाने अविश्वासाने विचारलं. "सच मे याद नही..." तो वैतागून म्हणाला.. अब्बा तिथेच बसले होते. त्यानी फ़ोटो मागितला. आणि बघून ते हसले. "रेहान... तुम्हे अपनी बीवी याद नही..." ते हसतच म्हणाले. क्या?" नाझ उडालीच. "रेहान.. फ़िर से देखो." रेहानने अब्बाच्या हातातून फ़ोटो घेतला. आणि त्याला आठवले. "अब्बा, ये तो रूही है..." "आत्ता आठवले तुला... " मोहसीना म्हणाली. "नाझ, ये रूही.. हमारे बाजु मे रहते थे ना. उनकी बेटी.." मोहसीनाने नाझला सांगितलं. रेहानच्या चेहयावर हलकेच स्मित उठले. "नाझ, इसका नामे भी मैने ही रखा था.. रेहान की रूही.. और इसके कान मे पहली अझान भी अब्बाने दी थी..." "पुरा टाईम उसीके साथ खेलता था... " अम्मी म्हणाली. "अम्मी, आजकल कहा है ये रुही?" नाझने विचारलं. "पता नही बेटा, उसके वालिद और वालिदा का वक्त से पहले इन्तकाल हो गया तब से पता नही चला.." नाझ रेहानकडे बघायला लागली. "मतलब.. उसके मा बाप मर गये. तबसे वो किधर गयी पता नही... " रेहानने तिला समजावलं. "खरंच, कुठे गेली ही मुलगी ते कळालंच नाही.." मोहसीना म्हणाली. "तेच तर लाइफ़ आहे. कधी कधी कुणी फ़ार जवळ असतं. तर कधी तेच फ़ार दूर होऊन जातं. कधी आपल्याला कळतच नाही की आज जे जवळ आहे ते उद्या दूर जाईलही.... " रेहान म्हणाला. "फ़िर से मिलेगी रूही?" नाझने विचारलं.. "आपण परत भेटू की नाही हा प्रश्न तुला पडतोय... मला नाही कारण काही झालं तरी मी तुला भेटणार आहे...." रेहान म्हणाला. "काय? " मोहसीना म्हणाली. कुणालाच तो काय म्हणाल ते कळले नाही.... पण अब्बा मात्र हळूच पुटपुटले.. " Thats her friendship "
|
परत एक धक्का! झक्कास चाललय!
|
Jhuluuk
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:13 am: |
| 
|
ए, ही रुही प्रिया आहे का? मला असा डाउट येतोय
|
Manogat
| |
| Wednesday, January 24, 2007 - 8:47 am: |
| 
|
मला पण तसच वटतय झुळुक मजा येते आहे प्रत्येक पोस्ट वचतांना.. good work nanadini
|
|
|