Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through January 24, 2007 « Previous Next »

Shyamli
Tuesday, January 23, 2007 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि शिल्प आवडली मस्तच,
देवा, कोकीळेच घरट आवडल
मीनु एकदम जय जय रामकृष्णहरी?
छानेत पण

सुधीर ही आधि कुठे टाकलेली? वाचली वाटत मी


Meenu
Tuesday, January 23, 2007 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा घरटं छान रे ..
सुधीर एकदम जोरात ...
श्यामले धन्यवाद ..


Shree_tirthe
Tuesday, January 23, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुगरन

तुवं घर लई न्यारं
सम्द्यांना वाटतं प्यारं
ह्याची पक्की हायत का दारं?
मंग कितीबी येवू द्या वादळ-वारं?

झाडावर लेकरांचा जीव टांगते
म्हणे थांबा तुमच्यासाठी खाऊ आणते

हे चित्र बघूनी शुध्द हरपली
भगवंताने तिला अशी का बनवली?


Bhramar_vihar
Tuesday, January 23, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुद्ध हरपली?? मी तर हल्ली कांदा घेउनच येतो कविता बिबिवर!

Meenu
Wednesday, January 24, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिर्थे तुम्हाला काय होतय नक्की ..? काय मनात येईल ते लिहु नका हो. थोडे दिवस तुमचं काव्य वहीत लिहा. कुणा तुमच्या आवडत्या कवीकडुन तुम्ही लिहीलेल्या कवितांचं परीक्षण करुन घ्या.
वाचकांच्या प्रतिक्रीयांचा मान राखुन थोडे दिवस शांत रहा. लोकांनी अजुन किती स्पष्ट शब्दात सांगायचं आता तुम्हाला ..? तुम्ही आत्मपरीक्षण का नाही करत ..?


Shree_tirthe
Wednesday, January 24, 2007 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदजी धन्यवाद. माझ्यासाठी पण कांदा आणा प्लीज.

Shree_tirthe
Wednesday, January 24, 2007 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मीनु. अहो आत्मपरीक्षणच करतोय. आणि हो तुम्ही सर्वजण माझे आवडते कवी आहात म्हणून तर कविता येथे पोस्ट करतोय. तुमच्या सर्वांकडून मला शिकायला मिळतय. कविता कशा असायला हव्यात याबद्दल जर कुठे काही नियम असतील तर मला अवश्य कळवा. ही नम्र विनंती.
काही चुकलं असेल तर, मायबोली करांनो मी दिलगीर आहे.


Jo_s
Wednesday, January 24, 2007 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश, सारंग, श्यामली, मीनू धंन्यवाद

गणेश अस प्रत्त्येकाला कधी ना कधी होतच, इथे येत रहा एकटेपण वाटणार नाही.

श्यामली हि कविता सखी च्या कंटाळा
pageवर टाकली होती

Vaibhav_joshi
Wednesday, January 24, 2007 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री तिर्थे

कविता कशी असावी याला नियम नाहियेत . जशी गद्य बोलण्यासाठी भाषेचा आधार घेताना एक लहज़ा असतो प्रत्येक माणसाचा तसंच प्रत्येक कवी ( ? ) चं असतं . मुळात त्या कवितेतून काय म्हणायचंय हे पोचलं नाही की वाचकाबरोबर संवाद साधला जात नाही . आपण समोर बसून बोलताना असंबध्द बडबडतो का ? कुठल्याही कवितेने वाचकाला एक तर बोलतं केलं पाहिजे वा अंतर्मुख . पण ती प्रक्रिया कवीला " काय म्हणायचंय " हे कळल्यानंतर सुरू होते ना ? आता तुमची वरची रचना जर आपण घेतली तर या कवितेतून तुम्हाला काय म्हणायचंय हे स्पष्ट होतंय का ?

तुवं घर लै न्यारं ... बर
समद्यांना वाटतंय प्यारं ... बर
ह्याची पक्की हायत का दारं .. ( हे का आलं ? समद्यांना प्यारं वाटतंय तर दारं पक्की आहेत का ही शंका कशासाठी ? )

तुम्ही प्रतिमा वापरली असेल . तुमचा एक विचार असेल पण तो किंव दुसरा कुठलाही किमान एक विचार पोचतोय का वाचकापर्यंत ? तुम्हाला on the face value घरंच म्हणायचंय की धरती म्हणायचंय की देश म्हणायचंय याचे आधी किंवा नंतर संदर्भ येत आहेत का ? कदचित तुमचा तो कविता सुचण्यामागचा विचार कळला तर बोलता येइल .

कवितांमध्ये चूक बरोबर काही नसतं . ते कवी / कवयित्रीचं त्या क्षणांचं प्रतिबिंब असतं . आपलं प्रतिबिंब तेव्हा गोंधळलेलं होतं का , भावनांची फक्त सरमिसळ झाली होती का ? हर्ष , राग , द्वेष , दुःख तितकं उत्कट नव्हतंच का याचा विचार ज्याने त्याने आपल्या मागील रचनेकडे बघून करावा . आपण जर वाचकांना त्या वातावरणात घेऊन जाऊ नाही शकलो तर काय उपयोग ?

मायबोली ही गृहपाठाची वही नाहीये तो वर्गातला फळा आहे जिथे आपण लिहीताना सारे वाचत असतात म्हणून या फळ्यावर लिहीण्या आधी काय आणि का लिहायचंय हा विचार पक्का नको का ?

बरं फक्त पोर पोराटकीचा वर्ग भरतो म्हणावं तर तसंही नाही , कित्येक बुजुर्ग मंडळी इथे येउन वाचत असतात . त्याचा दर्जा सांभाळणे हे इथल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे . जिथे आपल्याला चार क्षण जगायला मिळतं त्या जागांचा आदर राखला गेला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे . मग ती जागा म्हणजे जीवन असो , , आपलं घर असो , ऑफिसमधली खुर्ची असो . सुदैवाने वा दुर्दैवाने इथे quality supervisors नाहीयेत पण त्याचा एकच अर्थ मी घेतो

We all are quality ambassadors of maayboli


Naveen
Wednesday, January 24, 2007 - 1:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहीलाच प्रयत्न आहे तुम्ही सांभाळून घेणार अशी अपेक्षा आहे. हो ना!!!

माझं अस्तित्व

माझं अस्तित्व
शेवटी काहीही न उरण्यासारखं
जळणार्‍या कापरासारखं

माझं अस्तित्व
क्षणार्धात कुठंतरी लपण्यासारखं
आकाशातल्या इंद्रधनुष्यासारखं

माझं अस्तित्व
ईकडून तिकडे पळण्यासारखं
वाळवंटातील वाळूसारखं

माझं अस्तित्व
जवळ जाताच नष्ट होण्यासारखं
एखाद्या मृगजळासारखं

माझं अस्तित्व
कशातही न पकडण्यासारखं
सुर्याच्या किरणांसारखं

माझं अस्तित्व
असूनही नसल्यासारखं
समुद्राला मिळणार्‍या नदीसारखं


Shree_tirthe
Wednesday, January 24, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवजी तुम्ही खूपच चांगल्या पध्दतीने मला मार्गदर्शन केलं धन्यवाद.
मी नेहमी लक्षात ठेवेन.

तुवं घर लै न्यारं ... बर
समद्यांना वाटतंय प्यारं ... बर
ह्याची पक्की हायत का दारं .. ( हे का आलं ? समद्यांना प्यारं वाटतंय तर दारं पक्की आहेत का ही शंका कशासाठी ? )

मला असं वाटलं कि दिसायला ऐवढं सुंदर घरटं आहे अर्थातच नाजूक असेल अशी मनाला शंका वाटते. वारं-वादळं आले कि आपल्या घरावरचे पण पत्र(छप्पर) उडतात मग तशा वादळात त्या सुगरनीच्या घरट्याचे काय हाल होत असतील हे त्या सुगरनीला आणि देवालाच माहीत.
म्हणून त्या सुगरनीला असा प्रश्न विचारावा वाटतो कि "तुझं घर खूपच सुंदर आहे, सगळ्यांना खूप आवडतं पण, जेव्हा वादळ येत तेव्हा तुझ्या घराला काहीच होत नाही का?



Meenu
Wednesday, January 24, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवनी खुप छान लिहीलच आहे वरती .. मी अजुन काही मुद्दे मांडते ..

भाषा एकसारखी असली तर कविता वाचायला सोपी जाईल. उदाहरणार्थ पहील्या कडव्यात ग्रामीण बाजाची मराठी बोलणारा कवी पुढच्या दोन कडव्यात एकदम वेगळी मराठी का बोलतोय ? तीथे वाचताना link तुटते.

दुसरं म्हणजे तुम्हाला अशी शंका आहे की सुगरणीचं घर मजबुत आहे का ? वर जो सगळा अर्थ तुम्ही सांगीतलात, तो सर्व विचार तुम्ही तुमच्या मनात केलात पण तुमच्या कवितेच्या ओळीतुन तु अजिबात प्रतीत झाला नाहीये. वाचताना फक्त ईतकच वाटलं की न्यारं, प्यारं, दारं, वारं असा फक्त यमक साधायचा आटापिटा झालाय. यमक जुळलं म्हणजे काव्य होतं असं नाहीये.

अजुन एक म्हणजे ज्या विषयाबद्दल लिहीताय त्या विषयाची जाण. हा मुद्दाही महत्वाचा आहे. तुम्ही आत्ता फक्त एखाद्याचा असा विचार असु शकतो हे नाही मांडताहात तर सुगरणीच्या घरट्याबद्दल बोलताय. तुम्हाला माहीतीये का की तिचं घरटं किती मजबुत असतं अथवा नसतं ते. ते वादळात मोडुन पडतं वगैरे. कारण आत्तापर्यंत सुगरणीच्या घरट्याचा या अर्थानी, weak या अर्थानी कुठे वापर आला नसेल तर वाचकांना हे कळणं अवघड आहे.

आत्तापर्यंत बहीणाबाईंचं म्हणणं प्रमाण होतं

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला ..

नेहमी जे उल्लेख ज्या अर्थानी वापरले जातात त्यापेक्षा वेगळ्या अर्थानी आपण वापरणार असु तर असं का हे कळलं तर जास्त बरं नाही का पडणार ?


Kanchangandha
Wednesday, January 24, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुली कण

घाव टाकीचे सोसले
परी देवपण आले नाही
मुरुमाचे पथ्थर आम्ही
कातळ का झालो नाही?

असतो आम्ही कातळ जर
घडले असते शिल्प सुंदर
परी सप अंतरीचे
ठिकर्‍या उडविती अपार

झालो मृत्तिके समान
मार्गातच लीन झालो
धूळ सृजनशिल पदांची
होऊनिया धन्य झालो

असु द्या क्षणभर आपुल्या चरणी
हेची मागणे साचार
नको उपेक्षा शब्दांची
आम्ही पाळू सारासार


Naveen
Wednesday, January 24, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर ति(प्रेयसी अथवा बायको) कोमात गेली असेल तर तो(प्रियकर अथवा नवरा) कशा पध्दतीने तिला कोमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो याचाच एक भाग म्हणजे ही कविता.
तो तिला जुन्या आठवणी सांगतोय. पण त्यापूर्वी "तो" देवाला आणि तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांना प्रश्न विचरतो,
"पाप न करता का गेली कोमात, मला सांगेल का कोणी?
देवा तिला कोमातून बाहेर आण, हात पसरवितोय दोन्ही"

आठवलं?

दुसर्‍या भेटीतला पहीला पाऊस
पहिल्या पावसातला सुसाट वारा
आठवलं? अगं आठवना, त्या जोराच्या गारा

दामीनीने हाहाकार केला
त्या भितीने तु मला अलिंगण दिलेले
आठवलं? अगं आठवना, ते चुंबनाचे वर्षाव केलेले

मंदिराचे करुन बहाणे
हलूच चोरुन बागेत जाणे
आठवलं? अगं आठवना, चिंचेच्या झाडाखाली गायलेले ते गाणे

शनिवार वाड्यात पाहिलेले
ते "बाजीराव-मस्तानी"चे नाटक
आठवलं? अगं आठवना, माझ्या भेटीसाठी तु ओलांडलेले ते फाटक

आजीने सांगितलेल्या "राजा-राणी"च्या
गोष्टीतला तो गुलाम
आठवलं? अगं आठवना, २६ जानेवारीला
झेंड्याऐवजी तुला केलेला तो सलाम

त्या रात्री माझ्या मिठीत येताना तु लाजलेली
ति नाजुक स्वरात म्हणाली,"मला आठवली
ती रात्र रातराणीच्या फुलांनी सजलेली"

अशा रीतीने "ति" कोमातून बाहेर आली
देवाने "त्याची" प्रार्थना ऐकली.


Nandini2911
Wednesday, January 24, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन..
ती परत कोमात जाईल रे...
कोमा काय असतो हे जरा समजावून घे आधी..
देवा, कवितेच्या बीबीवर ही कसली साथ आलेय रे?


Ravindrakadam
Wednesday, January 24, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त एकदाच.........

फक्त एकदाच तुला मनसोक्त हसताना पहायचय
निदान त्यासाठि तरी मला विदुषक बनुन तुझ्यासमोर यायचय
फक्त एकदाच तुझ्या मनातले सारे काही जाणून घ्यायचय
निदान त्यासाठि तरी नजरेला नजर भिडवून तासनतास बसायचय
फक्त एकदाच तुला माझ्यासाठी बेचैन होताना पहायचय
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे ऊशिरा यायचय
फक्त एकदाच तुला अनिवार रडताना पहायचय
निदान त्यासाठी तरी मला खोटेखोटे मरायचय.........


Meenu
Wednesday, January 24, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं काय चाल्लय हे ...? नको .. नको हे वाचणं

Poojas
Wednesday, January 24, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'' तेव्हापासून......''

नव्हती जेव्हा तुझी नि माझी ओळख साधी..
संवादाची वृथा अपेक्षा प्रश्नाआधी..
तेव्हापासून खोल मनाच्या गाभार्‍याशी..
तुझ्या स्मृतींच्या सवे घ्यायची नित्य समाधी..

तेव्हापासून जडली बाधा आठवण्याची..
पुन्हा मनाला मागे मागे पाठवण्याची..
शब्दफुलांचे असंख्य झेले.. अनंत आशा..
मुठीत काही मिठीत थोडे साठवण्याची..

तेव्हापासून फ़ितुर झाले श्वास बिलंदर..
तेव्हापासून उरले नाही..दूरात अंतर..
शब्द लाघवी जुळले.. आणिक घडली कविता..
रुळू लागले ओठावरती..गीत परस्पर...

तू नजरेने सांग एकदा माझ्यासाठी
जुळतील का रे.. तुझ्या नि माझ्या रेशीमगाठी..
तुझेच व्हावे मीपण तेव्हा सर्वस्वाने..
विसरून माझे 'मी' पण अवघे तुझ्याच साठी..

असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?
माझ्यावाचून काही तुझेही अडेल का रे
तेव्हापासून त्या सरलेल्या.. क्षणाक्षणाला..
स्मरण्याचे हे वेड तुलाही जडेल का रे..??

काय खुळी मी विचारते बघ भलते सलते...
नाहीच काही तसे मलाही अचूक कळते..
उगीच वेड्या आशेवरती माझ्या नकळत..
अल्लड पाऊल पुन्हा पुन्हा त्या तिथेच वळते..

अपुल्यामधले किंतु परंतु सरतील जेव्हा..
जरतारीच्या रिक्त पोकळ्या भरतील तेव्हा..
उपचाराचे रूक्ष बोलणे सोड अन्यथा...
आठवणींचे हिशोब केवळ उरतील तेव्हा..

नकोच गुंता नात्यांचा ती व्यर्थ मुजोरी..
नकोस तोलू शब्दांमधले अर्थ दुहेरी..
मित्रत्वाची अवीट गोडी ओढ चिरंतन..
अखंड राहो पावित्र्याचा बंध रुपेरी..

तेव्हापासून असेच काही स्मरते.. झुरते..
नित्य उशाशी अश्रू.. आणिक मनात सल ते..
किती ठरवते विसरून सारे पुन्हा नव्याने..
जगण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करते..

अखेर माझ्या नकळत मजला.. गुपित कळते..
शून्यामधल्या घरट्यासाठी वणवण फिरते..
तेव्हापासून... माझी प्रतिभा .... अलिप्त.... निश्चल..
म्हणून माझी कविता.. कायम अपूर्ण उरते............ !!!




हुश्श्श्श्श.....


कविता बरीच लांबली...... !!!
अगदी मनाच्या श्लोकाएवढी लांबलचक झाली.....
तरी.... या BB वरची जागा व्यापल्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करते..
आणि आशा करते की... तुम्ही हे ही चालवून घ्याल..............!!!!!!!!!!!!!






Meenu
Wednesday, January 24, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा मस्त नाद आहे कवितेला आणि अर्थही .. कविता आवडली ...


Bhramar_vihar
Wednesday, January 24, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे नविन! तुझ्या कविता ऐकवल्यास तर ती कोमातूनच direct exit घेईल रे! अरे यात आजीची गोष्ट कुठुन आली? आधी मान्यवर कविंच्या कविता वाचा रे आणि मगच धाडस कारा ना!

हे सगळे हेमंत दिवटेने सोडलेले तर नसतील ना? ए. भा. प्र





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators