Meenu
| |
| Monday, January 22, 2007 - 5:58 am: |
| 
|
|| श्री || नव्या कोर्या वहीवरचा पहीला शब्द, आज झुळुकेचं कोरं पान बघुन आठवला ..! नव्या कोर्या वहीचा वास आणि स्पर्श, मी पुन्हा एकदा मनात साठवला ..!
|
R_joshi
| |
| Monday, January 22, 2007 - 6:14 am: |
| 
|
मीनु जुन्या आठवणि ताज्या केल्यास. नव्याचा छंद मनाला जडला जुने आपसुक माघे राहिले नव्या अन जुन्या क्षणांचे निर्माल्य झुळुकेला मी वाहिले. प्रिति
|
जुनं संगीत म्हणे ऐकणार्याला शांत झोपवायचं नव्यानं काम केलयं झोपलेल्यानां जागवायचं. गणेश(समीप)
|
तु मला विसरलीस म्हणून, मी पाठवलं आपल्या आठवणींच पत्र तुला तुझ्या नयनांतून येतील अश्रु असं कधीच वाटलं नव्हत गं मला
|
कुठे चालली संस्कृती काहीच कळत नाही भाकरीसाठी पीठ कोणीच मळत नाही
|
Tulip
| |
| Monday, January 22, 2007 - 12:22 pm: |
| 
|
संस्कृती आणि भाकरीच पीठ मळत नाही.. काहीच कळत नाही.. वा! वा! वा! अगदी सांसरीक तरीही गहन अर्थ. असेच लिहित रहा. असंच लिहित रहा तीर्थे. ते मान्क्या दिसले नाहीत बरेच दिवसांत?
|
Vasant_20
| |
| Monday, January 22, 2007 - 4:57 pm: |
| 
|
आठवणींची झुळुक तुझी आज पुन्हा येऊन गेली, दोन क्षणांचच का होईना, पण जगण देऊन गेली
|
Krishnag
| |
| Tuesday, January 23, 2007 - 12:34 am: |
| 
|
शब्दांमृतांच्या वर्षावात कुणी उत्सर्जित जल फेकतात झुळुकेच्या बाग कोमेजून त्याने भुछत्रं उगवतात पण अशी भुछत्रं कधी चिरकाल टिकत नसातात सुकलेल्या बागा जिजिविषेने पुन्हा टवटवीत होतात
|
ज्या ज्या दिवशी फुलांनां बाजारात भाव त्या त्या दिवशी काट्यांची माझ्याकडे धाव! गणेश(समीप)
|
Manogat
| |
| Tuesday, January 23, 2007 - 2:56 am: |
| 
|
तुझ्या अठवणिंनची झुळुक कधी तरी वादळात परिवर्तित होते, अणि शांत असलेल्या माझ्या आयुश्याला उधवस्त करुन जाते..
|
ह्या स्वप्नातल्या गावात तुमचं स्वागत आहे जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला रोग्-राईचं अलिंगण आहे काय हे गाड्यांच्या धुरांचे धुके दाटले सुखं-दु:खातले अश्रु देखील आटले
|
काहीजण स्वार्थासाठी स्वत:च्या आई-वडिलांना विसरतात विसरणारे माणसं आयुष्यभर तरफडतात आई-वडिलांजवळ पैसा असेपर्यंत त्याच्यां तोंडून कुत्र्यासारखी टपकते लाळ आई-वडिलांसाठी स्वत:चं जिवन अर्पण करणारा आज आठवतो का तो श्रावण बाळ?
|
जीव गेल्यावर प्रत्येक माणुस कसा फक्त शरीराने उरलेला असतो आपल्याला त्याच हे उरणं पटत नाही... आपण त्याला पुन्हा पुरुण,जाळून मारतो! गणेश(समीप)
|
Meenu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 12:19 am: |
| 
|
गणेश मी कवितेवर तिर्थे यांना लिहीलय ते तुम्हालाही तंतोतंत लागु होतय .. तेव्हा तुम्हीही थोडा विचार करा आत्मपरीक्षणाचा.
|
मीनुजी, तुम्ही मायबोलीच्या खुप जुन्या सभासद आहात, तुमच्या सारख्या कवयत्रीने, जर काही चागलं सुचवलं, सल्ला दिला तर आमच्या सारख्यां 'नव कवींनी' तो तंतोतंत पाळायला हवा नाही का? गणेश(समीप)
|
Meenu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 2:56 am: |
| 
|
मी खुप जुनी सभासद नाही. माझा सल्ला पाळायचं बंधन नाही. पटला तर पाळु शकता. पण तुमचं जे हसं होतय ते थांबावं अशी मात्र मनापासुन ईच्छा होती ईतकच. गैरसमज नसावा. धन्यवाद.
|
Naveen
| |
| Wednesday, January 24, 2007 - 4:17 am: |
| 
|
तो कोण होता का झाला फक्त तुझ्यासाठी देव विट्ठल जेवला भक्त नामदेवासाठी
|
हा कोण आहे? का आला? फ़क्त झुळुके साठी नविन id घेतला देव ना तरी आम्हास वाचवु शकला आता यावे इथे मज वाटे कशासाठी???? ( मला मार्गदर्शन करा, माझी झुळुक जुळतेय की नाही??? त्यासाठी शेवटच्या ओळीत मला ला शेवटी असलेला शब्द हवा आहे तुला सुचतोय का सांगा please )
|
Shyamli
| |
| Wednesday, January 24, 2007 - 4:39 am: |
| 
|
बास का वैशाली आता तुला सुचेना झालं का कस होणार..... परमेश्वरा वाचव रे बाबा कशाला लिहि ग मुली बाकिचे कश्याला लिहितायत तसच तुहि लिहि
|
Meenu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 4:41 am: |
| 
|
आता इथे यावे वाटे कशासाठी मजला ... असं चालेल का बघ ना लोपा ..
|