|
पाऊस मनी ईच्छा होती तिचे स्मित पाहण्याची तिच्यावर प्रितिची फुले वाहण्याची ति उभी पावसात चिंब भिजताना मी त्या पावसावर जळताना ति माझी मग त्याने का स्पर्शावे? तिच्या कोवळ्या शरीरावर त्याने का बरसावे? अंगणात उभी पावसात भिजताना मी दारामागून तिला पाहताना तिचं सौदर्य पावसात भिजलेलं मला पाहून लाजेन झाकलेलं मी जवळ जाताच ति लाजली चुंबनाच्या वर्षावात ति नाहली मी प्राशीले तिच्या ओटांवरचे पाणी तिने गायली प्रेमाची गाणी
|
Ajjuka
| |
| Monday, January 22, 2007 - 7:45 am: |
| 
|
परेश, प्रसाद, तुषार, वैभव, हेम्स, पिक्या, क्षिप्रा, पेशवा, गिर्या, हे सगळे अस्सल कवीलोक कुठे गेलेत? hibernating? लिहा रे काहीतरी.. हे ट ला ट वाचून कंटाळा आला रे.. हे थांबवण्यासाठी तरी लिहा.. सारंग आणि देवदत्त-जी हे दोघंच किती पुरे पडणार..
|
कालचा पाउस रोजच्या सारखा नव्हता मुसळ्धार असुनही कोरडाच वाटत होता रोज आकाशात ढग येताना तुला घेवून येतात बरसण्याआधी मिठित माज्या तुला सोडून जातात विजानाही आता चान्गलेच ठाउक जाहलेय त्याना पाहिले की तुला घाबरायला होतय ढगाच्या आडून त्याही जोरात कडकडतात त्याना पाहुन हात तुजे मला अजुनच घट्ट आवळ्तात पाउस पडायला लागला की बाहेर जायला तुला कारण हवे असते नेमके तेव्हाच घरातले दूध किन्वा साखर सम्पलेली असते नेहमी जवळ्च्या वाण्याकडे एक्ट्याला पिटाळ्त असतेस पावसात मात्र माज्या पुढे कुलुप घेवुन तयार असतेस घाई घाईत बाहेर पडताना मुद्दाम तु छत्री विसरणार नन्तर मात्र मनसोक्त पावसात चिन्ब भिजणार बोचरया वार्यात, ओल्या अन्गाने तु आईस्क्रिम खाणार घरी आल्यावर लपून छपून शिन्का देणार पण काल मात्र ढग एकटेच आले विजाही नुसत्याच चमकून गेल्या पाऊस उदासपणे कोसळ्त होता ग्यसवर आपल्या, चहा निवान्तपणे उकळत होता तुज्याविणा पावसातला ओलावा हरवला होता बाहेरच्याएवजी काल माज्या डोळ्यात तो उतरला होता...
|
वा!!! वा!!! रविंद्रजी मस्तंच. तुज्याविणा पावसातला ओलावा हरवला होता बाहेरच्याएवजी काल माज्या डोळ्यात तो उतरला होता... एकदम झक्कास.
|
Abhijat
| |
| Monday, January 22, 2007 - 8:33 am: |
| 
|
काहीच्या काही कविता मधल्या कविता तर इथे चुकून आल्या नाहीत ना? निदान वरच्या २ कविता पाहून तरी अशी शंका वाटली!
|
अभिप्रायासाठी सगळ्या दोस्तांची आभारी आहे. मीनू, ' जबाबदार' कवितेचा अर्थ स्पष्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ' आठवणी' आवडल्या. प्रश्न आणि उत्तरं.. खरंय.. काही प्रश्न सोडून दिल्यानेच सुटतात म्हणे.. सारंगा, कविता नावाची कविता मस्त आहे. अगतिकता खूप प्रत्ययकारी उतरली आहे. शलाका, ' रुपेरी किनारा'ची कल्पना छान आहे, पण मला स्वतःला कात उसवण्याचा संदर्भ नंतर ( रुपेरी किनारा दिसल्याचा परिणाम म्हणून) आलेला वाचायला जास्त logical वाटला असता.. म्हणजे अस काहीसं: तरीही.. सुक्या डोळ्यांनी शोधायचाच आहे तू गोरज वेळी दाखवलेला काळ्या नभाचा ( मेघाचा??) रुपेरी किनारा.. तो सापडला तर उसवेलही कदाचित ही कात पण तोवर नको विचारूस ना ' मी अशी का दिसते..?'
|
Parakhad
| |
| Monday, January 22, 2007 - 5:48 pm: |
| 
|
" मनी ईच्छा होती तिचे स्मित पाहण्याची " नंतर काय झालं रं तुज्या ह्या विच्छेचं ? १४ वाक्य लिवलीस , ल्यका तिला हसवायचं सुचलं न्हाय व्हय रं ? आता म्हन गजल हाय , म्हंजी वाचनारी मानसं बसल्या जागी प्रान सोडत्याल . कशाला जिवावं उटलायस बाबा ? मायबोली बचाव फंडातुन देनगी देतू . रंगीबेरंगी की काय हाय बग तिकडं जागा घी पेशल आन सुट मोकाट
|
Meenu
| |
| Monday, January 22, 2007 - 10:19 pm: |
| 
|
प्रार्थना नको वाटे देवा, अज्ञान अंधार .. वासनांचा भार सोसवेना .. संसार सागर, वासनेची नाव .. बुडणे सुकर, होत जाई .. निर्मळ ज्ञानाचा, पसरो प्रकाश .. उजळुनी जावे, अंतरंग .. चुकता लेकरु, दावी तुची मार्ग .. असो द्यावी कृपा, मजवरी ..
|
Meenu
| |
| Monday, January 22, 2007 - 10:24 pm: |
| 
|
ओळ माझी रुचेना संसार, सोसणे अपार .. भक्तीचा मी मार्ग, न चालिता .. समाज कुंपण, देईल दुषण .. पाळणे नियम, भोगणे जी .. मळलीच वाट, लागे चालावया .. पाऊल पाऊल, जड होई .. नाही रे मी ज्ञाना, सर ना तुक्याची .. खारीचा हा यत्न, ओळ माझी ..
|
Meenu
| |
| Monday, January 22, 2007 - 10:29 pm: |
| 
|
प्रार्थना संतांचिये मुखी, अमृताचा बोल .. बोलविता धनी, विठुराया .. संसार असार, सोडविली माया .. भार झाली काया, संतांलागी .. भक्तीचा हा मार्ग, मज दाखविला .. चालावया बळ, देई भक्ता ..
|
आई काळाने आज का घात केला? आईला माझ्या का दुर नेला? वार्याने का तांडव केला? आभाळाने का साथ दिला? जमीन फाटली, निष्ठूरता दाखविली आईला माझ्या का गिळून घेतली? देवा, आईविना जगू रे कसा? तिचा स्पर्श हवाहवासा तिने भरवलेल्या घासात होता मेवा तुला माझा का वाटला हेवा? तिच्या प्रेमाच्या हाकेने मला ओढनं तिन्ही लोकांत नाही कुठे तिच्या कुशीतलं झोपणं माझी हाक, तु का रे ऐकली नाही? आईला माझ्याजवळ तु का रे ठेवली नाही? माझ्यापासून का हिरावून घेतलीस उषा? आईला दुर नेऊन मला का दिली निराशा? देवा, आईविना जगू रे कसा? तिचा स्पर्श हवाहवासा तिचा स्पर्श हवाहवासा...
|
Devdattag
| |
| Monday, January 22, 2007 - 11:47 pm: |
| 
|
किती प्रयत्न करतोय मी बर्याच काड्या गोळा केल्या कापुस आणला कागद, गवत, पानं, फुलं सगळं जमा केलं पण एक वार्याची झुळूक येते आणि मी बांधत असलेलं कोकिळेच घरटं परत उध्वस्त होतं
|
सावली...... भर मध्यानीचा एकटाच निघालास तु सावली न मी तुझी मला ही न सादवता निघालास? डोक्यावरचा तापता सुर्य सावलीला पण ठेवतोय पायाशीच त्यातुन पाउल ही जडावलय त्या शृखलांचा प्रत्येक हिसका थरथरवतोय ती सावली हसलेले, डवरलेल दवात नहालेल सुखाच्या बघितलय मी तुला असा भर मध्यानीचा नको निघु जाशील रे कोमेजुन माझ्या फ़ुला..... अन तुझ्यी कोमेजणारी प्रत्येक पाकळी जखमी करून जाईल या तुझ्या सावलीला
|
कांचनगंधा सावली आवडली. अगदी मस्तं
|
Smi_dod
| |
| Tuesday, January 23, 2007 - 1:40 am: |
| 
|
आठ्वणी!!! आठवणीची मखमली पेटी उघडायची अल्लद.... विखरायच्या आठवणी हळुवार न्याहाळत बसायच्या मग त्या सगळ्या आठवणी निरखता निरखता नव्याने जाणवते त्यांची वीण त्या धाग्या धाग्या मागची गुंफ़ण त्यावेळी निसटलेला तपशील आता एकदम नजरेत भरतो दरवेळी निरखताना नविन वाटणारी जुनी आठवण वेगळाच पैलु दाखवते फ़िरवुन आणते परत निसटलेल्या क्षणांत दुर्लक्ष केलेल्या कितीतरी आठवणी...सुंदर वाटतात बघता बघता गत काळाचे भास आणतात स्मि
|
Jo_s
| |
| Tuesday, January 23, 2007 - 6:21 am: |
| 
|
वा छान चाललय सगळ्यांच एकटेपण जीवनात येते कधीतरी, असे आगळे एकटेपण भासु लागतो वर्षांसम मग, आयुष्यातील हरेक क्षण भोवती असती कितीतरी, परी अपण मात्र एकाकी उगाच बसते मनही मांडत, आयुष्यातली वजाबाकी नको वाटते सारे काही, नको वाटती आठवणी मन रमेना कोठेही अन्, सारे वाटे अगदी अळणी यत्न किती ते व्यर्थची जाती, लागत नाही काही हाती असे सारे अनुभव मात्र, नैराश्याचा गर्तेत नेती अशा वेळी काय करावे, सारे काही विसरून जावे जेव्हा बदलेल सारे काही, तोवर अगदी स्वस्थ बसावे जेव्हा बदलेल सारे काही, तोवर अगदी स्वस्थ बसावे त्या क्षणाच्या स्वागतास पण, मन सदा सज्ज असावे संधी येताच मात्र अशी, तुटून पडावे त्या वरती सारे क्षणं मग आपुलेच ते, अलगद पकडावे हाती सुधीर
|
सुधीर तुमची "एकटेपण" ही कविता फार आवडली! तुमची कविता वाचल्यावार मला क्षणभर वाटलं,की हे असं "एकटेपण" हल्ली मी खुपच अनुभवतोय! असो कविता खुप आवडली! गणेश(समीप)
|
Vasant_20
| |
| Tuesday, January 23, 2007 - 3:56 pm: |
| 
|
आठवणीच्या प्रत्येक पानावर तुझ नाव लिहीलय, आठवणीच्या प्रत्येक पानात तुझच फ़ुल ठेवलय, पुसट झालीत अक्षर तरीही ती वाचतोय, अन् कोमजुन गेलीत फ़ुल तरी तुझ्याच सुगंधात नहातोय वसंत.
|
वा!!! वा!!! वसंतजी मस्तंच. कोमजुन गेलीत फ़ुल तरी तुझ्याच सुगंधात नहातोय
|
Sarang23
| |
| Tuesday, January 23, 2007 - 10:49 pm: |
| 
|
देवा, लै खास मित्रा!! सुधीर, वा! छान आहे रे!
|
|
|