Himscool
| |
| Friday, January 12, 2007 - 6:24 am: |
| 
|
साहवेना , राहवेना मतल्यात आलं की पुढे सगळीकडे " हवेना " येणं गरजेचं होतं ... त्यामुळे पुढचे शेर अडचणीत आले आहेत . वैभव, इथे "हवेना" ऐवजी नुसतं "वेना" असेच मतल्यात धरले तर... इथे मात्रांचा काही संबंध येतो का? मी काही कविता गझल लिहित नाही पण मला उत्सुकता आहे म्हणुन शंकेचे निरसन व्हावे हीच इच्छा आहे...
|
Meenu
| |
| Friday, January 12, 2007 - 7:47 am: |
| 
|
हिम वैभव सांगतोय कि मग मी पहील्या शेरमधे त्याची सोय करायला हवी उदाहरणार्थ तीथे मी साहवेना आणि चालवेना वापरलं असतं तर अवेना नी संपणारे शेर चालले असते पण तीथे दोन्हीकडे ह आलाय त्यामुळे तो पुढेही येणं गरजेचं आहे. जे पहील्या दोन ओळीत common आहे ते पुढच्या सर्व शेरांमधे शेवटी येणं गरजेचं होतं.
|
Chanakya
| |
| Monday, January 15, 2007 - 12:43 am: |
| 
|
इथल्या एकसे एक नितांत सुंदर गझला पाहुन मीही काहितरी लिहायचे धाडस करत आहे... कुठे काय चुकतेय ते सांगा pls? आसवांचे कैक प्याले पीत मी गात जातो जीवनाचे गीत मी भोवती स्वार्थांध, ढोंगी श्वापदे का तयांची अंगिकारू रीत मी? आरसाही जाणिवांचा भंगला राहिलो ना मन्मनाचा मीत मी सोबती एकांत माझा एकटा चालतो रे सावलीला भीत मी दाबल्या कित्येक इच्छा अंतरी कावळाही ना शिवे ते शीत मी
|
Sarang23
| |
| Monday, January 15, 2007 - 1:17 am: |
| 
|
वा! वा! चाणक्य, सुंदर!
|
Mankya
| |
| Monday, January 15, 2007 - 2:42 am: |
| 
|
" सोबती एकांत माझा एकटा चालतो रे सावलीला भीत मी " आवडले रे चाणक्य ! .... मस्तच !
|
चाणक्य ... मीटर परफ़ेक्ट आहे ... आवडली
|
चाणाक्य गझल छान आहे.!!!
|
चाणाक्य गजल छान आहे.
|
Bbhannat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 5:56 am: |
| 
|
काव्य सम्त्राट .. सम्राट व्हायच होत काय तुमाला ..?
|
Chanakya
| |
| Wednesday, January 17, 2007 - 12:42 am: |
| 
|
सर्वांचे मनापासुन आभार सारंग, वैभव तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रियेमुळे हुरुप वाढला
|
Imtushar
| |
| Wednesday, January 17, 2007 - 6:52 am: |
| 
|
चाणक्य, फ़ारच छान. दाबल्या कित्येक इच्छा अंतरी कावळाही ना शिवे ते शीत मी ... अप्रतिम.......
|
Shyamli
| |
| Wednesday, January 17, 2007 - 6:59 am: |
| 
|
वा चाणक्य छान आहे गझल आवडली,
|
Bairagee
| |
| Wednesday, January 17, 2007 - 9:47 am: |
| 
|
दाबल्या कित्येक इच्छा अंतरी कावळाही ना शिवे ते शीत मी वा. मतलाही छान. लिहीत रहा. लिहिता-लिहिता ओळी अधिक सहज बोलत्या होतील.
|
Sarang23
| |
| Thursday, January 18, 2007 - 4:13 am: |
| 
|
जात माणसाची जात काही जात नाही! एवढेसे मन कुणीच पहात नाही!! ओळखीचे खेळ सारे संचितांचे; खावयाला भूक देते दात नाही! रोज होते हाव तो येईल हाती; खेळतो मी डाव जो हातात नाही! सालबादासारखे येईल का ते? मूळ अकलेचे मुळीच वयात नाही! देह नुस्ता वाढलेला माणसाचा; आत आत्मा राहिलाच हयात नाही… प्रेम सुद्धा खेळ झाला मर्कटांचा या दिव्याला तेल आहे वात नाही बोललो ते लागले का हो मनाला? ही जगाची रीत; तुमची बात नाही! सारंग एका गोड मैत्रीला समर्पीत...
|
सारंग भाई मस्तच. प्रेम सुद्धा खेळ झाला मर्कटांचा या दिव्याला तेल आहे वात नाही. वा!!! श्री
|
Mankya
| |
| Thursday, January 18, 2007 - 4:23 am: |
| 
|
बोललो ते लागले का हो मनाला? ही जगाची रीत; तुमची बात नाही! सारंगा ..... पटलं रे मित्रा ! सही लिहिलय यार .... मस्त ! माणिक !
|
Abhiyadav
| |
| Thursday, January 18, 2007 - 4:35 am: |
| 
|
दाखला दिसणारा हर एक जण परका वाटला होता ओळखी पुसायचा मी घाट घातला होता कधी होणार समतल ही जातींची उतरंड तसा शबरीच्या बोराने रामही बाटला होता हा कसा अवेळी अंधार पसरला आहे सूर्य वटवाघळांनी दिवसा झाकला होता ढोंग पावित्र्याचे जेव्हा उघडे पडले माझाच चेहरा तेव्हा मलाच हासला होता क्षुद्रापरी चिरडतात हे मानवी जीवाला पाहून रौद्र इथले शैतान लाजला होता ठाऊक मजला आहे पैसा धुळीतला मी न ठोकरून त्यांनी माझा मान राखला होता आता बटीक कायद्याकडून नाही कसली अपेक्षा पाय चाटी तुमचे तो सर्वात लाडला होता धार आहे म्हणता शब्दांना तुम्ही माझ्या माझ्याकडे स्वत:च्या जीवनाचा दाखला होता अभिजित...
|
Abhiyadav
| |
| Thursday, January 18, 2007 - 4:41 am: |
| 
|
ही वृत्त-वजा गजल आहे. किंवा गजलसदृश्य कविता म्हणू शकेन.
|
वा!!! अभिजित वा!!! कधी होणार समतल ही जातींची उतरंड तसा शबरीच्या बोराने रामही बाटला होता. मस्तच. श्री
|
Dineshvs
| |
| Thursday, January 18, 2007 - 12:03 pm: |
| 
|
अभिजेत छान कल्पना, तिसर्या शेरात आहे च्या जागी दुसरी वाक्यरचना करता येईल का ? तिथे वर्तमानकाळ जरा खुपतोय. अर्थात मी जाणकार नाही.
|