|
Dineshvs
| |
| Thursday, January 18, 2007 - 12:05 pm: |
| 
|
सारंग, दुसर्या शेरात दाताच्या जागी हात हवे होते का ? आहे त्या ओळीचा अर्थ मला लागला नाही.
|
Bairagee
| |
| Friday, January 19, 2007 - 12:01 am: |
| 
|
सारंग, काही जात नाही! सोबत कुणीच पहात नाही खटकते. तीच बात मुळीच वयात नाही!, राहिलाच हयात नाही ची. हे प्रकरण मात्रावृत्तात बसत असले तरी लय लयाला जाते आहे. खावयाला भूक देते दात नाही! (हाताबाबत दिनेशशी सहमत) खेळतो मी डाव जो हातात नाही! या दिव्याला तेल आहे वात नाही ह्या सुट्या सुट्या ओळी प्रॉमिसिंग आहेत. अभिजित, वृत्तावर हुकमत मिळवा. उत्तम गझल लिहाल. सूर्य वटवाघळांनी दिवसा झाकला होता वा! रचनेत गझलेची तबीयत आहे.
|
Sarang23
| |
| Friday, January 19, 2007 - 4:53 am: |
| 
|
दिनेशदा आणि बैरागी, सुचनांबद्दल आभारी आहे. कुणीच पहात नाही... सहमत. खरं तर मलाही ते खटकतय पण भाव तेच रहावे आणि लय यावी म्हणून प्रयत्नशील आहे. तुम्हाला काही सुचत असेल तर कळवा
|
Chanakya
| |
| Friday, January 19, 2007 - 8:49 am: |
| 
|
तुषार, श्यामली, बैरागी धन्यवाद सारंग मस्तच आहे गझल असे चालतेय का बघ - माणसाची जात काही जात नाही पशूंपेक्षा वेगळी औकात नाही चु. भु. देणे घेणे अभि यादव, तुमचीही रचना छान आहे
|
नमस्कार मंडळी. सगळ्या जुन्या जाणत्या आणि नवीन उत्साही गज़लकारांना बघून बरं वाटलं. खूप दिवसांनी आले आहे, एकेक वाचून सावकाश अभिप्राय देईनच. सद्ध्या माझी एक गज़ल पोस्ट करत आहे.
|
जाहिरात छाती पिटून तू ही कर जाहिरात आता व्यापार वेदनांचा आहे भरात आता खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते असली जुनाट नाणी ना वापरात आता वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली कोणीच येत नाही या मंदिरात आता ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता प्रत्येक प्रांत देतो अपुला स्वतंत्र नारा मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? ज्यांनी मला दिलेले मृत्यूस सोहळ्याने खांद्यावरून त्यांच्या माझी वरात आता...
|
Mankya
| |
| Friday, January 19, 2007 - 9:26 am: |
| 
|
खुप दिवसांनी लिहिलस ! पहिल्या शब्दापासुनच एक प्रकारची उचल घेते हि गजल ( गजलच ना? )... ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता पुर्ण वास्तवाशी भिडलेली....स्वाति ..You have done it! मस्तच ! माणिक !
|
Sarang23
| |
| Friday, January 19, 2007 - 9:51 am: |
| 
|
आज सोहळा आहे म्हणायचा... एक कविता आणि एक गझल! निनावी, अ प्र ति म... काय दाद देऊ? केवळ अ प्र ति म!!!
|
Bairagee
| |
| Friday, January 19, 2007 - 11:41 am: |
| 
|
निनावी, गझल दणकेबाज़ आणि हमखास दाद घेणारी. छाती पिटून तूही कर जाहिरात आता व्यापार वेदनांचा आहे भरात आता वा! एक सुचवतो. छाती पिटून जाहिरात बाजारात चांगली वाटते. १० का ३, १० का ३ सारखे. खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते ' असली' जुनाट नाणी ना वापरात आता शेर चांगला आहे. इथे चालायची खोटीच नाणी इथे चलनात नव्हतो फारसा मी ह्या ओळींची आठवण झाली. ही कुंपणे निकामी, कुलपे-कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता छान! अर्थ थोडा स्पष्ट झाला, खुलला तर अज़ून मजा येईल. श्लेष कळावा म्हणून' असली' अवतरणे नसावीत. वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली कोणीच येत नाही या मंदिरात आता छान! प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? वा! छान! 'त्याचा' ऐवजी 'अपुला' हवे असे वाटते. मराठीत असा वापर नसतो. 'त्याचा' हा इंग्रजीचा प्रभाव वाटतो. चुभूद्याघ्या. शेवटचा शेर भरतीचा वाटतो. मला जमला नाही. सारंग, माझ्यामते अशावेळी कल्पना इतरत्र वापराव्यात.
|
मनापासून धन्यवाद, बैरागी. तत्काळ करता येण्यासारखे होते ते बदल ( तत्काळ) केले आहेत. बाजार अधिक समर्पक आहे हे खरं, पण ' बाजार भरात येणं' हे जरा विचित्र नाही का वाटणार? तसंच ' पाहुण्यांच्या' शेर मधे काय बदल करता येईल?
|
Meenu
| |
| Friday, January 19, 2007 - 12:00 pm: |
| 
|
वा स्वाती खरच सुंदर .. गज़ल पहील्यांदाच वाचायला मिळतेय तुझी ..
|
Shyamli
| |
| Friday, January 19, 2007 - 12:00 pm: |
| 
|
ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता>>>> वाह...... .. ..
|
Dineshvs
| |
| Friday, January 19, 2007 - 12:15 pm: |
| 
|
स्वाती, वर श्यामलीने उधृत केलेल्या ओळीत, दोनदा निकामी नको होता, पण दुसरा शब्द मला सुचत नाही. तुलाच सुचु शकेल. श्यामलीने काय हल्ली, चार ओळींचे बंधन घालुन घेतलेय का ?
|
Anilbhai
| |
| Friday, January 19, 2007 - 1:29 pm: |
| 
|
ही कुंपणे फाटकी.. चालेल का?
|
Bairagee
| |
| Saturday, January 20, 2007 - 3:28 am: |
| 
|
बाजार अधिक समर्पक आहे हे खरं, पण ' बाजार भरात येणं' हे जरा विचित्र नाही का वाटणार? असलंच तर ' बाजार भरात येणं' 'व्यापार भरात येणं' एवढंच विचित्र. 'बाज़ार गर्म' आहे ह्या अर्थाने चालेल ना. पाहुण्यांच्या शेरात मला 'नेमकी' अडचण वाटत नाही. हे आगंतुक 'पाहुणे' कोण हे थोडे स्पष्ट व्हायला हवं. विचार करतो आहे.
|
स्वाती ... अप्रतिम गज़ल ... छाती पिटून तू ही कर जाहिरात आता व्यापार वेदनांचा आहे भरात आता स्वाती , बैरागी ... मला वाटतं व्यापार जास्त समर्पक आहे ... वेदनांचा बाजार मध्ये बाजार कुठल्या अर्थाने येतोय म्हणून शंकेला वाव नाही का राहणार ? म्हणजे बाज़ार फक्त गर्दी म्हणून पण येऊ शकतो ना ? खरंतर एक विचार मला ही गज़ल वाचल्यापासून छळतोय तो इथे मांडतो ... आणि तो मांडण्यासाठी एका र्हस्वची सूट घेतो छाती पिटुन व्यथेची कर जाहिरात आता व्यापार सांत्वनांचा आहे भरात आता हा शेर जास्त परिणामकारक होईल काय ? प्रत्येकाने आपापल्या व्यथेची जाहिरात करून सांत्वनेची देवाण घेवाण करावी अशी परिस्थिती आहे असं म्हणायचंय .. हा जास्त comprehensive thought होऊ शकेल का ? ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता इथे दोनदा निकामी आल्याने उलट त्या शेरचं सौंदर्य वाढलं आहे अस माझं मत आहे ... बर्याच वेळा एखादी गोष्ट आणखी ठामपणे सांगण्यासाठी एका शब्दाचा दोनदा खूप सुंदर वापर केला जाऊ शकतो ... जो इथे केला आहे .. दोन्दा आल्यामुळे एक सौंदर लयही मिळत गेली आहे असं माझं मत आहे ... ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता हे मनाला उद्देशून असावे आणि " भलत्याच " शब्दांतून नकोसे लोक दिसतायत हे खरे असले तरी as an afterthought परक्याच माणसांची गर्दी घरात आता असे लिहून आपली माणसे परकी झाली आहेत आणि नको असूनही घातलेली सर्व कुंपणे निकामी ठरतायत आणि मनास त्यांची गर्दी वाटते आहे असे जास्त परिणामकारक होईल काय ? परकी माणसे ही पाहुणेही असू शकतात म्हणजे मूळ विचाराला धक्का पोचणार नाही .. तसेच परक्याच गर्दी , घरात ह्या मधील र च्या repeatedness ne नादमयता वाढते असं वाटलं प्रत्येक प्रांत देतो अपुला स्वतंत्र नारा मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? मला स्वतःला तरी " त्याचा " खटकलं नाही ... विशेष्तः " अपुला " , " अता " सारखी सूट घेण्या ऐवजी तर नाहीच नाही . मला आठवतं माझ्या ते म्हणाले प्रेम अमुचा विषय नाही मी म्हणालो " का तुम्हाला हृदय नाही '"? ह्या मतल्यावर प्रचंड deliberation केलं गेलं होतं आणि तिथे " प्रेम त्यांचा विषय नाही " हे मुद्दम टाळण्यात आलं होत कारण मग तो त्यांचा विषय आहे म्हट्ल्यावर मी त्यांना सानी मिसर्यामध्ये " का , तुम्हाला हृदय नाही ? असं विचारण्यात तथ्य रहात नाही . इथे बरोब्बर उलटी परिस्थिती नाही काय ? प्रत्येक प्रांताचा " त्याचा " स्वतंत्र नारा हे जास्ती Detment underline करत नाही काय ? आपली मते जाणून घ्यायला आवडेल ज्यांनी मला दिलेले मृत्यूस सोहळ्याने खांद्यावरून त्यांच्या माझी वरात आता... मलाही काहीतरी खटकतंय ... वरात आल्याने मृत्यूशी लग्न लावल्याचा संदर्भ येतोय पण पुरेसा स्पष्ट होत नाहीये .. हुंडाबळी किंवा स्त्रीची कैफ़ियत हा एकच अर्थ हवा असेल तर ज्यांच्या कृपे मिळाला आहेर जीवनाचा खांद्यावरून त्यांच्या माझी वरात आता मध्ये जास्त paradox येईल काय ? एवीतेवी खांद्यावरून वरात मध्ये मृत्यू येतोच आहे असे वाटते ...
|
Jayavi
| |
| Saturday, January 20, 2007 - 10:42 am: |
| 
|
स्वाती....... गझल मनापासून आवडली. खरं तर मला गझल ह्या प्रकारातलं काहिच कळत नाही म्हणून मी त्याच्या वाटेलाही जात नाही. पण इथे ज्या गझला येताहेत आणि जाणकार लोक त्याच्याबद्दल जे काही बोलताहेत........ त्यामुळे काहीतरी उत्सुकता मात्र नक्कीच निर्माण झालीये
|
Upas
| |
| Sunday, January 21, 2007 - 9:42 am: |
| 
|
स्वाती अगदी सुंदर.. मस्त गझल वाचायला मिळालि.. छान वाटलं.. असा एकदा ठेका जमला की मात्रा आणि आशय आपोआप जुळून येतात.. ही अंगणे रिकामी, कुलपे कड्या निकामी भलत्याच पाहुण्यांची, गर्दी घरात आता.. असं जमेल का ग? अभिप्रेत अर्थ असा की जे अंगणात म्हणजे बाहेर होते ते भलतेच लोक घरात गुसलेत आणि त्यांना थोपवायला कुलपे कड्या कुचकामी ठरत आहेत आणि अंगण मात्र रिकामं झालय कारण आता पाखरं, मुलं दूर उडून गेलीत..
|
Pulasti
| |
| Sunday, January 21, 2007 - 10:44 pm: |
| 
|
मायबोलीवर माझा पहिला प्रयत्न... ======================== "पाऊस" कानात पानांच्या कुणी सांगून गेले चिंब झाले, फूल ते लाजून गेले. मागू नये देवाकडे काहीच यंदा मागल्या कृपेत घर वाहून गेले. सांगकाम्या तू म्हणून, दुष्काळ हे ओले इथे, तेथे सुके येऊन गेले. थांबेचना रिपरीप रक्ताची तिथे पावसाळे रे किती उलटून गेले. वर्षाव झाला कोरड्या आश्वासनांचा चातकाच्या जातीचे हुरळून गेले. कळले तुला तेव्हा सरी धाऊन आल्या थेंबात या ते थेंबही मिसळून गेले. --- पुलस्ति
|
पुलस्ति पहिला प्रयत्न मस्तं आहे. मागू नये देवाकडे काहीच यंदा मागल्या कृपेत घर वाहून गेले. वा!!! वा!!! श्री
|
Bairagee
| |
| Monday, January 22, 2007 - 2:10 am: |
| 
|
वैभव,' सांत्वनांचा' बदल छान! "बाज़ार" सांत्वनांचा अधिक सर्वसमावेशक (कॉम्प्रहेन्सिव) वाटेल. विविध-विविधअठरापगड वेदनांचा, व्यथांचा आणि सांत्वनांचा बाज़ार जागोजागी(बाज़ार के हर नुक्कड, हर चौराहेपर) छाती बडवत बोली लावणे सुरू आहे. "छाती पिटून तूही कर जाहिरात आता" मध्ये "इतर जाहिरात करताहेत तूही कर" हा अर्थ आला आहे. छाती पिटने में मातम भी आ गया. जैसे मुहर्रम का मातम होता है. मग "व्यथेची" अनावश्यक, रिडंडंट होते. तसेच पहिल्याच मिसऱ्यात/ओळीत व्यथा आल्यास कवयित्री कशाची जाहिरात करायला सांगते आहे बुवा/बाई हा प्रश्नही मनातून खारीज होतो. सस्पेंस जातो. मला स्वतःला तरी " त्याचा " खटकलं नाही. 'त्याचा' अनेकांना खटकत नाही म्हणून इथे 'त्याचा'चा वापर (यूसेज) योग्य ठरत नाही. ... विशेषतः" अपुला " , " अता " सारखी सूट घेण्या ऐवजी तर नाहीच नाही . या दोन्हींची तुलना चुकीची आहे. "आता","आपला" वृत्ताच्या मर्यादांमुळे शक्य होत नसेल आणि नेमका अर्थही पोचवायचा असेल तेव्हा ही रूपे ज़रुर वापरावीत. दुसरी गोष्ट म्हणजे, चुकीचा वापर(अब्यूसेज) करण्यापेक्षा अशी सूट बरी. किमान कवींनी तरी किमान पद्यात अशा चुका करू नयेत, असे माझे मत आहे. कारण ते भाषा घडवत असतात. असो. चुभूद्याघ्या. निनावी, पाहुण्यांचा विचार सुरूच आहे. पुलस्ति, मागू नये देवाकडे काहीच यंदा मागल्या कृपेत घर वाहून गेले. वा!!! प्रयत्नांती परमेश्वर!
|
|
|