Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend » Archive through January 16, 2007 « Previous Next »

Himscool
Tuesday, January 09, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो भाग चुकून मी आधी टाकला..
Very Good म्हणजे आता स्वत: लेखिकाच Confuse झाली आहे.. सहीच म्हणजे ह्या कथेचीही बाकिच्या कथांसारखीच अवस्था होणार की काय?

Jhuluuk
Tuesday, January 09, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, good going.. पाखी हे पात्र आणि तिची गोष्ट कथेत नविन spark आणतोय..

Paresh_joshi
Tuesday, January 09, 2007 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी कथा मस्त चालू आहे पण तु अशी मधेच confuse होवू नकोस नाहीतर गोष्ट आधी संपेल आणि suspence नंतर्च्या भागात समजेल

Chyayla
Tuesday, January 09, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी काही Confusion वाटत नाही, कथा मस्त आकार घेत आहे सगळा ताळमेळ व्यवस्थित बसवाताना थोड वेळ तर द्यायलाच पाहिजे. पाखी, रेहान, प्रिया.... कहानी मे ट्विस्ट... लगे रहो मी पण येतो मटर किन्वा Coffe पिवुन.

Suvikask
Wednesday, January 10, 2007 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय confusion आहे?? गोष्टीचे इतके तुकडे झालेत कि कुठला कुठे जोडावा म्हणजे fit बसेल, काहीच कळत नाही. कृपया गोष्ट लिहुन पुर्ण झाल्यावर त्याचा सारांश लिहावा...जेणे करुन काहितरी तरी कळेल...

Nandini2911
Wednesday, January 10, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अखेर आज तो दिवस उजाडला. आज तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस. लहानपणी इंडियात जायचं म्हटलं की तिला राग यायचा. हा देश तिला कधीच आवडला नाही. पण आज इथेच ती तिचा संसार उभा करणार होती. नाझियाला आपण कुठे आहोत तेच कळत नव्हतं, मधेच तिने मान वर करून रेहानकडे पाहिलं. शेरवानीत एकदम वेगळा दिसत होता. तिचा ड्रेस तर त्यानेच बनवला होता. .. How romantic ...

निकाहची नमाज पढून झाली.. मुल्लासाहेब आता कुराणमधले आयत दोघाना वाचून दाखवत होते.

असिफ़ रेहानच्या बाजुलाच बसला होता. सगळ्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावरच तर होती. रेहानच्या निकाहनंतर रुबियाचा निकाह होता. त्यामुळे त्याची तयारी सुरू करायला हवी होती. हॉल माणसाची तुडुंब गर्दी होती. तो परफ़्युमचा वास.. ती गडबड कोलाहल... असिफ़ला या सगळ्याचा अतिशय तिटकारा होता.
त्याने रेहानकडे पाहिलं.. हाच का तो रेहान? तो रेहानला पहिल्यादा भेटला. तेव्हा रेहान नुकताच हॉस्पिटलमधून बाहेर आला होता. तेव्हाचा रेहान आणि आजचा रेहान किती फ़रक होता.
"क्या हुआ?" रेहानने विचारलं.
"मै जब शादी करूगा तो किसीको नही बुलाऊगा.. तुम्हे भी नही.." तो रेहानच्या कानात म्हणाला...
आलेलं हसू रेहानने दाबून धरलं.
असिफ़ने परत एकदा भरलेल्या हॉलकडे पाहिलं.
अचानक हॉल शांत झाला. कसलाच आवाज ऐकू येईना. त्याने आजूबाजुला पाहिलं... सगळं नॉर्मल वाटत होतं. पण तरीही एक अस्वस्थता त्याला सतावत होती.
तो मोकळ्या हवेसाठी बाहेर आला. तरी कहीतरी राहिलं होतं. कुठेतरी... कुणितरी... पण काय.. ते कळत नव्हतं.
त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. त्या अंधारात त्याला दिसलं... कुणीतरी धावताना.. ओळखीचं वाटत होतं पण चेहरा दिसत नव्हता. त्याने डोळे उघडले तरी तो अंधार तसाच होता. कसलातरी गंध त्याला खुणावत होता. खूप ओळखीचा गंध होता. नुकत्याच उडालेल्या अत्तारासारखा.... नव्हे.... काळोखातच त्याला दिसली ती उडालेली रक्ताची एक चिळकांडी. त्या रक्ताचाच हा वास....
त्याला दरदरून घाम फ़ुटला. डोक्यात एकच विचार थैमान घालायला लागला.
तो धावत गाडीकडे गेला. कसलीतरी धुंदी त्याच्यावर स्वार होती. कोणतरी त्याला रस्ता दाखवत होतं. तो निघाला आणि पाठी हॉलमधे "सुभानल्ला" ऐकू यायला लागलं. रेहानने नाझियाला आणि नाझियाने रेहानलाअ कबूल केलं होतं.
तिच्या फ़्लेटपर्यंत पोचला. बेल वाजवून काही फ़ायदा नाही हे त्याला ठाऊक होतं.
ती घरात नसू दे...त्याने अल्लाकडे प्रार्थना केली. दरवाज्याच्या बाजुला लपवलेली चावी त्याने काढली.
घरात शांतता होती.
तो बेडरूममधे गेला. क्षण दोन अन त्याचा डोळ्यावर विश्वास बसेना.
प्रिया जमिनीवर पडली होती. रक्ताच्या थारोळ्यात..
तिने तिच्या डाव्या हाताची नस कापली होती.


Bhramar_vihar
Wednesday, January 10, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढ्या SSSSSSS ण ट ढ्या SSSSSSSS ण!

Himscool
Wednesday, January 10, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॅमेरा चार वेळा असिफच्या चेहर्‍यावर पुढे मागे आणि प्रियाच्या चेहर्‍यावर पुढे मागे मगे... एक वेगळ्याच ऍंगलनी प्रिया आणि असिफ अलटून पालटून... आणि तेवढ्यात Title Song ~D

Vinayaknarvekar
Thursday, January 11, 2007 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक प्रियाला बघायला सगळे hospital मध्ये गेलेत.....

Nandini2911
Friday, January 12, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेहान केव्हाची असिफ़ची वाट बघत होता. त्याच्या निकाहमधून गायब झालेला असिफ़ अजून परत आला नव्हता.
त्याने पुन्हा त्याचा नंबर फ़िरवला. कुणीच उचलला नाही. एवढं पार तो लग्नातून काही न कळवता गेला याचा अर्थ काहीतरी मोठी भानगड असणार. पण तरी एक मेसेज तरी त्याने पाठवायला हवा होता. नाझ रूमम्धे आली तरी त्याचं लक्ष नव्हतं.
"असिफ़ का कुछ फ़ोन आया?" तिने विचारलं.
त्याने नाही म्हणून मान हलवली.
"कही काम मे होगा.." नाझ म्हणाली.
"मेरी शादी से भी जरूरी क्या काम है? कमीना साला... गया होगा किसी लडकी के साथ...." रेहान उसळला.
"रेहान, cool down कुछ प्रॉब्लेम भी तो हो सकता है ना.."
"चलो.. अभी उसे फ़ोन लगाता हू.. अगर बात की तो ठीक नही तो आने के बाद देख लुगा हरामजादे को.."
त्याने परत असिफ़चा नंबर फ़िरवला. कुणीच उचलला नाही. तो कट करणार एवढ्यात कुणीतरी फ़ोन उचलला.
"हेलो.." आवाज अनोळखी बाईचा होता..
"असिफ़ कुठाय?" त्याने विचारलं.
"तुम्ही कोण?"
"मी त्याचा दोस्त बोलतोय. प्लीज अर्जंट काम आहे.."
"त्यानी सांगितलय की कुणाचा फ़ोन घेऊ नको. ते बिझी आहेत. तुम्ही सारखा फ़ोन करताय. आम्हाला डिस्टर्ब करू नका. "
रेहान शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. काही करून तिला बोलत ठेवणं गरजेचं होतं.
ती कुठून बोलतेय हे कळलं असतं तरी चाललं असतं.
"हे बघा.. मला माहित आहे की मी तुम्हाला त्रास देतो. पण मला फ़क्त एवढं सांगा असिफ़ कसा आहे? सकाळी आमचं झगडा झाला आणि तो गेला. तेव्हापासून पत्ता नाही.. मला काळजी वाटते.." रेहान म्हणाला.
नाझिया आपल्या नवर्‍याकडे बघत होती. त्याचा आवाज पार रडवेला झाला होता. नाटकी... तिने मनातच म्हटलं.
"हे बघा.. तुमचा मित्र ठीक आहे. तसा काहीही प्रॉब्लेम नाही." तिचा आवाज जरा अडखळला.
रेहानला जे हवं ते मिळालं होतं.
"तुम्ही खोटं बोलता. मला माहित आहे की त्याला काहीतरी झालय.. म्हणून तो माझ्याशी बोलत नाही. त्याची बायको केव्हाची त्याला शोधतेय..."
"काय? त्याची बायको... सर तुमचा घोटाळा होतोय.. तुम्हाला असिफ़ शेखच हवाय ना?"
पण रेहानला ट्रेक मिळाला होता.
"हो असिफ़ शेख.. माझा बचपनचा दोस्त आहे..." त्याचा आवाज पार भरून आला.
"सर, असिफ़ इथे आहे, आणि त्याची बायको पण. खरं तर त्यानी कुणाला सांगू नको म्हटलेलं पण तरीही मी सांगते.
त्याची बायकोने आत्महत्यचा प्रयत्न केलाय..."
रेहानने सुटकेचा निश्वास सोडला. असिफ़च्या कुठच्यातरी छावीने हा घोळ घतला होता.
"कुठल्या हॉस्पिटलमधे?" त्याने नाटक चालु ठेवलं.
"जे जे मधे. आय सी यू मधे.."
म्हणजे प्रकरण भारी होतं.
"आपण कोण?"
"मी स्टाफ़ नर्स बोलतेय. असिफ़ नमाज पढतोय म्हणून फ़ोन माझ्याकडे आहे.."
" madam,, Thank You एक विचारू.. असिफ़च्या बायकोचं जरा नाव सांगाल. काय आहे तीन लग्ने केली आहेत त्याने त्यामुळे ..."
रेहानच्या चेहर्‍यावर हसू होतं. नाझने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं.
"एक मिनिट हा.. असिफ़ शेख आणि अरे.. असं कसं शक्य आहे?"
"काय झालं.?"
"इथे तर त्याच्या बायकोचं नाव..... प्रिया कुलकर्णी... "
"ओह...प्रिया आहे तिथे.." असिफ़ने खोटं नाव दिलय हे त्याच्या लक्षात आलं.
"हो ना... प्रिया.... काय छान मुलगी आहे हो.." ती म्हणाली.
रेहान काहीच बोलला नाही. त्याला हवी तेवढी माहिती मिळाली होती.
"तुम्हाला म्हणून सांगते.. तिचे वाचायचे चान्सेस फ़ार कमी आहेत..."
"ठीक आहे मी येतो तिकडे.." तो म्हणाला. माणूसकी म्हणून.
"लवकर या. तिचे आई वडील आले थोड्या वेळापुर्वी. आई ला तर झोपेचं injection दिलं. "
आता ती नर्स बोलत सुटली होती. रात्री अकरा वाजता तिलाही गप्पा मारणारं कुणीतरी हवंच होतं.
रेहानला आता काळजी वाटायला लागली शेवेटी काही झालं तरी कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न होता.
"वडील कसे आहेत?" त्याने विचारलं.
"ते पण घाबरलेत. पण ते असिफ़ला खूप काहीतरी बोलले. कोणीतरी रेहान आहे... तोच या सगळ्याला जबाबदार आहे.. सोन्यासारखी मुलगी त्याच्यापायी वेडी झाली असं म्हणाले. असिफ़ काहीच बोलला नाही. कसे नवरे हे सहन करू शकतात देवेच जाणे.... " ती पुढेही बोलत होती.

पण रेहानच्या हातातून फ़ोन केव्हाच पडला होता..



Zpratibha
Sunday, January 14, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी एकदाचा शेवट सांगुन टाक बघु. नाहि म्हणजे अगदिच धिर धरवत नाहिये म्हणुन.

Neelu_n
Monday, January 15, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Jhuluuk
Monday, January 15, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलु, हा हा हा !!
असा computer फोडुन गोष्टीचा शेवट लवकर नाही मिळणार :-)
नंदिनी, अगं पुढचा भाग टाक न


Nandini2911
Monday, January 15, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेहान येतोय हे असिफ़ला नर्सने सांगितलं. जे व्हायला नको होतं ते झालं होतं पण ही वेळ विचार करायची नव्हती. काही करून रेहानला परत पाठवायला हवं होतं. एक तर प्रियाचे आईवडील इथे होते वर रेहानचं आजच लग्न झालं होतं, परत त्याच्या घरच्याना त्याच्यावर नाराज व्हायला संधी मिळाली असती.

वीर आणि जतिन एव्हाना पोचले होते. प्रियाला चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधे हलवायची तयारी चालू होती.
असिफ़ला काय करावं ते सुचेना. तो बाकावर शांत बसून राहिला.
रेहान आय सी यु च्या जवळ आला. असिफ़ तिथेच बसला होता.
रेहानने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
असिफ़ने वर पाहिलं...
दोघंही काहिच बोलले नाही. बोलण्यासाठी शब्दच कुठे शिल्लक राहिले होते?
असिफ़चे डोळे भरून आले होते.
"कहा है?" रेहानने विचारलं.
असिफ़ने आयसी यु च्या दरवाज्याकडे पाहिलं..
रेहान तिकडे जायला निघाला.
"मत रेहान.." असिफ़ म्हणाला.
रेहानने प्रश्नार्थक चेहर्‍याने त्याच्याकडे पाहिलं.
"रेहान.. मै तुम्हे सब समझा दूंगा.. पर अभी नही. तू परत जा.. प्लीज.."
"असिफ़, एक तर तुम्ही सगळे मला फ़सवलं आणि आता मला सांगतो परत जायला... तू कधीच बोलला नाहीस की प्रिया कुठे आहे? मी कायम विचारलं.. पण नाही... आणि आज मला हे सगळं कळतय.. असिफ़.. मुझे ये पुछना है उससे कि क्यु इतने दिन तक वो मुझसे झूठ बोलती रही? "
"मै बताता हू.. उसने कसम खाई है के वो जिंफ़्दगीमे कभी तुम्हारी शकल नही देखेगी... प्लीज आज वो बेहोश है She is fighting against death.. पर मे नही चाहता के उसकी कसम टूटे.. रेहान आज वापस जाओ... हम बाद मे बात करेंगे इस मामले मे..."
रेहान आयसीयूच्या दरवाज्याकडे वळला... असिफ़ने त्याचा हात घट्ट धरला.

"रेहान तुझे प्रिया की कसम.. "
रेहान थबकला. त्याने असिफ़कडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अंगार होता.
"असिफ़, मुझे नही पता के तु सच बोल रहा है या झूठ.. अब मै तुमपे यकीन नही कर सकता. मै प्रिया को देखे बगै यहा से वापस नही जाऊगा. वो मेरी शकल नही देखना चाहती. fine पर मुझे उसको देखने से आज खुदा भी नही रोक पायेगा... "आणि रेहान आत गेला.

चौथ्या नंबरच्या बेडवर ती होती. शांत. नुकतीच झोपल्यासारखी.. हाताला बंडेज बांधलं होतं...
तो तिच्या उशाशी बसला. हलकेच त्याने तिच्या केसातुन हात फ़िरवला... पाच वर्षं.. पाच वर्षानी तो तिला बघत होता. तिचा चेहरा बिलकुल बदलला नव्हता. इतक्या वर्षाचे प्रश्न त्याच्या मनात फ़िरत होते. पण सगळी उत्तरं आज मूक झाली होती...

तो पहाटे घरी परत आला. नाझिया अजून जागीच होती..
"कैसी है असिफ़ की दोस्त?" तिने विचारलं.
तो काहीच बोलला नाही. तिने परत विचारलं. "ठीक है... " तो एवढंच म्हणाला.
"तुम सो जाओ.." त्याने तिला सांगितलं आणि तो हॉलमधे आला.

त्याचं डोकं गरगरत होतं. त्याने एक पेग बनवून घेतला. पण जगातली कुठचीच गोष्ट आज त्याच्या मनातली अस्वस्थता शांत करू शकत नव्हती.
प्रियाचं त्याच्यावर प्रेम होतं.. ते भेटले त्या पहिल्या दिवसापासून.. पण तिने त्याला कधीच सांगितलं नाही. का? ते त्यालाही माहित नव्हतं. पण प्रिया त्याला का नाही भेटली? का त्याच्यापासून दूर जात रहिली. असिफ़ला तिच्याविषयी सगळं माहित होतं तरी का त्याने त्याला सांगितलं नाही?

रेहानला वाटलं की तो कुठल्यातरी एका खेळातला कठपुतळीचा बाहुला आहे. सगळे जण त्याला मनाला येइल तसं खेळवत आहेत. असिफ़ने जर एकदा.... फ़क्त एकदा त्याला सांगितलं असतं की प्रिया कुठे आहे तर कदाचित आज प्रिया त्याची दुल्हन बनली असती. कदाचित.... नाझच्या जागी... आज प्रिया.....




Zpratibha
Monday, January 15, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी डेलि एपिसोड मधे एकाच दिवशी दोन भाग नाहि दाखवता येत का?

Vinayaknarvekar
Tuesday, January 16, 2007 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक Admin नी high TRP बघुन दिवसाला १ च भागाची परवानगी दिलीय.. :-)

Zakasrao
Tuesday, January 16, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक भा. प्र.

nandini तुमच आडनाव कपुर आहे का?
d~


Sakhi_d
Tuesday, January 16, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव झकास.....

कथेच्या नावात "क" दिसत नाहीय....



Manogat
Tuesday, January 16, 2007 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि,
गोष्ट छान वेग घेत आहे पण please टुटक भाग वाचुन गोष्टितलि सगळी मजा जात आहे. क्रुपया लवकर पोस्ट कर पुढचा भाग.


Chyayla
Tuesday, January 16, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रेहान.. मै तुम्हे सब समझा दूंगा.. पर अभी नही. तू परत जा.. प्लीज.."

नन्दिनी कपुर... कहानी freind freind की... तु परत जा ऐवजी "तु वापस जा" हवे होते ना?

मन्डळी हा कमर्शियल ब्रेक असतो मधे मधे, पर यह ब्रेक काफ़ी लSSSSम्बा है.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators