ये जरा ये पुजू दे मज गझलसूर्या वैभवा मायबोलीच्या धरेवर गाजणारी पावले
|
Sarang23
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:22 am: |
| 
|
वा! वैभवराव, काय ऐकत नाही तुम्ही!!! प्रसाद... brilliant! आणि पुर्ण अनुमोदन, फक्त एक बदल... पूजु दे बोलली मज भेट घे त्या वैभवाची एकदा गाव कवितेचा फिरोनी शोधणारी पावले
|
वैभव, फार सुंदर गज़ल! त्या जुन्या वळणावरी येशील तर दिसतीलही सल दिमाखाने अजूनी मिरवणारी पावले! फिदा हो गये यार! गणेश (समीप)
|
Meenu
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:40 am: |
| 
|
अरे आता मी काय लिहु .. प्रसाद आणि सारंग वगैरे दिग्गजांनी दिलेल्या प्रतिसादाला अनुमोदन इतकच बास होईल नाही का ..? अरेच्चा मी असं लिहु का ..? ऐकुनी सारी प्रशंसा ही स्वतःची वैभवा राहु दे तरीही धरेवर ठाम तुझी पावले दिवे हं
|
Devdattag
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:46 am: |
| 
|
सहिच आलीये जमून.. अजुन एक पाऊल नाचले ऐसे कुणी का कवितेच्या राज्यामध्ये लय शब्द अन भावनांची साधणारी पावले
|
Mankya
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:53 am: |
| 
|
मित्रा ( वैभव ) ...........! प्रसाद, सारन्ग, मीनु, देवा ulimtate.....! माणिक
|
Sarang23
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:59 am: |
| 
|
संधिकाल दूर दूर लोपणार एक लाट केशरी सूर्य साथ सोडणार मालवून सागरी सावळ्या निवांत रम्य सांजगारव्यात हा मंद मंद सांडणार, चंद्र अत्तरापरी वेगळाच लाभलाय अर्थ शांततेस या अर्थ तोच तोडणार मौन केधवा तरी खोल खोल लागतील सूर सूर मंत्रसे अंतरात वाजणार सोबतीस बासरी आत्मभान राहिले न बोलण्या मला सख्या संधिकाल हा असा, अनेक भाव अंतरी जाण ना जरा तरी अबोल रंगरीत ही का क्षितीज भूषवी निशाण आज भर्जरी? बोलल्याविना तुला मनातले कळेल का? पाहशील का मनात काय खळबळे तरी ? सारंग
|
झकास रे . वाह ! सावळ्या निवांत रम्य सांजगारव्यात हा मंद मंद सांडणार, चंद्र अत्तरापरी अप्रतिम !!!
|
Mankya
| |
| Wednesday, January 10, 2007 - 6:12 am: |
| 
|
प्रत्येक ओळ सुन्दर ! मस्तच रे सारन्गा !
|
Meenu
| |
| Wednesday, January 10, 2007 - 6:14 am: |
| 
|
दूर दूर लोपणार एक लाट केशरी सूर्य साथ सोडणार मालवून सागरी सावळ्या निवांत रम्य सांजगारव्यात हा मंद मंद सांडणार, चंद्र अत्तरापरी >> वाहवा क्या बात है .. सुंदर सारंग अगदी चपखल वर्णन केलस
|
Bairagee
| |
| Wednesday, January 10, 2007 - 7:48 am: |
| 
|
आज मी माझ्या दिशेने भरकटाया लागलो ओळखू आली धुळीला टाळणारी पावले वा!! गझल आवडली. मतल्यात "गाजणारी पावले" वाचले संधिकाल अगदी गीतच. मंद मंद सांडणार, चंद्र अत्तरापरी
|
राजा सारंगा संधिकाल फारच रम्य
|
Kiru
| |
| Wednesday, January 10, 2007 - 8:02 am: |
| 
|
वैभवा, 'पावले' अफाट..!! सारंगा, 'तीच' संध्याकाळ अनुभवली रे पुन्हा.. क्या बात है!!!
|
Sati
| |
| Wednesday, January 10, 2007 - 11:04 am: |
| 
|
सारंग आणि वैभव सुरेख आहेत रचना! साती
|
Jayavi
| |
| Wednesday, January 10, 2007 - 12:12 pm: |
| 
|
सारंगा..... संधीकाल अप्रतिम रे! वा..... काय वातावरण निर्माण केलंस रे!
|
Ashwini
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:56 pm: |
| 
|
देवा, छान. सारंग, सुरेख. वैभव, हा अन्याय आहे. अरे, जरा श्वास घ्यायला तरी अवधी दे. चौकशी वाचून एक सुन्न अवस्था आली होती, ती ओसरायच्या आतच ' पावले ' .. कसं सावरायचं यातून? 
|
Meenu
| |
| Thursday, January 11, 2007 - 12:01 am: |
| 
|
विरह सख्या हा दुरावा मला साहवेना नको ना अबोला असा राहवेना किती देखणी ही शिल्पे सभोती परी तु न जेथे मला पाहवेना असु दे कुणीही ईथे सोबतीला तुझ्याविण सखया आता चालवेना ईथे पक्षी गाती सुमधुर गीते सख्या बोल तुजवीण मज ऐकवेना किती फुल, माळा येथे सुगंधी परी एकही फुल मज माळवेना इस्लाह करायला वैभव, सारंग, प्रसाद वगैरे आहेत म्हणुन पोस्ट करायचं धाडस करतेय .. सारंगच्या गज़लपुढे माझी गज़ल म्हणजे
|
मीनू ... सख्या हा दुरावा मला साहवेना नको ना अबोला असा राहवेना ल गा गा , ल गा गा मीटर . आधी व्याकरण बघू . मीटर योग्य आहे . साहवेना , राहवेना मतल्यात आलं की पुढे सगळीकडे " हवेना " येणं गरजेचं होतं ... त्यामुळे पुढचे शेर अडचणीत आले आहेत . अर्थाच्या दृष्टीने म्हणशील तर सख्या हा दुरावा मला साहवेना नको ना अबोला " अता " राहवेना असं जास्त बदल न करता सुचवू इच्छितो . किती देखणी ही शिल्पे सभोती परी तु न जेथे मला पाहवेना पहिल्या ओळीत मीटर चुकलंय .. म्हणजे किती देखणी छान शिल्पे सभोती परी तु न जेथे मला पाहवेना असं वाचून बघ .. कळेल ... असु दे कुणीही ईथे सोबतीला तुझ्याविण सखया आता चालवेना दुसरर्या ओळीत मीटर सांभाळण्यासाठी " अता " येणं गरजेचं आहे ... अर्थाच्या दृष्टीने म्हणशील तर पहिल्या ओळीत वाटचाल आली असती तर जास्त परिणामकारक चाले असते असे वाटून गेले . सोबत न चालतानाचीही असू शकते त्यामुळे पहिल्या ओळीत ते येणं गरजेचं आहे असं वाटतं .. ईथे पक्षी गाती सुमधुर गीते सख्या बोल तुजवीण मज ऐकवेना पहिल्या ओळीत मीटर चुकलंय .. अर्थाच्या दृष्टीने दुसर्या ओळीत सख्याच्या बोलण्याशिवाय दुसरं काहीच ऐकवेना .. की तो सोबत नाहीये म्हणून पक्ष्यांचे कूजन कर्कश होते आहे ... हे नीट स्पष्ट होत नाही किती फुल, माळा येथे सुगंधी परी एकही फुल मज माळवेना पहिल्या ओळीत मीटर चुकलंय हजारो फुले उमलती रोज येथे परी एकही फुल मज माळवेना असं केलं तर मीटर मध्ये बसेल .. अर्थाच्या दृष्टीने काय म्हणायचंय ते कळतंय .. पण शेर इतका सपाट जाऊ नये असं " माझं " मत आहे .. म्हणजे तुला anyway साहवेना , राहवेना बदलावंच लागणार आहे ... तर ते बदललंय असं गृहित धरून वरचा शेर असा लिहून बघितलं तर तुला काय वाटतं ते बघ हजारो फुले उमलती रोज येथे परी अंतरीचा ऋतू पालवेना कुठलाही शेर impactful आणि पर्यायाने पूर्ण गझल परिणामकारक होण्यासठी या आणि या सारख्या खूप बाबींकडे लक्ष देणं आवश्यक होवून बसतं .. म्हणजे आधी काव्य की मीटर ? मग स्फुरलेलं मीटर मध्ये कसं बसवायचं ? मग बसवलेल्यातून नक्की काय म्हणायचय ते कळतंय का ? आणि मग ते crafted वाटत नाहीये ना ? असे हजारो प्रश्न येत राहतात .. त्यासाठी उत्स्फूर्त आणि लयबध्द एकत्र सुचणं फार गरजेचं आहे आणि हे वारंवारच्या वाचनातून आणि लिखाणातूनच येतं ... लिहीत रहा ... सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
|
Mankya
| |
| Friday, January 12, 2007 - 5:23 am: |
| 
|
मीनु ... तन्त्र वगैरे कळत नाही .. पण भावना छानच उतरल्यात ग ! मित्रा ( वैभवा )... झेपत नाही यार हे ... तुसी simply ग्रेट हो ! माणिक !
|
Meenu
| |
| Friday, January 12, 2007 - 5:32 am: |
| 
|
वैभव धन्यवाद मला वाटतय की तु काय म्हणतो आहेस ते कळलय मला .. बघु या पुढच्या कुठल्या प्रयत्नात काही जमलं तर .. माणिक धन्यवाद ...
|