Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 10, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » मराठी गझल » Archive through January 10, 2007 « Previous Next »

Ashwini
Saturday, January 06, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, मस्तच. पहिल्या दोन ओळीतच जिंकून जाण्याचं कसब तुला नेहमीच कसं साधतं? :-)

Paragkan
Sunday, January 07, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah .. kya baat hai !

Vaibhav_joshi
Tuesday, January 09, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चौकशी


पुरे चौकशी अनवाणी पायांची
जरा जबानी घ्या आता काट्यांची

बळेच केला न्यायनिवाडा त्यांनी
झाली नव्हती साक्ष तिच्या डोळ्यांची

एकसंध एकही चेहरा नाही
गर्दी केवळ फुटलेल्या पार्‍यांची

घाव घालणार्‍यांची पर्वा नाही
भीती मज शेपूट घालणार्‍यांची

उरात माझ्या सुरा दडवुनी गेले
तुम्ही घेतली कसून झडती ज्यांची

या जन्मी ना स्वर्ग मिळे न्यायाला
सत्ता चाले तेथे अन्यायांची

पेटली किती धडधड माझी पोथी
रद्दी होती केवळ अध्यायांची


Shyamli
Tuesday, January 09, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरे चौकशी अनवाणी पायांची
जरा जबानी घ्या आता काट्यांची >>
....
सगळेच शेर सुरेख पण हा....म्हणजे खासच


Psg
Tuesday, January 09, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री_तिर्थे.. ही 'कविता' आहे असं वाटत, आणि तुम्ही गझल बीबीवर पोस्ट केलीये.. प्लीज तिकडे हलवणार का?

घाव घालणार्‍यांची पर्वा नाही
भीती मज शेपूट घालणार्‍यांची
वैभव, पॉश आहे! :-)





Devdattag
Tuesday, January 09, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नाथास आज पुन्हा कोड्यात पाहिला मी
"का आव ज्ञानबाचा रेड्यात पाहिला मी??"

पाण्यावरी मुक्याने वाहून चालला जो
तो प्राण नाविकाचा होड्यात पाहिला मी

कोषात पाखराला सोडून आज आला
त्यालाच पाठमोरा वेड्यात पाहिला मी

होतो इथे जरासा आवाज पावलांचा
तो पाय प्रेषिताचा बेड्यात पाहिला मी

आलाच मानण्याला आभार सावळ्याचे
वीटेवरी तयाला जोड्यात पाहिला मी


Devdattag
Tuesday, January 09, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. लय म्हणजे लय खास..:-)

Daad
Tuesday, January 09, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, अतिशय सुंदर.
सगळेच शेर सुंदर आहेत...

'एकसंध एकही चेहरा नाही
गर्दी केवळ फुटलेल्या पार्‍यांची' -
'पारा' - फुटलेल्या आरश्यासाठी इतका समर्पक दुसरा शब्द तोसुद्धा अर्थ आणि आशय संभाळून? जियो...


Daad
Tuesday, January 09, 2007 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा, देवदत्त. पहिला तर सुंदर आहेच पण मला आवडलेले शेर
होतो इथे जरासा आवाज पावलांचा
तो पाय प्रेषिताचा बेड्यात पाहिला मी

आलाच मानण्याला आभार सावळ्याचे
वीटेवरी तयाला जोड्यात पाहिला मी


Sarang23
Tuesday, January 09, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे वैभवा, सुरेख आहेत सगळेच शेर!

Jayavi
Tuesday, January 09, 2007 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, देवा......... लाजवाब ...... :-)!!

Kmayuresh2002
Wednesday, January 10, 2007 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, सुरेख रे...:-)
देवा,`त्या कोवळ्या फ़ुलांचा' style ने आहे का रे ही गझल?तशी वाटली.. छान वाटली वाचायला. शेर मस्त आहेत सगळे.


Meenu
Wednesday, January 10, 2007 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव खुपच सुंदर रे

पुरे चौकशी अनवाणी पायांची
जरा जबानी घ्या आता काट्यांची हं क्या बात है

बळेच केला न्यायनिवाडा त्यांनी
झाली नव्हती साक्ष तिच्या डोळ्यांची अहा काय पण बोललास रे .. नेहमीच पडतो हा प्रश्न ओठातुन निघालेले शब्द काय म्हणतात ते खरं मानावं का डोळ्यांची वाणी खरी मानावी

घाव घालणार्‍यांची पर्वा नाही
भीती मज शेपूट घालणार्‍यांची अगदी खरय .. पण सध्या शेपूट घालणारेच जास्त दिसतात रे ..

उरात माझ्या सुरा दडवुनी गेले
तुम्ही घेतली कसून झडती ज्यांची हा म्हणजे कळस आहे रे

Meenu
Wednesday, January 10, 2007 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा छान जमायला लागलेलं दिसतय हं तंत्रही .. सारंग सांगेलच मात्रा मोजुन

Devdattag
Wednesday, January 10, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोक्स..:-)
>>देवा,`त्या कोवळ्या फ़ुलांचा' style ने आहे का रे ही गझल?
मलाही वाटलच हा काफ़िया कुठून सुचला.. :-)

Sarang23
Wednesday, January 10, 2007 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन वर्षाचा संकल्प, हा खरं तर पुर्वीच करायला पाहिजे होता, पण आत्ता करतोय. मात्रा मोजण्याचा धंदा बंद केलाय मित्रांनो...
तसा जर अभिप्राय द्यायचा असता तर मी वैभवला "अरे एकदम मात्रा वृत्त? २० मात्रा छान आहेत रे!" असा काहीसा reply दिला असता. हो ना?! :-)
यापुर्वीच्या माझ्या कुठल्या प्रतिक्रियेमुळे कोणी दुखावले (?????) गेले असेल तर माफ करा...


Meenu
Wednesday, January 10, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मात्रा मोजण्याचा धंदा बंद केलाय मित्रांनो... >> मग गज़ल कशी लिहीणार तु ..? बरं मी आपली देवाच्या त्या विनोदी लेखाला आठवुन दिली होती प्रतिक्रीया .. so दिवे

Princess
Wednesday, January 10, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली मायबोलीवर येणे कमी झालय. येते ती फक्त वैभवची कविता आलीय की नाही ते बघायला. वैभव, कवितेच्या राज्याचा सम्राट आहेस तू. काय काय लिहुन जातोस रे... खरच सांगते, जबरदस्त fan आहे मी तुझी. माझ्या पतिदेवाना कविता वाचण्याचे वेड लावल्या बद्दल धन्यवाद. हो, खरच सांगतेय मी, तुझ्या कविता वाचुनच कितीतरी लोकाना कवितेची आवड निर्माण झाली असेल.
नेहमी कविता वाचुन अभिप्राय देतेच असे नाही. पण आज अगदीच राहवले नाही म्हणुन लिहिले. आता यापुढे प्रत्येक कविता लिहिताना, माझी वाह वाह आधीच मिळालीये असे समजुन घे:-). तुझ्या कवितेचे कौतुक करण्यासाठी तोलामोलाचे शब्द नाहीये रे :-(

तुझी प्रतिभा अशीच फुलत रहो. आणि आम्हाला असाच काव्यानंद मिळो हीच प्रार्थना (ईश्वराला आणि तुला सुद्धा)

प्रिंसेस


Vaibhav_joshi
Wednesday, January 10, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा .. गज़ल बद्दल मेल करतो .
सारंग .. मला कळलंय तुला काय म्हणायचंय ते ..
:-)
पण वर्षाच्या सुरुवातीला "धंदा" बंद करून कसं चालेल?
:-)
प्रिंसेस ... खूप खूप आभार. खरंतर मी त्यातलं एकच वाक्य घेतलंय .
"तुझ्या कविता वाचुनच कितीतरी लोकाना कवितेची आवड निर्माण झाली असेल."
तेवढंच पुरेसं आहे.
बाकी इतकं प्रेम आणि जिव्हाळा मिळाल्यानंतर सामान्य माणसाचं जे होतं तेच झालंय म्हणून एक गझल पोस्ट करतो म्हणजे जमीनीवर येइन . (मनःपूर्वक आभार)
:-)

Vaibhav_joshi
Wednesday, January 10, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावले...

ही स्तुतीवरती तरंगत चालणारी पावले
ही न माझी नेहमीची वाजणारी पावले

शैशवाचे भास सारे राहिले ह्या अंगणी
खिन्न झाली उंबरा ओलांडणारी पावले

विस्मृतीला लागली चाहूल का होती पुन्हा?
काय ती होती तुझी रेंगाळणारी पावले?

त्या जुन्या वळणावरी येशील तर दिसतीलही
सल दिमाखाने अजूनी मिरवणारी पावले

मानतो आभार त्याचे, मज मिळाली जन्मतः
एकट्याचा मार्ग आहे जाणणारी पावले

आज मी माझ्या दिशेने भरकटाया लागलो
ओळखू आली धुळीला टाळणारी पावले

वेस ओलांडून माझे मन पुढे गेले पहा..
थांबली देहास माझ्या पेलणारी पावले





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators