Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 09, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend » Archive through January 09, 2007 « Previous Next »

Hello_shree
Sunday, December 31, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहिच कि........ खुप दिवसानी सस्पेन्स स्टोरी............. क्या बात है.......

Nandini2911
Tuesday, January 02, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया जे काही म्हणाली ते वीरला समजलं नाही. आणि हे बर्‍याचदा व्हायचं.. तिच्या वयाच्या बाकीच्या मुली जेव्हा बॉयफ़्रेन्डबरोबर डिस्कोत मजा मारायच्या, तेव्हा प्रिया कॉम्प्युटरवरती concepts बनवायची. कधीच गप्पाटपा टाईमपास नसायचा. ही मुलगी इतकं निरस आयुष्य का जगते तेच त्याला कळायचं नाही. पण तरी त्याला तिच्याबरोबर काम करायला आवडायचं.
आताही तो तिच्याकडे नुसतं बघत होता. ती मात्र नेहमीसारखी शांत होती. कुठला प्रोजेक्ट तिच्यासाठी महत्वाचा आहे तिलाच ठाऊक....
"वीर." प्रियाने त्याला आवाज दिला.
"काय?" त्याने विचारलं.
"अरे, असा हरवल्यासारखा का दिसतोयस? तुझा जतिन तुझ्या नावाने बोंब मारतोय." ती म्हणाली.
"प्रिया.. कधीतरी मुलीसारखी बोलत जा.."
" Oh Really,, Mr Veer, Mr Jatin is calling you for a meeting.." ती उपरोधिक स्वरात म्हणाली. That was terrible तो म्हणाला आणि जतिनच्या केबिनमधे गेला.
जतिन टेबलवर डोकं ठेवून बसला होता.
"जतिन.." वीरने हलके आवाज दिला. जतिनने वर पाहिलं.. एखाद्या युध्दात पराभूत झालेल्या सैनिकासारखा तो दिसत होता.
तो काहीच बोलला नाही. "जतिन.. हे काय चाललय तुझ?" वीरनं विचारलं. त्याच्या आवाजात एक काळजी होती.
"वीर, तूच सांग मला..." जतिन म्हणाला. वीर काहीच बोलला नाही. जतिनने ड्रॉवरमधून एक बॉक्स काढला. आणि वीरच्या हातात दिला. वीरने उघडून पाहिलं. आत एक हिर्‍याची चमचमती अंगठी होती..

"म्हणून मी तिला long drive ला येते का विचारलं. but she reacted like i wanted to use her.. वीर मला ती आवडते. मला लग्न करायचय तिच्याबरोबर.. ती जशी आहे तशी मला चालेल. तुला माहितिये ना मी drinks सिगरेट काहीही घेत नाही. पण तिने घेतलं तरी माझं objection नाही. मी तिला खूप खूश ठेवीन.. पण.. ती.... तिला माझी किंमत नाहिये.. i dont know why.....but she hates me.. "

वीरने हातातला बॉक्स टेबलवर ठेवला. जतिन म्हणजे खजिन्याची चावी होती. किती मुली त्याच्या पाठी लागल्या अहेत याची वीरला पूर्ण कल्पना होती.
"जतिन, मला नाही वाटत की प्रियाला तू आवडत नाहीस.... मी गेले सहा महिने बघतोय तिला. तिचं दुसरं कुठेही affair नाही. मी तिला बर्‍याचदा विचारलय. तिला तू आवडतोस.. पण फ़क्त collegue म्हणून बॉस म्हणून.." वीर म्हणाला..
"वीर, ती असं का वागते?"
"माहित नाही. जतिन.. एक सांगू.. चिडू नकोस" वीर म्हणाला.
"वीर, तू माझा मित्र आहेस, आतापर्‍यंत कधी चिडलोय का मी?"
"जतिन.. तिचा विचार सोड.." वीर म्हणाला. जतिन चमकला.
"का?" त्यानं विचारलं.
"जतिन, तुझ्या घरचे कधीतरी तयार होतील? आणि काय सांगणार आहेस तू त्याना? परवा तुझी आई आणि दिदी आले होते ऑफ़िसात.. प्रिया त्याच्यासमोर सिगरेट ओढत होती. जतिन.. प्रियासारख्या मुली लग्न करत नाहित.. आणि तुझ्या खानदानात तर बिल्कुल नाही."
"तू असं का म्हणतोयस?" जतिनचा स्वर दुखावलेला होता.
"कारण, मला तुझी काळजी आहे. तू या मुलीच्या पाठी लागून आयुष्य बरबाद करतोयस.. जतिन, तुला प्रिया आवडते हे मी समजू शकतो. कुठल्याही मुलासाठी ती परफ़ेक्ट आहे..बायको म्हणून नव्हे. तू विचार कर. ही मुलगी जर लग्न करून तुझ्या घरी आली तर तिथे adjust होऊ शकेल? आणि समजा जरी झाली तरी घरचे तिला समजावून घेतील?"

जतिन शांत बसला. वीर उठला.. त्याने जतिनच्या खांद्यावर हात ठेवला.. I hope you wil understand "

वीर जेव्हा केबिनच्या बाहेर आला तेव्हा प्रिया कॉम्पुटरवरती काम करत होती. सराईतपणे तिची बोटं की बोर्डवर खेळत होती. स्क्रीनवरची नजरदेखीइल न हलवता तिने विचारलं
"सांगितलस त्याला?"
"हो." तो म्हणाला.
" good " ती म्हणाली.
त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. इतका वेळ त्याने घेतलेला समजूतदारपणाचा बुरखा आपोआप गळून पडला "तू का करतेस असं? त्याने विचारलं.
"कारण मी त्याला खड्ड्यात पडण्यापासून वाचवतेय.." प्रिया म्हणाली.
वीरला या वादाचे पुढचे सगळे मुद्दे पाठ होते. कितीतरी वेळा त्याने प्रियाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रिया. ...

"प्रिया तू वेडी आहेस,,जतिनसारखा मुलगा तुला परत मिळणार नाही. पण प्रियाने काहीच reaction दिली नाही. ती अजूनही कामातच होती.

"तुला कसला मुलगा हवाय ते तरी मला कळू दे.. " वीर चिडून म्हणाला.

की बोर्डचा खडखडाट बंद झाला. फ़क्त एका सेकंदासाठी. आणि परत सुरू झाला. वीरने प्रियाकडे पाहिलं. इतक्या दिवसात वीरला पहिल्यादा तिच्या गालावरची खळी दिसली. कारण प्रिया हसत होती.....


Himscool
Tuesday, January 02, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता काय "जस्सी जैसी कोई नही" चे पुढचे एपिसोड का?

Jhuluuk
Tuesday, January 02, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, सही जा रहे हो तुस्सी...

R_joshi
Wednesday, January 03, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी २००६ संपुन २००७ उजाडल, तरी अजुन तु कथा पुर्ण केली नाहिस. इतका सस्पेंस असह्य होतोय.:-(

Suvikask
Thursday, January 04, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुवात बरी वाटली... पण लांबण लागल्यामुळे रटाळ वाटायला लागली... कृपया लवकर सम्पवावी.
वेळेत थांबणे फायद्याचेच... नाही का?


P_sahasrabudhe
Thursday, January 04, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I agree with Suvikask, baas karava aata..

Nandini2911
Friday, January 05, 2007 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अम्मी.. कैसी है..?" रेहानने हलकेच तिच्या कानात विचारलं. अम्मीने हसून त्याच्याकडे पाहिलं. समोर नाझिया बसली होती. डोक्यावरून दुपट्टा घेतलेली, लाजलेली. पहिल्यादा रेहानला तिला असं बघत होता. तिचे आईवडील, भाऊ आले होते. सगळं ठरत आलं होतं.. त्याचा आणि रुबियाचा निकाह एकाच दिवशी करायचा असं दादाजीनी सुचवलं होतं.
घरात सगळ्याना नाझीया आवडली होती. जरी लहानपणापासुन लंडनला राहिली तरी सगळ्या रुढी परंपरा तिला येत होत्या. अब्बा मात्र शांत होते. त्यानी काहिच प्रतिक्रिया दिली नाही.

संध्याकाळी रेहानने स्वत्:हुन विषय काढला.
"अब्बा, आप कुछ बोले नही..."
"किस बारे मे?"
"आपको नाझ कैसी लगी?"
"पसन्द तो काफ़ि अच्छी है तुम्हारी.. पर Are you sure that you want to spend your entire life with her?"

रेहान चमकला.."मतलब?"
अब्बानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "बेटा, जो भी सोचना है अभी सोच लो. बाद मे तुम्हे पछताना ना पडे.."
"आपको नाझ पसंद नही.. है ना?"
"मैनि ऐसा तो नही कहा. बहोत अच्छी लडकी है..तुम्हे खुश रखेगी.. पर क्या तुम उसे खुश रख पाओगे?"
"आप क्या कह रहे हो..मुझे नही पता चल रहा है.."
"सीधी सी बात है बेटा, मैने जब तुम्हारी अम्मी को कबूल बोला था तब कभी नही सोचा था के उसे इतना दुख दूंगा. मै नही चाहता के मेरी गलतिया तुम दोहराओ. Marry Naaz only if you think she is your soulmate.."

रेहान बराच वेळ विचार करत होता. अब्बाना नक्की काय म्हणायचं होतं ते त्याला समजलं नाही. पण एक गोष्ट clear होती. अब्बाना हे लग्न मान्य नव्हतं.. आणि त्याचं कारण ते सांगणार नव्हते.



रेहानच्या लग्नाच्या तयारी सुरू झाली. असिफ़ मात्र हल्ली दिवस दिवस गायब असायचा. विचारलं तर "तुम्हारी ही campaign का काम कर रहा हू.. " असं म्हणायचा.

त्या दिवशी रेहान आणि असिफ़ आलेली गार्मेंटस बघत होते. तेवढ्यात असिफ़साठी landline वर फ़ोन आला. असिफ़ रूमच्या बाहेर गेला. रेहानला हे कलेक्शन आवडलं होतं.. कदाचित bridal असल्या मुळे असेल.....

असिफ़चा मोबाईल वाजला. रेहानने कुणाचा फ़ोन आहे ते पाहिलं. नाव नव्हतं. त्याने फ़ोन कट केला. दोन सेकंदानी परत वाजला. शेवटी वैतागुन रेहानने कॉल अटेंड केला.
"हेलो"
पलीकडून काहिच आवाज आला नाही.
"हेलो... कोई बात करना चाहता है?"
फ़ोन कट झाला. असिफ़ परत आल्या आल्या रेहान म्हणाला.. "असिफ़,तेरी किसी गर्लफ़्रेंड का फ़ोन था.. मेर्र आवाज पसंद नही आयी तो कट कर दिया.
असिफ़ने मोबाईलमधे नंबर पाहिला.
"रेहान, मुझे जाना है.."
"किधर?" रेहानने विचारले.
" campaign के लिये.."
"यार असिफ़, कभी हमको तो मिलाओ तुम्हारी इस टीम से.."
"जरूर रेहान. वक्त आने पर.."असिफ़ने त्याची बेग उचलली आणि तो निघाला.
रेहान परत त्याच्या कामात बिझी झाला.


Krups
Friday, January 05, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त चालू आहे गोष्ट. खूप दिवसांनी मायबोली वर सारखं सारखं यावस वाटायला लागलय.:-)

Jhuluuk
Friday, January 05, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, ३ दिवसाचा gap पण मोठा वाटला गं.. आता लवकर लिही, पुढे काय होणार ते..

Nandini2911
Friday, January 05, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"असिफ़.. You are always late." प्रिया म्हणाली. निळी जीन्स आणि काळा शर्ट..लांबसडक केसाचा बुचडा आणि डोळ्यावर चष्मा
"अरे यार, आने तो दो पहले. वेलकम ही ऐसे करोगे तो क्या होगा?"
असिफ़ म्हणाला. त्याने आजूबाजूला पाहिलं. शूटची पूर्ण तयारी झाली होती. काळोखातली रूम एकाच कोपर्‍यात झगमगत होती.
"कौन करेगा?" त्याने विचारलं. ती केमेराची लेन्स adjust करत होती.
"मॉडेलके बारे मे पूछ रहे हो या फोटोग्राफ़र के बारे मे..." ती म्हणाली.
"प्रिया.. मुझे पता है के मॉडेल कौन है.."
"तो फ़िर क्यु पूछ रहे हो?" तिने त्याला चिडवलं.
बाजूच्या रूममधून मेक अप करून मॉडेल बाहेर आली. असिफ़ने तिच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं त्याचं ह्रुदय उडी मारून बाहेर येणार.. आजच नव्हे तर जेव्हा जेव्हा तो तिला बघायचा तेव्हा हे असं व्हायचंच..
"पाखी.... गेट रेडी..." प्रियाने ऑर्डर सोडली.
असिफ़ आणि वीर एका कोपयात उभे राहुन शूट बघत होते. प्रिया खरं तर creative head होती. हे तिचं काम नव्हतं.. पण या असाईनमेंटमधे प्रत्येक काम प्रिया करत होती. जणू काही ही तिच्या स्वत्:च्या कंपनीची जाहिरात होती.

प्रियाने मोजून तीन शॉट्स घेतले आणि ब्रेक declare केला. बाकिच्या शूटला प्रिया एका तासात maximum शॉट्स घ्यायला लावायची पण इथे कसलीही तडजोड नव्हती. असिफ़ मात्र फ़क्त पाखीकडे बघत होता. अर्थात तिला याची जाणीव होतीच. तीही चोरून एखादा कटाक्ष त्याच्याकडे टाकत होती. तिच्या आईची नजर चुकवून.

"वीर, कैसे लगे शॉट्स?" प्रियाने त्याला विचारलं.

"प्रिया, शॉट्स मस्त होते. पण तू का करतेयस. we could have hired best photographer."
तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत हजर सुयाची धार होती.
"वीर, ही माझ्यासाठी नुसती असाईनमेंट नाही..."
"प्रिया, मला माहितिये की तू आणि असिफ़ कॉलेजमेधे एकत्र होता. त्याचं काम तुला पर्सनल वाटलं पाहिजे पण तो तर त्या पाखी भोवती फ़िरतोय." प्रियाच्या चेहर्‍यावर हसू फ़ुललं.
"वीर, तुझा घोटाळा झालाय. असिफ़ माझा फ़क्त मित्र आहे. आणि त्याला पाखीमधे interest आहे हे मलापण माहित आहे..."
"मग तरीही तू असं का करतेस? तुला जतिन नको, असिफ़ मित्र आहे. मग तुला काय अख्खं आयुष्य असंच घालवायचय?" वीर चिडला होता.
प्रियाने ओल्या रुमालाने चेहरा पुसला. असिफ़ आणि पाखी मोबाईल गेममधे गुंतले होते.

ती काहीच बोलली नाही. " next shot " ती ओरडली.
आणि परत कामात बिझी झाली. नेहमीसारखी.


Chyayla
Friday, January 05, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!!! नन्दिनी हा एकच शब्द आपसुकच निघतोय तुझी कादम्बरी वाचुन, अगदी खिळवुन ठेवलय आहे की, आता पुढचा भाग येउ दे. प्रसन्ग अगदी डोळ्यापुढे सजीव होउन उभे राहात आहेत. तुझ्या लेखनकलेचा हा नवाच पैलु समोर आला आहे. माझ्या मन्:पुर्वक शुभेछा:
तो आगे क्या हुआ?....


Yogi050181
Saturday, January 06, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फिरररर्र क्या हुआ.. फिरररर्र क्या हुआ.. :-)

Nandini2911
Saturday, January 06, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूटचा रीझल्ट मस्त होता. जतिन तर एक एक फ़ोटोवर खुश होता. पाखी नुसती सुंदर दिसत नव्हती तर नवरी वाटत होती. प्रिया आता ब्रोशर डीझाईन करत होती.

"प्रिया,.."जतिनने तिला आवाज दिला.
"येस बॉस.." ती जागेवरून उठली.
"मला वाटतं आतापर्‍यंतच हे तुझं सगळ्यात एक्सलंट काम आहे. तुला कधी creative सोडावंसं वाटलं तर मला सांग. तुझ्यासाठी फोटोग्राफ़रची जागा ऑफ़र करेन.." जतिन म्हणाला.
" Thanks for this generous offer.." प्रिया म्हणाली आणि पाठी वळली.
"प्रिया.. ही मॉडेल आपल्यासाठी exclusive हवी. मी वीरला सांगतो तिच्या एजन्सीशी contact करायला."

"मला नाही वाटत ती अजून खूप दिवस या प्रोफ़ेशनमधे राहिल..." आणि प्रिया केबिनबाहेर पडली.

ही कायम असं अर्धवट का बोलते.. जतिनला प्रश्न पडला.

वीर फ़ोटो बघत होता. "प्रिया, पाखी आली आहे... तिच्या आईसोबत.. visitors मधे बसलेत. प्रियाने त्याच्याकडे डोळे मोठे करत पाहिलं. अर्थ सरळ होता..संकट अटळ आहे.
"म्हातारीला पैसे वाढवून हवे असतील.. दुसरं काय?"


पाखीची आई एखाद्या पोत्यासारखी सोफ़्यावर बसली होती. पाखीच्या चेहर्‍यावर टेन्शन होते.
"बोलिये.." प्रिया आत येता येता म्हणाली.
पाखीच्या आईने तिच्याकडे रागाने पाहिलं. "हमको ये contract नहि मंगता. cancel करो.."
प्रिया शांतपणे बसली.
"चाय कॉफ़ी ज्युस.. क्या लेंगे?"
"कुछ नही. हमको सारा फ़ोटो देदो... तुम्हारे साथ काम नही करने का." पाखीच्या आईच्या बोलण्यात बंगाली accent होता.
"आंटी, आपको पता है ना के ऐसा करना पॉसिबल नही है..." प्रिया म्हणाली.
"वो सब हमको नै मालूम. पाखी को फ़िल्मका ऑफ़र आया है. अब वो कोई थर्ड क्लास गार्मेंटस का फ़ोटो मे नही दिखेगी..." तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत समोरचा पाण्याचा ग्लास तिच्या तोंडावर रिकामा झाला होता.
प्रिया एक एक शब्द हळू हळू उच्चारत होती.
"इससे पहले के आप कुछ बोले और मेरा गुस्सा भडक जाये आप बाहर निकलो."
पाखीच्या डोळ्यात पाणी आलं होतं..
"प्रिया, प्लीज...." ती म्हणाली.
"पाखी, इनको बाहर जाने बोलो."
पाखी आईला म्हणली.."तु बाहरे बसो.."
पण तिला तवर सूर सापडला होता. ती पाखीवर ओरडली.
"चूप रह, तु निजाकू कणा भाभीछू......"
" ओ भाभी... हिन्दी मे बोलो. ओरिया मे नही. और बाहर निकलो." प्रियाने रूमचा दरवाजा उघडून धरला. पाखीची आई जागची हलली नाही.
"बा ह र.."
पाखी आता रडायला लागली होती. प्रियाने तिच्याकडे पाहिलं.
"पाखि, रोना मत... मस्कारा फ़ैल जायेगा.." ती म्हणाली.
"आंटी, security को बुलाऊ धक्का मारने के लिये.."
आता मात्र ढोलीचा नाइलाज झाला. आणि ती रूमबाहेर पडली.
"पाखी... चलो.." तिने आवाज दिला.
"आप बाहर रुको. मुझे उससे बात करनी है.. "आणि प्रियाने दरवाजा लावून घेतला.


पाखी हमसून हमसून रडत होती. प्रियाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "अब बस करो.. लो पानी लो.. " प्रियाने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.
"प्रिया, मला आता नाही जगायचं.. "पाखी डोळे पुसत म्हणाली.
अवघी सतरा वर्षाची, काळ्या डोळ्याची पाखी पाहिल्यावर प्रियाला कायम वाटायचं हिचं एक मस्त पोर्ट्रेट काढावं...
प्रिया काहीच बोलली नाही. जगणं हा विषय तिच्या अखत्यारितला नव्हताच मुळी. तिला स्वत:ला तरी कुठं जगावंसं वाटत होतं. ...
पाखी हळू हळू शांत झाली. तिच्या रडण्याचा भर ओसरल्यावर प्रिया म्हणाली...
"कुठची फ़िल्म आहे?" पाखीला आधी नक्की काय ते समजेना.
"माहित नाही. कुठची तरी भोजपुरी आहे.. मा सगळं ठरवते."
तुला काम करायचं आहे का?" प्रियाने विचारलं.
पाखी खाली बघत होती. तिने हळूच नाही अशी मान हलवली. "का?" प्रियाने विचारलं.

"प्रिया, मला हे नाही आवडत. पण मा म्हणते इथे मला स्कोप आहे. मला शाळेत परत जायचय....."
"पाखी, एक सांगू.. तुझ्या आईचं बरोबर आहे. तुला खरंच इथे वाव आहे. जर नीट काम केलस तर टॉपला जाशील."
"पण मला काम करायचंच नाहिये.." पाखी म्हणाली.
प्रियाने परत तिच्याकडे पाहिलं. आणि ति क्षण दोन क्षण थांबली.
"तुला असिफ़ हवाय का?" तिने पाखीला विचारलं



Nandini2911
Saturday, January 06, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाखीने चमकून तिच्याकडे पाहिलं.
"माहित नाही.." ती एवढंच म्हणाली.
"पाखी, तुला काहीच माहित नाही हो ना..?"
"मला असिफ़ आवडतो. पण माझ्या घरी ते कधीच मान्य होणार नाही...:
"तू असिफ़शी बोललीअ आहेस या विषयावर.."
"नाही..."
"मी बोललेय. पाखी, मी असिफ़ला खूप वर्षापासून ओळखते. त्याचं आणि माझं नातं हे असं नाहि सांगता येणार.. पण कुठेतरी मी आणि असिफ़ एका बंधनाने बांधलो आहोत."
जे काही ऐकतोय त्यावर पाखीचा विश्वास बसत नव्हता.
"म्हणूनच पाखी मी असिफ़ला व्यवस्थित ओळखते. त्याने किती मुली फ़िरवल्या ते कदाचित त्यालाही ठाऊक नसेल. पण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच आज मी तुला विचारतेय. तुला काय हवय?"
"माहित नाही....."
"पाखी, मला हे उत्तर परत ऐकायचं नाहिये तुझ्याकडून.. "
"प्रिया, मला भिती वाटतेय... जर माझा निर्णय चुकला तर.."

प्रिया हसली.
"पाखी, तुझ्याएवढी मी होते तेव्हा मलाही हिच भिती होती. तेव्हा दुसरं कोणी नाही... पण असिफ़ काय म्हणाला माहितिये... प्रिया, निर्णय तुझा असू दे.. भले तो चुकला तरी चालेल. पण एक समाधान राहिल की निर्णय तुझा स्वत्:चा होता..."
"प्रिया, हे एवढं सोपं नाही. मा आणि घरचे सगळे माझ्यावर अवलंबून आहेत...मी इतक्या लवकर लग्नाचा विचार.... "
"एक मिनिट पाखी.. तुझा घोटाळा होतोय. मी तुला असिफ़ हवा का विचारलं लग्न करते का म्हणू नाही.."
"म्हणजे...?"
"पाखी, तुझं हे वय प्रेमात पडायचं आहे. लग्नाचं नाही. तुझ्यापुढ्यात एवढं चांगलं करीअर आहे..."
"तू सेम मासारखं बोलतेस.."
"हो.. पण माझ्या आणि तिच्यात फ़रक आहे तो intention मधे.पाखी.. ती फ़क्त तुझा विचार करतेय. मी तुझा आणि असिफ़ दोघाचा विचार करतेय... आणि मी तुला स्पष्ट सांगते. मला तुझ्यापेक्षा असिफ़ची काळजी आहे. मी त्याच्या आयुष्याचा खेळ नाही करू शकत. तो तुझ्यामधे गुंतत चाललाय. त्यामुळे तुला हे ठरवावंच लागेल की पुढे काय करायचय?"

"प्रिया.. एक विचारू.. तू कधी कुणावर प्रेम केलयस?"
प्रिया काहीच बोलली नाही.
"सॉरी, मी हे नको विचारायला हवं होतं...पण असिफ़ मला एकदा म्हणालेला प्रेम जर करायचं असेल ना तर प्रियासारखं कर.."
प्रियाने पाखीकडे पाहिलं. टेबलावरची पाण्याची बाटली उघडली. आणि त्यातलं पाणी तिने आपल्या हातावरुन सोडलं......
"पाखी. मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याला असं च सोडून दिलं.. अर्घ्य म्हणून......कायमचं.."



Nandini2911
Monday, January 08, 2007 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रे, भूक लागलीये.. काहीतरी बनव ना पटकन." प्रिया म्हणाली.
रेहान computer वरती डीझाईन बनवत होता.
"नोकर समझा है क्या मुझे? तुला भूक लागलीये.. तू बनव.."
"असं काय करतोस? मला किचनमधे काम करायला नाही आवडत, तरी ब्रेकफ़ास्ट बनवला ना मी?" प्रियाने त्याच्या गळ्यात हात टाकला.
"एहसान किया?" त्याने तिचा हात काढून घेतला. तिच्या चेहर्‍यावर रागाची एक लकीर आली. "ठीक आहे.. तू पण काहीकरू नकोस. मी पण काही करत नाही. बसते तशीच उपाशी..." ती चिडून म्हणाली. आणि हॉलमधे गेली.
रेहान तिच्या पाठून गेला. "आमरण उपोषण जिन्दाबाद..." त्याने तिला चिडवलं.
प्रियाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो किचनमधे गेला आणि फ़्रीजमधून भाज्या काढायला सुरुवात केली.
"क्या बनाऊ..." त्याने मुद्दाम ओरडून विचारलं. प्रियाकडून काहीच उत्तर आलं नाही, तसा तो बाहेर आला. प्रिया सोफ़्यावर पाय घेऊन बसली होती. तो तिच्या बाजूला बसला...
"प्रिया, मैने पुछा क्या खाओगे?.."
"कुछ भी नही,.. मेरी भूक मर गयी.." तिने उत्तर दिलं.
"अरे, ऐसे कैसे मर गयी. चलो असिफ़ को फ़ोन करो..."
तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.. "असिफ़ को क्यु?"
एखादं मोठं रहस्य सांगितल्यासारखा आव आणून तो म्हणाला..
"क्यु कि असिफ़ कभी किसीको मरने नही देता.. टाईम पे पहुन्च जाता है.. याद है ना?" त्याने तिचा गळा धरला.
तिच्या चेहयावर हलकंसं हसू उठलं.
प्रियाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"रेहान.... मटर आलू की सब्जी बनाओ..." ती हलकेच पुटपुटली..
"प्रिया..इतने romantic मूड मे तुम्हे मटर याद आ रहे है?" त्याने तिची हनुवटी धरत विचारलं.
"याद तो मुझे बहोत कुछ आ रहा है..लेकिन फ़्रीज मे सिर्फ़ मटर है.." तिने तितक्याच सीरीयसली उत्तर दिलं..
"कठीण आहे.." असं म्हणत रेहान उठला आणि किचनकडे निघाला.




Vinayaknarvekar
Monday, January 08, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा भाग ४ तासात कसा काय बदलला?.. रेहानला coffee सोडुन आलू मटर खायला लावल....:-)

Sakhi_d
Monday, January 08, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़क्त coffee एवजी मटार नाही..... नाझ एवजी प्रिया आलीय....

नंदिनी आधीची पोस्ट का डिलिटली??



Nandini2911
Tuesday, January 09, 2007 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो भाग चुकून मी आधी टाकला.. मला काय माहित एव्ढ्यानी वाचला म्हणून.... तो भाग नंतर येईल. रेहानला कॉफ़ी पण प्यायला लावू... :-)

Sakhi_d
Tuesday, January 09, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी तु लिहितेस छान पण जरा पटपट लिही ना.....
जास्त वाट बघायला लावु नकोस....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators