|
R_joshi
| |
| Wednesday, December 27, 2006 - 5:19 am: |
| 
|
नंदिनी लवकर टाक ना ग पुढची कथा. उत्सुकता अजुन ताणुन धरता येत नाहि आहे.
|
आकाशात उडालेलं विमान जमिनीवर आलें आणि रेहानच्या मनाने परत भरारी घेतली. चार वर्षानी तो परत येत होता. स्वत्:लाच दिलेलं वचन पूर्ण करून. एअर पोर्टवर त्याला भेटायला त्याच्या बहिणी आल्या होत्या.. पण त्याची नजर दुसर्याच कुणाला शोधत होती. त्याच्या बहिणी दुसर्या गाडीत बसल्या आणि तो त्याच्या आवडत्या ikon मधे. तो गाडीत बसला. आणि ड्रायव्हरकडे बघताच उडाला. "असिफ़.." " welcome back " असिफ़ म्हणाला. "ये भी कोई मजाक का तरीका है... मुझे पता था तू जरूर आयेगा" रेहानने त्याच्या पाठीत धपाटा घातला. "रेहान, मुझे पता था के तू मुझे ढुढेगा तो सोचा क्यु ना तुझे और थोडी तडपाऊ...." असिफ़ म्हणाला. गाडिने एअरपोर्ट सोडलं आणि त्याच्या गप्पाना ऊत आला. असिफ़ त्याला इथल्या सगळ्या बातम्या देत होता. रेहानच्याच कंपनीत तो कामाला लागला होता. नक्की तो काय काम करतो हे त्यालाही ठाऊक नव्हतं. पण रेहानच्या घरासाठी मात्र तो एक मोठा आधार बनला होता. शेवटी रेहानने विचारलं.. "असिफ़... प्रिया की कोई खबर?" "कौन प्रिया?" " shut up यार. प्रिया अपनी कॉलेजवाली दोस्त.." "वो जो अपने को ११ th मे मिली थी... सॉरी. उसकी कोई खबर नही. पागल थी वो. गाववाले कहते है के वो घर छोडके भाग गयी. क्यु किसीको नही पता.." रेहान खिडकीतून बाहेर बघायला लागला. आतापर्यत त्याने जेव्हा जेव्हा असिफ़ला हा प्रश्न विचारला तेव्हा तेव्हा त्याला हेच उत्तर मिळालं होतं. "रेहान, मेरी बात मान.. जादा सोच मत.. अब तक तो उसकी शादी भी हो गयी होगी." असिफ़ म्हणाला. " I dont think so.." रेहान अजूनही बाहेरच बघत होता. "असिफ़.. मुझे यकीन है.. एक ना एक दिन वो मुझे जरूर मिलेगी.." "हा, क्यु नही.. तब तक वो चार बच्चोकी अम्मा बन गयी होगी..." "मोटी भी हो गयी होगी ना,..." ते दोघं घरी पोचले तोपर्यंत प्रिया आता कशी असेल हाच विषय चालू होता. तो घरी आला होता तेव्हा सगळ्याच्या चेहर्यावर पसरलेली काळजी स्पष्ट दिसत होती. आणि ही काळजी अब्बच्या तब्बेतीची नव्हती. रेहानच्या परत येण्याची होती. तो अब्बाच्या रूममधे गेला. अब्बा झोपले होते. त्याच्या उशाशी तो शांतपणे बसून राहिला. त्याचे चाचा, दादा दादी अम्मी सगळे बघत राहिले. हाच रेहान अब्बाच्या सावलीशी सुद्धा नफ़रत करत होता. आज मात्र तो त्या द्वेषाच्या पलीकडे जाऊन पोचला होता. कुठेतरी मनातून त्याने अब्बाला माफ़ केलं होतं. त्याने हलकेच त्याच्या कपाळावरून हात फ़िरवला. घरी उत्साहाला नुसतं उधाण आलं. रेहानची सगळ्याशी चेष्टा मस्करी सुरू होती. त्याच्या येण्यानं घरात एक चैतन्य पसरलं होतं. जेवायच्या वेळेला अब्बा उठून आले. हसता खेळता रेहान पाहून त्याना आज खूप बरं वाटत होतं. एका मोठ्या जबाबदारीतून ते मोकळे झाले होते. साजिदा शॉपिंगला गेली होती.. रेहान येणार हे माहित असूनही. मुद्दामून. ती जेव्हा परत आली तेव्हा सगळे शांत बसले. रेहानकडेतर कुणी बघण्याचं सुद्धा धाडस केलं नाही. ती दरवाज्यात उभी होती. तिच्या कडेवर तिची छोटी निदा होती. तीन वर्षाची. साजिदा मनातून खूप घाबरली होती. त्याला शक्य तितकं टाळायचा तिचा प्रयत्न होता. त्याने ती आलेलं पाहिलं. "आईये.. पहचाना हमे.." रेहान म्हणाला. आणि त्याने निदाला उचलून घेतलं. पलीकडच्या रूममधून अब्बा पाहत होते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. असिफ़ बाल्कनीत बसून हे सारं पाहत होता. त्याने मोबाईलचा एक नंबर फ़िरवला....
|
Himscool
| |
| Wednesday, December 27, 2006 - 7:03 am: |
| 
|
आणि आसिफनी प्रियाला फोन लावला.. असेच आहे ना! इतक्या भागांनंतर आज पहिल्यांदा थोडेसे Predictable वाटले...
नंदिनी, तू सिरीयलची डायरेक्टर वगैरे आहेस काय? प्रत्येक वेळेस कथा कुठे थांबवायची ह्याची नॅक तुला परफेक्ट जमली आहे... लवकरच पुढचा भाग येऊ दे
|
Neelu_n
| |
| Wednesday, December 27, 2006 - 7:27 am: |
| 
|
नंदिनी सुपर्बSSSSS... बढिया लिख रहे हो.
|
त्या दिवशी झोपायला जवळ जवळ दोन वाजले. त्याच्या रूमवर आल्यावर त्याने सगळ्यात आधी पेंटिंग़ लावलं. कदाचित ते इथून आता हलणार नव्हतं. रेहानने दिल्लीचा बेसिक डिप्लोमा पूर्ण केला आणि लगेच लंडनला Fasion Merchandising ला admission घेतली. आयुष्याची चार वर्ष फ़ुकट गेली होती त्यात अजून त्याला भर टाकायची नव्हती. कॉलेजमेधे असतानाच त्याने ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली होती. यापुढे इथेच राहून करीअर करण्याचा त्याचा विचार होता. घरचा बिझिनेस चाचानी आणि त्याच्या मुलानी सांभाळला असता. तिथे सगळं कसं स्थिरस्थावर होत आलं होतं. पण ठरवलेल्या गोष्टी कधी होत असतात का? अब्बाना heart attack आला. बायपास सर्जरी वगैरे झाली. पण आता घरच्याना काळजी लागली. घरी परत ये असा लकडा सुरू झाला. तसा तो परत आला नसत पण नेमकं रुबियाचं त्याच्या तिसर्या बहिणिचं लग्न ठरलं आणि रेहान परत आला. इतक्या वर्षात काहीच बदललं नव्हतं. सगळं जसंच्या तसं होतं.... पण कुठेतरी मनाला एक रुख रुख लागून राहिली होती. काहीतरी राहुन गेलं होतं. काय ते त्यालाही आठवत नव्हतं... अचानक वीज चमकावी तसा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. पोचल्यावर फ़ोन करतो असं त्याने नाज़ला promise केलं होतं... त्याने लगेच तिला फ़ोन लावला. लाईन बिझी हिती. बिचारी.... त्याचा फ़ोन आल्याशिवाय तिला करमलं नसतं... नाज़िया... खरंच या बायका कसं इतकं प्रेम करू शकतात त्याला आश्चय वाटायचं. त्यात नाझ म्हणजे खरोखर आश्चर्य होतं. तिला भेटून अजून सहा महिने सुद्धा झाले नव्हते. पण तिने त्याच्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेतला होता.... अणि त्याने तो घेऊ दिला होता. डोळ्यावर हळू हळू झोप यायला लागली. तरी पण पेंगुळल्या डोळ्यानी त्याने नाझचा नंबर ट्राय केला पण लागलाच नाही. त्याला कधी झोप लागली हे कळले पण नाही. पण त्या रात्री जगाच्या दुसर्या कोपर्यात नाझिया वाट बघत होती रेहानच्या फ़ोनची. आणि रेहानच्याच शहरात प्रिया जागी होती येणार्या वादळाची चाहूल घेत.
|
R_joshi
| |
| Thursday, December 28, 2006 - 3:27 am: |
| 
|
नंदिनी इन्टरेस्ट वाढतोय कथेतला.
|
Jhuluuk
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:24 am: |
| 
|
नंदिनी अगदी professional सारखी लिहित आहेस, छान चालली आहे कथा. पुढचा भाग?
|
Srk
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:25 am: |
| 
|
नंदिनी, हट्स ऑफ. खुप छान लिहीतेयस.
|
भलतीच नागमोडी वळणं आहेत या कथेत. एक महिना कसा काय काढायचा?
|
भ्रमर,त्या रेहानने ४ वर्ष काढली आणि तुला १ महिना धीर देता येत नाही
|
रेहान नुसता मोबाईलकडे पाहत होता. "कॉल करो उसे..." प्रिया म्हणाली... "काही फ़ायदा नाही.. She will not answer... " रेहानने बेडवर बसत उत्तर दिलं. प्रिया त्याच्या बाजुला बसली. रेहानने विमनस्कपणे बसून राहिला. "प्रिया, उसे पता है के आज तुम यहा पे हो. मीच तिला सांगितलय." "रे.. I can understand her.. " " What? " रेहानने प्रियाकडं पाहिलं.. तिच्या डोळ्यात हलकंच पाणी होतं.. सकाळपासून ती अश्रूना परतावून लावत होती. रडणे हा तिचा स्वभाव नव्हता. कित्येकदा रेहानला वाटायचं की प्रियाने त्याच्या कुशीत हमसून रडवं आणि त्याने तिला शांत करावं.. तिची समजूत घालावी.. ती त्याची घालते अगदी तशीच.. त्याने तिचा एक अश्रू हलकेच बोटानी टिपला.. "रेहान... "तिचा आवाज गदगदून आला. "प्रिया.. एक बात बोलू... Will you marry me? " त्याने तिच्याकडे बघत विचारलं.. ती हसली विषण्णपणे.. "शादी और तुमसे.. कभी नही..." "सोच लो.. अच्छे खानदान से हू.. लाखोमे कमाता हू... जिंदगीभर खुश रखूगा तुम्हे.." "रेहान, मजाक मत करो.. " "मजाक नही कसम से.. हा.. सिर्फ़ एक बात से तुम्हे adjust करना पडेगा..." प्रिया काहीच बोलली नाही. "वो क्या है ना प्रिया..." "रेहान, अब बस करो.. मुझे सब पता है और मेरा तुमसे शादी करने का कोई इरादा नही...." ती उठली.. कित्येकदा रेहान अशी जीवघेणी चेष्टा करायचा. त्याला पूर्णपणे माहित होतं की प्रिया त्याची बिवी कधीच होणार नव्हती.. त्याचीच काय आता तर ती कुणाचीच होणार नव्हती. "रेहान.. भले लोकासाठी नसेल. पण माझ्यासाठी तर आपल्या दोघाचं लग्न केव्हाच झालंय.. तुझं आणि नाझियाचं लग्न व्हायच्या आधी...."
|
Neelu_n
| |
| Friday, December 29, 2006 - 3:13 am: |
| 
|
विनायक नंदिनी, आम्ही जीव मुठीत घेवुन आहोत... तु मायबोलीकरांना टिपं गाळायला लावणारसं दिसतय.
|
एकदम मस्त आहे. नन्दिनी तू हवी तर सुट्टी घे पण कथा लवकर सम्पव एकदाची.
|
Himscool
| |
| Friday, December 29, 2006 - 6:47 am: |
| 
|
नन्दिनी तू हवी तर सुट्टी घे पण कथा लवकर सम्पव एकदाची. >>> संतोष ही डेली कथा आहे त्यामुळे दिवसाला एकच भाग येतो आणि त्यात परत शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे तेव्हाही काही नसते...
|
अब्बा रेहानकडे नुसते बघत होते. त्यांच्या रूम मधे तो जमिनीवर बसला होता. पुढ्यात डिझाईन्स होती. सोबत लैपटॉपवर presentation चालू होतं. गेले दोन महिने खपून त्याने हे सगळं तयार केलं होतं. तो भरा भरा बोलत होता.. अब्बांचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं... डोळ्यासमोर दिसत होता तो रांग़णारा बोबडं बोलणारा रेहान... "ठीक है?" त्याने विचारलं.. अब्बा भानावर आले. "हा... रेहान .." "अब्बा, सिर्फ़ एक प्रॉब्लेम है.." तेवढ्यात असिफ़ आला. "क्या चल रहा है..." त्याने रेहानच्या डीझाईन्स पाहिले. " Too good यार. रेहान तू तो साला मास्टर हो गया." "असिफ़, इसमे से कौनसा तुम्हे पसंद है?" रेहानने त्याच्यासमोर काही डीझाईन्स धरली. "रेहान, तु क्या पुछ रहा है मुझे ये तो wedding dresses है, एकदम मस्त.. सभी अच्छे है.. कोई एक चुनना मेरे बस की बात नही. चाचा आपको क्या लगता है?" असिफ़ने अब्बाना विचारलं. "बेटा.. वैसे तो सभी अच्छे है. पर रेहान तुम किसी प्रॉब्लेम की बात कर रहे थे.." "हा.. अब्बा.. डीझाईन्स से भी जरूरी है marketing. i am thinking of an entire campign for this collection "कैसे करोगे?" असिफ़ने विचारलं. रेहानने आसपासच्या बंडलातून तीन चार magazins ची कटींग काढले. \ "ये देख.. I want this model .. दुल्हन लगती है. जिस किसीने भी ये शूट किया है उसको पता है के वो क्या कर रहा है.. I like this camaighn. मुझे इसे copy नही करना है पर मेरे दिमाग मे जो भी है वो शायद यही लोग कर पायेंगे." रेहान पुडएही बरंच काही बोलत होता. असिफ़चं मात्र एकटक त्या चित्रातली मॉडेल बघत होता. "असिफ़.. लक्ष कुठे आहे तुझं.. I m asking you something " रेहान ओरडला. "रेहान, ये camapign का काम तू मुझे दे.. जैसे चाहिये वैसे रीझल्ट्स लाके दूंगा.. " एवढं बोलून त्याने ती सगळी कटींग्स उचलली. आणि तो निघाला सुद्ध. "असिफ़.. यार बात तो सुन.." रेहानने पाठुन आवाज दिला. पण तो पर्यंत असिफ़ निघूनही गेला. "अब्बा, ये लडका अजीब है ना?" रेहान म्हणाला. पण अब्बा मात्र रेहानच्या डीझाईन्सकडे बघत होते.
|
Sati
| |
| Friday, December 29, 2006 - 10:01 am: |
| 
|
आतापर्यंत इथल्या कुठल्याही कथेची इतकी आतुरतेने वाट पाहिली नसेल. मस्तच आहे ही गोष्ट! आवडली. साती
|
प्रियाने केबिनम्धून बाहेर आली तीच मुळी वादळासारखी. तिच्या डोळ्यातून संताप धगधगत होता. वीरला तिच्याकडे पाहताच आत काय विषय झाला असेल याची कल्पना आली. " cool down " तो म्हणाला. "वीर.. हा माझा आणि माझ्या कामाचा अपमान आहे.. जर हेच सगळं करायचं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं.." ती म्हणाली. " He didnt mean it priya.. " वीर म्हणाला. प्रियाने हातातली फ़ाईल टेबलावर आपटली. "वीर, तो नालायक मला लोणावळ्याला येतेस का म्हणून विचारत होता.. तिथे काय मी राखी बांधेन ही अपेक्षा आहे का त्याची..तू त्याची बाजू घेऊ नकोस. तुम्ही सगळे पुरुष साले एकाच केटेगरीतले. कामाचे ना धामाचे. भाकरी खातात नेमाची.." "प्रिया. शांत हो. त्याने तुला ऑफ़र दिली.. काही जबरदस्ती नाही ना केली.. We all know that he likes you.. probably he loves you.. " वीरने प्रियाला खांद्याला धरून खुर्चीवर बसवलं. तिचे विस्कटलेले केस सरळ केले. "प्रिया. इतका राग येणं चांगलं नाही. या गोष्टी इथे चालतातच.. You have to adjust yourelf.." प्रिया आता बर्यापैकी शांत झाली होती. "वीर, एक वेळ अशी होती, की मला कुणीही काहीही म्हटलं तरी मी शांत असायचे.. माझ्या मेथ्सच्या टीचरने.. देशपांडे मला वर्गात कसाही बोलायचा आणि मी no reaction .. पण हल्ली तसं होत नाही.. " वीर जाऊन कॉफ़ी घेऊन आला... "कॉफ़ी घे. बरं वाटेल." "थक्स..." ती म्हणाली. तेवढ्यात केबिनमधून जतिन बाहेर आला. प्रियाचा बॉस. "प्रिया. you have an assignment. Come to my cabin for discussion " "येस सर.. " जतिन आत गेला. प्रियाने हातातला कॉफ़ीचा कप खाली ठेवला. वीर अजूनही केबिनच्या दरवाज्याकडे पाहत होता. "हा स्वत्: का बाहेर आला?" त्याने विचारलं. "हे बघायला की मी त्याच्या ऑफ़िसची मोडतोड करतेय का.." वीर हसला. "तुझा राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर जातो पण.. So new assighnment.. " "...जिला मी नाही म्हणणार आहे.. " प्रिया म्हणाली. आन्णि आत गेली.
|
आणि ती assighnment रेहानशी संबधित असणार आहे... ... ... ...
|
प्रिया केबिनमधे आली आणि शांतपणे बसली. जतिनने तिच्यासमोर एक फ़ाईल ठेवली. Interesting hai.. देख लो." तो म्हणाला.\ "मी ही असाईनमेंट करणार नाही." प्रिया फ़ाईलकडे पाहिलंसुद्धा नाही. जतिन प्रियाकडे बघत होता. तिला जॉईन होऊन अजून पाच महिने सुध्दा झाले नव्हते. तरीही असा उद्दामपणा ती करू शकत होती. "प्रिया, This is very unusual..different concept आहे. तूच तर म्हणाली होतीस ना की तुला वेगळं काहितरी हवय. दरवेळेला तेच दुल्हन आणि दिवाळी करून वैतागली आहेस म्हणून...." जतिन म्हणाला "जतिन.. Thanks पण मला नाही करायचं." आता मात्र जतिन वैतागला. का म्हणून आपण हिचं ऐकून घेतोय हेच त्याला समजेना. "प्रिया, I am not asking you, I am ordering you... Go thru this file and understand the client requirements.. This is good for your career ' "जतिन.. मला माहित आहे की तू या कंपनीचा मालक आहेस. You dont have to remind me that.. पण मी खरं सांगतेय.. " "या नकाराचं कारण कळेल?" जतिननं विचारलं. "जतिन. पर्सनल आहे. दुसरं काही नाही.." प्रिया म्हणाली. तुला सुट्टीची गरज आहे. जतिनच्या मनात विचार येऊन गेला. पण तसं म्हणाला मात्र नाही.. ही कालिकामाता केव्हा रुद्रावतार धारण करेल याचा भरवसा नाही. सतत बारा तेरा तास दररोज ऑफ़िसमधे घालवून हिला काय मिळवायचं हा प्रश्न त्याला कित्येक वेळा पडायचा. "जतिन, मी निघू?" प्रियाने विचारलं. "हो... पण परत एकदा विचार कर " तो म्हणाला. प्रिया काहिच बोलली नाही. केबिनच्या दरवाजापर्यंत गेली आणि म्हणाली.. "जतिन, तू लोणावळ्याला नक्की जाऊन ये.. तुला सुट्टीची गरज आहे.." ती केबिनबाहेर पडली जतिनला हसू आलं. तिचा सगळे नखरे सहन करून तिला नोकरीवर ठेवण्याइतका तो उल्लू नव्हता. प्रिया म्हणजे जीनीयस होती.. आतापर्यंत दिलेला प्रत्येक प्रोजेक्ट तिने successful केला होता. अवघ्या सहा महिन्यात ती या कंपनीची ओळख बनली होती. मिस प्रिया कुलकर्णी... Creative mind behind Mehta Advertising ती बाहेर पडल्याबरोबर वीरने विचारलं "काय झालं?" " nothing .. तुला ते घड्याळवाले माहितिये.. कुठचीतरी फ़्रान्सचे लोक आहेत.. त्याना त्याची घड्याळं भारतात विकायची आहेत. त्याचं केम्पेन आपण करतोय.." तिने सिगरेट पेटवत विचारलं... "प्रिया, thats great yaar.." "काय ग्रेट? मी करत नाही म्हणून आधीच सांगितलं ना.." ती म्हणाली. "पण का?" "कारण..... मी दुसर्या एका प्रोजेक्टची वाट बघतेय.. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि ग्रेट प्रोजेक्ट..." ती सिगरेटचा धूर सोडत म्हणाली. "पण.. याच्यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं?" वीरने विचारलं. "असू शकतं.. वीर... कधी कधी माझ्यासाठी माझ्याहीपेक्षा असं महत्वाचं काहीतरी असू शकतं"
|
Disha013
| |
| Saturday, December 30, 2006 - 12:48 pm: |
| 
|
मस्तच चाललय!शेवट काय असेल,याची प्रचंड उत्सुकता लागलिये. intersting!
|
|
|