|
मन लावुन बनवलेल्या डीशचा शांतपणे आस्वाद घ्यायला जशी मजा येते ना तीच अनुभवतोय! keep it up & hope that many more such delicasies will be offered by you!
|
Jhuluuk
| |
| Monday, December 18, 2006 - 2:19 am: |
| 
|
सर्वांच्या मताला अनुमोदन, वेगळी कथा आहे. पुढचा भाग?
|
"रे, असं नको ना बघूस.." प्रिया म्हणाली... "का?"त्याने नजर न हटवता विचारलं. "तुला कुणी सांगितलय की तू नालायक आहेस म्हणून..." "अब्बा कायम म्हणतात.. कधी कधी i think माझं नाव रेहान नाही.. नालायक आहे.." तो म्हणाला... प्रिया खिडकीच्या जवळ उभी होती. या घरातली तिची सगळ्यात आवडती जागा. तो तिच्या जवळ आला. तिच्या केसाची एक बट त्याने हलकेच तिच्या गालावर आली होती. त्याने ती पाठी केली. तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. "रे, मला निघायला हवं." तो काहीच बोलला नाही. "मी पुढच्या संडेला नक्की येईन.. नाहीतर आपण जायचं का बाहेर कुठे?" "प्रिया, तुम मत आना.." रेहान निर्धाराने म्हणाला. कारण तिलाही ठाउक होतं. पण त्याने कितीही येऊ नको म्हणून सांगितलं असतं तरी ती आलीच असती... नसती आली तर तो तिच्याकडे आला असता..... तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. "मेसेज है.." तो म्हणाला... त्याने मोबाईलवर पाहिलं.. आणि मोबाईल बेडवर टाकला.... "नाझिया.. है ना?" तिने विचारलं.
|
हा भलताच लहान episode !
|
Himscool
| |
| Tuesday, December 19, 2006 - 12:26 am: |
| 
|
हा भलताच लहान episode ! ह्या episode मध्ये कॅमेरा वेगवेगळ्या अँगलनी फिरवायला कॅमेरामनला फूल टू स्कोप दिला आहे रे तिने... ( हा दिवा घे बरका नंदिनी)
|
नन्दीनी, अग तुझी कथा पुढे सरकत तरी आहे....त्यामुळी लाहान हि साही episode तो हय.....येवु देत ग...तुज़्ह्या तुज़्ह्या pase नी....बाकि कथा मास्तच.....सुरेख लिखाण....
|
अकरावीची final exam झाली. आणि रेहान दिल्लीला गेला. त्याला तिथल्या एक fashion institute मधे प्रवेश मिळाला होता. तसा त्याला तो मुंबईतही मिळाल असता, पण त्यानेच घराबाहेर राहणं पसंत केलं होतं. दादाजी आणि दादी खूप खुश होते. असिफ़ मात्र खूप काळजीत होता. "रेहान ठीक राहशील ना..." तो सारखा विचारत होता. प्रियाला मात्रा आता चिंता नव्हती. गेल्या सहा महिन्यात तो खूपच बदलला होता. आणि आता तो नीट वागेल याची तिला खात्री होती. जसाजस जायचा दिवस येत गेला तसा रेहान गुमसुम झाला. त्याला प्रियाला बरंच काही विचारायचं होतं. सांगाय्चं होतं, बोलायचं होतं. अजून कितीतरी प्रश्नाची उत्तरं अधूरी वाटल्यासारखी होती. त्याची ही अस्वस्थता असिफ़ने हेरली. "रेहान, जादा सोच मत." तो म्हणाला. पण तसं करणं शक्यही नव्हतं. काहीतरी पाठी राहून गेलय याची जाणीव त्याला सतत होत होती. रेहान्चीइ अपेक्षा होती की तिने त्याला थांबवावं.. त्याला वाटत होतं, की ती त्याच्या प्रेमात पडलीये. पण प्रिया मात्र तसं काही दाखवत नव्हती.. प्रिया हे पहिल्या दिवशी त्याच्यासाठी जेवढं गूढ होतं.. तितकंच आजही होतं. रेहानची सगळी पकींग प्रियानेच केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिची गडबड चालू होती. "रेहान, अजून काही घालायचं राहिलय का बघ.. नाहितर पुढच्या आठवड्यात दादी येतील.. त्याच्यासोबत पाठवून देते.." "प्रिया, I want to talk to you" रेहान म्हणाला. "लवकर बाबा उशीर होतोय तुला" प्रिया म्हणाली. "प्रिया, मला नाही माहित आपण पुन्हा परत केव्हा मिळणार?"\ "मिळणार नाहि भेटणार.." " oh forget that.. you still remain my friend.. yes or no.? " "रेहान, एक सांगू तुला? आपण परत भेटू की नाही हा प्रश्न तुला पडातोय.. मला नाही.. कारण काही झालं तरी मी तुला भेटणार आहे.. Thats my friendship " " friendship or love? त्याने विचारलं. ती चमकली. " What do you mean by this?" " you love me?" "no" ती रूमच्या बाहेर निघाली. त्याने तिला अडवलं. "मला माहित आहे की you love me " "रेहान, हाथ छोडो माझं तुझ्यावर प्रेम नाही..." "तो फिर क्यु तुम मुझसे..... " "बात करती हू. तुम्हारी हर बात मानती हू. का मी तुला एवढं समजून घेते? का मी तुझे सगळे नखरे सहन करते? हेच विचारायचं आहे ना?" तो काहीच बोलला नाही. " I am glad that you asked me at least today. रेहान, मी promise केलं होतं की तुझी मी काळजी घेईन. It was not personal. I was getting paid for it. गिनके पैसे लिये है मैने तुम्हारे दोस्त बनने के.. अजून काही माहिती हवी असेल तर विचार तुझ्या अब्बाला. त्यानेच तर विकत घेतलय मला..." काय बोलायचं हे त्याला सुचेना.. त्याने प्रियाचा हात सोडला. ती तिथच उभी होती. त्याला वाटलं की त्याच्या डोक्याच्या ठिकर्या होतील. प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हलकेच आपले ओठ त्याच्या कानाजवळ नेले. ती हलकेच काहितरी पुटपुटली. आधी अर्धा सेकंद ती काय म्हणाली हे त्याला कळलंच नाही. ती परत म्हणाली...."एप्रिल फ़ूल" आणि रूमचा बाहेर पळाली.... आता त्याला उलगडा झाला. त्याला स्वत्:लाच हसू आलं. त्याचा प्रश्न तिने अप्रिल फ़ूल म्हणून घेतला. आणि इत अकंच नाहीतर उलटं त्यालाअच फ़सवं. प्रिया हे इतक्यात सुटणारं कोडं नव्हतंच मुळी.... पण कुणालाहि न लक्षात येणारी एक गोष्ट त्याला समजली होती. तू आता पूर्णपणे बरा झाला होता. यामधे तसं बघायला गेलं तर प्रियाचं योगदान काहीच नव्हतं. पण रेहानला वाटलं की तो बरा झालाय ते प्रियासाठी.
|
हम्म्म्म्म्म्म... आत्ता कसं बरं वाटलं... आज पटापट पोस्ट गं नंदिनी...
|
Jhuluuk
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:29 am: |
| 
|
वाह ! लगेच भरभर post वाचुन काढली.
|
छान! camera ला scope न देता प्रसंग आले की बरं वाटतं!
|
Athak
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:48 am: |
| 
|
ओह एक आगळी वेगळी कथा , छान , एका दमात वाचली
|
Santosh172
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:37 am: |
| 
|
मस्त कथा आहे. पुढ्चा भागाची वाट पहीन.
|
तो निघताना तिच्या डोळ्यात हलकंच पाणी आलं. "प्रिया, मुझे फ़ोन करना.." एवढंच तो म्हणाला.. आणि निघाला. गावाबाहेर गेल्यानंतर त्याला वाटलं अशीच गाडी परत घ्यावी आणि तिला घेऊन यावं.. ती आली असती त्याच्याबरोबर? कुणास ठाऊक? रेहानच्या डोळ्यासमोर प्रिया दिसायला लागली. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण ओझरायला लागला. तिचं त्याला समजावणं, तिचं हसणं.. "बाबा" म्हणणं, पहिल्याना बीअर घेताना केलेला कडवट चेहरा. त्याच्या हातातली सिगरेट फ़ेकून देणारि ती... प्रिया.. त्याने गाडी थांबवली.. ती आपल्या प्रेमात पडलीये... wrong Rehaan.. You are in love इतके दिवस आपण एकत्र होतो.. तेव्हा का नाही तिला सांगितलं हा प्रश्न त्याचा त्याला पडला. कदाचित तू रागावून निघून गेली असती.. कदाचित ती हो म्हणाली असती... कदाचित.. मात्र आता आयुष्याचे मार्ग बदलले होते. नव्हे,, त्यानेच बदलले होते. काय गरज होती त्याला इतक्या दूर जाण्याची? त्याने गाडी सुरू केली आणि भरधाव सोडली.. मुंबईकडे... पण तो लवकरच परत येणार होता. तिला भेटायला. पण यावेळेला तो काही बिगडा शहजादा बनून येणार नव्हता.. काहितरी बनून येणार होता. मुंबईवरुन तो लगेच दिल्लिला गेला. तिथलं कॉलेज सुरू झालं. मधे फ़क्त एकदाच प्रियाचं मेल आलं होतं... बरा अहेस ना म्हणून.. त्याने ही तिला reply केला.. पण त्यानंतर तिचं मेल आलंच नाही.. बारावीच्या अभ्यासात असेल.. तिला यावेळेला चांगले marks मिळवायचे होते... का.. ते त्यालाही ठाऊक नव्हतं. कधी कधी त्याला आश्चर्य वाटायचं.. तिच्याबद्दल आपल्याला जास्त काहीच माहित नाही.. एकदा फ़क्त तो तिच्या आईला भेटला होता. बाबाना एकदाही नाही... हळू हळू इथल्या कॉलेजात तो रमत गेला आणि मागच्या सर्व आठवणी पुसट होत गेल्या. फ़क्त प्रिया सोडून.. तसं काही तो मुद्दाम तिची आठवण काढायचा नाही... उलट तीच यायची रोज रात्री....... त्याच्या स्वप्नात
|
ह्म्म्म्म! multilocation serial नंदिनी, तुला मेल केलं होत, re नाही केलास?
|
Waiting. .. .. .. ..
|
R_joshi
| |
| Friday, December 22, 2006 - 1:46 am: |
| 
|
नंदिनी कथा लवकर लिहि ग! उत्सुकता वाढत चाललि आहे.
|
Mirachi
| |
| Friday, December 22, 2006 - 7:21 am: |
| 
|
Nandini, खुपच मस्त लिहिलयस............... मला ते priya kulkarniचं character चिक्कारसं माझ्यासारखंच दिसतयं........... anyways, पुढ्ची पोस्ट कधी पाठवतीयस............... लवकर गं, स्वप्नातसुद्धा हेच प्रसंग येतात!!!!!!!!!!!!!
|
मिरचि नावावरुन तसचं वाटतय. दिवे घे बरं
|
मीटिंग संपली आणि ती तिच्या डेस्कवर आली. मोबाईल उचलून पाहिलं तर एकाच नंबरावरून तीन मिसकॉल होते. नंबर अर्थातच ओळखीचा होता. खरंतर सध्या फ़ोन करणं गरजेचं होतं.. पण त्याहूनही तिच्यासाठी गरजेचं होतं दोन क्षण निवांतपणाचे. पण ते कधीच मिळणार नव्हते. ती washroom मधे गेली. तोंडावर पाण्याचा हबकारा मारला... जरातरी fresh वाटलं. तिने आरशात आपल्याच प्रतिबिंबाकडे पाहिलं. बघता बघता पाच वर्षे कशी गेली ते कळलंच नाही... कसं कळलं नाही.. हा प्रत्येक दिवस कसा गेला हे तिच्याशिवाय दुसर्या कुणालाच समजलं नसेल. इथे उगवणारा प्रत्येक दिवस हे एक युध्द असतं. माणसाच्या या जंगलात ती हरवून गेली होती. अख्खा दिवस इथल्या शार्कपासून वाचवण्यात जायचा आणि रात्र जायची ती दुसर्या दिवसाची रणनीती आखण्यात.. सगळ्या नकोशा आठवणी पुसायचा खूप प्रयत्न चालू होता. पण जर सगळ्याच आठवणी पुसल्या तर शिल्लक काय राहणार होतं. इतकी मोठी परिक्षा आपल्याला द्यायला लागेल असा विचार तरी कधी केला होता का आपण... the battle has begun just now.. बाहेर आली तोवर तिच्या नावाची बोंबाबोंब झाली होती.. लगेच कामाला लागायला हवं. आता फ़ोन करणं शक्य नव्हतं. रात्री बघू.. तिने मनाशी विचार केला. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला... तिने पटकन उचलला.. कोण होतं हे तिला चांगलंच माहित होतं. "काय झालं?" तिने विचारलं. "तो मुंबईला येतोय.... पुढच्या महिन्यात.... कायमचा" तिला काय बोलायचं ते सुचेना. एकीकडे तो परत येत होता. आणि दुसरीकडे भिती पण होती. समजा आपण भेटलो तर... तिने फ़ोन कट केला. तिच्या लढ्याचा हा दुसरा भाग होता. तिला लढण्यासाठी तयार होणं गरजेचं होतं.. पहिलापेक्षाही जोमाने कारण आता ही कसोटी फ़क्त तिची होती..
|
नंदिनी खल्ल्लास अजुन कित्ति वेळ वाट बघायल लावणार आहेस ग?? पण मस्तच रहस्यमय लिहितेस तु... फ़ॅन झाले मी तुझी... 
|
|
|