टपोरा थेंब.. थेंबात तुफ़ान गालावर सुकलय सार आपल गुमान.. थोड वादळ.. थोडा गोंधळ.. झाला शांत.. उद्वस्त मी, आता बसलिये निवांत..!!!
|
गड गड ढग वाजु लागले सरसर आभाळ भरुन आले झर झर सरी झरु लागल्यात मी स्तब्धच.. त्या अचानक आलेल्या पावसाने गोंधळुन उभी.. मग लक्षात येते.. दारात तु आला आहेस..!!!
|
खुप दिवसांनी शब्द रांगले.. नागमोडी वळणे घेत.. हुंदडु लागले.. मीही खळालुन हसले.. खुप दिवसांनी..!!!
|
टपोरा थेंब त्या थेंबामागे कितीक स्वप्ने.. निजलेली.. मला रात्र रात्र जागवुन सजलेली.!!! चला मैत्रिणिंनो निघाले भेटु परत कधीतरी.. तुम्ही सगळ्या खुप छान लिहिता लिहित रहा..!!!
|
लोपा, गुलमोहरवरील तुमच्या प्रतिभेची मराठी साहित्य जगत दखल घे ईल?
|
तथाकथीत साहित्यिकांना मायबोलीवर काय छापून येतय ते दाखवायला हवं
|
R_joshi
| |
| Saturday, December 16, 2006 - 3:59 am: |
| 
|
लोपा चारोळ्या छानच आहेत तुझ अचानक निघुन जाण मला नेहमीच असह्य होत एकटेपणाच्या रात्री जागवण एवढच का माझ्या हातात असत प्रिति
|
लोपा छानच लिहल आहेस. प्रिती सुरेखच.
|
R_joshi
| |
| Saturday, December 16, 2006 - 4:08 am: |
| 
|
टपो-या थेंबात निजलेली स्वप्ने बरसणा-या डोळ्यांनी ती पाहत राहणे बरसणा-या डोळ्यांनी पाहता पाहता ती स्वप्ने ही वाहुन जाणे प्रिति
|
लोपा, प्रिती.. चारोळ्या सुपर्ब आहेत.. 
|
Devdattag
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:46 am: |
| 
|
अजवरी आम्हास कोणी ओळखले ऐसे नव्हे ओळखले स्वत:स ज्यांनी ते भेटले ऐसे नव्हे
|
Devdattag
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:47 am: |
| 
|
म्हणे का फुकटात वेड्या तू जींदगी हि वेचली दाखवा त्यांना जरा ही भीड आम्ही खेचली
|
Devdattag
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:48 am: |
| 
|
कोण म्हणतो आज अमुचे जाणे खाली हाथ आहे वाहिले त्यांनी मजला ज्या त्या आसवांची साथ आहे
|
Devdattag
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:49 am: |
| 
|
होईल प्रतिवर्शी घरी ह्या हा दिन वेगळा साजरा अनोळखी येतील म्हणतील वागण्यास हा होता बरा
|
लोपा, प्रिति, देवदत्त तुमच्या चारोळ्या मस्तं आहेत. मज न कळे काय जाहले मम आयुष्य तुझंवर का वाहले? श्री
|
तू येशील!!! माझ्या स्वप्नात तू येतेस पण बोलत का नाहीस? सत्यात शोधताना मग, दिसत का नाहीस? कुठे शोधू तूला काहीच कळत नाही हे वेडं मन तूझ्याशिवाय कुठेच वळत नाही. आता अंत नको पाहू सखे तूझं रूप मला दावं ह्या बाजीरावाची मस्तानी होऊन शनिवारवाड्यात मला पावं. उद्या रविवारचा दिवस आहे तूझ्याकडे तूझी वाट पाहीन मी शनिवारवाड्याकडे माझी खात्री आहे तू उद्या शनिवारवाड्यात येशील अन् माझ्या आसुसलेल्या डोळ्यांना, तहानलेल्या काळजाला दर्शन देशील!!!! श्री
|
R_joshi
| |
| Monday, December 18, 2006 - 6:44 am: |
| 
|
देवा चारोळ्या अप्रतिम श्री कविता छान आहे कवितेच्या बीबीवर टाका
|
R_joshi
| |
| Monday, December 18, 2006 - 6:48 am: |
| 
|
ओळख स्वत:ची स्वत:ला कधी मी करुन दिली नाहि एकटे जीवन जगताना ही कधी मी एकटि राहिली नाहि प्रिति
|
R_joshi
| |
| Tuesday, December 19, 2006 - 4:24 am: |
| 
|
गेले कोठे सर्वजण झुळुकेवरुन मी एकटिच होते अन श्रावण बरसत होता तुझ्या आठवणि घेऊन जाताना मला तो रिता करत होता प्रिति
|
एकट्याने जगताना सगळ सहन कराव लागतं मनात अनेक दु:ख चेहर्यावर समाधान असाव लागतं असंख्य यातना सहन करुन सतत हसरं रहाव लागतं सगळ्या वादळांन्S न घाबरता एकट्यानेच तोंड द्याव लागत्सं सगळ्यांना एकत्र ठेवुन त्यांच्याबरोबरच रहाव लागतं सगळ्यांबरोबर मिसळुन देखील स्वत: एकटच रहाव लागतं.... स्वत: एकटच रहाव लागतं.... रुप
|